Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2761

कराडात मध्यरात्री सिलेंडरचा स्फोटात 25 घरे जळून खाक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शहरातील मुख्य भाग असलेल्या टाऊन हॉल, बापूजी सांळुखे पूतळा नजीक असणाऱ्या वेश्या वस्तीला मध्यरात्री दीड वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर आगीत सापडलेल्या चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याने सगळीकडे पळापळा सुरू झाली होती. या आगीत 20 ते 25 घरे पूर्णपणे जळून खाक झाली. तब्बल तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

घटनास्थळावरील माहिती अशी, कराड शहरात बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या वेश्या वस्तीत अचानक आगी लागली. नंतर चार सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे घरासह परिसरात असणारी छोटी घरे तसेच व्यावसायिकांची खोकी या आगीच्या भक्ष्यस्थानी अडकली होती. या घटनेत सुदैवाने जीवितहानी कोणतीही झालेली नाही, मात्र दोन महिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. कराड नगरपरिषद अग्निशामक दल तसेच कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशामक दलाने पहाटे 4. 30 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.

आज मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे या वस्तीत एकच खळबळ उडाली. अनेक महिला, लहान मुले आक्रोश करीत सुरक्षित स्थळी पळत होती. तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केल्याने आग आटोक्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत सूचना केल्या. तत्पूर्वी माजी नगरसेवक फारूख पटवेकर, विजय यादव यांनी घटनास्थळावर आग विझवण्यासाठी कार्यकर्त्यांसह मोठी मदत केली. अनेक घरातील साहित्य ही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

कोर्ट ड्यूटीवर असणाऱ्या होमगार्डची सतर्कता….

आग लागल्याने वस्तीतील काही रहिवाशी, महिला रस्त्यावर पळत येऊन आक्रोश करताच येथिल कोर्टात रात्रपाळीसाठी ड्यूटीवर असणाऱ्या सूहास देवकर या होमगार्डने धाडसाने वस्तीत धाव घेत तेथिल घरामध्ये घूसून अनेकांना जागं करीत घराबाहेर पडण्यासाठी मदत करुन अग्निशामक दलाला सूचना दिली. तसेच जज निवास्थानात असणाऱ्या न्यायाधिश यांनी ही भितीने रस्त्यावर सैराभर पळणाऱ्या महिला, मूलांना पाण्याची सोय करीत दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक उंच पुतळ्याचा डोळ्याचे पारणे फेडणारा अनावरण सोहळा

Shivaji Maharaj

औरंगाबाद – फटाक्यांची प्रचंड आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, लाईट शोचा लखलखाट आणि हातात भगवे ध्वज घेऊन लाखोंच्या संख्येने उपस्थितीत नागरिकांच्या साक्षीने क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५२ फूट उंचीच्या पुतळ्याचे शुक्रवारी रात्री अनावरण करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषणाने यावेळी आसमंत दुमदुमला. शिवरायांचे शिवतेच पाहण्यासाठी क्रांती चौकात जमलेल्या विक्रमी अलोट गर्दीच्या डोळ्याचे पारणे फिटले.

महापालिकेने क्रांती चौकात उभारलेल्या देशातील सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याचे शुक्रवारी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून अनावरण करण्यात आले. व्यासपीठावर महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार सतीश चव्हाण, शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, हरीभाऊ बागडे, अतुल सावे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी सभापती राजू वैद्य यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांती चौकातील शिवयारांचा पुतळा भव्यदिव्य असल्याने कार्यक्रमाची देखील जय्यत तयारी करण्यात आली होती. शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला. पुतळ्याला सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आली होती. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी सायंकाळपासूनच क्रांती चौकात गर्दी झाली. पोलिसांनी सिल्लेखाना, दूधडेअरी चौक, जिल्हान्यायाल व गोपाळ टी हाऊस चौकात रस्ते बंद केले होते. क्रांती चौकापासून हे चारही रस्ते शिवप्रेमींनी गजबजून गेले. हातात भगवे ध्वज, जयभवानी जय शिवाजीच्या घोषणा देत तरुण, तरुण, महिला-पुरुषांनी प्रचंड गर्दी केली. रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास आदित्य ठाकरे, सुभाष देसाई यांचे आगमन झाले. ठाकरे यांनी शिवप्रभुंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांच्या हस्ते मशाल पेटवण्यात आली. त्यानंतर लाईट आणि साउंड शो सुरु झाला व फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. लाईट आणि साऊंड शो व फटाक्यांच्या आतषबाजीने क्रांती चौकचा परिसर फुलून गेला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भगवा झेंडा हातात भगवा झेंडा घेवून त्यांनी तो फिरवला. त्यानंतर शिवप्रेमीं ठेका धरला. अनेकांनी चारचाकी वाहने, परिसरातील इमारती, अग्निशमन, पोलिसांच्या वाहनांवरच चढून हा ऐतिहासिक सोहळा पाहिला. क्रांती चौकात येणाऱ्या चारही रस्त्यांवर एक ते दीड किलोमीटरपर्यंत शिवप्रेमींची अलोट गर्दी होती.

