Monday, December 22, 2025
Home Blog Page 2801

पोकलेनसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्याने तरुणास मारहाण

फलटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

पोकलेन मशिनसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत का भरले नसल्याचे विचारत फलटण तालुक्यातील मठाचीवाडी येथील एका तरुणास मारहाण केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी घेतली. या प्रकरणी चार जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अनिल जगन्नाथ शिंदे (वय ३२ वर्षे, रा मठाचीवाडी, ता. फलटण) व त्यांचा मेव्हणा रमेश बाऊसो बुधनवर या दोघांनी श्रेयी इक्वीपमेंट फायनान्स लि. पुणे यांच्याकडून पोकलेन मशिन घरेदी करण्यासाठी दि. १४ फेब्रुवारी २०२० रोजी ४२ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतलेले होते. दरम्यान, दि. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास इक्बीपमेंट फायनान्स लि. पुणेचे अधिकारी अरिंदम आचार्य व पंकज गायकवाड तसेच त्यांच्या सोबत इतर दोन व्यक्ती गाडीतुन मठाचीवाडी येथे आले.

यावेळी त्यांनी अनिल शिंदे यांच्या घरासमोर कर्जाचे हफ्ते वेळेत का भरले नाही असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी शिंदे यांना तुमच्या नावचे कोर्टाचे वॉरंट आहे. तुम्हाला आमचे सोबत पुण्याला यावे लागेल असे सांगितले. त्यावेळी शिंदे मोटरसायकलवरून त्यांच्या सोबत जाण्यास निघाले. त्यावेळी फायन्सास कंपनीचा पंकज गायकवाड फिर्यादी यांच्या मोटर सायकलवर पाठीमागे पिंप्रद येथे पेट्रोल पंपंच्या थोडे पुढे गेल्यावर अरिंदम आचार्य याने त्याची लाल रंगाची चार चाकी गाड़ी शिंदे यांच्या मोटार सायकलपुढे आडवी मारली. तसेच त्यांना थांबवत त्यांच्या गाडीची चावी काढुन त्यांना गाडीत बसविले.

गाडीत बसवल्यानंतर शिंदे यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी अनिल शिंदे यांनी मारहाण केलेल्या चार जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच त्यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता…; हिजाब प्रकरणात कंगणाची उडी

kangana ranaut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कर्नाटक राज्यात हिजाब आणि बुरखा शाळेत परिधान करण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चिघळल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी विविध स्तरांवरून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यातच आता बॉलीवूड अभिनेत्री अभिनेत्री कंगना रनौतने यांनी यावर इंस्टाग्रामवर पोस्ट करत भाष्य केले आहे.

कंगनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. कंगनाने इंस्टावर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिने २ फोटो शेअर केले आहेत. यामध्ये लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे. या पोस्टमध्ये इराणमधले हे दोन्ही फोटो तिने शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो हा १९७३ सालातील आहे. यावर कंगनाने लिहिले कि, १९७३ सालामध्ये इराणी महिला बिकिनी घालायच्या. पण आता महिला बुरखा घातलेल्या दिसत आहेत.

यानंतर पुढे कंगना म्हणाली की, “हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता वावरून दाखवा.” कंगनाच्या या स्टोरीमुळे हिजाब प्रकरणाला आणखीच वेगळे वळण येताना दिसत आहे. कारण कंगनाने पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांसह अनेक नेटकऱ्यांनी तिच्या मताला आदरपूर्वक संमती दर्शवली आहे. तर काही लोकांनी नेहमीप्रमाणे तिला आणि तिच्या पोस्टला विरोध केला आहे. मात्र तरीसुद्धा कंगनाची ही इंस्टाग्रामवरील स्टोरी चांगलीच चर्चेत असल्याचे दिसत आहे.

देशभरात ब्रॉडबँड ते मोबाईल नेटपर्यंत Airtel च्या सेवा ठप्प

Airtel

नवी दिल्ली । आज सकाळपासून एअरटेल यूजर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एअरटेलची ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा बंद आहेत. सोशल मीडियावर एअरटेल यूजर्सचे म्हणणे आहे की, त्यांना मोबाईल इंटरनेट आणि कॉलिंगमध्ये समस्या येत आहेत. देशभरातील अनेक यूजर्स याबाबत तक्रार करत आहेत. एअरटेल यूजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर याबाबत सातत्याने तक्रार करत आहेत. एअरटेलच्या तक्रारींचा मुद्दा असा आहे की, काही वेळातच #AirtelDown ट्विटरवर ट्रेंड करू लागला.

