Monday, December 15, 2025
Home Blog Page 1678

‘दीड फुटांचा आमदार अन्…’, नितेश राणेंवर टीका करताना विद्या चव्हाणांची जीभ घसरली

Vidya Chavan And Nitesh rane

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण (vidya chavan) यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ‘दीड फुटाचा आमदार तीन फुटांची जीभ असल्यासारखं बोलतो. अजित पवारांवर बोलण्याआधी तुम्ही कोण आहात, याचा विचार करा,’ अशी टीका विद्या चव्हाण (vidya chavan)यांनी केली आहे.

नेमक्या काय म्हणाल्या विद्या चव्हाण
जागर महागाईचा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेवेळी विद्या चव्हाण यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही ‘कामाख्या देवीकडे जाऊन जादू टोणा करून सत्ता आणली पण ती टिकणार नाही. आमच्याकडे साडेतीन शक्तीपीठं आहेत. तुम्ही कामाख्या देवीला जाता, कारण तिकडे जादूटोणा चालतो म्हणून,’ असे विद्या चव्हाण (vidya chavan) म्हणाल्या आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत तर स्वराज्य रक्षक आहेत,असं वक्तव्य अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली. त्यांनी राज्यात ठिकठिकाणी याबाबत आंदोलने केली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख धरणवीर असा केला. त्यांच्या या टीकेला अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तरसुद्धा दिले होते.

हे पण वाचा :
Tour Packages : कमी पैशात करा परदेशी दौरा; IRCTC ने आणलं खास पॅकेज
LIC मध्ये महिन्याला 1358 रुपये जमा करा आणि 25 लाख रुपये मिळवा
PM Kisan Yojana : 13 वा हप्ता तुम्हांला मिळणार की नाही?
नवीन वर्षात अगदी स्वस्तात घरी घेऊन जा ‘हे’ 10 स्मार्ट अन् ब्रँडेड TV
धक्कादायक घटना : बाल्कनीत अडकलेल्या 15 वर्षीय मुलीचा आगीमुळे तडफडून मृत्यू

महाराष्ट्रातील एका गावात 95 हजार एकराच्या शेताला बांधच नाही, 12 किमीचं शेत विनाबांध

Farm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शेतीच्या बांधावरून (dams) होणारी भांडणे ही पिढ्यानपिढ्या चालूच आहेत. खासकरून महाराष्ट्रात याचं प्रमाण खूपच जास्त आहे. कधी कधी हा वाद इतका टोकाला जातो की एखाद्याचा जीवही जातो. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. इंचभर (dams) जागेवरून देखील हे वाद होतानाचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेजारी तर सोडा पण सख्ख्या भावा भावात हे बांधावरून वाद झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात आहेत. पण हे सर्व बाजूला ठेवून तुम्हाला म्हंटलं कि एक गाव आहे जिथं शेतीला बांधच नाहीत, तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. पण हे खरं असून आपल्या महाराष्ट्रात एक गाव असं आहे. त्याबद्दल आज जाणून घेऊया..

शेकडो वर्षांची परंपरा
राज्यातील हे एकमेव गाव असेल जिथे बांधावरून (dams) कधीही भांडण झाले नाही आणि होतही नाही. या गावात शेताची हद्द निश्चित करण्यासाठी दगड लावले जातात किंवा झाडे लावले जातात. हे गाव सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात आहे. मंगळवेढा येथील शेतीला बांध न करण्याची शतकानुशतके जुनी परंपरा आहे. बांधावरून काही आक्षेप असले तरी ते आपसात सामोपचाराने तातडीने सोडवले जाते. या परिसरात संपूर्ण जमीन हि कोरडवाहू आहे. कुणाच्याही शेतात विहीर नाही. संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ज्वारी आणि हरभरा ही प्रमुख पिके म्हणून या भागात घेतली जातात. साधारणपणे वर्षातून एकच पीक या भागात घेतले जाते जे कि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.

12 किलोमीटरपर्यंत अशीच शेती
मंगळवेढा म्हणजे ज्वारीचे काेठार. या शिवाराच्या शेतात कुठेही बांध नाही. मंगळवेढा-साेलापूर राेडलगत शेताच्या चारही दिशांना 12 किलाेमीटरपर्यंत शेतात बांधच (dams) नाहीत. हे क्षेत्र थोडे थोडके नसून तब्बल 38 हजार हेक्टर आहे. म्हणजेच 95 हजार एकर आहे. आता विचार करा कि एवढी जमीन कशी बिना बांधाची असू शकते. पण म्हणतात ना सर्वांचे विचार सारखे असले आणि समजूतदारपणाची भूमिका असेल तर सर्व काही शक्य होऊ शकतं.

सुपीक जमीन, तशी माणसेही समजदार
या भागातील जमीन सुपीक आणि सपाट आहे. 40 फुटांपर्यंत काळी माती असल्याने जमिनीचा पाेत बदलत नाही. पावसामुळे या जमिनीत बांध टिकत नाहीत. मग शेतकरी शीव किंवा हद्द ओळखू यावी म्हणून फक्त एक फुटाचा दगड उभा करतात किंवा एखादे झाड लावतात.

एकमेकांना समजून घेत शेती
बांधावरून भांडणे झाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. कधी कधी जीवही जातो. पण, मंगळवेढ्यात शेतकरी एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढतात. बांधावरून भांडण कधीच होत नाही असे गावातील सेवानिवृत्त शिक्षक व शेतकरी ग्यानीबा फुगारे यांनी सांगितले.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

Tour Packages : कमी पैशात करा परदेशी दौरा; IRCTC ने आणलं खास पॅकेज

Tour Packages

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात (Tour Packages) तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत परदेशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे . भारतीय रेल्वे अगदी कमी खर्चात आणि सर्व सुविधांसह एक खास पॅकेज घेऊन आलं आहे. या पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या 50 हजार रुपयांत थायलंड आणि बैंकॉकला जाऊ शकता. या पॅकेजमध्ये तुमच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोयसुद्धा करण्यात आली आहे.

Tour Packages

काय आहे IRCTC चे पॅकेज- Tour Packages

IRCTC ने नवीन वर्षाच्या निमित्त 5 रात्री आणि 6 दिवसांचे पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही थायलंड, बँकॉक आणि पट्टायाला जाऊ शकता. या ठिकाणांना तुम्ही एकटे किंवा कुटुंबासह भेट देऊ शकता. 21 जानेवारी ते 26 जानेवारी 2023 च्या कालावधीत ही tour आहे. कोलकात्यापासून या सफारीला सुरुवात होणार आहे. म्हणजेच कोलकाता ते थायलंड असा प्रवास तुम्हाला करता येणार आहे. या प्रवासाला सुरुवात झाल्यांनतर सर्वप्रथम ही tour कोलकाताहुन सर्वप्रथम बँकॉकला जातील., त्यानंतर तेथून तुम्हाला पट्टायाला नेले जाईल.

Tour Packages

IRCTC च्या या पॅकेजमध्ये तुमच्या राहण्याचा (Tour Packages) आणि खाण्यापिण्याचा सुद्धा समावेश आहे. मात्र इतर कोणत्याही अतिरिक्त खर्चासाठी मात्र तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील. राहण्यासाठी हॉटेलची सोय करण्यात येईल तसेच तेथून आजूबाजूला फिरण्यासाठी गाड्यांची सोय सुद्धा याच पॅकेजमध्ये करण्यात आली आहे.

Tour Packages

IRCTC वेबसाइटनुसार, थायलंडला जाण्यासाठी (Tour Packages) या पॅकेजची किंमत एका प्रवाशासाठी 54,350 रुपये आणि डबल यात्रीसाठी 46,100 रुपये असेल. याशिवाय, या पॅकेजच्या माध्यमातून 3 व्यक्ती प्रवास करत असतील तरी सुद्धा प्रति व्यक्ती 46100 रुपये द्यावे लागतील. तुम्हाला सुद्धा थायलंडला जाण्याची इच्छा असेल तर IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करू शकता.

LIC मध्ये महिन्याला 1358 रुपये जमा करा आणि 25 लाख रुपये मिळवा

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ही भारतातील सर्वात मोठी विमा प्रदाता आहे. त्याची टॅग लाइन आहे – जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. हे अगदी बरोबर आहे. कारण LIC पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो आणि लाइफ कव्हर देखील मिळते. LIC सतत नवीन पॉलिसी जारी करत असते. आज आम्ही तुम्हाला एलआयसी जीवन आनंद पॉलिसीबद्दल सांगणार आहोत, जी तिच्या सर्वात लोकप्रिय पॉलिसींपैकी एक आहे. या पॉलिसीचा वापर करून तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात. या योजनेची अधिक माहिती जाणून घ्या.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांगले
एलआयसी जीवन आनंद पॉलिसी त्यांच्यासाठी अधिक चांगली आहे ज्यांना त्यांचे पैसे अनेक वर्षे गुंतवून ठेवायचे आहेत. ही दीर्घकालीन बचत योजना आहे. ज्या लोकांना त्यांचा निवृत्ती निधी उभारायचा आहे त्यांनी ही पॉलिसी निवडावी. ज्या लोकांना तात्काळ पैशांची गरज नाही त्यांना या पॉलिसीचा फायदा होणार आहे. या पॉलिसीमध्ये लॉक-इन कालावधी जितका जास्त असेल तितके पॉलिसीचे फायदे अधिक असतील.

LIC जीवन आनंद पॉलिसीच्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक बोनस मिळतो. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला 125 टक्के मृत्यू लाभ मिळेल. LIC जीवन आनंद पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम रु 1 लाख आहे. कमाल रकमेची मर्यादा नसताना. पुढे, 25 लाख रुपयांची विमा रक्कम मिळविण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल हे जाणून घ्या.

तुम्हाला रोज 45 रुपये गुंतवावे लागतील. ही रक्कम दरमहा 1358 रुपये आहे. या रकमेसाठी आवश्यक कालमर्यादा 35 वर्षे असावी. म्हणजे इतकी वर्षे पॉलिसी ठेवावी लागेल. 35 वर्षांच्या मुदतीनंतर, गुंतवणूकदाराला 25 लाख रुपये मिळतील.

एलआयसी कन्यादान पॉलिसी
LIC कन्यादान पॉलिसीमध्ये, तुम्ही मुदतपूर्तीच्या वेळी परतावा मिळविण्यासाठी फक्त तीन वर्षांसाठी प्रीमियम भरणे निवडू शकता. योजनेचा लाभ घेण्यासाठी, गुंतवणूकदाराला तीन वर्षांसाठी वार्षिक सुमारे 50,000 रुपये जमा करावे लागतात. कन्यादान धोरणातील एक अतिशय महत्त्वाची अट म्हणजे गुंतवणूकदाराचे किमान वय किमान 30 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. दुसरी अट म्हणजे गुंतवणूकदाराची मुलगी किमान 1 वर्षाची असावी. एलआयसी कन्यादान पॉलिसीचा किमान मॅच्युरिटी कालावधी 13 वर्षांचा आहे तर विमा रकमेसाठी प्रीमियम भिन्न असू शकतो. एलआयसी कन्यादान पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला काही कागदपत्रे जसे की आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तुम्ही एकूण रु. 10 लाख गुंतवण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला 22 वर्षांसाठी 3,901 रुपये मासिक हप्ता जमा करावा लागेल. तीन वर्षांनंतर, म्हणजे पॉलिसी सुरू झाल्यापासून 25 वर्षांनी, मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्हाला 26.75 लाख रुपये मिळतील. LIC च्या अशाच इतर अनेक पॉलिसी आहेत, ज्या तुम्हाला कमी गुंतवणुकीत चांगला परतावा देऊ शकतात.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

Bank FD Rates : ‘या’ बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर; FD व्याजदरात मोठी वाढ

Bank FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात तुम्ही FD मध्ये गुंतवणूक (Bank FD Rates) करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला नवीन वर्षात मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करून सुरक्षित मार्गाने मजबूत परतावा मिळवायचा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा सारख्या अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँका मुदत ठेवींवर म्हणजेच FD वर 7% किंवा त्याहून अधिक व्याज देत आहेत. चला सविस्तरपणे जाणून घेऊया या बँकेचा FD दराचा तपशील…

