Monday, December 22, 2025
Home Blog Page 2809

ठरलं तर! ‘या’ दिवशी होणार शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj
Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा क्रांती चौकात बसवण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पुतळ्याच्या अनावरण आवरून मागील काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने आवरणाचा चेंडू शासनाकडे टोलवला होता शासनाने शिवजयंतीच्या दिवशी सकाळी अनावरण करण्याचे निश्चित केले आहे.

शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होईल. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. प्रशासन राज्य शासनाकडे अंगुलीनिर्देश करीत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने 19 फेब्रुवारी रोजी सकाळी अनावरणाची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुतळ्याच्या आजूबाजूला सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. लवकरच या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा मनपा कडून करण्यात येणार आहे. अलीकडेच मनपा प्रशासन यांनी पुतळ्याची पाहणी केली. सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.

मनपाच्या नागरी मित्र पथकाने केला एक लाख 32 हजारांचा दंड वसूल

औरंगाबाद – महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने शहराच्या विविध भागात दंडात्मक कारवाई करून एक लाख 32 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान 15 पथकामार्फत 5 हजार 150 नागरिकांची लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यात आले. यात 85 नागरिकांनी अध्याप लस न घेतल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून प्रतिव्यक्ती पाचशे रुपये प्रमाणे एकूण 42 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.

शहरात विविध ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिक आठवण आल्या बाबत 16 जणांकडून 56 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केल्याबद्दल 11 जणांकडून 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

“तुमची जागा आता “आत”, धमक्या देण्याचे दिवस संपले”; नारायण राणेंचा राऊतांना इशारा

sanjay raut narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत “तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे, असा इशारा राऊतांनी भाजपला दिला. त्याच्या इशाऱ्याला केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करीत प्रत्युत्तर दिले आहे. “राऊत तुमची जागा आता बाहेर नाही, तुमची जागा आता आत आहे. धमक्या देण्याचे दिवस आता संपले, तुम्ही फक्त मातोश्रीपुरते मर्यादीत आहात,” असा टोला राणेंना लगावला आहे.

भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज ट्विट करीत शिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, तुमची जागा बाहेर नाही आता “आत” तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही.

संजय राऊत यांचे वक्तव्य मुंबईचा दादा “ शिवसेना ” पण ती फक्त “मातोश्री पुरतीच”. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस संजय राऊत आता संपले असल्याचा इशारा राणेंनी दिला आहे.

संजय राऊतांनी काय केले आहेत आरोप?

आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर अनेक आरोप केले. “ईडीचे सर्वाधिक खटले महाराष्ट्रातच कसे? यूपी, बिहार आणि दिल्लीत कसे नाहीत? महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठीचा हा डाव आहे. त्यासाठीच हे षडयंत्र सुरू आहे, असा दावाही राऊत यांनी केला आहे. तसेच अनिल देशमुखांच्या शेजारील कोठडीत जावे लागेल, असे भाजप नेते वारंवार सांगत असल्याचेही राऊतांनी म्हंटले आहे.

“चंद्रकांत पाटलांचा मेंदू जतन करून संग्रहालयात ठेवायला हवा”; जलील यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्रेनबाबत केलेल्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात ज्या केंद्र सरकारने ट्रेन पाठवल्या होत्या तर रिकाम्या सोडायला पाहिजे होत्या, असे म्हणाले. त्यांच्या या विधानावरून एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांचा मेंदू जतन करून संग्रहालयात ठेवायला हवा, अशी टीका जलील यांनी केली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “कोरोना काळात ट्रेन रिकाम्या जायला हव्या होत्या असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. खरं तर चंद्रकांत पाटलांचा मेंदू जतन करून संग्रहालयात ठेवायला हवा. त्यामुळे किती बुद्धिमान माणसं आपल्या देशात होऊन गेली ते पुढच्या पिढ्यांना समजेल, असा टोला यावेळी जलील यांनी लगावला.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विधान केले. यावेळी ते म्हणाले की, “केंद्राने रेल्वे सोडल्या तरी त्या रिकाम्या जातील ही तुमची जबाबदारी होती. लॉकडाउन झाला तरी लोकांना आम्ही तुमची काळजी करु हा आत्मविश्वास सरकारने लोकांमध्ये निर्माण करायला हवा होता. ट्रेन तुमच्या दबावामुळे सोडण्यात आल्या. पण लोकांना आत्मविश्वास देऊन त्या रिकाम्या जायला हव्या होत्या,” असे पाटील यांनी म्हटले.

Atal Pension Yojna : दरमहा 5000 रुपये पेन्शन कशी मिळवावी ‘हे’ जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. तुम्हालाही तुमच्या रिटायरमेंटनंतर सुरक्षित आयुष्य हवे असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या सरकारी पेन्शन योजनेत दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळते. यात सामील होणा-यांची संख्याही दर महिन्याला सातत्याने वाढतच आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात 24 जानेवारीपर्यंत 71 लाखांहून जास्त लोकं या योजनेशी जोडले गेले आहेत.

लोकं सतत योजनेत सामील होत आहेत
राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. बी.के. कराड यांनी माहिती देताना सांगितले की,” 24 जानेवारी 2022 पर्यंत अटल पेन्शन योजनेंतर्गत 71,06,743 नवीन सदस्य जोडले गेले. या योजनेकडे लोकांची मोठी पसंती आहे. सतत त्यात सामील होणाऱ्यांची संख्या पाहून हे कळते.”

