Monday, December 22, 2025
Home Blog Page 2806

10 मार्च नंतर राज्यात भाजपच सरकार येणार असा माझा दावा नाही ; चंद्रकांतदादांची पलटी

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात 10 मार्चनंतर सत्ताबदल होईल. तेव्हा 10 मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपले सरकार येईल, असा दावा केला होता. मात्र, माझा हा दावा नसल्याचे पाटील यांनी म्हणत पलटी मारली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे येथे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. 10 मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपले सरकार येईल, असे मी कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांचे मन राखण्यासाठी तसे बोलावे लागले. मात्र, मी असा दावा केलेला नाही, असे यावेळी पाटील यांनी सांगितले.

यावेळी पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत जे बोलतात त्याला गंभीरपणे घेत नाही. सुपातले जात्यात जात आहेत. एक दिवस सगळे जण जात्यात जातील. अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहेत. मॉब लिंचिंग करुन सोमय्यांची हत्या करण्याचा कट रचला गेलेला आहे. केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या ईडीचा वापर करतात असं राऊत यांना वाटत असेल तर त्यांनी कोर्टात जावे, असेही यावेळी पाटील यांनी म्हंटले.

रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; म्हणाले की मला कोणत्या तरी गुन्ह्यात अडकवायच अन्…..

ravi rana uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावतीचे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासाहित ११ जणांवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर राजकारण पुन्हा एकदा तापलं असून रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधला आहे.

माझ्यावर गुन्हे दाखल करुन मला कोणत्यातरी गुन्ह्यात अडकवलं पाहिजे असा इशारा उद्धव ठाकरेंनी अमरावतीमधील पोलीस आयुक्तांना दिला. महाराष्ट्रातील कोणत्या विषयावर कोणी काही बोललं तर त्याला अडकवायचं, फसवायचं, अटक करायची असा प्रकार सुरु आहे. महाराष्ट्रात गेलो तर अटक करुन जेलमध्ये टाकतील असे मला पोलिसांचे फोन येत आहेत,” असं रवी राणा यांनी यावेळी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर संजय राऊतांवरही 506 चा गुन्हा दाखल करा असं थेट आव्हान रवी राणा यांनी यावेळी दिलं. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे, अनिल परबच्या प्रॉपर्टींवर कारवाई होईल, आणि मीही पुरावे देईन, असे आरोप आमदार रवी राणा यांनी केले आहेत.

आर्थिक धोरणाबाबत गव्हर्नरांचे 10 मोठे निर्णय ज्याचा तुमच्यावरही थेट परिणाम होईल

RBI

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यीय समितीने आर्थिक धोरणांबाबत अनेक प्रभावी निर्णय घेतले आहेत. तीन दिवस चाललेल्या बैठकीनंतर झालेल्या निर्णयांची माहिती देताना गव्हर्नर दास म्हणाले की,”महामारीच्या दबावातून अर्थव्यवस्था अजूनही सावरत आहे. त्यामुळे तूर्तास आर्थिक धोरणे मऊ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

या समितीची बैठक आधी 7 फेब्रुवारीपासून होणार होती, मात्र सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने एक दिवसासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली, त्यानंतर ८ फेब्रुवारीपासून बैठक सुरू झाली. किरकोळ महागाई, धोरणात्मक व्याजदर, विकास दर आणि डिजिटल व्यवहारांसह अनेक मुद्द्यांवर बैठकीत निर्णय घेण्यात आले. MPC बैठकीतील 10 मोठ्या गोष्टींबाबत जाणून घ्या.

डिजिटल व्यवहारांना चालना मिळेल
– सलग 10व्यांदा रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही. तो 4 टक्क्यांवर कायम आहे.
– रिव्हर्स रेपो दरही 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. RBI कडे जमा केलेल्या बँकांच्या पैशांवर त्याच दराने व्याज दिले जाते.
-आपत्कालीन आरोग्य सेवा आणि कृषी, खाणकाम, रेस्टॉरंट्स यासारख्या गहन क्षेत्रांसाठी लिक्विडिटीची सुविधा 30 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
– ई-रुपी प्रीपेड डिजिटल व्हाउचर 10,000 रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आले आहे. हे एकापेक्षा जास्त वेळा वापरले जाऊ शकते.
– व्यापाराशी संबंधित सेटलमेंटसाठी नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH) ची मर्यादा 3 कोटी रुपये करण्यात आली आहे.
– 2021-22 या आर्थिक वर्षासाठी विकास दराचा अंदाज 9.2 टक्के राखून ठेवण्यात आला आहे.
– पुढील आर्थिक वर्षासाठी (2022-23) रिझर्व्ह बँकेने 7.8 टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला आहे.
– किरकोळ महागाईचा दरही पुढील आर्थिक वर्षात 4.5 टक्क्यांवर राहण्याची अपेक्षा असून, सप्टेंबरनंतर ते कमी होण्याची चिन्हे आहेत.
– सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा ताळेबंद गेल्या वर्षीच्या तुलनेत मजबूत झाला असून त्यामुळे बँकांच्या कामगिरीत आणखी सुधारणा होईल, असा दावा गव्हर्नरांनी केला आहे.
– साथीच्या रोगाचा दबाव अजूनही सुरू आहे. ओमिक्रॉनने अर्थव्यवस्थेच्या सुधारणेला मोठा धक्का दिला आहे. जगातील काही देशांमध्ये, महागाईचा दर अनेक दशकांच्या वर पोहोचला आहे.

