Saturday, December 13, 2025
Home Blog Page 1679

आता बाळ झाल्यावर आईप्रमाणंच वडिलांनाही मिळणार 12 आठवड्यांची सुट्टी

father the birth of the baby.

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसूती काळात आणि त्यानंतर बाळाच्या आईला महिला नोकरदाराला १२ आठवड्याची भरपगारी रजा दिली जाते. तर राज्यात महिला शासकीय कर्मचाऱ्यांना 2017 च्या शासन निर्णयान्वये 180 दिवसापर्यंत “विशेष रजा”अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. मात्र, आता आईप्रमाणे बाळाच्या वडिलांनादेखील अशी रजा घेता येणार आहे. प्रसिद्ध असलेल्या फायझर कंपनीने त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतला असून वडील झाल्यावर कर्मचाऱ्यांना 12 आठवड्यांची सुट्टी दिली जाणार आहे.

पॅटर्निटी लिव्ह अंतर्गत फायझर कंपनीत मोठा संख्येने कर्मचारी काम करत आहेत. कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले जातात. काम कंपनीच्यावतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला असून काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बाप झाल्यास चार टप्प्यामध्ये ही पॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे. तसेच बायोलॉजिकल बाळांच्या वडीलांनाही ही 12 आठवड्यांची सुट्टी लागू होणार आहे. याबाबत अधिकृत धोरण फायझर कंपनीने गुरुवारी जाहीर केले आहे.

कंपनीकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कमीत कमी दोन आठवडे आणि जास्तीत जास्त सहा आठवड्यांपर्यंत कर्मचाऱ्यांना सुट्टी घेता येणार आहे. तर 12 आठवड्यांची पितृत्व रजा पॉलिसीमुळे पुरुष सहकाऱ्यांना आणि त्यांच्या जोडीदाराबरोबर पालकत्वाचा आनंद घेता येणार आहे.

फायझर इंडियाचे डायरेक्टर पीपल एक्सपिरिअन्स शिल्पी सिंह यांनी पॅटर्निटी लीव्हवर कंपनीचे मत मांडले आहे. ‘फायझरमध्ये, आम्ही जे काही करतो त्याचे सगळे लक्ष हे कर्मचारी असतात. आमचा विश्वास आहे की प्रगतीशील कार्यक्षेत्राचे भविष्य म्हणजे सगळ्यात आधी कर्मचाऱ्यांचा विचार करायचा. 12-आठवड्यांची पितृत्व रजा पॉलिसी आमच्या पुरुष सहकाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नींना पालकत्वाचा अनुभव आणि आनंददायक क्षण जपण्यास नक्कीच मदत करेल.’

महिला नोकरदारांना 12 आठवड्यांची भरपगारी रजा

कामगार कायद्यानुसार प्रसूती काळात महिला नोकरदारांना 12 आठवड्यांची भरपगारी रजा मिळते, प्रसूती आणि त्यानंतरच्या काळात आईसह बाळाला विश्रांती मिळावी अन् बाळाच्या आरोग्याच्या, संगोपनाच्या दृष्टीने ही रजा आता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सूनबाई जोरात : कालेच्या शीतल देसाईंना Olympic मध्ये नेमबाजीत गोल्डसह 2 सिल्वर मेडल

Sheetal Desai Sports

कराड | पुण्यात शिव छत्रपती स्टेडियम बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेत काले गावच्या 34 वर्षीय सूनबाईने चक्क गोल्ड मेडलसह 2 सिल्वर मेडल जिंकले आहे. शूटींग क्रिडा प्रकारात काले येथील शीतल प्रीतम देसाई यांनी तीन पदके जिंकली आहेत. आता त्याचे लक्ष्य हे जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातून जवळपास 10 हजार 456 खेळाडूंनी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बहुउद्देशीय महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेत 39 क्रिडा प्रकार होते. या स्पर्धेत शीतल देसाई यांनी मिळवलेले यश सातारा जिल्ह्यासह काले गावासाठी अभिमानास्पद आहे. शीतल यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये नॅशनलाही 50 मीटर शूटींग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे.

शीतल देसाई या कृष्णा साखर कारखान्याचे माजी संचालक डाॅ. अजित देसाई यांच्या सूनबाई आहेत. त्याचे संपूर्ण प्रशिक्षण कराडमध्येच कोच सारंग थोरात यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. गेल्या 10 वर्षापासून त्या शूटींगचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना एक तीन वर्षाचा मुलगाही आहे.

शीतल देसाईंना तीन पदके 
शीतल प्रीतम देसाई यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेत शूटिंगमध्ये 50 मीटर पिस्टल प्रकारात 1 गोल्ड आणि 10 मीटर एअर पिस्टल व 25 मीटर .22 मध्ये  सिल्वर पदक पटकवले. आता 11 जानेवारी रोजी दिल्ली येथे इंटरनॅशल ट्रायल सिलेक्शनसाठी जाणार आहेत. आपले ध्येय जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे शीतल देसाई यांनी सांगितले.

सानिया मिर्झा टेनिसमधून घेणार निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार शेवटचा सामना

sania mirza

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सानिया मिर्झाच्या (sania mirza) चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सानिया मिर्झा (sania mirza) लवकरच टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे. सानिया मिर्झाने (sania mirza) याची घोषणा केली आहे. सानियाला झालेल्या इंज्युरीमुळे तिने हा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत तलाकच्या बातम्या चर्चेत असताना हि बातमी समोर आल्याने चाहते नाराज झाले आहेत.

पुढील महिन्यात दुबई टेनिस चँपियनशिपमध्ये ती खेळताना दिसणार आहे. दुबाईतला तिचा सामना करिअरमधला अखेरचा सामना असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुबईत होणारा WTA1000 इव्हेंट ही तिच्या करिअरमधली शेवटची स्पर्धा असेल.टेनिसच्या डबल्समध्ये जगातील नंबर एकची खेळाडू राहिलेली सानिया मिर्झा 2022 या वर्षाच्या अखेरीस निवृत्ती घेणार होती. कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिने काही काळ निवृत्ती पुढे ढकलली.

शोएबसोबत तलाक?
सानिया मिर्झाने (sania mirza) पाच महिने डेटिंग केल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत 2010 मध्ये लग्न केलं होतं. 30 ऑक्टोबर 2018 रोजी यांना मुलगा झाला. इजहान मिर्झा मलिक असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. आता पाकिस्तानी मीडियातून सानिया आणि शोएबच्या तलाकच्या बातम्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.

हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…

जिथं बोलवेल तिथं जाऊन मी संजय राऊतला… ; नारायण राणेंनी राऊतांना दिला थेट इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून त्यांना संसदेत सांज राऊत माझ्या बाजूला बसून मातोश्रीबद्दल काय काय सांगतो हे सांगणार आहे. हे ऐकल्यावर उद्धव आणि रश्मी ठाकरे स्वतःच राऊतांना चप्पलेने मारतील. खरं तर शिवसेनेला संपवण्याचे काम मी करत नसून संजय राऊतच खरी शिवसेना संपवतोय. संजय राऊत जिथं बोलावेल तिथं जाऊन त्या ठिकाणी त्याला भेटेन. राऊतसमोर जाऊन उभा राहीन बघुया काय करतो ते,” असे आव्हान भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुंबईत राम कदम यांच्यावतीने आयोजित काशी यात्रेसाठी तब्बल 3 हजार यात्रेकरूंच्या मोफत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री राणे म्हणाले की, शिवसेनेच्या पहिल्या चाळीस वर्षात शिवसेना वाढविण्यासाठी आणि सर्वकाही करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली. संजय राऊतांनी घेतली आहे. शिवसेना संपवण्याचा संजय राऊतांना जो आनंद होत आहे ना तो आपण पाहतोय.आता बाराही आमदार राहिलेले नाहीत शिवसेनेत आणि त्याचा शेवट करायला राऊत तयार आहे.

संजय राऊत कोणाला चॅलेंज देतोयस? एक तरी राऊताचे विधायक, विकासात्मक, धार्मिक कार्य सांगावे. मला रक्त फिरण्याचं चॅकेंज देतो. मी स्वतः प्रोटेक्शन मागितलेली नाही. पोलिसांनी जबरदस्तीने मला १९९० सालापासून प्रोटेक्शन दिले. हे राऊतला माहिती नाही. तेव्हा तो शिवसेनेत नव्हता. माझ्या अंडर 7 कोटी 30 लाख उद्योगपती आहेत. तर संजय राऊताला उद्योग नाही, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला.

भाजप आमदार राम कदमांकडून काशीसाठी मोफत ट्रेन; नारायण राणेंनी दाखवला हिरवा झेंडा

BJP MLA Ram Kadam train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार राम कदम यांच्यावतीने काशी यात्रेसाठी तब्बल 3 हजार यात्रेकरूंच्या मोफत ट्रेनचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य टर्मिनल्समधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर ट्रेन काशीला रवाना झाली.

भाजप आमदार राम कदम यांच्यावतीने अनेक समाजउपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. दरम्यान त्यांच्या वतीने आज 3 हजार यात्रेकरूंच्या काशी यात्रेच्या ट्रेनचे आयोजन करण्यात आले. सकाळी दहा वाजता या ट्रेनला मंत्री राणेंच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, आमदार राम कदम यांच्यासह भाजप नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप आमदार राम कदम यांच्यावतीने दरवर्षी अनेक उपक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी सर्वात मोठा दहीहंडी उत्सव कदमांकडून आयोजित केला जातो शिवाय या उत्सवात अनेक सिनेअभिनेत्रीही आमंत्रित केले जातात. त्याच्याकडून दरवर्षी अनेक समाजोपयोगी, धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या वादावर अमृता फडणवीस यांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Amruta Fadanvis And Urfi Javed

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या त्यांच्या गाण्यामुळे तसेच आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचे ‘आज मै मूड बणा लेया’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यांचे गाणे कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्या प्रत्येक विषयावर आपले परखड मत मांडत असतात. अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना ‘आज मै मूड बणा लेया’ गाण्याच्या लाँच दरम्यान उर्फी जावेद वादाबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
उर्फी जावेद वादाबद्दल प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मला या विषयावर नक्की बोलायला आवडेल. पण ही ती वेळ नाही. आज मी फक्त आणि फक्त ‘आज मै मूड बणा लेया’ यावर बोलेल आणि सर्वांना या गाण्यावर थिरकायला लावेल… गाण्यावर तुम्ही देखील डान्स करा आणि उर्फीला देखील डान्स करायला सांगा…’ असं देखील अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) म्हणाल्या.

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) अनोखी फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे त्या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या मागच्या गाण्याप्रमाणे हे गणेसुद्धा हिट ठरणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…

आ. जयकुमार गोरेंना पुन्हा पुण्याला हलविले

Jaykumar Gore

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
माण- खटावचे आमदार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांना दोन दिवसापूर्वी हाॅस्पीटलमधून घरी सोडण्यात आले होते. परंतु गेल्या दोन दिवसात दगदग झाल्याने आ. जयकुमार गोरे यांच्या छातीतील वेदना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्री. गोरे यांना शुक्रवारी रात्री पुन्हा पुण्याला हलवण्यात आले.

फलटण- पंढरपूर मार्गावर मलठण येथे 14 दिवसांपूर्वी भीषण अपघातात आ. गोरे जखमी झाले होते. त्यांच्या पाय व छातीच्या बरगड्यांना इजा झाली होती. रुबी हॉल क्लिनिकमध्ये बारा दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. गुरुवारी त्यांना हेलिकॅप्टरने बोराटवाडी येथील असे निवासस्थानी आणण्यात आले होते. मात्र, प्रवास व खूप दगदग झाल्याने त्यांच्या छातीत पुन्हा तीव्र वेदना होवू लागल्या.

रुबी हॉल क्लिनिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्थानिक डॉक्टरांनी आ. गोरेंवर उपचार केले. त्यांना पुढील उपचारासाठी रात्री उशीरा पुण्याला हलवण्यात आले. दोन दिवसात आ. गोरेंना पुरेशी विश्रांती मिळाली नाही. त्यांच्या छाती आणि पायाला वेदना होवू लागल्या आहेत. तरी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळजी करु नये आवाहन सौ. सोनिया गोरे यांनी केले आहे.

“आज मैं मूड बना लिया…”; अमृता फडणवीसांचं नवं पंजाबी गाणं रिलीज

Amrita Fadnavis new Punjabi song

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी काहींना काही कारणांनी चर्चेत येतात. सध्या त्या त्यांनी गायलेल्या आणि नाचलेल्या गाण्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आजपर्यंत अमृता यांनी अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक नवे पोस्टर शेअर करीत नव्या “आज मैं मूड बना लिया…” या गाण्याच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांचे नवे गाणे रिलीज झाले असून “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर गाणे शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी पंजाबी पेहरावही केला आहे. “आज मैं मूड बणा लेया ए ए ए ,तेरे नाल ही नचणा वे !!’ या गाण्यावर त्यांनी चांगलेच ठुमके लगावले आहेत.

https://www.instagram.com/reel/CnBrsi_oYuK/?igshid=YmMyMTA2M2Y=

आपलया वेस्टर्न ड्रेसमधलया लूकमुळे त्यांनी एक वेगळ्या अंदाजाची झलक दाखवली आहे. “अज मैं मूड बणा लेया ए ए ए ,तेरे नाल ही नचणा वे” हे गाणे शुक्रवारी 6 जानेवारी 2023 रोजी टी सीरिजच्या अधिकृत युट्युब चॅनलवर रिलीज झाले आहे.

अमृता फडणवीस यांना तशी पाहिली तर गाण्याची फार आवड आहे. त्या नेहमी आपल्या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. कधी त्यांची गाणी प्रेक्षकांना आवडतात. तर, कधी त्यांच्या गाण्यावर टीकाही होते. मात्र, त्यांनी त्यांच्या गाण्याची आवड कायम जपली आहे.

कारने 15 वर्षीय विद्यार्थ्याला 1 KM फरफटत नेलं, Video आला समोर

car hit

लखनऊ : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील हीट अँड रन प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात एका बलेनो कारने अंजली नावाच्या तरुणीला 12 किलोमीटर फरफटत (car hit) नेले होते. या घटनेमध्ये पीडित तरुणीचा मृत्यू झाला होता. आता अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई या ठिकाणी घडली आहे. यामध्ये सायकलवर कोचिंगसाठी जात असलेल्या एका विद्यार्थ्याला कारने धडक (car hit) दिली एवढेच नाहीतर त्याला कारने तब्बल एक किलोमीटरपर्यंत फरफरटत नेलं.

यानंतर हि कार बाजारात पोहोचल्यानंतर स्थानिक लोकांनी तिला अडवले आणि त्या जखमी विद्यार्थ्याला बाहेर काढले. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी कारची तोडफोड करत गाडी पलटी केली. तसेच कारचालकाला बेदम मारहाणदेखील केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी कारचालकाला ताब्यात घेतले.

https://twitter.com/superman19239/status/1611431206524182528

काय घडले नेमके?
हि घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई या ठिकाणच्या झबरा पुरवा परिसरात घडली आहे. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव केतन असे आहे. तो नववीच्या वर्गात शिकतो. घटनेच्या वेळी तो सायकलवरुन कोचिंगसाठी जात होता. यादरम्यान एका भरधाव कारने त्याच्या सायकलला धडक (car hit) दिली. यामुळे हा मुलगा सायकलवरुन पडला. यानंतर केतन गाडीच्या चाकात अडकला. केतन गाडीच्या चाकामध्ये अडकल्याचं पाहून स्थानिक लोकांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार चालकाने गाडी आणखी वेगात पळवली. आणि केतनला जवळपास एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. यानंतर स्थानिकांनी कार अडवून आरोपी कारचालकाला पकडून त्याची धुलाई केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट

6 वर्षाच्या चिमुकल्याचा शिक्षिकेवर बंदुकीतून गोळीबार

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका सहा वर्षाच्या चिमुकल्याने थेट शिक्षिकेवरच बंदुकीतून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना हि अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये घडली असून या घटनेमुळे एकच गलबल उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी अमेरिकेमधील व्हर्जिनियामध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याना शिकवत होती. यावेळी वर्गात बसलेल्या सहा वर्षाच्या विद्यार्थ्याने अचानक बंदूक काढली गोळी झाडण्यास सुरुवात केली. यामध्ये शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षिकेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून या विद्यार्थ्याचे वय किती आहे हे अधिकाऱ्यांनी सांगितले नसले तरी गोळीबार करणारा विद्यार्थी केवळ 6 वर्षांचा असल्याचे सांगण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आपापल्या पालकांसोबत घरी सोडण्यात आले आहे. ही गोळीबाराची घटना घडलेल्या न्यूपोर्ट न्यूज शहराची लोकसंख्या 1 लाख 85 हजारांपेक्षा जास्त आहे. हे शहर चेसापीक आणि व्हर्जिनिया बीचपासून 40 मैलांवर आहे. हे शहर यूएस नेव्हीसाठी जहाजबांधणीमुळेही ओळखले होते.