Canara Bank

कॅनरा बँक (Canara Bank) – Bank FD Rates

कॅनरा बँक ₹3.25 टक्के ते (Bank FD Rates) वार्षिक ₹7 टक्के पर्यंत FD व्याज देत आहे. 7 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवर ही बँक 3.25 टक्के व्याज देते. 46 दिवस ते 90 दिवसांच्या ठेवींवर आणि 91 ते 179 दिवसांच्या ठेवींवर कॅनरा बँकेत 4.50 टक्के व्याज मिळू शकते. कॅनरा बँक 666 दिवसांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक वार्षिक 7 टक्के परतावा देत आहे. 2 वर्षे आणि त्याहून अधिक परंतु 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी कॅनरा बँकचा एफडी दर 6.80 टक्के आहे, तर 3 वर्षे आणि त्याहून अधिक परंतु 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 6.75 टक्के व्याज मिळेल.

PNB Bank

पंजाब नॅशनल बँक (PNB)-

PNB बँकेने सुद्धा आपल्या FD (Bank FD Rates) व्याजदरात वाढ केली आहे. 1 जानेवारी 2023 पासून वर्ष ते 665 दिवसांच्या कालावधीसाठी पंजाब नॅशनल बँकेत वार्षिक 6.75 टक्के व्याज मिळेल. तसेच 666 दिवसांच्या मुदत ठेवीवर PNB मध्ये 7.25% वार्षिक परतावा मिळत आहे. याशिवाय, PNB ने 667 दिवस ते 2 वर्षे आणि 2 वर्षांवरील आणि 3 वर्षांपर्यंतचे FD दर 6.75 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत.

bank of baroda

बँक ऑफ बडोदा (BoB) –

26 डिसेंबर 2022 पासून, बँक ऑफ बडोदा तिरंगा प्लस एफडी योजनेत 399 दिवसांत गुंतवणूक करण्याची संधी देत ​​आहे. सामान्य नागरिकांना या मुदत ठेवीवर गुंतवणुकीसाठी ७.०५ टक्के व्याज मिळत आहे. हा BoB FD दर सरकारी मालकीच्या बँकेने ऑफर केलेल्या सर्व मुदतीत सर्वाधिक परतावा आहे. सामान्य मुदत ठेवींवर, बँक ऑफ बडोदा 3 टक्के ते 6.75 टक्के एफडी दर देत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना आणि अतिशय ज्येष्ठ नागरिकांनाही जास्त व्याज देईल. हे FD दर बँक ऑफ बडोदा FD खात्यात ₹2 कोटींपेक्षा कमी ठेवींसाठी लागू आहेत.

Whatsapp कडून युजर्सना नवीन भेट! आता इंटरनेटशिवाय करता येणार चॅट

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – युजर्सच्या चांगल्या अनुभवासाठी Whatsapp सतत नवनवीन फीचर्स जोडत आहे. अ‍ॅप डेव्हलपर्सनी हे प्लॅटफॉर्म आणखी एक पाऊल पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. Whatsapp चे नवीनतम फीचर याचा पुरावा आहे. अ‍ॅपने जगभरातील वापरकर्त्यांसाठी प्रॉक्सी सपोर्ट सुरू केला आहे. Whatsapp कडून गुरुवारी याची माहिती देण्यात आली. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने Whatsapp वापरकर्ते इंटरनेटशिवायही या प्लॅटफॉर्मवर कनेक्ट राहू शकतील. केवळ त्यांच्या फोनवरच नव्हे तर परिसरात इंटरनेट नसले तरीही वापरकर्ते Whatsapp सेवा वापरू शकतील. या फीचरच्या मदतीने Whatsapp वापरकर्ते जगभरातील स्वयंसेवक आणि संस्थांच्या प्रॉक्सी सर्व्हर सेटअपद्वारे कनेक्ट राहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे हे फीचर….

