Monday, December 15, 2025
Home Blog Page 1673

Makar Sankranti 2023 : तिळाचे लाडू बनवण्याची पध्दत अन् त्याचे फायदे जाणून घ्या

Makar Sankranti 2023 Sesame Ladoo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षातील पहिला (Makar Sankranti 2023) सण म्हणजे मकर संक्राती.. यंदा 15 जानेवारीला हा सण साजरा होतोय. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या गोचराला मकर संक्रांती म्हंटल जातं. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लोक घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ बनवतात. खास करून तीळ आणि गुळाच्या पदार्थांचा यामध्ये समावेश असतो. सध्या थंडीचे दिवस असून मकर संक्रातीला जर तुम्ही तिळाचे लाडू बनवले तर याचे वेगळे आरोग्यदायी फायदे तुम्हाला मिळतील. चला जाणून घेऊया तिळाचे लाडू कसे तयार करावे आणि आपल्या आरोग्यासाठी तिळाच्या लाडूचे नेमके कोणकोणते फायदे होतात याबाबत…

Makar Sankranti 2023  Sesame Ladoo

अशा प्रकारे बनवा तिळाचे लाडू- 

सर्वप्रथम एका कढईत तूप (Makar Sankranti 2023) गरम करून त्यामध्ये तीळ सोनेरी होईपर्यंत तळा.
तीळाचा रंग बदलल्यावर ते एका भांड्यात काढून घ्या आणि थंड करा.
आता दुसऱ्या कढईत पाणी गरम करून त्यात गूळ वितळा.
एकदा का गुळ विरघळला की त्यामध्ये तीळ, वेलची पावडर, काजू बदाम टाकून व्यवस्थित एकजीव करा
त्यांनतर आपण तयार केलेले मिश्रण किंचित थंड करा.
लाडू बनवण्यासाठी हाताला थोड्या प्रमाणात तूप लावा आणि मिश्रणाला गोल आकार देऊन लहान लाडू तयार करा.

Makar Sankranti 2023  Sesame Ladoo

तिळाच्या लाडूचे आरोग्यदायी फायदे- (Makar Sankranti 2023)

तीळ आणि गुळात आयरन, व्हिटॅमीन बी६, व्हिटॅमीन-ई, सेलेनिअम अशी पोषक तत्वे असतात.

तीळाचे लाडूचे सेवन केल्यामुळे (Makar Sankranti 2023) शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी उत्तम राहते. तसेच हृदयासंबंधित काही अडचणीही दूर होतात.

गुळामध्ये लोह असते. त्यामुळे गुळ असलेल्य्या लाडवाचे सेवन केल्यास अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.

थंडीच्या दिवसात शरीराला गरम राहण्याची आणि रोगप्रतिकार शक्तीला मजबूत ठेवण्याची तिळाचे लाडू फायदेशीर ठरतो.

तीळाच्या लाडूचे सेवन केल्यामुळे (Makar Sankranti 2023) आपली हाडे मजबूत होतात. यामध्ये असणारे कॅल्शिअमचे प्रमाण स्नायू आणि हाडांना मजबूत ठेवते.

Delhi Accident : “अंजली कारखाली असल्याची माहिती होती, पण…”, पोलीस तपासात आरोपींनी केला मोठा खुलासा

Delhi Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील कंझावाला येथे अंजली सिंग या 20 वर्षीय तरुणीला कार चालकाने 12 किलोमीटर फरपटत (Accident) नेलं होतं. या अपघातात (Accident) अंजलीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गाडी मालकासह सहा आरोपींना अटक केली होती. तसेच पोलीस सातव्या आरोपीच्या शोधात होते. दरम्यान, या प्रकरणातील सातवा आरोपी अंकुशने शुक्रवारी रात्री सुल्तानपुरी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. या आरोपींनी तपासादरम्यान मोठा खुलासा केला आहे.

या आरोपींनी गुन्हा मान्य केला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तसेच अपघातानंतर अंजली गाडीखाली अडकली असल्याचेदेखील आरोपींना माहिती होते. मात्र, भीतीपोटी त्यांनी गाडी थांबवली (Accident) नाही. अंजली खाली पडावी, यासाठी ते यु-टर्न घेत होते असे आरोपी म्हणाले. यादरम्यान अपघातापूर्वी अंजलीने मद्यप्राशन केले होते, असा दावा अंजलीची मैत्रीण निधिने केला होता.

