कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला ‘टीम इंडिया’ म्हणून विजयी करा: मोदींनी साधला खेळाडूंशी संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विराट कोहली, पीव्ही सिंधू, सचिन तेंडुलकर यांच्यासह प्रमुख खेळाडूंना कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आणि या साथीच्या विरूद्ध जागतिक लढाईत ‘टीम इंडिया’ म्हणून भारताला विजयी करण्यासाठी लोकांना जाणीव करून द्यायचे आवाहन केले.पंतप्रधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, ज्येष्ठ सचिन तेंडुलकर आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्यासह देशातील ४० हून अधिक खेळाडूंशी व्हिडिओ कॉलद्वारे एक तास बोलले.

यातील काही खेळाडूंनी आपले मतदेखील मांडले आणि मोदींनी सांगितले की त्यांच्या या मताकडे पूर्ण लक्ष दिले जाईल. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी बॅडमिंटन स्टार बी साइ प्रणीत हि देखील या कॉल मध्ये सहभागी होती.याची एक क्लिप तिने ट्विटरवर टाकली होती.

यात मोदी म्हणाले, “तुमच्या सूचनांवरही सरकार पूर्ण विचार करेल. कोरोनाविरुद्धच्या या जागतिक युद्धात टीम इंडिया म्हणून आम्हाला भारताला विजयी बनवावे लागेल. माझा विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून देशात नवीन उर्जा प्रवाहित होते. “

 

‘संकल्प, संयम, सकारात्मकता, आदर आणि सहकार्य’ हा पाच कलमी मंत्र देताना पंतप्रधान म्हणाले की, लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी भाषणाबद्दल सांगितले की, “हे संभाषण एक तासापर्यंत चालले ज्यामध्ये खेळाडूंनी आपल्या सूचना दिल्या आणि पंतप्रधानांनी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात केलेल्या योगदानाचे कौतुक केले.”

 

ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी ट्वीट केले की, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंशी बोलताना त्यांच्या सोशल मीडियाद्वारे सामाजिक अंतर राखण्यासाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि लोकांना कोरोना विषाणूची जाणीव करुन द्यावी असे आवाहन केले. ”

 

 

या व्हिडिओ कॉलमध्ये क्रीडामंत्री किरेन रिजिजू देखील सहभागी झाले होते. महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांनी बंगळुरु येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) शिबिरात कोरोना विषाणूबद्दल घेतल्या जाणाऱ्या खबरदारीविषयी सांगितले. सहभागी खेळाडूंच्या यादीमध्ये अनेक नामांकित क्रिकेटपटूंचा समावेश होता. तेंडुलकर, गांगुली आणि कोहली व्यतिरिक्त माजी वेगवान गोलंदाज झहीर खान, युवराज सिंग यांनीही भाग घेतला होता.

माजी विश्वचषक विजेता कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि केएल राहुल यांची नावेही या यादीत होती पण ते सहभागी होऊ शकले नाही. क्रिकेटपटूंबरोबरच ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता पीव्ही सिंधू, भाला फेकणारा नीरज चोपडा, बुद्धीबळ बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, धविका हिमा दास, बॉक्सर एम.सी. मेरीकॉम आणि अमित पन्हाळ, कुस्तीपटू विनेश फोगट आणि युवा नेमबाज मनु भाखर हेही या खेळाडूंनीही या व्हिडिओ कॉलमध्ये भाग घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

कोविड -१९ च्या लसीची उंदीरांवर यशस्वी चाचणी; जाणून घ्या

लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार