Monday, December 15, 2025
Home Blog Page 1672

Auto Expo 2023 मध्ये Hyundai सादर करणार ‘ही’ Electric कार; 614 किमी रेंज

Auto Expo 2023 Hyundai Ioniq 6

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या (Auto Expo 2023) वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. मार्केटमध्ये सुद्धा गेल्या काही महिन्यात एकापेक्षा एक इलेक्ट्रिक गाड्या आल्या आहेत. त्यातच आता यंदा 13 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये प्रसिद्ध वाहन निर्माता Hyundai आपली Ioniq 6 ही इलेक्ट्रिक कार प्रदर्शित करणार आहे. चला आज आपण जाणून घेऊया या गाडीचे खास वैशिष्ट्ये…

Auto Expo 2023 Hyundai Ioniq 6

गाडीचा आकार –

Hyundai Ioniq 6 ही कंपनीच्या E-GMP आर्किटेक्चरवर आधारित असून Kona EV आणि Ioniq 5 नंतर जागतिक स्तरावर ब्रँडकडून (Auto Expo 2023) ऑफर केलेली तिसरी इलेक्ट्रिक गाडी आहे. आकाराच्या बाबतीत सांगायचं झाल्यास या इलेक्ट्रिक मॉडेलची लांबी 4,855 मिमी, रुंदी 1,880 मिमी आणि उंची 1,495 मिमी आहे, तर याचा व्हीलबेस 2,950 मिमी आहे.

Auto Expo 2023 Hyundai Ioniq 6

बॅटरी पॅक आणि मायलेज –

Ioniq 6 53kWh युनिट (Auto Expo 2023) आणि 77kWh युनिटसह दोन बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे.ड्युअल मोटर सेटअप 302 bhp पॉवर आणि 605 Nm टॉर्क जनरेट करतो तर RWD सेटअप 228 bhp पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करतो. यातील 53kWh युनिट असलेल्या बॅटरी पॅकवर ही गाडी 429 किलोमीटर मायलेज देईल तर 77kWh बॅटरी सह 614 किलोमीटर रेंज मिळू शकते.

Auto Expo 2023 Hyundai Ioniq 6

फीचर्स – (Auto Expo 2023)

गाडीच्या फीचर्स बाबत सांगायचं झालयास, Hyundai Ioniq 6 मध्ये LED हेडलॅम्प, फ्लश-फिटिंग डोअर हँडल, कूप सारखी रूफलाइन, ADAS, एक टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, अॅम्बियंट लाइटिंग, एक फ्लॅट सेंटर कन्सोल मिळतो. तसेच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट आणि फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरएक डॅशबोर्डवर डिस्प्ले मिळतो .

तुमची नजर आहे का तीक्ष्ण? तर मग शोधून दाखवा 5 सेकंदात फोटोत लपलेलं एक हेलिकॉप्टर

Optical Illusion Helicopter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ, गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये विशेष करून मेंदूला चालना देणारे ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो पहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून त्या फोटो हेलिकॉप्टर आहे. ते हेलिकॉप्टर तुम्हाला शोधून दाखवायचे आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त एक टक्के लोकांनाच हे कोडे सोडवता आले असून तुमची नजर जर तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करा.

जर तुमची नजर अधिक तीक्ष्ण असेल आणि खूप विचार करत असाल तरच तुम्ही प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला खडकात लपलेलं हेलीकॉप्टर सापडेल. जर तुम्ही ५ सेकंदात हेलिकॉप्टर शोधू शकत असाल तर तुम्ही हुशार आहात हे सिद्ध होईल. तसे पाहिले तर या फोटोत असलेलं हेलिकॉप्टर शोधणे कठीणच आहे.

मात्र, ज्या कलाकाराने हे चित्र रेखाटले आहे तर ते चित्रात अशाप्रकारे लपवले आहे की ते सहज शोधता येत नाही. पण जर तुम्ही हे चित्र नीट पाहिल्यास तुम्हाला या चित्रात हेलिकॉप्टर सहज दिसेल.