पुणे- बेंगलोर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

कराड | पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अमोल सदाशिव लोकरे (वय- 36, रा. येरवळे, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते कोल्हापूर या लेनवर जखिनवाडी फाट्याजवळ शुक्रवारी दि. 18 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकी व अज्ञात वाहनाचा अपघात झाला. अपघातात येरवळे येथील अमोल सदाशिव लोकरे हा युवक गंभीर जखमी झाला. जखमी अमोल याला हायवे 108 ॲम्ब्युलने त्याला तात्काळ कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना अमोल यांचे निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे पोलिस कर्मचारी प्रशांत जाधव, चालक लादे घटनास्थळी रवाना झाले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली होती. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस कर्मचारी प्रशांत जाधव करीत आहेत.

शिवसेना नेत्याला उडविणारा कार चालकाला पुण्यातून अटक

कराड | कराड दक्षिणचे शिवसेनेचे नेते अशोकराव जगन्नाथ भावके यांना धडक देणाऱ्या कारचालकाला पुण्यातून अटक करण्यात यश आले आहे. काल रात्री उशिरा किरण महेंद्र महादे (वय 28 वर्ष रा, शांतीनगर, येरवडा पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तसेच धडक दिलेली कारही ताब्यात घेण्यात आली आहे.

कराड तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड ते चांदोली रस्त्यावर घोगाव (ता. कराड) येथे शिवसेनेचे नेते व श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे संस्थापक अशोकराव भावके यांना अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची धडक दिलेली होती. या धडकेत त्यांचे निधन झाले. अपघातातील धडक देणारा कार चालक घटनास्थळावरून पळून गेला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील, पोलिस, निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी सकोल तपासाचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलिस निरिक्षक सखाराम बिराजदार, फौजदार भरत पाटील, हवालदरा संदिप कांबळे, गुन्हे प्रकटीकरणचे सज्जन जगताप यांनी गुन्ह्याचा तपास केला.

पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यावरून होंडा सिटी कार (एमएच- 02 – बीपी- 6687) जप्त केली आहे. तसेच कार चालकालाही ताब्यात घेतले आहे. सहायक पोलि निरिक्षक बिराजदार, हवालदार कांबळे व जगताप यांनी पुणेतील विश्रांतवाडी पोलीसांशी संपर्क सादून पळून गेलेला कारचालक किरण महादे यास ताब्यात घेतले. त्याची शांतीनगर पुणे येथे गॅरेजवर दुरुस्तीला लावलेली होंडा सिटी कारही जप्त केली आहे. पोलिस निरीक्षक खोबरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरिक्षक  बिराजदार, फौजदार पाटील, हवालदार कांबळे, जगताप यांनी तपासात सहभाग घेतला.

गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटामध्ये चार घरे जळून खाक, रेस्क्यू ऑपरेशनवेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या पंचशीलनगर मधल्या झोपडपट्टीत शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या आगीमध्ये चार घरे जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळाले. कामानिमित्त या घरातील कुटुंबे बाहेर गेली असल्याने सुदैवाने कोणातीही जीवितहानी झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केले.

या ठिकाणी रेस्क्यू करत असताना अग्निशमन दलातील अधिकारी विजय पवार यांच्यासह चौघे जखमी झाले. यातील फायरमन रामचंद्र चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून ते 25 टक्के भाजले आहेत. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. गॅसचा स्फोट इतका भीषण होता कि परिसरातील काही घरे हादरून गेली होती. दरम्यान, स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

शांतिनिकेतन कॉलेजच्या शेजारी मेंडगुळे वस्ती आहे. याठिकाणी असणाऱ्या रेल्वे रूळ शेजारीच ओपन स्पेस मध्ये झोपडपट्टी आहे. याठिकाणी अनके पत्र्यांची छोटी घरे वसली आहेत. शुक्रवारी या वस्तीतील नंदकुमार जावीर यांच्या घरात गॅस लिकेज झाला. यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. अचानक घडलेल्या या घटनेनं परिसरातील नागरिकांनी धावाधाव सुरु केली. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब, रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली. त्याठिकाणची गर्दी बाजूला करून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न अग्निशमनच्या जवानांनी सुरु केले.

या चार घरांमध्ये एकूण आठ सिलेंडर होते त्यातील सात सिलेंडर बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. नंदकुमार जावीर यांच्या घराला कुलूप असल्याने तो सिलेंडर बाहेर काढण्यास अडथळा आला. त्याचवेळी या गॅसचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता कि सदरचा सिलेंडर हा घराचा पत्रा छेदून बाहेर फेकला गेला. याचवेळी याठिकाणी आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे अधिकारी विजय पवार, फायरमन रामचंद्र चव्हाण, सुनील माळी हे गंभीर जखमी झाले. या स्फोटात परिसरातील काही नागरिक किरकोळ जखमी झाले. याठिकाणी असणारे गॅस पथकांनी तातडीने बाहेर काढले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. परिसरातील संग्राम जावीर, नंदकुमार जावीर, दगडू चवरे आणि विजय पडळकर यांच्या घरात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

साताऱ्यात “ग्लोबल वॉर्मिंग – ग्लोबल वॉर्निंग” या विषयावर परिसंवाद ः नितीन पाटील

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे हवामानातील बदल, त्याचे दुष्परिणाम आणि त्यामुळे वेळोवेळी येणाऱ्या आपत्ती याबाबत जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना जाणीव व्हावी, यावरील उपाययोजना जाणून घेवून आपले शेती उत्पादन वाढवावे या उद्दात हेतूने “ग्लोबल वॉर्मिंग – ग्लोबल वॉर्निंग” जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम व उपाययोजना या विषयावर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा व दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज, डीस्ट्री‍‌क्ट 3234 -D1 रविवार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय, सातारा येथे परिसंवाद आयोजित केल्याची माहिती सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिलेली आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. आदित्यजी ठाकरे पर्यावरण, पर्यटन, राजशिष्ठाचार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र विधानपरिषद सभापती मा.ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या कार्यक्रमास बाळासाहेब पाटील, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सातारा, मा.ना. नीलमताई गोऱ्हे, महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती, मा.खा. वंदनाताई चव्हाण, मा.आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा.आ.मकरंद पाटील, सिने अभिनेत्री व पर्यावरण कार्यकर्त्या मृण्मयी देशपांडे यांची प्रमुख उपस्थित असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि सामाजिक कार्यकर्ते व सिनेअभिनेते आमिर खान, सयाजी शिंदे ऑनलाईन उपस्थित रहाणार आहेत.

या परिसंवादात पर्यावरण तज्ञ मा. खा. वंदनाताई चव्हाण, कामधेनु विद्यापीठ, गांधीनगरचे कुलगुरू मदनगोपाल वार्षनेय, पर्यावरण तज्ञ डॉ. गुरुदास नुलकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ हे कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांचेसाठी समाज माध्यमांद्वारे ऑनलाईन प्रदर्शित केला जाणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात तसेच तालुक्याच्या ठिकाणी बँकेच्या विभागीय कार्यालयात किंवा समाज माध्यमांवर ऑनलाईन सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, लायन्स क्लबचे प्रांतपाल एमजेएफ ला. सुनिल सुतार, प्रांतिय चेअरमन, पर्यावरण एमजेएफ ला. डॉ. शेखर कोवळे यांनी केले आहे.

NSE Scam : हिमालय बाबाचे ‘सिक्रेट’ उघड, एकत्र समुद्रकिनाऱ्यावर जायच्या माजी MD-CEO”

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंज NSE च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांच्या घोटाळ्यात, त्या ज्या हिमालय बाबाची आज्ञा पाळत असे, तो कोणीतरी तिच्या जवळचाच असल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत हिमालयातील या निनावी बाबाची कोणतीही ओळख नसल्याचे बोलले जात होते आणि तो चित्राला दुरूनच सूचना देत असे. मात्र, मनीकंट्रोलने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये चित्रा या बाबासोबत समुद्र किनारी फिरत असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत जर चित्रा बाबांना कधीही भेटलेली नाही तर मग त्या समुद्रकिनाऱ्यावर त्याच्याबरोबर काय करत होत्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही व्यक्ती चित्राच्या जवळची व्यक्ती असल्याचे मानले जात आहे.

घोटाळ्याचे त्रिकूट … सुनीता आनंदची एन्ट्री
हिमालय बाबाच्या सांगण्यावरून चित्रा यांनी आनंद सुब्रमण्यन यांची नियुक्ती केली होती, तसेच त्यांच्या पत्नीलाही मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. आनंद सुब्रमण्यम यांच्या पत्नी सुनीता आनंद यांना NSE साउथचे प्रमुख बनवण्यात आले. ही सर्व कामे चित्रा यांनी बाबाच्या सूचनेवरून झाली.

चित्रा दिल्ली कनेक्शनचा फायदा घेत असे
या प्रकरणाच्या तपासात चित्रा यांचे दिल्लीतही मजबूत संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. दिल्लीतील कोणत्याही हालचालीची माहिती त्यांना मिळायची. त्यामुळेच तिच्याविरुद्धच्या तक्रारींबाबत लोकं गप्प बसायचे. सुब्रमण्यम यांनी 12 सप्टेंबर 2018 रोजी दिलेल्या निवेदनात आपण गेल्या 22 वर्षांपासून अज्ञात योगीला ओळखत असल्याची कबुली दिली होती.

बाहेरून आनंदी आणि साध्या मात्र आतून…
वरून अतिशय साध्या आणि हसतमुख दिसणाऱ्या चित्रा यांचा खरा स्वभाव तसा नव्हता हे चित्राला ओळखणारेही सांगतात. त्या खूप हुशार आणि व्यावसायिक होत्या. NSE कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की, हे त्रिकूट (चित्रा, आनंद आणि सुनीता) त्यांचे काम अतिशय व्यावसायिक पद्धतीने पार पाडत होते. यामुळेच सेबीच्या हे लक्षात आले नाही आणि चित्राने जवळपास तीन वर्षे 8 कोटी गुंतवणूकदारांच्या भावना आणि पैशांशी खेळ केला.

धक्कादायक : आईला व्हिडिओ कॉलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर मुलाची आत्महत्या

sucide

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरातील शाहुपुरी येथील एका महाविद्यालयीन युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. गावी गेलेल्या आईला व्हिडिओ कॉल करून दिल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबतची माहिती शाहुपुरी पोलिसांना देण्यात आली.

याबाबत शाहूपुरी पोलीसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी येथील जिजामाता काॅलनीतील प्रेम लहू पवार (वय -16) हा आपल्या आई- वडिलांसह राहतो. प्रेम याचे मूळ गाव आसनगाव असून आई-वडील काल तिकडे शेतीकामासाठी गेले होते. आज आईचा वाढदिवस असल्याने प्रेमने सकाळी आईला फोन करून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यानं काही वेळाने गळफास घेतला असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या काही जणांच्या लक्षात आली.

प्रेमने गळफास घेतल्याची माहिती काही शेजारील लोकांनी कुटुंबीयांना दिली. गावी गेलेल्या आई- वडिलांना आपल्या एकलुत्या एकाने गळफास घेतल्याची बातमी ऐकून मोठा धक्का बसला आहे. प्रेम हा सातारा येथील एका महाविद्यालयात 11 वीत शिकत होता. त्याचे वडील शिक्षक आहेत. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

एका बाबामुळे धोक्यात आले CA पासून शिखरावर पोहोचलेल्या चित्रा यांचे करिअर

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मधील अनियमिततेमुळे स्टॉक एक्स्चेंजच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या छापेमारीनंतर आता CBI ने चित्रा यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. CBI ने शुक्रवारी चित्रा यांची चौकशी केली. तपास एजन्सीने रामकृष्ण आणि आणखी एक माजी सीईओ रवी नारायण आणि सीओओ आनंद सुब्रमण्यन यांना देश सोडण्यापासून रोखण्यासाठी लूक आउट सर्क्युलर जारी केले आहे.

बाबांच्या प्रभावाखाली निर्णय घेण्याचे प्रकरण
11 फेब्रुवारी 2022 रोजी, देशाच्या बाजार नियामक सेबीने सांगितले की, हिमालयात फिरणाऱ्या एका योगीच्या प्रभावाखाली त्यांनी आनंद सुब्रमण्यन यांची एक्सचेंजचे सीओओ आणि एमडी म्हणून नियुक्ती केली होती तेव्हापासून चित्रा यांचे नाव चर्चेत आले. सेबीने चित्रा आणि इतरांवर सुब्रमण्यन यांची मुख्य धोरणात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती आणि नंतर त्यांची ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि एमडीचे सल्लागार म्हणून पुनर्नियुक्ती करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. सेबीने रामकृष्णन यांना 3 कोटी रुपये, NSE आणि त्यांचे माजी एमडी आणि सीओओ रवी नारायण आणि सुब्रमण्यन यांना प्रत्येकी 2 कोटी रुपये आणि मुख्य नियामक आणि तक्रार अधिकारी व्हीआर नरसिंहन यांना 6 लाख रुपये दंड ठोठावला आहे.

चित्रा रामकृष्ण व्यवसायाने CA आहेत
चित्रा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहे. त्यांनी 1985 साली IDBI बँकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. काही काळ सेबीमध्येही काम केले. 1991 मध्ये NSE सुरू झाल्यापासून त्या मुख्य भूमिकेत होत्या.

2013 मध्ये NSE प्रमुख बनल्या
‘हर्षद मेहता घोटाळा’ प्रकरणा नंतर पारदर्शक स्टॉक एक्स्चेंज तयार करण्यासाठी निवडलेल्या पाच लोकांमध्ये NSE चे पहिले सीईओ RH पाटील यांच्या नेतृत्वाखालील चित्रा यांचा समावेश होता. 2013 मध्ये रवि नारायण यांचा कार्यकाळ संपल्यानंतर चित्रा यांना 5 वर्षांसाठी NSE चे प्रमुख बनवण्यात आले.

आनंद सुब्रमण्यम यांचा पगार 15 लाखांवरून 1.38 कोटींवर आला आहे
असा आरोप आहे की, चित्रा यांनी पदभार स्वीकारताच NSE मध्ये सीओओ पद बनवले आणि हिमालयातील एका बाबाच्या प्रभावाखाली आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती कर्नाय्त आली. चित्राने आनंद सुब्रमण्यम यांचा पगार 15 लाखांवरून वार्षिक 1.38 कोटी रुपये केला. यापूर्वी आनंदचा पगार 15 लाख रुपये होता.

“मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार”; पंतप्रधान मोदींची घोषणा 

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून पार पडले. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी “मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार आहे,” अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.

लोकार्पण सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, ” आज लोकार्पण करण्यात आलेल्या या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अनेक फायदे होणार आहेत. लोकल आणि एक्प्रेससाठी वेगवेगळ्या लाईन होतील, इतर राज्यांतून येणाऱ्या गाड्यांना थांबावं लागणार नाही. “आत्मनिर्भर भारता’मध्ये मुंबईचे योगदान वाढावे यासाठी या शहरात अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्न आहे.

ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेचे काम गेली दहा वर्षे रखडले होते. मार्च 2019 अंतिम मुदत असतानाही त्यात अनेक वेळा बदल झाला होता. त्यानंतर जून 2021 ही अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कमी मनुष्यबळ आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे या कामात पुन्हा अडथळा आला.