काय आहे Whatsapp चे नवीन फीचर्स
Whatsappने म्हटले आहे की प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट केलेले असतानाही, वापरकर्त्यांना गोपनीयता आणि सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याची गरज नाही. त्यांना पूर्वीप्रमाणेच गोपनीयता आणि सुरक्षा मिळत राहील.त्यांचे संदेश एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यादरम्यान यूजर्सचे मेसेज कोणीही पाहू शकणार नाही. ना प्रॉक्सी नेटवर्कवर, ना मेटा किंवा स्वतः WhatsApp वर.

व्हॉट्सअ‍ॅपने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘इंटरनेट बंद कधीच होऊ नये, या 2023 सालासाठी आमच्या शुभेच्छा.’ Whatsapp ने पुढे म्हंटले कि ‘गेल्या काही महिन्यांपासून इराणमध्ये ज्या प्रकारची समस्या आपण पाहत आहोत, शेवटी ते मानवाधिकार नाकारतात आणि लोकांना तातडीने मदत मिळण्यापासून रोखतात.आम्हाला आशा आहे की हा उपाय लोकांना मदत करेल, जिथे सुरक्षित आणि विश्वासार्ह-संवादाची गरज आहे.

कशा प्रकारे वापराल हे फीचर्स
नवीन पर्याय Whatsappच्या सेटिंग्ज मेनूमध्ये आढळेल. तुमच्या फोनवर WhatsApp ची नवीनतम आवृत्ती असणे आवश्यक आहे. कंपनीचे म्हणणे आहे की जर तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा असेल तर तुम्ही सोशल मीडिया किंवा सर्च इंजिनवर विश्वासार्ह प्रॉक्सी स्रोत शोधू शकता.

प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट राहण्यासाठी, तुम्हाला WhatsApp सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा पर्याय मिळेल. तुम्हाला प्रॉक्सी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला Use Proxy च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि प्रॉक्सी अ‍ॅड्रेस टाकून सेव्ह करावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही हे नेटवर्क नंतर वापरण्यास सक्षम असाल. कनेक्शन यशस्वी झाल्यास, तुम्हाला चेकमार्क दिसेल. जर काही कारणास्तव प्रॉक्सी कनेक्शन जोडल्यानंतरही तुम्ही संदेश पाठवू शकत नसाल, तर ते ब्लॉक केले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला दुसरे प्रॉक्सी नेटवर्क वापरावे लागेल.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी

PM Kisan Yojana : 13 वा हप्ता तुम्हांला मिळणार की नाही? ‘या’ List मध्ये करा चेक

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) ही एक लोककल्याणकारी योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील पात्रअसलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये असे वर्षाकाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 12 हप्ते देण्यात आले असून 13 व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

जे पात्र शेतकरी 13 व्या (PM Kisan Yojana) हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना यावेळी पीएम किसान योजनेचे पैसे मिळतील की नाही हे त्यांच्या स्टेटसमधील मेसेजद्वारे कळू शकते. जर शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळेल की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी प्रथम जमीन बियाणे, केवायसी आणि त्यांच्या पात्रता संबंधित माहिती तपासावी.जर स्टेटसमध्ये या तिघांच्या पुढे YES लिहिले असेल तर तुमच्या खात्यात 13व्या हप्त्याची रक्कम येऊ शकते. जर NO लिहिले असेल तर मात्र तुमच्या खात्यावर पैसे येणार नाहीत.

असं करा चेक- (PM Kisan Yojana)

सर्वप्रथम पात्र (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांनी अधिकृत किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ ओपन करावं. येथे तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस चा पर्याय दिसेल.
बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा, त्यानंतर या योजनेशी संबंधित रजिस्ट्रेशन नंबर किंवा 10 अंकी मोबाइल क्रमांकावर क्लिक करा.
यानंतर, खाली दिलेल्या बॉक्समध्ये वेबसाइटच्या स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा.
यानंतर, शेतकऱ्याच्या वेबसाइटवर दिसणार्‍या Submit बटणावर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला समोरच्या स्क्रीनवर स्टेटस दिसेल.
यामध्ये e-KYC, पात्रता आणि जमीन बीजारोपण समोर (YES) होय किंवा (NO) नाही लिहिलेले आहे ते तुम्हाला समजेल.

कराड उत्तरचे ऋणानुबंध कायम जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
तुमच्यामुळे लोकसभेत मला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. खासदार, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व आमदार असताना मतदारसंघाचा गौरव वाढविण्याचा मी सतत प्रयत्न केला आहे. कराड लोकसभा मतदारसंघातील कराड उत्तरचे जुने ऋणानुबंध कधीही विसरणार नाही. हे ऋणानुबंध कायम जपणार आहे. असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. अंतवडी (ता. कराड) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांची कराड उत्तर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभ व आ. पृथ्वीराज चव्हाण तसेच निवासराव थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या १२ कोटी १४ लाख रुपयांच्या विविध विकासकामाचे भूमिपूजन, उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी सरपंच मुकुटराव शिंदे अध्यक्षस्थानी होते.

कराड उत्तरमध्ये साखळी बंधारे उभारण्याचे काम माझ्या हातून मुख्यमंत्री असताना झाल्याचे मोठे समाधान वाटते. अंतवडी येथे पाझर तलावासाठी मी मुख्यमंत्री असताना विशेष निधी मंजूर केला होता. विकासकामात श्रेयवादाची लढाई करणे चुकीचे आहे असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. देशात भाजपच्या माध्यमातून द्वेष निर्माण केला जात आहे. बंधुत्व, समता, न्याय, स्वातंत्र्य याला सुरुंग लावायचा. विषमतेच्या वातावरणात देश नेवून पुन्हा वर्णाश्रम पद्धती आणायची चालली आहे. याला आपल्यातील काही माणसे स्वतः च्या स्वार्थासाठी मदत करत आहेत. देशातील अस्थिरतेचे व विषमतेचे वातावरण बदलविण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे असे त्यांनी म्हंटल.

यावेळी, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जेष्ठ नेते मारुतीशेठ जाधव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहनराव माने, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश नलवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दिक्षीत, नंदकुमार जगदाळे, कोयना सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भिमराव डांगे, दिपक लिमकर, जे. के. पाटील, कराड उत्तर सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष उमेश साळुंखे, यशवंत चव्हाण, शिवाजी विद्यापीठ सिनेटचे सदस्य अमित जाधव, शैलेश चव्हाण, उमेश मोहिते, इंद्रजित जाधव, आनंदराव चव्हाण, विजय कदम, लहुराज यादव, दादासाहेब चव्हाण, सतीश इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीन वर्षात अगदी स्वस्तात घरी घेऊन जा ‘हे’ 10 स्मार्ट अन् ब्रँडेड TV

smart tv

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षात तुम्ही जर एखादा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दरवेळी खास ऑफर देणाऱ्या फ्लिपकार्टने सध्या आपल्या ग्राहकांसाठी बिग बचत धमाल सेल सुरु केला आहे. आम्ही आपल्याला दहा स्वस्त, स्मार्ट आणि ब्रँडेड टीव्हींबाबत माहिती देणार आहोत. कि त्यामध्ये Blaupunkt, Realme, Mi आणि Vu सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. सर्वात स्वस्त 50 इंचाचा टीव्ही 7 हजार 699 रुपयांना विक्रीत उपलब्ध आहे आणि सर्वात स्वस्त 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 10 हजार रुपयांना उपलब्ध आहे. हि अनोखी ऑफर उद्या 8 तारखेपर्यंत आहे.

‘हे’ आहेत सर्वात स्वस्त 50 इंच स्मार्ट टीव्ही

1) Cybersound 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

47 हजार 999 रुपयांचा MRP असलेला हा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 28 हजार 999 रुपयांना या याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच तुम्हाला यावर 18 हजार 300 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांपर्यंतची बँक ऑफर देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त 7 हजार 699 रुपयांमध्ये हा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.