अंजलीच्या आईने फेटाळला दावा
अपघातापूर्वी (Accident) अंजलीने मद्यप्राशन केले असल्याचा दावा अंजलीची मैत्रीण निधिने केला. तेव्हा हा दावा फेटाळून लावत हा अपघात षडयंत्र असल्याचा दावा अंजलीच्या आईने केला आहे. “मी निधीला ओळखत नाही किंवा तिला कधीही पाहिजे नाही. अंजलीने कधीही मद्यप्राशन केलं नाही. तसेच, कधीही मद्यधुंद अवस्थेत अंजली घरी आली नाही. निधी खरेच अंजलीची मैत्रिण असती तर अपघातानंतर ती निघून का गेली? हा अपघात एक षडयंत्र आहे. निधीची चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी अंजलीच्या आईकडून करण्यात आली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

डोंगरी तालुक्यांना विकासासाठी विशेष पॅकेज : आ. शंभूुराज देसाई

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
स्व. विलासराव पाटील- उंडाळकर काका यांच्या विचारांनी डोंगर दऱ्यात राहणाऱ्या भागात विकास कामांची झाली आहेत. सुपने- तांबवे भाग केवळ विकास कामांची पाठराखण करणारा असल्याने गावांची विकास कामांची भूक थांबताना दिसत नाही. परंतु मीही लोकप्रतिनिधी असल्याने काकांची दूरदृष्टी समोर ठेवून विकास कामांना प्राधान्य देत आलो आहे. शिंदे सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठीचा निधी वाढविला आहे. त्याचप्रमाणे डोंगरी तालुक्यातील विकासासाठी विशेष पॅकेज देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

गमेवाडी- पाठरवाडी (ता. कराड) येथील 20 लक्ष रुपयांच्या पोहोच रस्ता खडीकरण-डांबरीकरण, कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील, रयत कारखान्याचे संचालक प्रदिप पाटील, बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील, कोयना दूध संघाचे संचालक लक्ष्मण देसाई, कोयना बॅंक संचालक अविनाश पवार, संदिप साळुंखे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कराड तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, युवा नेते संतोष जाधव, माजी सरपंच करण जाधव, प्रदिप जाधव, जयवंत जाधव, शिवाजी जाधव, विकास कालेकर, अशोकराज उद्योग समुहाचे शरद चव्हाण व गमेवाडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, स्व. काकांच्या विचारांची पाठराखण करणारा हा भाग आहे. त्यामुळे येथे कोणतेही राजकारण केले जाणार नाही. केवळ अन् केवळ विकास कामांसह गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. यावेळी म्होप्रे, डेळेवाडी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदीश जाधव तर प्रास्ताविक वसंत जाधव यांनी केले. आभार रुपेश जाधव यांनी मानले.

सुपने गावची पाणी योजना आ. शंभूराज देसाई यांच्यामुळेच पूर्ण 
कराड तालुक्यातील सुपने गावची पाणी योजना बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. यासाठी निधी उपलब्धता करून देण्यापासून सर्व योजना पूर्ण नेण्यासाठी पालकमंत्री आ. शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला होता. त्याच्या प्रयत्नामुळेच सुपने गावाला सध्याची पाण्याची योजना मिळाली असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील यांनी सांगितले.

फलटणला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण

Phaltan Indian Medical Association

फलटण | आय. आम. ए (इंडियन मेडिकल असोसिएशन) च्या फलटण शाखेच्या नविन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ फलटण येथे डाॅ. जोशी हॅास्पिटल सभागृहात पार पडला. यावेळी आय. एम. ए फलटण शाखेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते डॉ. संजय राऊत तर उपाध्यक्षपदी डॉ. संपत वाघमारे व डॉ. संतोष गांधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाला आय. एम. ए महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, सचिव डॉ. संतोष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी इलेक्शन कमिशनचे चेअरमन डाॅ. अविनाश भोंडवे, माजी स्टेट आयएमए अध्यक्ष व बारामती आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, डिझास्टर कमीटी चेअरमन व माजी स्टेट आयएमए उपाध्यक्ष डाॅ. अमरसिंह पवार, महाराष्ट्र आयएमएचे जॅाईंट सेक्रेटरी डॉ. वैभव चव्हाण, सेंट्रल वर्किंग कमिटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. दोशी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

नवनिर्वाचित पदाधिकारी निवडीत ः- सचिव पदावर डॉ. सागर माने, उपसचिव डॉ. जनार्दन पिसाळ, खजिनदारपदी डॉ. विक्रांत रसाळ, तसेच महिला विंगसाठी उपाध्यक्ष म्हणून डॉ. सौदामिनी गांधी, चेअरमनपदी डाॅ. सुनिता पोळ व सचिवपदी डाॅ. संजीवनी राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. कुटे व इतर मान्यवरांनी नवनिर्वाचित कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. फलटण आयएमए शाखा ही महाराष्ट्रामध्ये फलटणचे नाव उंचावेल असा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमास आयएमएचे सर्व लाईफ मेंबर डॉक्टर तसेच नवीन सभासद उपस्थित होते.

आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या, आता हे महाशय…; राणेंची पवारांवर टीका

nilesh rane rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. रोहित पवारांनी आपले आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केली आहे. मात्र भाजप नेते निलेश राणे यांनी मात्र रोहित पवारांवर टीका केली आहे. अध्यक्षपदी निवड होण्यामागे रोहित पवारांचे क्रिकेटमध्ये योगदान काय? असा सवाल त्यांनी केला. तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला.

निलेश राणे यांनी खोचक ट्विट करत पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचं अभिनंदन पण अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, काल महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन कमिटीच्या बैठकीनंतर रोहित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. रोहित पवार यांसोबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय सचिवपदी शुभेंद्र भंडारकर, सहसचिवपदी संतोष बोबडे आणि खजिनदारपदी संजय बजाज यांची बिनविरोध निवड झाली आली.

शरद पवार आणि क्रिकेट यांचं नातं संपूर्ण देशाला माहित आहे. शरद पवारांनी अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशन, तसेच आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले आहे. क्रिकेटमध्ये शरद पवारांनी अनेक मोठे निर्णय घेतले होते. आता रोहित पवार सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकटच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रोहित पवार यांची कारकीर्द कशी होते हे आता पाहावं लागेल.

सकल हिंदू समाजाचा फलटणला जनआक्रोश मोर्चा

Phaltan Hindu community

फलटण | लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी, गोहत्या बंदी, लोकसंख्या नियंत्रण कायदा, वक्फ बोर्ड रद्द करणे, देशात समान नागरी कायदा लागू करणे यासारख्या विषयांवर फलटण तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे आयोजन सर्व सकल हिंदू समाजाच्यावतीने केले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दाखवली होती. या मोर्च्याला विविध पक्ष व विविध संघटना यांनी पाठींबा दिला होता. सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भगवान महावीर स्तंभ, आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक चौक, गजानन चौक, महात्मा फुले चौक मार्गे तहसील कार्यालय असा काढण्यात आला होता. यावेळी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले, लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी यासाठी स्वतंत्र कायदा करून हे सामाजिक गंभीर प्रश्नावर शासनाने निर्णय घेण्यात यावा. या संदर्भात उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रमाणे कायदा अस्तित्वात आणला आहे. त्याप्रमाणे आपल्या राज्यात कायदा अस्तित्वात आणण्यासाठी आपल्या मार्फत राज्य शासनास तात्काळ प्रस्ताव द्यावा. फलटण शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून हायस्कूल व कॉलेजसाठी व नोकरीसाठी मुली, स्त्रिया येत असतात. एसटी स्टँड परिसर, शैक्षणिक ठिकाणे, हायस्कूल, कॉलेजची परिसर, कॅफे- कॅन्टीन, उद्योग क्षेत्र अशा ठिकाणासह शहरातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. निर्भया पथक जरी कार्यरत असले, तरी मुलींना वेळेत संरक्षण मिळत नाही. यासाठी वरील ठिकाणावर पोलीस स्टेशनने टोल फ्री नंबर जाहीर करून तो लावावा. जेणेकरून काही प्रसंग उद्भवल्यास तातडीने संपर्क होऊ शकतो. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चालू करावेत.

राज्यात सुधारित गोहत्या बंदी कायद्यासह प्राणी क्लेश कायदा देखील अस्तित्वामध्ये आहे. मात्र या कायद्याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात प्रशासन करीत नाही. परिणामी राज्यातील गोवंश मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. यावर प्रभावी नियंत्रण व्हावे म्हणून विधिमंडळाने 4 मार्च 2015 अन्वये मूळ कायद्यात दुरुस्ती करून नव्याने कायदा अस्तित्वात आणला आहे. मात्र या कायद्याचे पालन करणे प्रशासनाचे कर्तव्य असताना देखील कार्यवाही व अंमलबजावणी होत नाही. तरी गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी. जिल्हा आणि तालुका स्तरावरील टास्क फोर्सच्या बैठका कधीही प्रशासन घेत नाही. त्या प्रत्येक महिन्यात चालू कराव्यात. जिल्हा नियोजन मंडळामार्फत अनुदान देऊन, तालुका आणि जिल्हास्तरावर गोहत्या बंदी बरोबरच गुटखाबंदी, स्त्री-भृण हत्या तसेच इतर सामाजविघातक बाबीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष पथक नियुक्त केलेले नाही. सदरचे पथक तात्काळ निश्चित करावे. 2447 प्रमाणे तालुक्याच्या चारही बाजूला जे रस्ते / महामार्ग आहेत त्या ठिकाणी वाहनांची तपासणी होऊन केसेस दाखल कराव्यात.

गोहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन केले म्हणून ग्रामीण व शहर पोलीस स्टेशनमध्ये ज्या केसेस दाखल झाल्या आहेत त्यामध्ये अद्याप कोणत्याही आरोपीस शिक्षा झालेली नाही. ही बाब घटनाबाह्य आणि अप्रशासकीय आहे.कायद्यातील तरतुदी प्रमाणे गोशाळांना आरोपीकडून निधी मिळत नाही याची व्यवस्था पोलीस केस दाखल करताना पोलीस स्टेशनची जबाबदारी असताना देखील करीत नाहीत. तशी व्यवस्था यापुढे करावी. यासह अन्य मागण्यांचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

 

“…तर राज्यसभेचा राजीनामा देणार का?” मुनगंटीवारांचे संजय राऊतांना खुलं आव्हान

mungantiwar and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात सध्या शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार फेब्रुवारीमध्ये पडणार असं विधान ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून आता भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) हे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, जर शिंदे- फडणवीस सरकार फेब्रुवारीनंतर टिकलं तर राज्यसभेचा राजीनामा देणार का? ज्या लेखणीने तुम्ही सामना पेपरमध्ये लिहिता. त्याच लेखणीने एक वाक्याचा राजीनामा तुम्ही देणार का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना विचारला आहे.

सुधीर मुनगंटीवारांचे राऊतांना खुले आव्हान?
कार्यकर्ते टिकत नाही. त्यामुळे न पटणारी विधान ते करीत आहे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तुमच्याकडे ताकद असेल शक्ती असेल, तसेच तुम्ही स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा सांगणारे असाल तर 15 मार्चपर्यंत सरकार पाडा असे आव्हान मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी संजय राऊत यांना दिले आहे. जर तुम्ही असे करू शकला नाहीतर चांदयापासून बांदयापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंत जनता तुमचा निषेध करेल अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

मुंबईकरांसाठी खुशखबर!! ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 20 मिनिटात?

thane to borivali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाहतूक कोंडी आणि धावपळीने त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बोरिवली ते ठाणे (Thane to Borivali) हा प्रवास आता फक्त 20 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. खरं तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे. कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA ) बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रवास करण्यासाठी तुमचा वेळ वाचणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park) हा सर्वात लांब भूमिगत बोगदा असून या दुहेरी बोगद्याचे (Double Tunnel) बांधकाम पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुरू होईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी या प्रकल्पाचे काम एमएसआरडीसीने करायचे होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते एमएमआरडीएकडे सोपवले.

रिपोर्टनुसार, या प्रस्तावित प्रोजेक्ट मध्ये दोन्ही टोकांना (ठाणे आणि बोरिवली) एकत्रितपणे 11.8 किमीचा डबल बोगदा असेल. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून एमएमआरडीएला वन्यजीव मंजुरी मिळाली आहे. आता प्रकल्प पुढे नेण्यासाठी पर्यावरण मंजुरी आवश्यक आहे.

हा बोगदा जमिनीपासून साधारण 23 मीटर खाली असणार आहे. या बोगद्यात सुरक्षा कॅमेरे, स्पीड कॅमेरे, स्मोक डिटेक्टर, वेंटिलेशन उपकरणे,अग्निशामक यंत्रे यांसारख्या सुविधा मिळतील. सध्या ठाणे ते बोरिवली हा प्रवास करण्यासाठी १ तासाहून जास्त वेळ लागतो. मात्र एकदा हा बोगदा तयार झाला की मग फक्त १५ ते २० मिनिटात तुम्ही ठाण्यावरून बोरिवलीला जाऊ शकता. या प्रकल्पासाठी मुंबईकरांना ४ वर्ष वाट पाहावी लागेल.

या पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे संरेखन बोरिवलीतील मागाठाणेच्या एकता नगर आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी-नी-वाडीच्या पुढे असेल. प्रत्येक बोगद्यामध्ये तीन लेन अशा एकूण सहा लेन्स असतील. प्रकल्पाला विलंब झाल्यामुळे याचा खर्च 11,235 कोटींवरून 13,200 कोटींपर्यंत वाढला आहे.

फलटण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा : पोलिसांची 9 जणांवर कारवाई

फलटण | सस्तेवाडी (ता. फलटण) याठिकाणी चालू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात 9 जणावर कारवाई करण्यात आली असून रोख रक्कमेसह 2 लाख 93 हजार रुपये किमतींचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, सस्तेवाडी गावच्या हद्दीत सतीश जाधव यांच्या शेताजवळ असलेल्या झाडाच्या खाली मोकळ्या जागेत जुगार खेळावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला टाकला. यामध्ये विजय जगन्नाथ घाडगे (वय- 46, रा. कुंभारभट्टी मलटण, ता. फलटण), सागर अजित जाधव (वय- 26, रा. गुणवडी, ता.बारामती), किरण भालचंद्र खरात (वय-28, रा. माळेगाव, ता. बारामती), रणजीत उर्फ गोटू शंकर जाधव (वय- 27,रा. सोमवार पेठ, फलटण), अजय यशवंत घाडगे (वय- 24 रा. निरा वाघच, ता. बारामती), रमेश नंदू कुंभार (वय- 24, रा. कुंभार भट्टी मलटण, ता.फलटण), रोहन दिलीप माने (वय- 32, रा. शुक्रवार पेठ, फलटण), अण्णा पोपट पवार (वय -30, रा. धुळेदेव ता.फलटण), ज्ञानेश्वर नारायण सुतार (वय- 34, रा. सोमंथळी) हे जुगार अड्ड्यावर आढळून आले आहेत.

संशयितांकडे 2 लाख 93 हजार रुपये किमतींचा रोख रकमेसह मुद्देमाासह फलटण ग्रामीण पोलीसांनी जप्त करण्यात आला आहे‌. अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत. नव्या वर्षात केलेल्या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांवर चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच यापुढे अशा कारवाईत सातत्या राहणार असल्याने कायदा हातात घेवू नये, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

कार रेसिंगदरम्यान मोठी दुर्घटना; ‘या’ प्रसिद्ध रेसरचा कार अपघातात मृत्यू

accident

चेन्नई : वृत्तसंस्था – आपण आतापर्यंत अनेक अपघात (accident) पहिले असतील. यातील काही अपघातांचे (accident) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशाच एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चेन्नईत रविवारी राष्ट्रीय कार रेसिंग चॅम्पियनशिपन पार पडली. या दरम्यान हा अपघात घडला आहे. या भीषण अपघातात (accident) प्रसिद्ध रेसर केई कुमार यांचा मृत्यू झाला आहे. केई कुमार हे मद्रास मोटर्स स्पोर्ट्स क्लबचे आजीवन सदस्य होते. ही रेसिंग स्पर्धा मद्रास इंटरनॅशनल सर्किट या ठिकाणी घेण्यात येत होती.

हा रेसिंग स्पर्धा सुरु असताना कुमार यांची कार स्पर्धकाच्या कारला धडकल्याने हा अपघात झाला. या धडकेमुळे केई कुमार यांची कार ट्रॅकवरुन घसरली आणि कुंपणाला आदळून जमिनीवर पडली. या अपघातानंतर (accident) लाल झेंडा दाखवून शर्यत तात्काळ थांबवण्यात आली.यानंतर केई कुमार यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

https://twitter.com/alishaabdullah/status/1612115394344685570

‘ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कुमार हा अनुभवी रेसर होता. मी त्याला अनेक दशकांपासून एक मित्र आणि प्रतिस्पर्धी म्हणून ओळखतो. त्यांच्या निधनाने MMSC शोक करत आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो असे या रेस मीटचे अध्यक्ष विक्की चंडोक म्हणाले आहेत.

हे पण वाचा :
Tour Packages : कमी पैशात करा परदेशी दौरा; IRCTC ने आणलं खास पॅकेज
LIC मध्ये महिन्याला 1358 रुपये जमा करा आणि 25 लाख रुपये मिळवा
PM Kisan Yojana : 13 वा हप्ता तुम्हांला मिळणार की नाही?
नवीन वर्षात अगदी स्वस्तात घरी घेऊन जा ‘हे’ 10 स्मार्ट अन् ब्रँडेड TV
धक्कादायक घटना : बाल्कनीत अडकलेल्या 15 वर्षीय मुलीचा आगीमुळे तडफडून मृत्यू