आउटेज ट्रॅकर डाउनडिटेक्टरनुसार, एअरटेल आज सकाळी 11:30 पासून इंटरनेटवर अडचण येत आहे. अनेकांनी सतत समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार केली आहे. मात्र, एअरटेलने याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.

Airtel News, Bharti Airtel News, Airtel Down, airtel recharge Plans,

या समस्येचा सामना करत असलेल्या शेकडो यूजर्सनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांची तक्रार मांडली आहे. काही यूजर्सम्हणतात की ते Airtel App वापरण्यास सक्षम नाहीत.

“संजय राऊत यांना इतकी मस्ती गुर्मी असेल तर…”; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या हे पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन, पुणे महा नगरपालिका आणि संचिती हॉस्पिटल या ठिकाणांना भेट देण्यासाठी आज सकाळी दाखल झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “संजय राऊत यांना इतकी मस्ती आहे, इतकी गुर्मी आहे. कि महाराष्ट्रातील लोकांचे जीव घेतील. महाराष्ट्रांच्या लोकांची हत्या करुन काही होणार नाही, असे वाटत असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात राहतात,” अशी टीका सोमय्या यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्याकडून कोरोना काळात संजय राऊत यांच्या साथीने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे. दुसऱ्या राऊत कडून संजय राऊतांकडे पोहोचला असेल तर जवाब द्यावा लागेल.

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने चालवल्या जात असलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. घोटाळेबाज कंपनीला कोव्हीड सेंटरचे कंत्राट कसे काय देण्यात आले? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला.

आमचा अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांसाठी महत्त्वाचा – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांसाठी महत्त्वाचा आहे, वास्तविक आगामी 25 वर्षे भारतासाठी महत्त्वाची आहेत असे विधान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. भारताच्या स्वातंत्र्याला (2047) 100 वर्षे पूर्ण होण्यासाठी दूरदृष्टी ठेवली नाही तर गेल्या 70 वर्षांत जे घडले असेच पुढेही घडेल. अर्थव्यवस्थेत स्थैर्य आणण्यासाठी आम्ही अर्थसंकल्प सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

सीतारामन म्हणाल्या की,”जर लोकं आणि अर्थव्यवस्थेला या संकटातून वाचवायचे असेल तर विकास हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळेच वाढीचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर 2021 चा अर्थसंकल्पही विकासाभिमुख होता.” सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले की,”भांडवली खर्चाच्या अंतर्गत पीएम गति शक्ती मास्टर प्लॅनवर काम केले जात आहे.” सरकार PM गति शक्ती प्रकल्पावर 23,000 कोटी रुपये खर्च करत आहे.

PM गति शक्ती योजनेअंतर्गत देशात 25 हजार किलोमीटरचे महामार्ग तयार केले जाणार आहेत. सरकारचे सर्व पायाभूत सुविधा प्रकल्प गती शक्ती योजनेत एकत्रित केले जातील. सरकारच्या मते, या योजनेमुळे पायाभूत सुविधांच्या विकासातील सर्व अडथळे दूर होतील. पंतप्रधान गती शक्तीमुळे अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. याच्या मदतीने 100 वर्षांसाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस राजवटीला काळोख तर भाजपच्या राजवटीला अमृत काल असे नाव दिले होते. त्या म्हणाल्या की,” 2008 मधील आर्थिक संकटापेक्षा कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानाला भाजप सरकार चांगल्या प्रकारे सामोरे गेले आहे. गेल्या 70 वर्षांपैकी 65 वर्षे ते सत्तेत होते आणि त्यांचे लक्ष केवळ कुटुंब निर्माण करणे, त्यांना मदत करणे आणि त्याचा फायदा करून देणे यावर होते असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला

पुण्यात गँगस्टर मोहोळे आणि मुळशीच्या शेलार टोळीमध्ये गँगवार

पुणे : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता बऱ्याच प्रमाणात कमी होत आहे. याचदरम्यान आता पुण्यामध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात पुन्हा एकदा व्यावसायिक वर्चस्ववादातून टोळी युद्ध झाले आहे. यामुळे पुण्यतील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शरद मोहोळच्या सांगण्यावरून त्याच्या टोळीतील सदस्यांनी विठ्ठल शेलारवर हल्ला केला होता. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच गुंड विठ्ठल शेलार याने व्यावसायिक वादातून हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली होती.

त्यामुळे गँगस्टर शरद मोहोळ याच्या सांगण्यावरुन सिद्धेश हगवणे, मल्हारी मसुगडे, आलोक भालेराव व त्यांच्या साथीदारांनी विठ्ठल शेलार व त्याचे साथीदार राधा चौकात असल्याचे समजून तेथे गेले. त्यावेळी तेथून एक गाडी जात होती. त्यात बसलेल्या विठ्ठल शेलारवर आणि त्याच्या साथीदारांवर दगड व कुंड्या फेकून मारल्या. तसेच राधा हॉटेल व तेथून येणार्‍या जाणार्‍या लोकांच्या जीवाची पर्वा न करता रोडवर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत गुंड त्या ठिकाणाहून पसार झाले होते. ही घटना मागिल महिन्यात जवडी परिसरामध्ये घडली आहे. या दोन्ही गुंडांची दहशत एवढी आहे की त्या बाबत एकही नागरिक तक्रार द्यायला पुढे आला नाही. यानंतर पोलिसांनी स्वतःच पुरावे गोळा केले आणि शरद मोहळ आणि त्याच्या साथीदारा विरुद्ध गुन्हे दाखल केले.

कोण आहे शरद मोहोळ?
पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून मोहोळची ओळख आहे. शरद मोहोळ या टोळीने सरपंचाचे अपहरण करुन खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. यानंतर शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेरावला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्यांनी दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा नाडीने गळा आवळून खून केला होता. मात्र या खटल्यामधून पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

कोण आहे विठ्ठल शेलार?
विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील गुंड आहे. विठ्ठल शेलार याच्याविरुद्ध खून, अपहरण, दरोड्याची तयारी आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर विठ्ठल शेलार याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

पॅन कार्ड – आधार लिंक करताना अडचण येतेय ?? अशा प्रकारे करा लिंक

PAN-Aadhar Linking

नवी दिल्ली । पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. मात्र असेही काही लोक आहेत ज्यांना लिंक करण्यात अजूनही अडचणी येत आहेत. वास्तविक, दोन डॉक्युमेंट्स च्या डिटेल्समध्ये फरक असल्यामुळे या अडचणी उद्भवू शकतात.

पॅनकार्ड धारकांना 31 मार्च 2022 पर्यंत त्यांचे PAN कार्ड आधार कार्ड क्रमांकाशी लिंक करण्याचा सल्ला दिला जातो. या मुदतीपूर्वी तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक केला नाही तर तुमचे पॅन कार्डही इन ऍक्टिव्ह केले जाऊ शकते. याशिवाय, तुम्हाला आधारशी पॅन लिंक करण्यासाठी 1,000 रुपये देखील द्यावे लागतील.

‘या’ कारणामुळे पॅन आधार लिंक करणे शक्य होत नाही
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी नाव, जन्मतारीख/वर्ष, ओटीपी मिळवण्यासाठी मोबाइल नंबर इत्यादी डिटेल्स पॅन आणि आधारशी जुळत नसल्यास, युझर्सना दोन्ही लिंक करण्यात अडचणी येऊ शकतात.

अशा प्रकारे ठीक करा
जर पॅन कार्डचे डिटेल्स जुळत नसतील, तर करदात्यांना ते दुरुस्त करण्यासाठी संबंधित ऑथॉरिटीकडे जावे लागेल. पॅनकार्डमध्ये काही फरक आढळल्यास तत्काळ कारवाई करून करदात्यांना तोडगा दिला जातो. आधार कार्ड किंवा आधार एनरोलमेंट क्रमांक (आधार सेवा केंद्र) चे युझर्स वेबसाइटला भेट देऊन किंवा त्याद्वारे अपडेट केले जाऊ शकतात.

अशा प्रकारे ऑनलाइन लिंक करता येते
>> सर्वप्रथम इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जा.
>> आधार कार्डमध्ये दिल्याप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका.
>> आधार कार्डमध्ये फक्त जन्माचे वर्ष दिले असल्यास चौकोनावर टिक करा.
>> आता कॅप्चा कोड टाका.
>> आता लिंक आधार बटणावर क्लिक करा
>> तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

ऑनलाइन अपडेट करू शकतो का ?
तुम्हाला काही ऑनलाइन अपडेट करायचे असल्यास नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता यासारखी वैयक्तिक माहिती ऑनलाइन अपडेट करता येते. तुमचा मोबाईल क्रमांक आधारमध्ये रजिस्टर्ड असावा जेणेकरून तो OTP द्वारे उघडता येईल. जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट किंवा लिंक करायचा असेल तर तुम्ही ते ऑनलाइन करू शकत नाही. ते अपडेट करण्यासाठी, तुम्हाला आधार सेवा केंद्र किंवा आधार एनरोलमेंट सेंटरला भेट द्यावी लागेल.

“आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, रोज नाही”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर साधला. “विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. रोज येत नव्हतो,”असा टोला ठाकरे यांनी लगावला.

मुंबईत पार पडलेल्या दरबार हॉलच्या उद्धघाटन कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपले राजभवन हे देशातील सर्वोत्तम असेल. 50 एकरात हे राजभवन आहे. या ठिकाणची असलेली हवा ही थंड असते. राजकीय हवा कशी ही असू द्या, असा टोला यावेळी ठाकरेंनी लगावला.

पावसाळ्यात मोर नाचतानाचे फोटो येतात, तर, कधी विषारी साप पकडल्याचे फोटो येतात. शिवसेना प्रमुखांसोबत येथे यायचो, राज्यपाल यांना भेटायला यायचो. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना भेटायला बोलावलेले त्यावेळी आलेलो होतो. आता जुना वारसा जपून आपण आधुनिककतेकडे चाललो आहोत. आधुनिकीकरणाच्या नावाखाली सर्व तोडून मोडून टाकले जाते. मात्र, या ठिकाणी जपलेले आहे,असे ठाकरे यांनी म्हंटले.

परप्रांतीय आत्महत्याग्रस्त कामगाराचे आयुष संस्थेकडून अंत्यसंस्कार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कुपवाड शहरातील औद्योगिक वसाहती लगत असणाऱ्या शरद नगर येथे एका परप्रांतीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. गौतम रामशंकर जाटव असे मयत परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. आयुष हेल्पलाईन टीम च्या रुग्णवाहिकेतून सदर मयत कामगारास उत्तरीय तपासणीसाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

आयुष सदस्यांनी या परप्रांतीय कामगाराची माहिती घेतली असता मयत परप्रांतीय कामगार हा पत्नी सोबत राहत होता. त्यांच्या नातेवाईकांना सदर घटनेची माहिती दिली असता त्यांनी सांगितले आमची आर्थिक परिस्थिती नसल्याने यांचे पुढील कार्य आम्ही करू शकत नाही. सदर मृत व्यक्तिची पत्नी एकटीच असल्याने ती अंतविधि करू शकत नव्हती.

तिने आयुष हेल्पलाईन टीमकडे मदत मागितली त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता आयुष हेल्पलाईन टीमच्या सदस्यानी त्या मृत व्यक्तिवर अंतिम संस्कार केले व सामाजिक दायित्व पार पाडले. यावेळी आयुष हेल्पलाईन टीमप्रमुख अविनाश पवार ,सुरज शेख, यश मोहिते ,चिंतामणी पवार, आजर शेख आणि चांद शेख हे मदतीसाठी उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती- संजय राऊत

raut thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काहीही केलं तरी तडा जाणार नसून महाविकास आघाडीचे स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती आहे आणि राहील असे मोठं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत हे सध्या गोव्यात असून त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

गोव्यात आमचा प्रचार आणि प्रसार, विस्तार सुरु आहे. इतक्या वरचं आम्ही थांबणार नाही… तर विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यामध्ये लोकसभेची तयारी आम्ही सुरु करणार आहोत. गोव्यात लोकसभेच्या जागा लढणार तयारी सुरु करणार आहोत, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना गोव्यात 11 जागा लढतेय पेंडण्यापासून ते वास्कोपर्यंत गोव्याच्या दोन्ही बाजूला शिवसेनेचे उमेदवार आहेत. ख्रिश्चन, हिंदू, मराठी, सर्व म्हणजे अख्खा गोवा आमचा आहे असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत 22 जागा निवडूण येण्याच्या केलेल्या विधानावर प्रतिउत्तर देत राऊत म्हणाले की, “22 जागा ना… जिंकू द्याना.. ते नेते आहेत त्यांच्या पक्षाचे आणि नेत्याला असं आत्मविश्वास पूर्ण बोलणं आवश्यक असतं. आम्हीही बोलतो 11 पैकी 11 जागा जिंकू. काँग्रेस बोलतं आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. आप म्हणतयं पूर्ण बहुमत मिळेल, तृणमूल काँग्रेसला वाटते आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल,” असही राऊत म्हणाले आहेत.