विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे ते एका कठीण शक्तींविरुद्ध लढत आहेत – आनंद महिंद्रा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीनच्या सीमेवर गेले दीड महिने सुरु असणारा तणाव आता शिगेला पोहोचला असून सोमवारी सायंकाळी दोन्ही देशातील सैनिकांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. शहिदांपैकी एक हे १६ बिहार रेजिमेंट चे कमांडर ऑफिसर संतोष बाबू हे एक होत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची टीव्ही वरील मुलाखत पाहून महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले असून ‘आपल्या विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे ते एका कठीण शक्तींविरुद्ध लढत आहेत’ असे त्यांनी लिहिले आहे.

‘शहीद कर्नल बाबू यांच्या पालकांची मुलाखत टीव्ही वाहिनीवर पाहिली. त्यांची शांतता, धैर्य आणि अभिमान बघून मी अस्वस्थ झालो आहे. आपल्या सैन्यातील  व्यक्तीच्या पालकांमध्ये असाच धीरोदात्तपणा असेल तर आपल्या विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ते एका कठीण शक्ती सोबत लढत आहेत.’ असे आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. सध्या सीमेवरचा तणाव वाढला आहे.

सोमवारी झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहिद झाल्याची माहिती मंगळवार संध्याकाळपर्यँत समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये यामुळे तणाव वाढला असून दोन्हीकडचे सैन्य सज्ज झाले आहे. भारत आणि चीनमधील काही सैन्याधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या होत्या. भारताने चीनसमोर काही अटी ठेवल्या होत्या. गेल्या दीड महिन्यात अनेकदा शांततेने हा मुद्दा सोडविण्याचे प्रयत्न झाले होते. लडाख सीमेवर भारताने रस्तेबांधणी सुरु केल्यापासून हा तणाव निर्माण झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment