Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2780

धक्कादायक ! नाशिकमध्ये RTI कार्यकर्त्यावर गोळीबार

prashant jadhav

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात प्रशांत जाधव हे जखमी झाले आहेत. नाशिक शहरातील सिडको भागात असलेल्या उपनगर परिसरामध्ये सोमवारी रात्री हा हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रशांत जाधव यांच्यावर हा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये प्रशांत जाधव यांच्या मांडीला एक गोळी लागली तर दुसरी गोळी पोटाला चाटून गेली.जखमी प्रशांत जाधव यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असलेले आणि एका पक्षाचे पदाधिकारी असलेले प्रशांत जाधव यांच्यावर नाशिकमधील एका मेडिकल स्टोअरजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यामध्ये प्रशांत जाधव जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रशांत जाधव जखमी
या हल्ल्यामध्ये प्रशांत जाधव यांच्या मांडीला एक गोळी लागली तर दुसरी गोळी पोटाला चाटून गेली आहे. हा गोळीबार नेमका कोणी आणि का केला? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. यासाठी पोलीस परिसरातील सीसी टीव्ही फुटेजची मदत घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या हल्ल्यामुळे सिडको परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेनेकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’?? पत्रकार परिषदेसाठी स्क्रिन लावण्याची तयारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज शिवसेना भवनात शिवसेनेकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 4 वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून यावेळी शिवसेनेकडून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणत खासदार संजय राऊतांकडून व्हिडिओ देखील सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण जनतेला याबाबत उत्सुकता लागली आहे.

शिवसेना भवनातील आजच्या पत्रकार परिषदेसाठी एक मोठा स्क्रिन लावण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय राऊत पत्रकार परिषदेत ‘व्हिडिओ बॉम्ब’ फोडणार असल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेसाठी एक पेन ड्राइव्ह घेऊन येणार असून व्हिडिओच्या माध्यमातून गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. आता राऊत नेमका कोणता व्हिडिओ समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, शिवसेना भवनाबाहेर झुकेंगे नही अशी पोस्टरबाजी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये जातील अस म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे ते साडेतीन लोक कोण असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

जर तुम्ही अशाप्रकारे पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर होईल कडक कारवाई

PM Kisan

नवी दिल्ली । जर तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. असे अनेक शेतकरी आहेत जे पीएम किसान योजनेत सामील झाले आहेत, मात्र ते या योजनेच्या अटी व नियम पूर्ण करत नाहीत आणि तरीही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा अपात्र शेतकऱ्यांवर आता कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. या अपात्र शेतकऱ्यांकडून सरकार आता पूर्ण रक्कम वसूल करत आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना पैसे परत करावे लागणार आहेत
तुमच्या घरातील एकाच जमिनीवर कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य पीएम किसान अंतर्गत हप्ता घेत असतील तर तुम्हाला हप्त्याचे पैसे 2000 रुपये परत करावे लागतील.

समजा एका कुटुंबातील एकाच जमिनीवर आई, वडील, पत्नी आणि मुलगा यांना पीएम शेतकऱ्याचा हप्ता मिळत असेल तर त्यांना सरकारला पैसे परत करावे लागतील. नियमांनुसार, पीएम किसान अंतर्गत कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला हप्ता मिळू शकतो. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अशा प्रकरणात त्याला तुरुंगातही जावे लागू शकते.

नियम काय आहेत जाणून घ्या
सरकारने या योजनेच्या जुन्या पद्धतीत काही बदल केले आहेत. आता ज्यांच्या नावावर शेती असेल त्यांनाच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच पूर्वीप्रमाणे यापुढे वडिलोपार्जित जमिनीत वाटा असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्याही नावावर शेत असेल तर हे काम त्वरित करा, अन्यथा तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो.

‘या’ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही
शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने टॅक्स भरला तर त्याला योजनेचा लाभ दिला जात नाही.
ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही त्यांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात आले आहे.
जर तुमच्या आजोबा किंवा वडिलांच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर शेतजमीन असेल तर तुम्हाला पीएम किसानचा लाभ मिळणार नाही.
जर एखादा शेतीमालक सरकारी नोकरीत असेल तर त्यालाही पीएम किसानचा लाभ मिळणार नाही.
रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सीए यांनाही या योजनेबाहेर ठेवण्यात आले आहे.
जर एखाद्या शेतकऱ्याला वार्षिक 10,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर तो देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

LIC IPO: तुम्ही देखील ‘या’ IPO ची वाट पाहत असाल तर जाणून घ्या इश्यूची किंमत काय असू शकते

LIC

नवी दिल्ली । बहुतेक गुंतवणूकदार देशातील सर्वात मोठ्या IPO ची वाट पाहत आहेत. विशेषतः रिटेल गुंतवणूकदार देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनी म्हणजेच LIC च्या IPO ची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा IPO लवकरच बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने सेबीकडे इश्यूसाठी अर्ज (DRHP) सादर केला आहे. मार्चमध्ये हा IPO येण्याची शक्यता आहे.

या IPO मध्ये, LIC पॉलिसी धारकांसाठी 10 टक्के हिस्सा राखीव असेल. तसेच, त्यांना स्वस्त दरात शेअर्स मिळू शकतात. यामुळे, या IPO बद्दल आणखीनच हाईप झाली आहे. मात्र, यावेळी भारतीय शेअर बाजारात कमकुवतपणा दिसून येत आहे.

LIC चे मूल्य
या डॉक्युमेंट्स नुसार, कंपनीचे एम्बेडेड व्हॅल्यू 5.39 लाख कोटी रुपये आहे. सध्या लिस्टेड खाजगी विमा कंपन्या त्यांच्या एम्बेडेड व्हॅल्यूच्या 3-4 पटीने ट्रेड करत आहेत. LIC चा इश्यू साईज आणि मार्केटमध्ये 66% मजबूत पकड असल्याने, नवीन बिझनेस प्रीमियम असूनही, त्याची वाढ खाजगी विमा कंपन्यांसारखी नाही.

IPO 53,500 कोटी ते 93,625 कोटी रुपयांपर्यंत
जर आपण LIC ची एम्बेडेड व्हॅल्यू 2-3.5 पटीने मल्टिप्लाय केले तर ते 10.7 लाख कोटी ते 18.7 लाख कोटी रुपये आहे. 632 कोटी शेअर्सच्या एकूण इक्विटी भांडवलावर आधारित जर आपण 5% इश्यूवर नजर टाकली तर LIC चा IPO 53,500 कोटी ते 93,625 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकतो. त्यानुसार, LIC ची इश्यू प्राईस 1963-2961 रुपयांच्या दरम्यान असू शकते. त्या तुलनेत, सरकारसाठी शेअर एक्विजीशन कॉस्ट 0.16 रुपये प्रति शेअर आहे. हा इश्यू आणण्यापूर्वी LIC मध्ये कॅपिटल रीस्ट्रक्चरिंग करण्यात आले होते.

सुरुवातीचे भांडवल
LIC सुरू झाली तेव्हा त्याचे प्रारंभिक भांडवल 100 कोटी रुपये होते. LIC ही त्यावेळची प्रीमियम गोळा करणारी कंपनी होती, त्यामुळे तिचे शेअर्स इतर कोणालाही वाटले गेले नाहीत. हा इश्यू आणण्यापूर्वी, सरकारने LIC चे कॉर्पोरेशनमधून कॉर्पोरेटमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रारंभिक 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती आणि 10 रुपये फेसव्हॅल्यूचे शेअर्स सरकारला वाटप करण्यात आले होते.

पॅन लिंक करणे आवश्यक आहे
जर पॉलिसीधारकांना या IPO साठी अर्ज करायचा असेल, तर LIC च्या वेबसाइटनुसार, त्यांना पहिले LIC च्या साइटवर आपला पॅन अपडेट करावा लागेल. LIC ने सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटले आहे की, “IPO मध्ये सहभागी होण्यासाठी, पॉलिसीधारकांना कंपनीच्या रेकॉर्डमध्ये त्यांचा पॅन बरोबर असल्याची खात्री करावी लागेल. तसेच, हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, भारतातील कोणत्याही IPO मध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे.

भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासाच्या कराड शहराध्यक्षपदी प्रकाश जाधव

कराड | अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासाच्या कराड शहराध्यक्षपदी प्रकाश जाधव यांची निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्हाध्यक्ष संदिप जगताप यांनी या निवडीचे पत्र दिले. राळेगणसिध्दी येथे झालेल्या बैठकीत आण्णा हजारे यांनी संघटनेच्या पुनर्बाधणी करणेबाबत सर्व जिल्हाध्यक्षांना सुचना देण्यात आल्या होत्या.

