Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2792

यंदाच्या आयपीएल लिलावात दिनेश कार्तिकची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

dinesh kartik

बँगलोर : वृत्तसंस्था – आयपीएल 2022 च्या लिलावात भारताचा विकेट कीपर बॅट्समन दिनेश कार्तिकची आयपीएलच्या पहिल्या सिझनपासूनची इच्छा पुन्हा एकदा अपूर्ण राहिली आहे. दिनेश कार्तिक हा मूळचा चेन्नईचा आहे. त्यामुळे त्याला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळायला मिळावे अशी त्याची इच्छा होती. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये दिनेश कार्तिकची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने जोरदार प्रयत्न केले. पण, अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सवर मात करत कार्तिकला 5 कोटी 50 लाखांना विकत घेतले.

आयपीएलच्या मागच्या सीझनपर्यंत दिनेश कार्तिक कोलकात्याच्या टीमसोबत होता, पण लिलावाआधी केकेआरने कार्तिकला रिलीज केले. दिनेश कार्तिक आयपीएल 2020 पर्यंत केकेआरचा कर्णधार होता, पण अर्धी आयपीएल संपल्यानंतर केकेआरने अचानक त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले. यानंतर केकेआरचे कर्णधारपद इंग्लंडच्या इयन मॉर्गनकडे सोपवण्यात आले. दिनेश कार्तिक त्याचा मित्र आणि मार्गदर्शक अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये आयपीएलची तयारी करत आहे.

दिनेश कार्तिकची कारकीर्द
दिनेश कार्तिक हा 2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय टीमचा भाग होता. टी-20 मध्ये फिनिशरची भूमिका निभावण्यासाठी आपण खेळामध्ये थोडी सुधारणा करत आहोत, तसंच पुढची 4 वर्ष आपल्याला खेळायचं असल्याचे मत दिनेश कार्तिकने यावेळी व्यक्त केले. कार्तिकने आतापर्यंत 6 टीमकडून आयपीएल खेळली आहे. मात्र त्याचे शहर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. यंदाच्या आयपीएल लिलावात त्याची हि इच्छा पूर्ण होईल असे वाटले होते पण ती इच्छा अपूर्णच राहिली.

कोण आहे ‘बेबी’ डिव्हिलियर्स? ज्याच्यासाठी मुंबईने मोजले 3 कोटी

dewald brevis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बेबी एबी डीव्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा अंडर 19चा खेळाडू आहे. त्याने यंदाच्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटिंगने सर्वांना आकर्षित केले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्यावर 3 कोटी रुपये खर्च करून आपल्या टीममध्ये सामावून घेतले आहे.

डेवाल्ड ब्रेविस याची कारकीर्द
काहीच दिवसांपूर्वी झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये डेवाल्ड ब्रेविसने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने 6 सामन्यांमध्ये 90.20 च्या सरासरीने 506 रन केले होते. भारताविरुद्ध त्याने 65 रनची खेळी केली होती. यानंतर दोन ग्रुप मॅचमध्ये त्याने 104 आणि 96 रनांची खेळी केली होती. इंग्लंडविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये डेवाल्ड ब्रेविसने 97 रनची खेळी केली होती.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन एबी डीव्हिलियर्सने मागच्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर डेवाल्ड ब्रेविस त्याची कमतरता भरून काढेल असे दक्षिण आफ्रिकेच्या फॅन्सना वाटत आहे. महत्वाचे म्हणजे डेवाल्ड ब्रेविस एबी डिव्हिलियर्ससारखीच 360 डिग्रीमध्ये बॅटिंग करतो, त्यामुळे त्याला बेबी डिव्हिलियर्स असे टोपण नाव ठेवण्यात आले आहे. एवढच नाही तर तो एबी डिव्हिलियर्ससारखीच 17 नंबरची जर्सी घालतो. डेवाल्ड ब्रेविस जेव्हा एबी डिव्हिलियर्सला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा त्याने 17 नंबरची जर्सी घालण्याची परवानगी त्याच्याकडे मागितली होती. एबी डिव्हिलियर्सने जेव्हा परवानगी दिली तेव्हा त्याने ही जर्सी घालण्यास सुरूवात केली.