‘या’ ठिकाणी आहे हेलिकॉप्टर

खूप काही प्रयत्न करू देखील तुम्ही हेलिकॉप्टर शोधू शकला नसाल तर आता आम्ही आम्ही तुम्हाला सांगतो की, हेलिकॉप्टर कुठे आहे. हेलिकॉप्टर खडकात लपले आहे, त्यामुळे ते शोधणे कठीण झाले आहे. चित्र काळजीपूर्वक पहा, चित्रात हेलिकॉप्टर कुठेही उपस्थित असू शकते. हेलिकॉप्टर चित्राच्या मध्यभागी थोडेसे वर उडत आहे.

Train Cancelled : रेल्वेकडून 320 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट

Train Cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : देशाच्या अनेक भागात आजही दाट धुक्यामुळे दृश्यमानता खूपच खराब झाली आहे. ज्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या दाट धुक्यामुळे आज (9 जानेवारी रोजी) भारतीय रेल्वेला 320 गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. खास करून जम्मू, हिमाचल, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पी. बंगालमधील रेल्वे वाहतुकीवर जास्त परिणाम झाला आहे. Train Cancelled

Indian Railway: दिल्ली-एनसीआर के लाखों यात्रियों के लिए खुशखबरी, रेलवे चलाने जा रहा 28 लोकल ट्रेनें, जान लें समय और किराया - Indian Railway Good News Good news for lakhs ...

रेल्वेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, रेल्वेकडून आज 274 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, 46 गाड्या या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्याबरोबर 39 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे तर 23 गाड्या त्यांच्या नियोजित मार्गांऐवजी इतर मार्गांवरून धावतील. दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीमुळे गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. Train Cancelled

How Indian Railways Is Leading The Way In Reducing The Nation's Carbon Footprint

ट्रेनचे स्टेट्स ऑनलाइन तपासा

रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती ऑनलाइन पुरवली जाते. रेल्वेच्या रद्द, रिशेडयूल आणि डायव्हर्ट केलेल्या गाड्यांची माहिती भारतीय रेल्वे आणि IRCTC च्या वेबसाइटवर उपलब्ध असते. तसेच रद्द झालेल्या गाड्यांची माहिती NTES या App वरूनही घेता येईल. रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटवर किंवा IRCTC च्या https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2 या वेबसाइटवर जाऊन कोणत्याही ट्रेनचे स्टेट्स तपासता येते. Train Cancelled

Planning a train trip? Railway Ministry urges to follow state-wise guidelines | Times of India Travel

रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट अशा प्रकारे चेक करा

IRCTC आणि नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम या दोघांकडून दररोज रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे आता घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट तपासता येईल. यासाठी सर्वांत आधी https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, Exceptional Trains च्या पर्यायावर क्लिक केल्यावर रद्द केलेल्या तसेच रीशेड्यूल आणि डायवर्ट केलेल्या गाड्यांची लिस्ट मिळेल. Train Cancelled

रेल्वेमधील नोकरी विषयक माहितीकरता इथे भेट द्या : Railway Recruitment 

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा

 

मविआचे नेते फक्त मंदबुद्धी नाहीत, तर त्यांचा मेंदू गुडघ्यात!; मनसे नेत्याचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतिला नेत्यांचा जो काही मेंदू आहे तो गुडघ्यात आहे. महाविकास आघाडीचे नेते फक्त मंदबुद्धी नाहीत तर त्यांचा मेंदू गुडघ्यात आहे, अशी घणाघाती टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड येथे मुलाखतीत म्हंटले आहे कि एक किंवा दोन उद्योग राज्याबाहेर गेले तर राज्याला फरक पडत नाही. फक्त गुजरातकडे का जातात हे योग्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते काहीही बोलत आहेत. आघाडीचे नेते फक्त मंदबुद्धी नाहीत तर त्यांचा मेंदू गुडघ्यात आहे.

वास्तविक पाहता एखाद्या कामाची चौकशी का होऊ शकत नाही? तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर घाबरता कशाला? पालिका आयुक्तांमध्ये एवढी हिंमत कशी येते? भ्रष्टाचार झाला असेल तरी कारवाई करू नका, असा कोणता कायदा आहे?, असा सवाल देशपांडे यांनी यावेळी केला.

शरद पवारांच्या तब्ब्येतीबाबत मोठी अपडेट; ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर येत आहे. शरद पवार उद्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होणार असून त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समजत आहे.

शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना 18 जानेवारीपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वी शरद पवारांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आधीची शस्त्रक्रिया सुद्धा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाली होती.

दरम्यान, २-३ महिन्यांपूर्वी शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्ब्येत बरी नसतानाही शरद पवारांनी तेव्हा शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला हजेरी लावली होती. त्यांनतर ते पुहा एकदा रुग्णालयात भरती झाले होते. शरद पवार हे नेहमीच आपल्या लढाऊ वृत्तीची ओळखले जातात. वयाच्या ८३ व्या वर्षी सुद्धा तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने त्यांचे दौरे सुरूच आहेत.

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या ताजे आजचे भाव

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : मजबूत जागतिक संकेतांमुळे आज भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. MCX वर आज (9 जानेवारी रोजी) सोन्याची किंमत 0.59 टक्क्यांनी तर चांदीचा भाव 0.62 टक्क्यांनी वाढला आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या ट्रेडिंग सत्रात MCX वर सोन्याचा दर 0.80 टक्क्यांनी तर चांदीचा दर 1.62 टक्क्यांनी वाढून बंद झाला होता.

आज, सकाळी 09:20 पर्यंत फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर कालच्या बंद किंमतींपासून 328 रुपयांनी वाढून 56,071 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करत होता. त्याच प्रमाणे, MCX वर आज चांदीचा दर 4311 रुपयांनी वाढून 69,586 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. Gold Price Today

आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.63 टक्क्यांनी वाढून $1,877.59 प्रति औंस झाली. त्याचप्रमाणे चांदीची स्पॉट प्राईस देखील 0.62 टक्क्यांनी वाढून 23.98 डॉलर प्रति औंस झाली. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 49,950 रुपये
पुणे – 49,950 रुपये
नागपूर – 49,950 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 56,290 रुपये
पुणे – 56,290 रुपये
नागपूर – 56,290 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
08 Jan 2023 ₹ 5,223 ₹ 41,784 ₹ 5,484 ₹ 43,872
07 Jan 2023 ₹ 5,223 ₹ 41,784 ₹ 5,484 ₹ 43,872
06 Jan 2023 ₹ 5,183 ₹ 41,464 ₹ 5,442 ₹ 43,536
05 Jan 2023 ₹ 5,223 ₹ 41,784 ₹ 5,484 ₹ 43,872
04 Jan 2023 ₹ 5,203 ₹ 41,624 ₹ 5,463 ₹ 43,704
03 Jan 2023 ₹ 5,188 ₹ 41,504 ₹ 5,447 ₹ 43,576
02 Jan 2023 ₹ 5,128 ₹ 41,024 ₹ 5,384 ₹ 43,072
01 Jan 2023 ₹ 5,153 ₹ 41,224 ₹ 5,411 ₹ 43,288
31 Dec 2022 ₹ 5,153 ₹ 41,224 ₹ 5,411 ₹ 43,288
30 Dec 2022 ₹ 5,128 ₹ 41,024 ₹ 5,384 ₹ 43,072

 

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता

कांदाटी खोरे, पर्यटन विकास व पोलीस विभागाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटन वाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल, याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरे (ता. महाबळेश्वर) येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, उपजिविकेच्या पर्यायांमध्ये विविधता उपलब्ध करुन देण्यात यावी. यामध्ये कृषी, वन, पशुधन, पर्यटन, पाणी आणि स्वच्छता याचा समावेश करावा. रस्ते जोडणी आणि दळणवळणाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करावी. ऑनलाईन सेवांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हीटी विकसीत करावी. तसेच स्थानिकांचा कौशल्य विकास आणि क्षमतावर्धन करावे. कांदाटी खोऱ्यात कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांना योग्य संधी उपलब्ध करुन द्यावी. शासकीय व्यवस्था आणि खाजगी क्षेत्र यांच्या भागीदारीतून पर्यावरणपूरक शाश्वत आणि एकात्मिक विकासासाठी सक्षम लोकसमुदाय तयार करावा.

