Monday, December 22, 2025
Home Blog Page 2808

Gold Price : सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत, आजची किंमत पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याच्या किंमतीत आज 0.01 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी चांदीचे भाव 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहेत.

सोन्या-चांदीची किंमत जाणून घ्या
ऑक्टोबरमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.01 टक्क्यांनी वाढून 48,666 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंग मध्ये चांदी 0.13 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 62,606 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,900 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,970 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,900 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45800 रुपये
पुणे – 45,760 रुपये
नागपूर – 45,760 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,970 रुपये
पुणे – 49,900 रुपये
नागपूर – 49,900 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4536.00 Rs 4535.00 -0.022 %⌄
8 GRAM Rs 36288 Rs 36280 -0.022 %⌄
10 GRAM Rs 45360 Rs 45350 -0.022 %⌄
100 GRAM Rs 453600 Rs 453500 -0.022 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4951.00 Rs 4950.00 -0.02 %⌄
8 GRAM Rs 39608 Rs 39600 -0.02 %⌄
10 GRAM Rs 49510 Rs 49500 -0.02 %⌄
100 GRAM Rs 495100 Rs 495000 -0.02 %⌄

Stock Market : गुंतवणूकदारांच्या सावधगिरीमुळे बाजाराची सावध सुरुवात

नवी दिल्ली । रिझव्‍‌र्ह बँकेच्या एमपीसी बैठकीचा निकाल येण्यापूर्वी गुरुवारी बाजारात गुंतवणूकदार सावध होते. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये जोरदार तेजी आली असली तरी नंतर गुंतवणूकदारांनी माघार घेतली.

सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स सुमारे 250 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता, तर निफ्टीने 17,500 चा टप्पा पार केला. काही वेळातच गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केली आणि रात्री 9.36 वाजता बाजार पुन्हा खाली आला. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी 12 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होते. सुरुवातीला, आयटी इंडेक्स निफ्टीवर सर्वात जास्त वाढले होते, तर मेटल आणि रिएल्टी इंडेक्स देखील अर्ध्या टक्क्यांहून अधिकने वाढले होते.

आज ‘या’ कंपन्यांचे निकाल दिसणार आहेत
Zomato, Hero MotoCorp, Mahindra यासह अनेक कंपन्या गुरुवारी त्यांचे डिसेंबर तिमाही निकाल जाहीर करणार आहेत. या कंपन्यांच्या कामगिरीवरही बाजाराची वाटचाल अवलंबून असेल. इतर मोठ्या कंपन्यांमध्ये डॉ लाल पाथलॅब, अमरा राजा बॅटरीज, हिंदाल्को इंडस्ट्रीज, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, एमआरएफ, झी मीडिया कॉर्पोरेशन, रिलायन्स पॉवर इत्यादींचा समावेश आहे.

जागतिक बाजारात तेजीचा कल आहे
अमेरिका, युरोपसह आशियातील बहुतांश शेअर बाजारातही तेजीचा कल आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही नक्कीच दिसून येईल. अमेरिकेचा NASDAQ शेअर बाजार 9 फेब्रुवारीला 2.08 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह बंद झाला. याशिवाय फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनच्या शेअर बाजारातही बुधवारी 1.57 टक्क्यांनी वाढ झाली. 10 फेब्रुवारीला सिंगापूर, जपान, तैवान, दक्षिण कोरियाचे शेअर बाजार ग्रीन मार्कवर खुले आहेत.

रवी राणा यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल; पालिका आयुक्त शाई फेक प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार काल घडला आहे. या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह 10 जणांवर कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीमध्ये असलेल्या राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा महानगरपालिकेने हटवला. त्यानंतर अमरावतीत पुतळा हटवू नये अशी मागणी करतात काही संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी रवी राणा, नवणीत राणा हे आघाडीवर होते.

त्यानंतर काल या पुतळा प्रकरणावरून महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर महिलांच्यावतीने शाई फेकण्यात आली. कालच्या घडलेल्या शाई फेक प्रकरणावरून रवी राणा यांच्यासह दहा जनावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे राणा यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

काय म्हणाल्या खासदार नवणीत राणा?

अमरावती येथील आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांनी प्रतिक्रीया दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यामुळे संतापलेल्या शिवप्रेमींनी शाईफेक केली, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आपण दिल्लीला असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. तर आमदार नवणीत राणा यांनी हा शिवप्रेमींचा राग असल्याचे म्हंटले.

हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतुन काढलं हे खोटं; राऊतांनी खोडून काढला मोदींचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जोरदार भाषण करत काँग्रेस वर टीका केली होती. दिवंगत लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं, अस म्हणत त्यांनी काँग्रेस वर आरोप केला. मोदींचा हा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोडून टाकला. घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटं बोलू नये असेही राऊत म्हणाले.

मला कळायला लागल्यापासून मी सागरा प्राण तळमळला’ गाणं आकाशवाणीवरुनच ऐकलं आहे. हे गाणं लोकप्रिय कऱण्याचं काम आकाशवाणीनेच केलं. यावरून हृदयनाथ मंगेशकर यांना काढलं असेल, तर ते गाणं वाजवतील कशाला, असा सवाल करत रेकॉर्डमध्ये असं काही नाही, असा दावा राऊत यांनी केलाय.आजही मी आकाशवाणी, दूरदर्शन, टीव्हीवर ऐकतो. हे गाणं आमच्या ह्रदयात आहे. मंगेशकर भगिनी तसंच ह्रदयनाथ मंगेशकरांनी हे गाणं फार वरती नेऊन ठेवलं आहे. असे राऊत म्हणाले.

मोदी नेमकं काय म्हणाले-
काँग्रेस ने मंगेशकर कुटुंबियांवर अन्याय केला असा आरोप मोदींनी केला. लता मंगेशकर यांचे छोटे भाऊ पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी वीर सावकरांची देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं,” असं नरेंद्र मोदी म्हणाले होते.

दहावी-बारावीची परीक्षा महिन्यावर परंतु लसीकरण मात्र काठावर!

औरंगाबाद – दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्याचे आदेश शिक्षण मंडळाने जानेवारी महिन्यात दिले होते. परंतू, महिनाभरात केवळ 30 ते 35 टक्के विद्यार्थ्यांना लसीचा एकच डोस मिळाला आहे. अद्याप 70 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. त्यामुळे परीक्षेपूर्वी म्हणजे एका महिन्यात सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.

शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावीची परीक्षा 15 मार्चपासून तर बारावीची परीक्षा चार मार्चपासून सुरु होणार आहे. 14 आणि 25 फेब्रुवारीला दोन्ही वर्गाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यात नऊ फेब्रुवारीपर्यंत 2 लाख 64 हजार 511 विद्यार्थ्यांपैकी 74 हजार 686 विद्यार्थ्यांना पहिला डोस दिला आहे. परीक्षेपूर्वी या विद्यार्थ्यांना लसीचा दुसरा डोसही मिळण्याची शक्यता आहे. मात्र, उर्वरित 1 लाख 89 हजार 825 विद्यार्थ्यांना अजून पहिलाही डोस मिळालेला नाही.

15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण त्या-त्या शाळेतच केले जात आहे. परंतू, दर रविवारी शाळेला सुटी; तर शनिवार, रविवार आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सुटी असल्यामुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारीदेखील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु ठेवावे. लसीकरण करत असताना नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांऐवजी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

2,64,511 – इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी
74,314 – दहावीचे एकूण विद्यार्थी
74,686 – पहिला डोस घेतलेले विद्यार्थी
30,356 – पहिला डोस घेतलेले विद्यार्थी
56,770 – बारावीचे एकूण विद्यार्थी
15,625 – लसीचा पहिला डोस घेतलेले विद्यार्थी

