…अन्यथा पोलीस कारवाई करणार; गृहमंत्र्यांचा इशारा

मुंबई | राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून कलम 144 म्हणजे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर फिरू नका, अन्यथा पोलीस कारवाई करतील असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे.

आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीत दरम्यान लोकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करा व जिल्हा अंतर्गत आणि इतर राज्यांतूनही वाहतूक प्रवास करता येईल. मात्र विनाकारण बाहेर पडल्यास पोलीस कारवाई करतील. वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीची व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या वेळेची टाळेबंदी आणि आत्ताची संचारबंदी यामध्ये फरक आहे. मात्र लोकांनी स्वतःहून काळजी घेणं गरजेचं आहे. असं वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे केवळ धूळफेक’ असल्याची टीका केली होती. याबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की,’ फडणवीस यांच्या टीकेला काही अर्थ नाही सरकारने गोरगरिबांसाठी जे पॅकेज जाहीर केला आहे त्याचा लोकांना संचार बंदी च्या काळात फायदाच होणार आहे’.

आज पासून सुरू होणारी संचारबंदी ही 1 मे सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान संचार बंदी च्या काळात अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like