पर्यटनवाढीसाठी ठिकठिकाणी होम स्टेची व्यवस्था विकसित करावी. कोयना जलाशयाच्या काठी टेन्ट व कॉटेज सारखी व्यवस्था निर्माण करावी. नौका पर्यटन आणि जंगल मुक्कामासह ट्रेकिंगची सोय उपलब्ध करुन द्यावी. पशुधनावर आधारित शेतकरी उत्पादक संघटना विकसित करुन त्यांचा बिझनेस प्लॅन तयार करावा. मध गोळा करणे, त्या वरील प्रक्रिया आणि विक्री यासाठी व्यवसाय योजना तयार करावी. तापोळा, महाबळेश्वर, खेड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये सुधारणा तसेच जलवाहतुकीमध्ये सुधारणा करण्यात यावी. तसेच कांदाटी खोऱ्यातील सोळा गावांसाठी सक्षम अशी आरोग्य सुविधा निर्माण करावी.

पुस्तकाचं गाव भिलार ब वर्ग पर्यटन दर्जा मिळणेबाबत, कास पुष्पपठार येथील रस्ते विकास व परिसर निसर्ग पर्यटन आराखडा तयार करावा, किल्ले प्रतापगड संवर्धन व विकास कामे , किल्ले प्रतापगड पायथा येथे शिवप्रतापसृष्टी उभारणे, सातारा जिल्ह्यातील 26 पर्यटन स्थळांचा व शहिद तुकाराम ओंबाळे यांच्या जन्मगावी स्मारक उभारणे या विषयांचाही आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला.

पोलीस विभाग आढावा
राज्य शासनाने पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर दिला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाणे, अत्याधुनिक यंत्रणा, निवासस्थाने यासह इतर सुविधा देण्यात येणार असून, पोलीस विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही,अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Dr. Vishwas Mehindale : ज्येष्ठ माध्यमतज्ञ, अभिनेते, लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

Dr. Vishwas Mehindale

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दूरदर्शनवर पहिले वृत्तनिवेदक म्हणून कारकीर्द गाजविणारे हे डॉ. विश्वास मेहेंदळे (vishwas mehendale) यांचे सकाळी मुलुंड येथे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. मागच्या 2-3 महिन्यांपासून ते आजारी होते. डॉ. मेहेंदळे (vishwas mehendale) गेले काही दिवस मुलुंड येथे त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास होते. त्याच ठिकाणी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. सोमवारी मुलुंड या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

दूरदर्शनवर वृत्त निवेदक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर त्यांचा माध्यमांशी स्नेहाचा धागा जुळला. अमोघ वक्तृत्वासाठी प्रसिध्द असलेल्या डॉ. मेहेंदळे (vishwas mehendale) यांनी नाटकातसुद्धा काम केले आहे. एकच प्याला, नांदा सौख्य भरे, प्रेमा तुझा रंग कसा, भावबंधन अशा विविध नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘मला भेटलेली माणसे’ हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम त्याकाळी खूप लोकप्रिय होता.

विश्वास मेहेंदळे (vishwas mehendale) यांनी साहित्यिक म्हणूनदेखील स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. आपले पंतप्रधान, मला भेटलेली माणसे, नरम गरम हा कथासंग्रह अशा एकूण 18 पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये त्यांनी काम केले होते. याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकपददेखील भूषवले होते.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