म्हसवड शहरात मध्यरात्री नंग्या तलवारी नाचवत चोरट्यांची दगडफेक

दहिवडी | म्हसवड शहरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी हातात नंग्या तलवारी घेऊन धुमाकूळ घातला. म्हसवडचे नगरसेवक केशव कारंडे यांच्या घरासह सनगर गल्ली, गुरव गल्ली, मुख्य बाजारपेठ व खंडोबा मंदिर परिसरातील 6 हून अधिक घरांचे कडी-कोयंडा तोडत अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नगरसेवक केशव कारंडे यांच्या घरातून 73 हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले, तर अन्य एकाच्या घरात दागिन्यावर डल्ला मारला आहे. येथील खंडोबा मंदिर लगत राहत असलेले सूर्यकांत कथले यांच्याही घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी एक मोबाईल व रोख 2 हजार रुपये लांबवले आहेत. तर गुरव गल्लीतही मध्यरात्री चोरट्यांनी काही ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथील एकाला चोरट्यांची चाहूल लागल्याने त्याने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी पळ काढला. स्थानिकांनी पाठलाग करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनीही त्यांच्या दिशेने दगडफेक करत दहशत निर्माण केली.

तसेच सणगरगल्ली येथील सासणे बोळात सरस्वती महेश ईकारे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 1 लाख 46 हजारांचा ऐवज लंपास केला. म्हसवड शहरात चोरट्यांनी घरफोडी करुन नंग्या तलवारी नाचवत दहशत निर्माण केली. हा प्रकार शहरातील एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.तपास सपोनि बाजीराव ढेकळे करत आहेत.

लता मंगेशकर अध्यासन केंद्राला कुटुंबीयांचा आक्षेप; कुलगुरूंना पाठवले पत्र

lata mangeshkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई विद्यापीठातील अध्यासन केंद्र हे लता दीदींच्या नावाने सुरु करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे. मात्र, या निर्णयावर मंगेशकर कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. हा निर्णय कुटुंबियांना विश्वासात न घेता घेण्यात आला. त्यामुळे हा निर्णय मान्य नसल्याचे कुटुंबियांनी या पत्राद्वारे म्हटलं आहे.

लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांच्यावतीने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्र पाठविण्यात आलेले आहार. त्या पत्रात विद्यापीठाने प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांच्या नावे ‘सेंटर फॉर एक्सलेंस इन लाइट म्युझिक’ हे अभ्यास आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे.

कुलगुरूंना पाठविण्यात आलेल्या या पत्रात म्हंटले आहे की, लता मंगेशकर यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्यापूर्वी मंगेशकर कुटुंबीयांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. हा निर्णय आम्हाला मान्य नसून यापुढे लता मंगेशकर यांच्या नावे कोणताही उपक्रम परस्पर हाती घेऊ नये, असेही मंगेशकर कुटुंबीयांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये प्रेत पडली नाहीत; राऊतांचा मोदींवर पलटवार

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रामुळे कोरोनाचा प्रसार झाला असे विधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर पलटवार केला आहे. महाराष्ट्रला कोरोनाचा सुपर स्प्रेडर म्हणणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे की महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये प्रेत पडली नाहीत असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले, ज्या राज्यानं जगात सर्वोत्त काम केलं. त्या महाराष्ट्र हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर? महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रात प्रेत फेकली नाहीत. आपण किती खोटं बोलता. एका तरी महाराष्ट्राती भाजप नेत्यानं निषेध नाही, निदान नाराजी तरी व्यक्त करावी. हे तुमचं महाराष्ट्र प्रेम, हा तुमचा महाराष्ट्र बाणा आहे का अस म्हणत त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांवरही निशाणा साधला.

दरम्यान, दिल्लीच्या राजकारणापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, कितीही प्रयत्न करा. खोटे पुरावे उभे करा, लोकांना धमकावा, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या, पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येड्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही. महाराष्ट्राचा बाणा आहे. असेही संजय राऊत म्हणाले

वाळू माफियांना दणका; तब्बल 46 कोटींचा ठोठावला दंड

sand

औरंगाबाद – गौण खजिन्यावर डोळा ठेवून महसूल यंत्रणेला न जुमानता अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांना तहसील प्रशासनाने दुसऱ्यांदा दणका दिला आहे. तालुक्यातील वाळूज मंडळातील आसेगाव येथील वाळू माफियांना शेहचाळीस कोटीचा दंड ठोठावून त्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवण्यात आला आहे.

वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी ही मोहीम तीव्र करणार असून, वेळ पडल्यास संबंधितांच्या जमिनीच्या लिलावातून दंड वसूल करणार असल्याचे तहसीलदार सतीश सोनी यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात याच मंडळातील आसेगाव, कासोडा, तळेसमान, नांदेडा व मुस्तफाबाद येथील एकूण 27 वाळू माफियांच्या सातबाऱ्यावर महसूल प्रशासनाने 6 कोटींचा बोजा टाकला होता. तेव्हाच या कारवाईचे संकेत देण्यात आले होते. तालुक्यातील आतापर्यंतची हि सर्वात मोठी कारवाई असून यामुळे तालुक्यातील इतर वाळू माफियांना तात्पुरता वचक बसणार असला तरी याविरोधात कायमस्वरूपी व ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गौणखनिज माफियांवर अनेकदा कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

परंतु ते प्रशासकीय यंत्रणेला न जुमानता पुन्हा नव्या जोमाने अवैध वाळू उपसा करत असल्याची स्थिती आहे. अशाच मुजोर व प्रशासनाला कोणतीही दाद न देणाऱ्या वाळूज मंडळातील आसेगाव शिवारातून केवळ तीन वाळू चोरांनी एकूण 16 हजार 138 ब्रास वाळूचा अवैध उपसा केला आहे. तर याच शिवारातील दोघांनी 675 ब्रास मुरुमाचा अवैध उपसा केला आहे. अवैधरित्या वाळूचे उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना नियमानुसार बाजार मूल्यापेक्षा पाचपट अधिक दंड आकारण्यात येतो. त्याआधारे तहसीलदार सतीश सोनी यांनी संबंधित वाळू चोरांना जोरदार दणका दिला आहे. या कारवाईत पाच जणांच्या सातबाऱ्यावर तहसीलदार सतीश सोनी यांनी कारवाई करून एकूण 46 कोटी 19 लाख 36 हजार 380 रुपयांचा दंड ठोठावून बोजा चढवला आहे. लाखोंचा दंड आकारल्याने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. या कारवाईचे नागरिकांमध्ये स्वागत करण्यात येत आहे तर वाळू माफियांत खळबळ माजली आहे.

यांना ठोठावला दंड –
1) अहेमद उस्मान पठाण रा.आसेगाव; 8112 ब्रास मातीमिश्रित वाळू उपसा. दंड 25 कोटी 44 लाख 49 हजार 104 रु

2) शेख जेहुर शेख कासम रा.आसेगाव ;1728 ब्रास मातीमिश्रित वाळू उपसा. दंड 5 कोटी 42 लाख 2 हजार 176 रु.

3) शे.हनिफ शे.कासम रा. आसेगाव; 6300 ब्रास माती मिश्रित वाळू उपसा. दंड 19 कोटी 76 लाख 12 हजार 100 रु.

4) अजमल खान अब्बास खान पठाण व एजाज खान अब्बास खान पठाण रा.आसेगाव 676 ब्रास मुरूम उपसा. दंड 44 लाख 55 हजार रु.

पाचही राज्यात भाजपला बहुमत मिळेल; मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या सर्वच राज्यात भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थाला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस वर सडकून टीका करत आगामी निवडणुकांवर भाष्य केले.

आगामी पाच राज्यांत भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार का?, असे विचारले असता पंतप्रधान मोदी यांनी ती शक्यता फेटाळली व पाचही राज्यांत भाजपची लाट असल्याचा दावा केला. पाच राज्यांतील चित्र स्पष्ट दिसत आहे. तिथे भाजपला बहुमत मिळणार आहे. जनता आम्हाला संधी देणार आहे. असे मोदी म्हणाले.

यापूर्वीच्या सरकारमध्ये निवडणुकांच्या तोंडावर योजनांच्या फाईलवर स्वाक्षरी करणे, निवडणुका आल्या की योजनांची घोषण करणे असे प्रकार चालायचे. त्यांना वाटत होते की, लोक काम नाही तर योजनांच्या घोषणा लक्षात ठेवतात. या सर्व प्रकारामुळे देशात अ‍ॅन्टी इन्क्मबन्सी येते, मात्र भाजपशासीत राज्यात हे सर्व प्रकार होत नसून, आम्ही कामावर भरोसा ठेवतो