Monday, December 15, 2025
Home Blog Page 1677

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात किती महिला असाव्यात?, चित्रा वाघ स्पष्टच सांगितला आकडा

Chitra Wagh cabinet expansion women Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबाबत आपली भूमिका मांडली. त्यानंतर मंत्रिमंडळात महिला नेत्या असण्याबाबत चर्चा सुरु झाली. आता शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार होणार असल्याने या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच्या मंत्रिमंडळात किमान 3-4 महिलांना संधी दिली पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज सोलापुरात दौऱ्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, राज्य मंत्रिमंडळात तीन ते चार महिलांना सरकारने संधी दिली पाहिजे.आमच्याकडे कॅलिबर महिला आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात 100 टक्के महिलांना संधी द्यावी. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे मला माहीत नाही. हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे.

तसे पाहिले तर आपल्याकडे प्रामुख्याने महिलांकडे महिला बालकल्याण विभागाचे खाते दिले जाते. पहिल्यांदाच पुरुषाला महिला बाल कल्याण खाते देण्यात आले आले आहे. महिलांनी राजकारणात येताना फक्त तिकीट घेऊन जमत नाही. निवडून आले पाहिजे. इलेक्ट्रोल मेरीट लागते. सक्षम असलेल्या महिलेला संधी दिली पाहिजे. पण केवळ महिला आहे म्हणून मला संधी द्या या मताची मी नाही, असे वाघ यांनी यावेळी सांगितले.

उर्फी जावेदच्या कपड्यांतील वादावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या की,

Supriya Sule Urfi Javed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या विचित्र फॅशनमुळे वारंवार चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या कपड्यावरून उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु आहे. यावरून राजकारण तापले असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणावर आता वर राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उर्फी जावेदपेक्षा आज देशासमोर याच्या पेक्षाही मोठे प्रश्न आहेत. त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत,” असे सुळे यांनी म्हंटल आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात सिंहगडावर उपस्थिती लावत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी अनेकवेळा प्रतिक्रया देत असते. महाराष्ट्रात नक्की चाललंय काय? महाराष्ट्रात देशात उर्फी जावेदवरुन जे काही प्रकरण चालले आहे. त्याबद्दल मी नक्की माहिती घेईन आणि त्यावर सविस्तर बोललें मात्र, सध्या यापेक्षाही अनेक मोठे प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

मी नेहमी एक शिवप्रेमी आणि इतिहास प्रेमी म्हणून सिंहगडावर येत असते. आज या ठिकाणी आल्यावर येथे कचरा पाहून वाईट वाटले. गड किल्ले म्हणजे आपली पवित्र वास्तू आणि त्यावरती कचरा होणं दुर्दैवी आहे. ऐतिहासिक ठिकाणी स्वच्छ राहावी हाच माझा प्रयत्न आहे. अजितदादा पुण्याचे पालकमंत्री असताना सिंहगडासाठी जो काही निधी त्यांनी दिला तेवढा निधी फक्त सिंहगडाला द्या, एवढीच मागणी ED सरकारकडे करत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले.

तरुणाने चक्क विमानात शर्ट काढून केली हाणामारी, Video आला समोर

Fight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आपण सोशल मीडियावर अनेक हाणामारीचे (fight) व्हिडिओ पहिले असतील. यामध्ये सीट अडवण्यावरून खिडकीपाशी बसण्यावरून, टॉयलेटवरून एक ना अनेक कारणांनी वाद (fight) होतात. पण सहसा विमानात असे वाद पाहायला मिळत नाही. पण मागच्या काही दिवसांपासून विमान प्रवासात अत्यंत धक्कादायक घटना होत असल्याचे समोर आले आहे. सध्या अशाच एका विमानातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
बिमान बांगलादेशच्या एअर- बोईंग 777 या विमानात दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादाने अत्यंत हिंसक रूप धारण केले होते. यामध्ये एक प्रवासी तर चक्क शर्ट काढून दुसऱ्याशी चढ्या आवाजात भांडताना दिसत आहे. हा वाद नेमके कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. यात शर्ट न घातलेला माणूस हा दुसऱ्या प्रवाशाला सीटवरून बाहेर खेचत आहे यानंतर बसलेला माणूस इतका चिडतो की तो थेट त्या प्रवाशाला कानाखाली (fight) मारतो. ज्याने त्याचा राग अजून वाढतो व हाणामारी सुरु होते.

