कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने रक्तदानाचा उपक्रम राबविण्याचे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी ठरविले. तसे त्यांनी आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे अनेक रक्तदाते आपापल्या गावी निघून गेले आहेत. अशावेळी अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते तेव्हा त्यांना ताजे रक्त मिळत नाही म्हणून पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्याचे नियोजन पवार यांनी केल्याचे राष्ट्रवादीचे आमदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आमचा कर्ण वादळाने नुकसान झालेल्यांचे अश्रू पुसतोय असे गौरवोद्गार शरद पवार यांच्यासाठी काढले.
कराड येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात हे रक्तदान घेण्यात आले. यावेळी त्यांनी विविध दानाचे महत्व सांगताना दान केले पाहिजे असे सांगितले. अन्नदान, द्रव्यदान, अवयवदान या समस्या लोकांपुढे येत आहेत.अगदी मूत्रपिंडाचे देखील दान केले पाहिजे असे ते म्हणाले. तसेच दानाची सुरुवात ही कर्णापासून होते हे सांगत असताना त्यांनी शरद पवार आमचे कर्ण आहेत. आणि तो सध्या वादळाने नुकसान झालेल्या पीडितांचे अश्रू पुसतोय असे ते म्हणाले.
कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये कराड दक्षिण, उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 300 हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्दान. यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते रक्तदात्याना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तर शरद पवार यांच्या आवाहनानुसार रक्तदान शिबिर घेण्यात आले असून त्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका कायम राष्ट्रवादीची राहिली आहे, असे मतही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.