सातारा येथे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सातारा जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांच्या निवडी तर कराड शहराध्यक्ष म्हणून प्रकाश जाधव यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष तात्या सावंत, चांदभाई अत्तार, सर्जेराव पाटील, चंद्रशेखर सोनार, हेमंत कदम, सुनिल शिंदे, संतोष यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जगताप म्हणाले, जिल्ह्यातील पाच हजार सदस्य करण्याचे उद्दिष्ट असून अण्णा हजारे यांचे मार्गदर्शनाखाली ते येत्या तीन महिन्यात करु असा विश्वास यावेळी व्यक्त केला. प्रकाश जाधव यांनी यापूर्वी कराड शहरांमध्ये अतिशय चांगले काम केले असल्याने त्यांची निवड करण्यात येत आहे.

निवडीनंतर प्रकाश जाधव म्हणाले, अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन व जिल्हाध्यक्ष संदिप जगताप यांची साथ मिळाल्याने या पुर्वीही संघटनावाढीसाठी कार्य केले आहे. याच कामाचा अनुभव पाठीशी असल्याने यापुढेही शहरातील गरजूंना शासन दरबारी मदत करण्याचे काम निश्चित केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

आत्ताच पब्लिसिटी करून घ्या, 3 नंतर संजय राऊत सिक्सर मारतील- सुप्रिया सुळे

Supriya Suley Sanjay Raut

महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील एकूण राजकीय वातावरण आणि केंद्रीय तपास यंत्रणा यावरून शिवसेना आज मुंबईतील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे. त्याचवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या पत्रकार परिषदेवरून भाजपला इशारा दिला आहे.

सध्या चॅनल आमचे कॉमेंट्स चालवतात मग चॅनलने आम्हाला पैसे द्यायला हवेत. आता आमचं चालेल, आम्ही आता चॅनलवर राहू मात्र, 3 नंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेक ओव्हर करतील असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. 3 नंतर संजय राऊत यांचा सिक्सर आहे. आपण वाट बघू संजय राऊत काय बोलतात ते. ते काही तरी महत्त्वाचेच बोलतील असे वाटते, कारण त्यांनी इशारा दिला आहे.  सगळा देश त्यांना बघणार आहे. मी पण बघणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, दुपारी 4 वाजता शिवसेना भवन येथे शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेनेची पत्रकार परिषदेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र बोलणार असून आमची पत्रकार परिषद भाजप आणि ईडी नेही बघावी असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि संजय राऊत नेमका काय गौप्यस्फोट करणार हे पाहावे लागेल.

“ज्यांच्यावर धाडी टाकल्या ते सध्या जेलमध्ये” ; ईडीच्या छापेमारीवरून चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ईडीच्या वतीनेही मुंबईत तब्बल दहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर आरोप केले जात आहेत. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याच्यावर धाडी टाकल्या त्यांना जेलमध्ये जावे लागे. तुम्हाला न्याय जर हवा असेल तर न्यायालयात जावे, असे विधान पाटील यांनी केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य घटनेने सर्वांना अधिकार दिलेले आहेत. केंद्र सरकारने काय करावे, राज्य सरकारने काय केले पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या राज्यघटनेत सांगितले आहे. तुम्हाला राज्यघटना मान्य नसेल तर तुम्ही न्यायालयात जावे. परंतु आतापर्यंत ईडीने ज्या ज्या लोकांच्यवर धाडी टाकल्या आहेत. त्या लोकांना जेलमध्ये जावे लागलेले आहे. काय जेलमध्ये आहेत तर काही जेलच्या बाहेर आहेत.

काय म्हणाले आहेत संजय राऊत

आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या साडेतीन नेत्यांना जेलमध्येही जावे लागणारअसे म्हंटले आहे. आम्ही खूप सहन केल्यामुळे आता बरबादही आम्हीच करू, असा इशारा राऊत यांनी दिला. आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात संजय राऊत यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी नावे जाहीर करणार आहेत.

भाडेकरूची घरफोडी करून 62 हजारांचे दागिने चोरणाऱ्या मालकिणीला साथीदारासह अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या कर्नाळ रोडवरील एका घरामध्ये घराच्या मालकिणीनेच भाडेकरूची घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या मालकिणीसह तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे. रोहिणी शिवाजी बोस आणि सचिन आमरुस्कर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दोघांकडून घरफोडीतील 62 हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार पोलिसांनी जप्त केला आहे. दोघांनी मिळून बोस यांच्या घरामध्ये भाड्याने राहणाऱ्या रुपाली कुंभार या परगावी गेल्या असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सोन्याचा हार चोरी केला होता. त्यानंतर त्यांनी अज्ञातांनी घरफोडी केल्याचे भासविले होते. या प्रकरणी सखोल तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दोघांना अटक केली आहे.

केंद्रीय जल जीवन मिशन ः सातारा जिल्ह्यातील 252 गावात नळ जोडणीने होणार पाणी पुरवठा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार “ केंद्रीय जल जीवन मिशन ” अंतर्गत घरोघरी पाणी ही केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना देशभरात वेगाने सुरू असून माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या जलजीवन मिशनच्या केंद्रीय समितीवर सदस्य आहेत. त्यांनी पहिल्या टप्प्यात फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघ आणि माण खटाव या विधानसभा मतदारसंघासाठी ही योजना मंजूर करून घेतली आहे. फलटण मतदार संघातील 71 व माण खटाव मधील माण तालुक्यातील 104 व खटावमधील 77 आशा एकूण 181 गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. माण तालुक्यासाठी रु. 23 कोटी 2 लाख 65 हजार तर खटाव तालुक्यासाठी 33 कोटी 80 लाख 97 हजार असा माण, खटाव मतदारसंघासाठी एकत्रित 56 कोटी 83 लाख 62 हजार रुपये निधी मंजूर करुन आणला आहे.

सातारा जिल्ह्यातील या तालुक्यांची कायम दुष्काळी व पिण्याच्या पाण्याचे कायमच दुर्भिक्ष अशी वर्षानुवर्षांची ओरड होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या या योजनेचा लाभ सर्व प्रथम या गरजू तालुक्यांना मिळत आहे. त्याखेरीज माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या योजनेच्या समितीवर सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. या योजनेचे स्वरूप व महत्त्व लक्षात घेता खासदारांनी फलटण कोरेगाव व माण खटाव मधील अशा एकूण 252 गावांना घरोघरी नळ जोडणी द्वारे पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती दिली.

या महत्वकांक्षी योजनेचा माण खटाव तालुक्यातील एकूण 181 गावांना रुपये 56 कोटी 83 लाख 62 हजार असा भरघोस निधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंजूर करून आणला आहे. या योजनेद्वारे केंद्र शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामाची कार्यवाही होणार आहे. माण व खटाव दोन्ही तालुक्यातून या योजनेसाठी कोणत्याही कालव्यातून पाणी उपलब्ध होत नसून पाणी स्रोत उपलब्ध सुविधे नुसार केला जाणार आहे. या योजनेनुसार काही गावांची कामे पूर्ण झाली असून काही गावांची कामे प्रगती पथावर आहेत. कामाची व्याप्ती व स्वरूप मोठे असल्याने डी. पी. आर. सादर करणे, प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव देणे, तशा मान्यता घेणे, निविदा काढणे, अंदाजपत्रक तयार करणे ही कामे वेगाने सुरू आहेत.

केंद्र शासनाची ही योजना देशभरामध्ये सन 2024 पर्यंत सुरू असेल. तरीही अगदी प्राथमिक स्तरावर फलटण कोरेगाव व माण खटाव या अत्यंत गरजू विधानसभा मतदारसंघासाठी खासदारांनी ही योजना मंजूर करून घेऊन प्रत्यक्षात निधी प्राप्त करून कामेही सुरू केली आहेत.

कोरोना सेंटरमधील साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, माजी आ. विलासराव जगताप यांचा गंभीर आरोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कोरोनाच्या पहिल्या दोन साथीच्या काळात कोरोना साहित्य खरेदीत प्रशासनाने मोठा भ्रष्टाचार केला आहे. सध्या जिल्ह्यात अवैध धंदे, शासकीय जमिनींची परवानगीने विक्री जोरात सुरु असल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला. जत येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास परवानगीने उभारा, असा आदेश पुतळा समितीस दिला.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले,”जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे पुतळे बसवले आहेत. तासगावसह जिल्ह्यात आठ ठिकाणी जिल्हाधिकार्‍यांच्या काळात पुतळे बसवले आहेत. त्यावेळी त्यांना नियमांची आठवण झालेली नाही. नियमाप्रमाणे चालणार्‍या प्रशासनाने कोरोनाच्या पहिल्या दोन साथ काळात आरोग्य विभागाच्या सहकार्यांने मोठे गैरव्यवहार केले आहेत. त्यांतील वस्तुची खरेदीची किंमत तीन-चार पटीने दाखवलेली आहे.”

“याबाबत राज्य शासनाने चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जिल्ह्यात महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या वरदहस्ताने मटका, गुटका, हातभट्टी धंदे जोरात सुरु आहेत. रोज कोट्यवधीची माया जमवली जात आहे. याला पोलिसप्रमुखांसह जिल्हाधिकारी यांची भूमिका कारणीभूत आहेत.” तसेच जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने अनेक शासकीय जमिनींची विक्री सुरु झालेली आहे. या प्रकरणीही प्रशासनातील प्रमुख अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.