आयपीएल लिलावात विक्रमी बोली लागल्यानंतर इशान किशनने दिली ‘हि’ प्रतिक्रिया

ishan kishan

बँगलोर : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएल 2022 च्या लिलावात भारताचा डावखुरा विकेटकिपर बॅट्समन इशान किशन सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सने इशान किशनला तब्बल 15.25 कोटी बोली लावून आपल्या टीममध्ये घेतले आहे. याचसोबत इशान किशन आयपीएल इतिहासातला चौथा सगळ्यात महागडा आणि भारताचा दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिसला 16.25 कोटी तर युवराज सिंगला 16 कोटी रुपये आणि पॅट कमिन्सला 15.5 कोटी रुपयांना आयपीएल इतिहासात विकत घेण्यात आले होते.

मुंबई इंडियन्सने आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूवर 10 कोटींपेक्षा जास्त रकमेची बोली लावली आहे. याआधी 2011 साली मुंबईने रोहित शर्मासाठी 9.2 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली होती. तर 2018 आयपीएलच्या लिलावात मुंबईने कृणाल पांड्याला 8.8 कोटी रुपयांना राईट टू मॅच कार्ड वापरून आपल्या टीममध्ये परत घेतले होते. तसेच आयपीएल 2020 च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर नॅथन कुल्टर नाईलला मुंबईने 8 कोटींमध्ये खरेदी केले होते.

इशान किशनची प्रतिक्रिया
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर इशान किशनने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इशान किशनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये इशान किशनने मुंबईच्या टीममध्ये घरवापसी झाल्यामुळे आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आमची मुंबई पुन्हा घरी येत आहे. पलटणला खूप मिस केलं, पुन्हा एकदा सोबत येण्याची आतुरतेने वाट पाहतोय. आपण एकत्र खूप आठवणी तयार केल्या आहेत, पण आपल्या गोष्टीची पुन्हा नव्याने सुरुवात होत आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल टीम आणि मालकांचे धन्यवाद. लवकर भेटू,’ असे इशान किशनने आपल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे.

धक्कादायक ! नोकरीच्या शोधात निघालेल्या तरुणीला बसने चिरडले

nashik crime

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 21 वर्षांच्या तरुणीला बसने चिरडले आहे. वैशाली शिवाजी गायकवाड असे या तरुणीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत वैशाली ही शहर पोलीस आयुक्तालयातील अंमलदार शिवाजी गायकवाड यांची मुलगी आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पोलीस दलात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

कशा प्रकारे घडली घटना ?
वैशाली शिवाजी गायकवाड ही तरुणी शुक्रवारी नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडली होती. ती मुख्य बसस्थानक परिसरात आली असता त्यावेळी नंदुरबारकडे निघालेल्या (एम.एच.15 बी.एल. 3445) या बसने वैशालीला चिरडले. जेव्हा हि बस मुख्य स्थानकातून बाहेर पडली त्यावेळी वैशाली हि रस्ता ओलांडत होती. यावेळी बसने वैशालीला जोरदार धडक दिली आणि ती जागेवरच कोसळली. तिला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर तिला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला.

चालक घटनास्थळावरून फरार
या अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. मृत वैशालीचे वडील पोलीस आयुक्तालयात अंमलदार आहेत. या अपघाताची माहिती मिळताच सरकार वाडा पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत वैशाली हि अत्यंत हुशार होती. तिने अनेक मोठमोठी स्वप्ने पहिली होती. तिला आपल्या वडिलांचा आधार व्हायचे होते. त्यासाठी ती नोकरी शोधत होती. मात्र काळाने तिच्यावर घाला घातल्यामुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एवढे सोने कशाला घातले विचारत, शिक्षकाला सव्वादोन लाखांना लुटले

औरंगाबाद – आम्ही पोलिस आहोत, तुम्ही अंगावर एवढे सोने कशाला घातले? ते काढून खिशात ठेवा, असे सांगत सेवानिवृत्त शिक्षकांचा दोन अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन असा 2 लाख 25 हजारांचा ऐवज लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शिवानिवृत्त शिक्षक सुधाकर गोपीनाथ इंजे पाटील (73, रा. शिवाजीनगर) हे गुरुवारी दुपारी फळे आणण्यासाठी शिवाजीनगर चौकात पायी चालत जात होते. दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना आम्ही पोलिस आहोत, तुम्ही गळ्यात आणि हातात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने कशाला घालता त्यामुळे सोने काढून ठेवा. काढून घेतले नाही तर आम्ही तुम्हाला पोलीस ठाण्यात घेऊन जातो असे धमकावले.

यानंतर इंजे पाटील यांनी बोटातील 16 ग्राम सोन्याच्या दोन अंगठ्या आणि गळ्यातील 29 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी बाहेर काढून किशात ठेवताना दोन भामट्यांनी लंपास केली.

मध्यरात्री रायगडमध्ये फायरिंगचा थरार; आरोपी पत्ता विचारायला थांबले अन्….

Raigad Crime

माणगाव : हॅलो महाराष्ट्र – रायगड जिल्ह्यातील माणगाव याठिकाणी मध्यरात्री एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी एका औषध विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या आरोपींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या औषध विक्रेत्याला थांबवून जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना इतकी अचानक घडली की, संबंधित तरुणाला स्वत:चे संरक्षण करायलाही वेळ मिळाला नाही. या हल्ल्यामध्ये हा औषध विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराची ही थरारक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके ?
शुभम जयस्वाल असे या हल्ल्यात जखमी झालेल्या 24 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो औषध विक्रीचे काम करतो. घटनेच्या दिवशी शुभम जयस्वाल दुकान बंद करून आपल्या घरी जात होता. यावेळी पल्सर मोटर सायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत त्याला थांबवले. यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाने बेसावध असलेल्या शुभमच्या पोटावर पिस्तुल रोखून त्याच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला.

हि घटना माणगावमधील कचेरी रस्त्यावर घडली आहे. हि घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी नेमक्या कोणत्या कारणातून हा प्राणघातक हल्ला केला? याची कोणतीही माहिती अजून पोलिसांना मिळालेली नाही. माणगाव पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 6.2 कोटी ITR दाखल

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । गेल्या वर्षी जूनपासून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 6.2 कोटींहून जास्त ITR आणि सुमारे 21 लाख टॅक्स ऑडिट रिपोर्ट (TARs) भरले गेले आहेत. नवीन इन्कम टॅक्स पोर्टल 7 जून 2021 रोजी लाँच करण्यात आले. एका निवेदनात, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले आहे की,”इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत सुमारे 21 लाख प्रमुख टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यात आले आहेत.”

पीटीआयच्या बातमीनुसार, 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी सादर केलेल्या एकूण 6.2 कोटी इन्कम टॅक्स रिटर्नपैकी 48 टक्के ITR -1 (2.97 कोटी), 9 टक्के ITR -2 (56 लाख), 13 टक्के ITR -3 (83 लाख) ) आणि 27 लाख ITR-4 (1.66 कोटी), ITR-5 (11.3 लाख), ITR-6 (5.2 लाख) आणि ITR-7 (1.41 लाख कोटी) होते.

छवि

कंपन्यांच्या बाबतीत, इन्कम टॅक्स रिटर्नची अंतिम तारीख 15 मार्च आहे.
जानेवारीमध्ये सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कंपन्यांच्या बाबतीत इन्कम टॅक्स रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 15 मार्चपर्यंत वाढवली होती. त्याच वेळी, 2020-21 साठी कर ऑडिट रिपोर्ट आणि ट्रान्सफर प्राइसिंग ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी आहे.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कोणत्याही करदात्याला ई-फायलिंगशी संबंधित कोणत्याही समस्या किंवा तक्रारीसाठी दोन ई-मेल आयडी दिले आहेत-
[email protected]
[email protected]

निवडणूक जवळ आल्याने माझ्यावर खोटा गुन्हा : रविंद्र ढोणे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मी माझ्या वाॅर्डाचा लोकप्रतिनिधी आहे. केवळ निवडणूक जवळ आल्याने माझ्यावर घाणेरडे आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांच्या कामासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत, राहणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने माझ्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा पूर्ण तपास करावा, माझा न्यायालयन बाबींवर पूर्ण विश्वास असल्याचे नगरसेवक रविंद्र ढोणे यांनी सांगितले.

सातारा येथे शहरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या जागेत खोदकाम करत जमिनीचे नुकसान केल्‍याप्रकरणी शाहुपूरी पोलिस ठाण्‍यात सातारा पालिकेचे नगरसेवक रविंद्र निवृत्ती ढोणे यांच्‍यासह तीन जणांवर ॲट्रासिटी गुन्‍हा नोंद करण्यात आला आहे. त्या संदर्भात रविंद्र ढोणे पत्रकारांशी बोलत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचे नगरसेवक आहेत. सातारा नगरपालिकेची निवडणूक काही दिवसावर आल्याने सातारा शहरात चांगलेच राजकीय वातावरण तापू लागले आहे.

रविंद्र ढोणे म्हणाले, यापूर्वी माझ्यावर असे बरेच प्रयत्न करण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात निवडणूक आल्याने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझी बदनामी करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या मागे बोलवता धनी वेगळाच आहे. तेव्हा पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. काही समाजकटंक या कायद्याचा चुकीचा वापर करत आहेत.

आता शेतीत डिझेलचा वापर होणार नाही; सरकारने तयार केला ‘हा’ प्लॅन

नवी दिल्ली । डिझेलचा वापर बंद करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 2024 पर्यंत शेतावरील डिझेलचा वापर शून्यावर आणण्याची आणि कृषी क्षेत्राला रिन्यूएबल एनर्जीमध्ये रूपांतरित करण्याची भारताची अपेक्षा आहे. भारतातून येत्या दोन वर्षांत कृषी क्षेत्रात डिझेलचा वापर जवळपास संपुष्टात येईल, असे केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी म्हटले आहे.

शेतीमध्ये डिझेलऐवजी जीवाश्म इंधनाचा वापर रिन्यूएबल एनर्जीसह केला जाईल. उर्जा मंत्रालय आणि रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाच्या अधिकार्‍यांसह, ऊर्जा कार्यक्षमतेच्या उपायांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सहकार्याच्या गरजेवर ऊर्जा मंत्र्यांनी भर दिला.

ते म्हणाले की,”केंद्र सरकार नवीन आणि आधुनिक भारतासाठी काम करत आहे, जे आधुनिक वीज व्यवस्थेशिवाय होऊ शकत नाही. आणि त्यासाठी ते आधुनिक भारतासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत काम करण्यास तयार आहे.” ते असेही म्हणाले की,”व्यावसायिक इमारतींनी ECBS आणि घरगुती इमारतींनी ECO NIVAS चे पालन केले पाहिजे. तसेच उर्जा साठवणुकीच्या मदतीने विजेची सर्व मागणी जीवाश्म नसलेल्या इंधन पद्धतीने पूर्ण केली पाहिजे.”

सौर सिंचन पंप
ऊर्जा मंत्रालयाने शेतकऱ्यांना डिझेलवर चालणाऱ्या सिंचन पंपांऐवजी सौरऊर्जेवर चालणारे सिंचन पंप वापरण्यास प्रोत्साहित केले आहे. आता सरकारकडून अनेक सौरपंप योजना राबवल्या जात आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांसाठीही आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकारांनीही सौर सिंचन पंप बसवण्यासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल
सरकारी आकडेवारीनुसार, भारताच्या एकूण इंधनाच्या वापरामध्ये डिझेलचा वाटा सुमारे 2/5 आहे. भारतातील कृषी क्षेत्र हे इंधनाचा, विशेषतः डिझेलचा सर्वाधिक वापर करणाऱ्यांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत सौरऊर्जेचा वापर करण्याचे हे पाऊल सर्वात प्रभावी ठरू शकते. त्यामुळे डिझेलचा वापर कमी होऊन शेतकऱ्यांच्या खर्चातही बचत होणार आहे.

साताऱ्यात महिलांच्या सुरक्षतेसाठी निर्भया पथकाच्या बोर्डचे उदघाटन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरातील शाहूनगरमध्ये गुरुकुल शाळेमार्फत 6 ठिकाणी निर्भया पथकाचे बोर्ड लावण्यात आलेली आहेत. महिलांना कुठेही संरक्षणाची गरज भासल्यास किंवा कोणतीही अडचण आल्यास त्यांनी 100 व 1091 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक आंचल दलाल यांनी केले आहे.

सातारा शहरात गुरूकुल शाळेकडून शहरात लावण्यात आलेल्या बोर्डचे उद्घाटन श्रीमती आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पोलीस दादा आणि पोलीस दीदी यांच्यामार्फत गुड टच बॅड टच याचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि पालकांना करण्यात आले.

राजेंद्र चोरगे म्हणाले, महिलांच्या सुरक्षितेसाठी या बोर्डचा मोठा फायदा होणार आहे. शहरात महिलांना कोणताही त्रास होत असल्यास या बोर्डवरती हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, त्यावरती फोन करून मदत मागता येणार आहे. तसेच विद्यार्थींना गुड टच आणि बॅड टच याचेही मार्गदर्शन करण्यात आले. मुलींच्या सुरक्षितेसाठी हे कळणे अत्यंत गरजेचे आहे.