यादरम्यान विमानातील आजूबाजूचे प्रवासी मध्यस्थी करून हे भांडण सोडवायचा प्रयत्न करतात. मात्र हे दोघे कोणालाच ऐकत नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (fight) होत आहे. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांच्या सुरक्षितत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

किंगखान शाहरुखचा मुलगा Aryan Khan करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट?

Bollywood Aryan Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा किंगखान, सुपरस्टार म्हणून ओळख असलेला शाहरुख खान हा त्याच्या पठाण चित्रपटामुळे चागंलाच चर्चेत आला आहे. मात्र, त्याबसोबत त्याचा मुलगा आर्यन खान हा गेल्या काही दिवसापासून डान्सर नोरा फतेहीसोबत असल्याची चर्चा सुरु होती. आता तो एका पाकिस्तानची अभिनेत्रीला देत करत आहे.

क्रूज ड्रग केसमुळे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हे नाव सर्वांसमोर आले. त्याचे हे प्रकरण अनेक दिवस चर्चेचा विषय ठरले. यानंतर आता आर्यन एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रेमात पडला असल्याचे दिसून आले आहे. ती अभिनेत्री म्हणजे सादिया खान होय. आर्यनचे सादिया खानसोबतचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याच्या फोटोमुळे ते एकमेकांना डेट करत असल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही आणि आर्यन खान हे डोखे दुबईतील एका पार्टीत एकत्रित आले होते. यावेळी त्यांचे एकमेकांसोबतचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, आता आर्यन एका पाकिस्तानी अभियोनेत्रीला डेट करत असल्याचे दिसून येत आहे.

https://www.instagram.com/p/CnGtw6nokNb/?utm_source=ig_web_copy_link

दुबईत नुकतीच एक नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची पार्टी पार पडली. या पार्टीमध्ये आर्यन खान हा सादिया खानसोबतचे दिसून आला. दोघांनी एकमेकांसोबत फोटोही काढले. ते आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचा हा फोटो फिल्मी वेव्ह या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोत दोघेही एकमेकांना कंगडी चिटकून उभे राहिले आहेत.

धुळ्यात मद्यपी टँकर चालकाने घातला हौदोस; अनेक वाहनांना दिली धडक

Tankar Accsident

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शहरात रात्री एका मद्यपी टॅंकर चालकाने चांगलाने शहरातील अनेक वाहनांना धडक (tanker accident) दिली आहे. या अपघातामध्ये (tanker accident) अनेक वाहनचालक जखमी झाले असून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धुळे शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन टँकर चालकाला अटक केली आहे. राजेंद्रसिंग सकट असे त्या टँकर चालकाचे नाव आहे.

टँकर चालक दारूच्या नशेत
सविस्तर माहिती अशी कि, शनिवारी रात्री एका मद्यपी टँकर चालकाने अनेक वाहनांना उडवले. ही घटना शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान घडली.राजेंद्रसिंग सकट असे आरोपी टँकरचालकाचे नाव आहे. राजेंद्रसिंग हा आपला टँकर घेऊन गुजरातकडे जात होता. मात्र तो त्यावेळी दारूच्या नशेत होता. त्यावेळी त्याने धुळे शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान अनेक वाहनांना उडवले(tanker accident). यामध्ये अनेक वाहनचालक जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांकडून या टँकरचालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

..तर झाला असता मोठा अनर्थ
या टँकरचालकाला वेळीच रोखण्यात पोलिसांना यश आलं. त्यामुळे मोठा अनर्थ (tanker accident) होता होता राहिला. पोलिसांनी या टँकर चालकाला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…

लग्नाआधीच मलायका अरोरा प्रेग्नंट? काय आहे नेमकं खरं कारण?

Malaika Arora

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्रींनमध्ये असलेल्या मलायका अरोराबाबत नेहमी काहीना काही गोष्टी ऐकायला मिळतात. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. सध्या ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. आता अदोघांचे लग्नही होणार आहे मात्र, लग्नापूर्वीच मलायका प्रेग्नंट असल्याची चर्चा होत आहे.

मलायकाला स्वता प्रेग्नंट असल्याची बातमी हि ती अर्जुन कपूरसोबत लंडनमध्ये वेकेशनवर असताना मिळाली होती. त्यानंतर दोघांनीही याबाबत हे खोट असल्याचे म्हंटल होत. वास्तविक पाहता मलायका अरोराने सलमान खानचा मोठा भाऊ असलेल्या अभिनेता अरबाज खानपासून घटस्फोट घेतला आहे. अरबाज खान आणि मलायका यांना एक मुलगाही आहे.

https://www.instagram.com/p/Cm3I4DaKUfQ/?igshid=YmMyMTA2M2Y=

अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. आता दोघे एकत्रित राहत असल्याने त्यांच्याबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी चर्चिल्या जात आहेत. अशात आता दोघांनीही लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लग्नापूर्वीच मलायका प्रेग्नेंट होणार असल्याची चर्चा होत आहे.

सूर्या ऑन फायर! T-20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

suryakumar yadav

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या आणि निर्णायक तिसऱ्या T-20 मध्ये धडाकेबाज शतक झळकावले. सूर्यकुमार यादवच्या T-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे तिसरे शतक ठरले. काल राजकोट या ठिकाणी खेळल्या गेलेल्या सामन्यात सूर्याने (suryakumar yadav) 51 चेंडूंत 7 चौकार आणि 9 षटकारांसह नाबाद 112 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाने श्रीलंकेसमोर 228 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.

अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज
सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) याआधी जुलै 2022 मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले T-20 शतक इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहँममध्ये झळकावले होते. या सामन्यात त्याने 55 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. त्यानतंर नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या होत्या. तसेच कालच्या सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूंत 7 चौकार आणि 9 षटकारांसह नाबाद 112 धावा केल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे हि तिन्ही शतके त्याने सलामीला न येत केली आहेत. T-20 मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

रोहितचा रेकॉर्ड मोडण्यापासून एक पाऊल दूर
T-20 क्रिकेटमध्ये तीन शतके करणाऱ्या सूर्यकुमारच्या पुढे आता शतकांच्या बाबतीत रोहित शर्मा आहे. T-20 मध्ये सर्वात कमी चेंडूत शतक साजरं करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) दुसऱ्या नंबरवर आहे. पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने 35 तर सूर्यकुमार यादवने 45 चेंडूत शतक झळकावलं आहे. रोहित शर्माच्या नावावर चार T-20 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

हे पण वाचा :
Tour Packages : कमी पैशात करा परदेशी दौरा; IRCTC ने आणलं खास पॅकेज
LIC मध्ये महिन्याला 1358 रुपये जमा करा आणि 25 लाख रुपये मिळवा
PM Kisan Yojana : 13 वा हप्ता तुम्हांला मिळणार की नाही?
नवीन वर्षात अगदी स्वस्तात घरी घेऊन जा ‘हे’ 10 स्मार्ट अन् ब्रँडेड TV
धक्कादायक घटना : बाल्कनीत अडकलेल्या 15 वर्षीय मुलीचा आगीमुळे तडफडून मृत्यू

महाविकास आघाडी आगामी निवडणुकीची तयारी एकत्रित करणार; शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात येणाऱ्या आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सर्वच पक्षांतून तयारी केली जाऊ लागली आहे. विरोधी महाविकास आघाडी पक्ष आगामी निवडणूक एकत्रित लढतील का? असा प्रश्न उपस्थित झाला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट आगामी निवडणुकीची एकत्रित तयारी करणार आहे, असे विधान पवार यांनी केले आहे. तसेच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला आहे. “सत्ता असलेल्यांनी जमिनीवर पाय ठेवावेत,” अशी टीका पवारांनी केली आहे

शरद पवार यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात काही नेत्यांकडून टीका करताना एकेरी उल्लेख केला जात आहे. यात टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली ठीक आहे. मात्र, राज्यात सत्ता हाती आल्यानंतर जमिनीवर पाय ठेऊन वागायचं असत. मात्र, मी अलीकडे पाहतोय कि ज्याच्याहाती सत्ता आहे ते जमिनीवर पाय ठेऊन काम करत नाहीत. सीमाप्रश्नी राज्य सरकारकडून ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तातडीची बैठक घेणे आवश्यक आहे.

आगामी निवडणूकीची तयारी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट एकत्रित करणार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित पावलं टाकावी हा आमचा महाराष्ट्रापुरता प्रयत्न आहे. त्यामध्ये इतर गटांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. रिपब्लिकन पक्षातील काही गटांना आम्ही सोबत घेणार आहोत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रश्नी सध्या सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. आणि ती व्यवस्थित त्या ठिकाणी मांडावी यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वी सुद्धा दोन ते तीनवेळा बैठक घेण्यात आल्या आहेत. काही लोक तुरुंगात टाकणार असं म्हणत आहेत. काही लोक जामीन रद्द करू असा इशारा देत आहेत. ही राजकीय नेत्यांची कामे नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली आहे. हे योग्य नसल्याचे पवारांनी यावेळी म्हंटले.

राज्यपालांकडून प्रतिष्ठा राखली गेली नाही : पवार

यावेळी शरद पवार यांनी राज्यपालाच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यपाल कोणत्याही पक्षाचे असो, पण आजवरच्या राज्यपालांनी राज्याच्या हिताचं काम केले, घटनेचं पालन केले पण हे पहिले राज्यपाल पहायला मिळतायत कि त्याच्याबद्दल खूप काही चर्चा होते. सतत लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. लोक त्यांच्यावर नापसंती व्यक्त करत आहेत. वास्तविक पाहता राज्यपाल हे महत्त्वाचे पद आहे. त्याची प्रतिष्ठा राखली पाहिजे. पण ती यांच्याकडून राखली जात नाही, अशी टीका पवारांनी केली.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भाषणात केला एकेरी उल्लेख; मिटकरींची टीका

Amol Mitkari

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagatsingh koshyari) हे मागच्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत चर्चेत आहेत. सध्या अशाच एका भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे राज्यपालांच्या (bhagatsingh koshyari) अडचणींत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी (bhagatsingh koshyari) छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांचा हा व्हिडिओ ट्विट करून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?
‘राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख ! नेमके राज्यपालांच्या (bhagatsingh koshyari) मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?’, असा सवाल अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी आणखी एक वक्तव्य केले आहे. राज्यपाल बनणं म्हणजे सर्व दु:खच दु:ख आहे, सुख काहीच नाही, असे राज्यपाल (bhagatsingh koshyari) म्हणाले. त्यामुळे त्यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागले आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

हे पण वाचा :
Tour Packages : कमी पैशात करा परदेशी दौरा; IRCTC ने आणलं खास पॅकेज
LIC मध्ये महिन्याला 1358 रुपये जमा करा आणि 25 लाख रुपये मिळवा
PM Kisan Yojana : 13 वा हप्ता तुम्हांला मिळणार की नाही?
नवीन वर्षात अगदी स्वस्तात घरी घेऊन जा ‘हे’ 10 स्मार्ट अन् ब्रँडेड TV
धक्कादायक घटना : बाल्कनीत अडकलेल्या 15 वर्षीय मुलीचा आगीमुळे तडफडून मृत्यू

औरंगजेबाच्या गुजरात कनेक्शनमुळेच भाजप नेत्याकडून उल्लेख; राऊतांचा बावनकुळेंवर हल्लाबोल

Sanjay Raut Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगजेबच्या उल्लेखावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले असल्याचे दिसते. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नव्हता असे विधान केले. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामानातील रोखठोकमधून बावनकुळेसह भाजपवर निशाणा साधला आहे. वास्तविक औरंगजेबाच्या गुजरात कनेक्शनमुळेच भाजप नेत्याकडून उल्लेख करण्यात आल्याची टीका राऊतांनी केली आहे.

संजय राऊत यांनी रोखठोकमधून औरंगजेबबाबत होत असलेल्या उल्लेखाबाबत आपले परखड मत मांडले आहे. त्यांनी म्हंटले आहे की, औरंगजेबाचा उल्लेख बावनकुळेंनी औरंगजेबजी केला. तो उगाच केलेला नाही. त्याला काही कारणे आहेत. औरंगजेबजी यांचा जन्म गुजरातच्या दाहोद येथे झाला. जन्मावेळी औरंगजेबाचे पिताश्री गुजरातचे सुभेदार होते.

औरंगजेबाच्या या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी केला असावा. काँग्रेसच्या एका नेत्याने अफझल गुरुचा उल्लेख अफझल गुरुजी केला होता. तेव्हा राष्ट्रवादाच्या नावाने भाजपने धुमाकूळ घातला होता. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबला औरंगजेबजी म्हटलं त्याचं काय? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नव्हता अशी नवी माहिती दिली. विष्णूच्या मंदिरासमोर संभाजी महाराजांना अटक केली. पण औरंगजेबाने विष्णूचे मंदिर तोडले नाही, असे औरंगजेबाचं महात्म्य सांगतानाच आव्हाड म्हणाले. या एका पुराव्याने औरंगजेब क्रूर नसल्याचे व थोर मानवतावादी असल्याचे प्रमाणपत्र आव्हाड यांनी दिले आहे.

खुद्द पंतप्रधान मोदींनी औरंगजेब क्रूर असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे औरंगजेब क्रूर नव्हता असे कसे म्हणायचे? पुन्हा बावनकुळ्यांचे सन्माननीय औरंगजेबजी प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनाही न पटणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणारेच औरंगजेबजी यांचा सन्मान करू शकतात, असे राऊत यांनी रोखठोकमध्ये लिहले आहे.