जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च बॉक्सर फ्लॉयड मेवेदर उचलणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी बॉक्सिंग चॅम्पियन फ्लॉयड मेवेदरने जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्कार आणि शोकसभेचा खर्च देण्याची ऑफर केली, जी त्याच्या कुटुंबीयांनी स्वीकारली आहे. मेवेदर प्रमोशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिओनार्ड एलेर्बे यांनी सांगितले की,’ ते स्वतःच त्या कुटुंबाशी संपर्कात आहेत. फ्लॉयडचे मूळ शहर हॉस्टनमध्ये ९ जूनला त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत ज्याचा संपूर्ण खर्च ते उचलणार आहे.

मिनीयापोलिसमध्ये एका काळ्या व्यक्तीचा मृत्यू झाला जेव्हा एका पोलिसाने त्याचे हात बांधले आणि गुडघ्याने त्याचा गळा दाबला. त्यानंतर संपूर्ण देशभरात हिंसक निषेधाचा एक टप्पा सुरू झाला आहे. एलेरबेन यांनी सांगितले की, जॉर्जच्या अंत्यसंस्काराशी संबंधित सर्व खर्च मेवेदर करणार आहेत. लास वेगासमध्ये राहणारे मेवेदर अजून त्या कुटुंबाला भेटलेले नाहीत. एकदा तर त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अंत्यसंस्काराचाही खर्च उचलला होता.

या घटनेनंतर सम्पूर्ण क्रीडा जगताने या वर्णद्वेषाचा विरोध केला आहे. अलीकडेच इंग्लंड क्रिकेटने वर्ल्ड कप २०१९ च्या अंतिम सामन्याचे छायाचित्र पोस्ट करुन या वंशद्वेषाचा विरोध केला आहे. या छायाचित्रात जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हे भावनिक छायाचित्र पोस्ट करत इंग्लंड क्रिकेटने ‘आम्ही विविधतेसाठी उभे आहोत, आम्ही वर्णद्वेषाच्या विरोधात आहोत’ असे लिहिले आहे.

 

तत्पूर्वी वेस्ट इंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल म्हणाला की,’ वर्णभेद फक्त फुटबॉलमध्येच नाही तर क्रिकेटमध्येही आहे.’ गेलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “काळ्या लोकांचे जीवन हे इतर लोकांच्या जीवनसारखेच महत्त्वाचे असते. काळे लोक महत्त्वाचे असतात (ब्लॅक लाइव्ह्स मॅटर). गेल म्हणाला की, “मी संपूर्ण जगाचा प्रवास केला आहे आणि मी वर्णविद्वेषी गोष्टी ऐकल्या आहेत कारण मी काळा आहे. त्यावर विश्वास ठेवा. ही यादी वाढतच जाईल.”

chris gayle, racism, george floyd, racism in cricket, sports news, cricket, क्रिकेट, क्रिस गेल, नस्‍लवाद, स्‍पोर्ट्स न्‍यूज

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.