2) Infinix X3 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV (50X3)

Infinix ब्रँडचा स्मार्ट टीव्हीची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. हा 50 इंचाचा असलेला स्मार्ट टीव्ही 26 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला 11 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेऊन तुम्ही फक्त 12 हजार 999 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

3) realme 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

तब्बल 42 हजार 999 रुपयांच्या किंमतीचा असलेला हा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 28 हजार 999 रुपयांना मिळत आहे. तसेच तुम्हाला 16 हजार 900 पर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि त्यावर देखील 3 हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त 9 हजार 99 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

4) SENS Pikaso 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

50 इंचाचा असलेला स्मार्ट टीव्ही हा सध्या 48 हजार 690 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, हाच टीव्ही केवळ 24 हजार 999 रुपयांना आपल्याकडे मिळणार आहे. यावर 11 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त केवळ 10 हजार 999 मध्ये हा टीव्ही खरेदी करू शकता.

5) Mi X Series 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

Mi X Series चा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही 44 हजार 999 रुपयांचा असून हा फक्त 34 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला 16 हजार 900 रुपयांपर्यंत टीव्ही खरेदीवर एक्सचेंज बोनस आणि 3 हजारापर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त 15 हजार 99 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

पहा सर्वात स्वस्त ‘हे’ 55 इंचाचे पाच स्मार्ट टीव्ही

1) Coocaa 138 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

Coocaa ब्रँडचा 73 हजार 990 रुपयांचा MRP असलेला हा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही 32 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला 11 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त 18 हजार 999 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता येणार आहे.

2) Mi X Series 138 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

नावारूपास आलेल्या Mi ब्रँडचा 54 हजार 999 रुपयांचा MRP असलेला हा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही 39 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला 19 हजार 900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त 17 हजार 99 रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करता येणार आहे.

3) KODAK 7XPro 139 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

KODAK ब्रँडचा सुमारे 46 हजार 999 रुपयांचा असलेला हा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही 30 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी टीव्ही खरेदीवर 11 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त 16 हजार 999 रुपयांमध्ये टीव्ही घरी घेऊन जाऊ शकता.

4) SENS Pikaso 140 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

SENS Pikaso ब्रँडचा हा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही 29 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला 11 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त 15 हजार 999 रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करता येणार आहे.

5) Vu 138 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart WebOS TV

Vu ब्रँडचा 65 हजार रुपयांचा MRP असलेला हा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही 29 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला 16 हजार 900 पर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजारपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त 10 हजार 90 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता येणार आहे.

Online Order केलेली बिर्याणी खाताच महिलेचा झाला मृत्यू; मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

online biryani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अन्नातून विषबाधा (Food poisoning) झाल्याची आणखी एक संशयास्पद घटना समोर आली आहे. Online Order केलेली बिर्याणी खाताच केरळ येथील एका 20 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अंजू श्रीपार्वती (Anju Sriparvati) असे सदर महिलेचं नाव असून त्यांनी 31 डिसेंबर रोजी कासारगोड येथील रोमान्सिया नावाच्या रेस्टॉरंटमधून ऑनलाइन बिर्याणी (Online Biryani) ऑर्डर केली होती. ती खाल्ल्यानंतर त्यांना त्रास सुरु झाला. त्यांनतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी महिलेच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेचा मृत्यू हा शनिवारी सकाळी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. खरं तर बिर्याणी खाऊन त्रास झाल्यानंतर या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथून तिला कर्नाटकातील मंगळुरू येथील दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्याचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी घटनेचा अहवाल देण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्तांना देण्यात आले आहेत. डीएमओ देखील या घटनेची आणि मुलीला देण्यात आलेल्या उपचारांची पाहणी करत आहेत असे वीणा जॉर्ज यांनी सांगितलं. अन्न सुरक्षा आणि स्टॅंडर्ड कायद्यांतर्गत (FSSA) अन्नातून विषबाधा केल्याचा आरोप असलेल्या हॉटेल्सचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

धक्कादायक म्हणजे या आठवड्याच्या सुरुवातीला, कोट्टयम मेडिकल कॉलेजच्या एका नर्स चा कोझिकोडमधील भोजनालयातील अन्न खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नर्स रेश्मी राज (33) यांनी येथील हॉटेल पार्कमधून ‘अल फहम’ हा अरबी चिकन डिश मागवला होता. मात्र ते चिकन खाताच त्यांची तब्ब्येत बिघडली. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यातच आज हे अजून एक नवं प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.