पाटण नगरपंचायत : नगराध्यक्षपदी मंगल कांबळे तर उपनगराध्यक्षपदी सागर पोतदार बिनविरोध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ. मंगल शंकर कांबळे तर उपनगराध्यक्ष पदावर सागर दादासो पोतदार यांची बिनविरोध निवड झाली. नगरपंचायतीच्या पदाधिकारी निवडीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीने बाजी मारली.

पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित होते. राष्ट्रवादी तथा पाटणकर गटाच्या पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीकडे नगरपंचायतीच्या 17 पैकी तब्बल 15 सदस्यांचे बहुमत होते. तर विरोधी शिवसेना तथा राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई गटाकडे अवघ्या 2 नगरसेविका असल्याने नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष पाटण विकास आघाडीचाच होणार हे निश्चित होते. बुधवारी नगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम क्षणी आघाडीच्या सौ. अनिता देवकांत यांनी माघार घेतल्याने सौ. मंगल कांबळे यांची बिनविरोध निवड स्पष्ट झाली व गुरुवारी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

गुरुवारी नगरपंचायत कार्यालयात पिठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुनील गाढे, पाटण नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली . उपनगराध्यक्ष पदासाठी पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीच्या वतीने सागर दादासो पोतदार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. विरोधी शिवसेना ना. देसाई गटाकडून उपनगराध्यक्ष पदासाठीही कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. छाननीत सागर पोतदार यांचा अर्ज वैध ठरला व यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांचीही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सुनिल गाढे व अभिषेक परदेशी यांनी अभिनंदन केले.

नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उप सभापती प्रतापराव देसाई, जि. प. माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, माजी चेअरमन दिनकरराव घाडगे, पाटण खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे ,कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोपानराव चव्हाण , सचिव अमरसिंह पाटणकर, बाजार समिती सभापती रेखाताई पाटील आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी अभिनंदन केले.

एअरटेलच्या ग्राहकांना धक्का, टॅरिफ प्लॅन पुन्हा महागणार !

Airtel

नवी दिल्ली । काही महिन्यांपूर्वी एअरटेलसह जवळपास सर्वच कंपन्यांनी आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. आता एअरटेलने या वर्षी पुन्हा दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. आपला ARPU 200 रुपयांपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कंपनीच्या ग्राहकांना धक्का बसला तरी कंपनीच्या मागे हटणार नाही.

भारती एअरटेल लिमिटेडने बुधवारी सांगितले की,”तिसर्‍या तिमाहीत टॅरिफ वाढ आणि गुगलने केलेल्या गुंतवणुकीमुळे आपल्या मजबूत कामगिरीमध्ये लक्षणीय योगदान आहे. या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 12.6 टक्‍क्‍यांनी वाढून 29,867 कोटी रुपये झाले, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत 26,518 कोटी रुपये होते.”

यावर्षी वाढ होईल

एका पोस्ट अर्निंग कॉलमध्ये, एअरटेलच्या टॉप मॅनेजमेंटने सांगितले की,” प्लॅनची ​​किंमत पुन्हा वाढू शकते.” मॅनेजमेंटने सांगितले की,”जर दोन ते चार महिन्यांत टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ झाली नाही, तर या कॅलेंडर वर्षाच्या शेवटी वाढ होऊ शकते.” मॅनेजमेंटने पुढे असेही सांगितले की,” कंपनी 2022 मध्ये ARPU 200 रुपयांपर्यंत दरमहा नेण्याची अपेक्षा करत आहे.”

कंपनीने या तिमाहीत (Q3) 830 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तर गेल्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीला 854 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. मात्र , कंपनीने ARPU मध्ये मोठी उडी घेतली आहे.भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)  गोपाल विट्टल यांच्या म्हणण्यानुसार, मोबाईल फोन सेवांच्या दरांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीमुळे, पर युझर ऍव्हरेज रेव्हेन्यू (ARPU) रुपये 163 झाली आहे.

मात्र, सुधारित मोबाइल दरांचा संपूर्ण परिणाम चौथ्या तिमाहीत दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. भारती एअरटेलवरील कर्जाचा बोझा वाढला आहे. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीवर 1.59 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत 1.47 लाख कोटी रुपये होते. NSE वर Bharti Airtel चे शेअर्स बुधवारी 1.55% वाढून 719.90 रुपयांवर बंद झाले.

तडीपार असताना विनयभंग; 72 तासांत दोषारोपपत्र

 

औरंगाबाद – तडीपार असताना ठाण्याच्या हद्दीत येऊन विनयभंगाचा गुन्हा करणाऱ्या सराईत आरोपीला वेदांत्नगर पोलिसांनी तत्काळ अटक केली. विशेष म्हणजे त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करत 72 तासात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सध्या आरोपी हर्सूल कारागृहात असून, मंगेश मारुती भालेराव (रा. राजीवनगर, रेल्वेस्टेशन) असे आरोपीचे नाव आहे.

वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश भालेराव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेले आहे. या कालावधीतही तो पोलिस ठाण्याच्या हद्दीत येऊन गुन्हे करीत आहे. 5 फेब्रुवारीला पीडितेच्या घरात घुसून आरोपीने महिलेचा विनयभंग केला होता. त्यावरून 6 फेब्रुवारीला वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे यांनी आरोपी मंगेश भालेराव याला तात्काळ अटक केली. त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा केले. विशेष म्हणजे पुराव्यासहित यांच्याविरुद्ध 72 तासात दोषारोपपत्र देखील सादर केले. न्यायालयाने याबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे.

आरोपीविरुद्ध 12 गुन्हे – 

आरोपी मंगेश भालेराव हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मारामारी करणे, विनयभंग, मालाविरुद्धचे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. क्रांती चौक आणि वेदांत नगर पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. त्याला 6 मार्च 2021 रोजी दोन वर्षांसाठी तडीपार केलेले आहे.

मार्च 2022 पर्यंत महागाईचा त्रास होणार तर ‘या’ महिन्यापासून मिळेल दिलासा

नवी दिल्ली । चालू तिमाहीत जानेवारी-मार्च 2022 मध्ये, किरकोळ महागाई ग्राहकांना खूप त्रास देईल. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतरच यामध्ये नरमाई येण्याची चिन्हे आहेत अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. चलनविषयक समितीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अंदाजे किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली.

शक्तीकांत दास म्हणाले की,”पुढील आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 4.5 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. चलनवाढीचा दर चालू तिमाहीत जास्त राहील, मात्र तो 6 टक्क्यांच्या निश्चित मर्यादेच्या पुढे जाणार नाही.” तसेच, वृत्तसंस्था रॉयटर्सने अर्थतज्ज्ञांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे की,” जानेवारीमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 6 टक्क्यांवर पोहोचेल, जो RBI च्या व्याप्तीचा शेवट आहे.”

सप्टेंबरनंतरच नरमाईची चिन्हे आहेत
शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की,” सध्या किरकोळ महागाईपासून फारसा दिलासा दिसत नाही आणि 2022-23 च्या उत्तरार्धानंतर म्हणजेच सप्टेंबर 2022 नंतरच त्यात नरमाई येण्याची चिन्हे आहेत. देशांतर्गत घटकांपेक्षा महागाई जागतिक घटकांच्या दबावाखाली आहे. जगभर महागाई वाढत आहे. अशा स्थितीत सध्याच्या घडीला केवळ भारतात खाली जाण्याची शक्यता नाही.”

लोकांच्या विचारात महागाई बसली आहे : दास
महागाईबाबत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी मोठे वक्तव्य केले आहे. अन्न, भाजीपाला, इंधन, कपडे महाग आहेत असे जर लोकांना वाटत असेल तर त्यांच्या मनात महागाई घुमेल, असे ते म्हणाले. मात्र, कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपन्या आणि टेलिकॉम कंपन्यांच्या वतीने वाढलेल्या किंमतीचा परिणाम किरकोळ महागाईवरही नक्कीच दिसून येईल.

धक्कादायक : स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरूणाला गरम चुन्याच्या निवळीत ढकलले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. काल रात्री बुधवारी उशिरा 11.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलेल्याचे समोर आले आहे. जखमी तरूणांवर सातारा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतचा गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समाधान महादेव मोरे (वय- 29) या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे उकळत्या चुन्यात निवळीत तरूणाला ढकलून देण्यात आले. या तरूणाला नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मारहाण झालेल्या मुलाचे शरीर ठीक ठिकाणी भाजले आहे.

जखमी तरूणावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मारहाण करणारे संशयित हे दारू पिलेले असल्याचे तक्रारदार यांचे सांगणे आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तरूण 9 टक्के भाजला असल्याची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली. तसेच संबधित आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असेही सांगितले.

“महिलांचे काही पोशाख पुरुषांना उत्तेजित करतात, म्हणून… ”, भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घातल्याने मुस्लिम मुलीला प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली. यावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. या मुद्द्यावरून भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले. “महिलांचे काही पोशाख पुरुषांना उत्तेजित करतात, म्हणून बलात्काराच्या घटना घडतात, असे विधान कर्नाटकचे भाजपा आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी केले.

कर्नाटकमध्ये हिजाबवरून वाद सुरू असताना भाजपा आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “बिकिनीसारखे शब्द वापरणे हे वाईट विधान आहे. कॉलेजमध्ये शिकताना मुलांनी पूर्ण कपडे घालावेत. आजकाल महिलांच्या कपड्यांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे कारण पुरुष भडकतात. हे योग्य नाही. आपल्या देशात महिलांचा सन्मान केला जातो. कन्नड भाषेत त्यांनी हे वक्तव्य केले.

सुरुवातीला त्यांनी केलेल्या विधानामुळे वाद होणार असल्याचे त्यांच्या नंतर लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली. प्रियांकाने माफी मागावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

बेरोजगारी आणि कर्जामुळे 25 हजारांहून जास्त भारतीयांनी मृत्यूला कवटाळले; सरकारनेच दिली माहिती

sucide

नवी दिल्ली । दिवसेंदिवस वाढत चाललेली बेरोजगारी देशाची चिंता वाढवत आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की, नोकऱ्यांअभावी भारतीय आत्महत्या करत आहेत. नोकऱ्यांअभावी लोकांवर कर्जाचा वाढता बोझाही त्यांच्यापुढे अडचणी निर्माण करत आहे. ही समस्या इतकी गंभीर झाली आहे की, बेरोजगारी आणि कर्जामुळे 25,000 हून जास्त भारतीयांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे.

खुद्द सरकारनेच ही माहिती दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान, संसदेत बेरोजगारीच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेत केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले की, 2018 ते 2020 या काळात 25,000 हून जास्त भारतीयांनी बेरोजगारी किंवा कर्जामुळे आत्महत्या केल्या आहेत. सरकारने वरच्या सभागृहात सांगितले की, 9,140 लोकं बेरोजगारीमुळे तर 16,091 लोकं दिवाळखोरी किंवा कर्जामुळे केलेल्या आत्महत्येमुळे मरण पावले.

2020 मध्ये बहुतेक लोकांनी आपला जीव दिला
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीचा हवाला देत ते म्हणाले की,”बेरोजगारांमध्ये आत्महत्या वाढत आहेत. 2020 च्या साथीच्या वर्षात, ही संख्या 3,548 वर पोहोचली आहे, जी सर्वोच्च आहे. 2018 मध्ये बेरोजगारीमुळे 2,741 लोकांनी आपले जीवन संपवले.”

2019 मध्ये 2,851 भारतीयांनी असे पाऊल उचलले. मात्र, कर्जाच्या दबावामुळे मृत्यूची प्रवृत्ती योग्य नव्हती. 2018 मध्ये नोटबंदीमुळे 4,970 लोकांनी आत्महत्या केल्या. 2,019 मध्ये हा आकडा 5,908 पर्यंत वाढला. 2020 मध्ये 5,213 लोकांनी जीव दिला.

बेरोजगारीचा मुद्दा वारंवार उपस्थित केला
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध विरोधी पक्षांच्या खासदारांनी बेरोजगारीचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे. महामारीच्या पार्श्वभूमीवर देशासमोर असलेल्या समस्येला तोंड देण्यासाठी अर्थसंकल्पात फार कमी तरतूद केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून रोजगाराच्या संधी निर्माण करून हा प्रश्न सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे गृह राज्यमंत्री म्हणाले.