घारेवाडीत भाजपाची सत्ता : गुप्त मतदानात काॅंग्रेसचा सदस्य फुटला

Gharewadi Gram Panchayat

कराड प्रतिनिधी| सकेलन मुलाणी
घारेवाडी (ता. कराड) येथे सरपंच पदासाठी अडीच वर्षानंतर घेण्यात आलेल्या फेर निवडणुकीत सत्ताधारी काॅंग्रेसच्या काका- बाबा गटाला भाजपाने धक्का दिला. बहुमत असतानाही काॅंग्रेसमधील अंतर्गत मतभेदामुळे सत्ता राखण्यात अपयश आले आहे. सदस्याच्या मतदानात सत्ताधारी गटाचा सदस्य फोडत भाजपाच्या सुवर्णा जाधव सरपंचपदी विजयी झाल्या. निवडीनंतर भाजप गटाच्या समर्थकांनी फटाक्याची अतिषबाजी करत गुलालाच्या उधळणीत जल्लोष केला.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डी. सी. दिक्षित व मंडलाधिकारी श्री. रमेश ढाणे यांनी काम पाहिले. तलाठी रामदास जाधव ग्रामसेविका जयश्री केंगले यांनी त्यांना सहकार्य केले. भाजपकडून प्रकाश ताटे, हिंदुराव घारे, उमेश घारे, अमित माने अणि सुरेश घारे, प्रमोद ताटे यासह कार्यकर्त्यानी सत्ता स्थापनेसाठी परिश्रम घेतले. घारेवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक 2021 मध्ये झाली होती. ग्रामपंचायतीच्या ९ जागासाठी झालेल्या तिरंगी लढतीत पृथ्वीराज बाबा गटाला 4, उंडाळकर काका गटाला 2 तर भाजपच्या अतुल भोसले गटाला 3 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी सत्तेसाठी बाबा- काका गट एकत्र आले होते. काका गटाच्या एकाच सदस्याला बरोबर सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी सुवर्णा घारे सरपंच झाल्या. त्यानंतर आता ठरल्याप्रमाणे दुसऱ्यास संधी देण्यासाठी सुवर्णा घारे यांनी राजीनामा दिला होता.

त्यामुळे सरपंच निवड निवडणुक प्रक्रिया पुन्हा पार पडली. सरपंच पदासाठी सुवर्णा घारे, अरूणा घारे अणि भाजपाकडून सुवर्णा जाधव तीन अर्ज दाखल झाले होते. यापैकी सुवर्णा घारे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला. अरूणा घारे व सुवर्णा जाधव या दोन उमेदवारासाठी गुप्त पध्दतीने मतदान झाले. नाट्यमय घडामोडीत भाजप गटाने खेळी केली. सत्ताधारी बाबा-काका गटाचा एक सदस्य आपल्याकडे घेत धक्का दिला. सरपंचपद भाजप गटाकडे खेचून आणण्यात यश आले अन् सुवर्णा जाधव विजयी झाल्या. घारेवाडी ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता स्थापन केली. सरपंच निवडीनंतर भाजप गटाच्या कार्यकर्त्यानी फटाक्याची अतिषबाजी करून गुलालाची उधळण केली.

मी बीडीओ, मुलगा वकील म्हणत राज्य मार्ग खटाव तालुक्यात ट्रॅक्टरने नांगरला

Tractor Plowed Road

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
मी रिटायर बीडीओ, मुलगा वकील त्यामुळे मी सगळा डांबरी रस्ता उकरू शकतो, असे म्हणत चक्क काही महिन्यापूर्वीच तयार केलेला राज्य मार्ग 143 ट्रॅक्टरने नांगरला आहे.  वंजारवाडी (लक्ष्मीनगर) येथील शामगांव खिंड, पारगाव, गोरेगांव, पुसेसावळी, वंजारवाडी (लक्ष्मीनगर), गणेशवाडी, औंध असा असलेला राज्य मार्ग पुसेसावळी येथील रस्त्यालगत नांगरण्यात आला आहे. तेव्हा रस्त्यांचे नुकसाना करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

गावातीलच शेतकरी श्रीरंग दादू खोत आणि ट्रॅक्टर मालक रमेश लक्ष्मण खोत यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट केली आहे. यावेळी शेताशेजारील रस्ता नाल्यासह साईड पट्टीही डांबरीकरण पर्यंत नांगरून टाकली आहेत. तसेच रस्त्यावर असलेली नंबरी दगडेही ट्रॅक्टरच्या सहाय्याने हलवली आहेत. याबाबत विचारणा करणाऱ्या ग्रामस्थांना संपूर्ण रस्ता नांगरला तरीही माझं कोणीच काही करू शकत नाही. मी स्वतः सेवानिवृत्त गटविकास अधिकारी असल्याने मला कायदा माहिती आहे, असे सांगत आहे.

सेवानिवृत्त बीडीओ यांच्याकडून असे बोलले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झाले, असून संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी. त्याकरिता येत्या बुधवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दोषीवर कारवाई न झाल्यास तहसील कार्यालय खटाव समोर लक्ष्मीनगर ग्रामस्थ आत्मदहन करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.