मात्र, 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2021-22 मध्ये नवीन सदस्यांची संख्या थोडी कमी होती. 2020-21 मध्ये 79 लाखांहून जास्त लोकं या योजनेशी जोडले गेले होते. त्याच वेळी, 2018-19 मध्ये 70 लाख लोकं त्याच्याशी जोडले गेले. सध्या, जर आपण एकूण सदस्यांवर नजर टाकली तर, या योजनेत सामील होणाऱ्या लोकांची संख्या आता 3.75 कोटींच्या पुढे गेली आहे.

मे 2015 मध्ये सुरू झाली
अटल पेन्शन योजना ही एक सरकारी योजना आहे आणि जी 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती, मात्र आता 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ज्यांचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहे अशी लोकं या योजनेत सहजपणे गुंतवणूक करू शकतात. या योजनेंतर्गत ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते. या योजनेत केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. यामध्ये तुम्हाला किमान 1,000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.

लवकर गुंतवणूक करणे जास्त फायदेशीर आहे
जितक्या लवकर तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये पेन्शनसाठी फक्त 210 रुपये जमा करावे लागतील. दुसरीकडे, 1000 रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला 42 रुपये जमा करावे लागतील, 2000 रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी रुपये 84 रुपये, रुपये 3000, 126 रुपये आणि 4000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला 42 रुपये जमा करावे लागतील. 168 रुपये प्रति महिना जमा करा. या सुरक्षित गुंतवणुकीत रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक, बचत खाते आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.

मृत्यू झाल्यास योजनेत ‘या’ तरतुदी आहेत
आयकर कायदा 80C अंतर्गत, या योजनेतील गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनेफिटची देखील सुविधा आहे. दुसरीकडे, जर गुंतवणूकदाराचा 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला, तर त्याची पत्नी/पती या योजनेत गुंतवणूक करत राहू शकतात. याशिवाय, पत्नी/पती देखील एकरकमी रकमेचा क्लेम करू शकतात. जर पत्नीचाही मृत्यू झाला तर तिच्या नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाते.

अर्जाची पात्रता अशी आहे
भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
तुमचे बँक खाते आहे जे आधार कार्डशी लिंक केलेले आहे.
अर्जदाराकडे मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
आधीच अटल पेन्शनचा लाभार्थी नाही.
किमान योगदान कालावधी 20 वर्षे आहे.
यानंतर सरकार किमान पेन्शनची हमी देईल.

खाते कसे उघडायचे ?
अटल पेन्शन योजनेत तुमचे खाते उघडण्यासाठी, तुम्हाला तुमचे बचत खाते असलेल्या बँकेत जावे लागेल आणि APY रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल. यासोबतच आधार आणि मोबाईल क्रमांकही द्यावा लागणार आहे. प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी तुमच्या बचत खात्यात रक्कम उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय, आता तुम्ही ऑनलाइन माध्यमातूनही या योजनेत सामील होऊ शकता.

बिबट्या फासकीत : डाॅग स्काॅडच्या मदतीने आरोपीला अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील खोडशी येथील कृष्णा नदीकाठी लावलेल्या फासामध्ये बिबट्या अडकल्याची घटना काल मंगळवारी दि. 9 रोजी पहाटे 5 वाजता उघडकीस आली. नदीकाठी फासकी लावणाऱ्या संशयितास वनविभागने ताब्यात घेतले आहे. बाबू सखाराम जाधव (वय ४५, सध्या रा. खोडशी, कायम राहणार गोपाळनगर कार्वे) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

वनविभागाने दिलेली माहिती अशी, याप्रकरणी वन विभागाने तपासाची चक्रे फिरवत काल रात्री उशिरा फास लावणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. विशिष्ट फास कोठून आणली यासह अन्य गोष्टीचा वनाधिकारी कसून चौकशी करत आहेत. मंगळवारी सकाळी खोडशी गावाच्या हद्दीत सावकार मळा परिसरात बिबट्या लोखंडी फासामध्ये अडकल्याची माहिती खोडशी गावाचे पोलीस पाटील यांनी दूरध्वनीवरून वनविभागाला दिली. त्यानंतर कऱ्हाडमधील वनक्षेत्रपाल तुषार नवले आपल्या पथकासह सावकार मळा, खोडशी या ठिकाणी पोहोचले.

यावेळी या फासात 9 ते 10 महिने वयाचा बिबट्या पाय अडकून जखमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर बिबट्याला वराडे रोपवाटिकामध्ये हलविण्यात आले. रोपवाटिकेमध्ये या बिबट्याच्या पायात अडकलेली फास काढण्यात आली. या ठिकाणी डॉ. चंदन सावणे यांनी बिबट्यावर औषध उपचार केले. या घटनेचे गांभीर्य ओळखून वन कर्मचाऱ्यांनी खोडशी गावच्या परिसरात या गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली. यावेळी आरोपीचा माग काढण्यासाठी वन्यजीव विभाग कराड यांचे डॉग स्कॉड पाचारण करण्यात आले होते. संशयिताला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

केंद्र सरकारने संपवले वर्क फ्रॉम होम, खासगी कंपन्या ऑफिस कधी उघडणार ?

नवी दिल्ली । देशात कोविड-19 चे रुग्ण आता कमी होत आहेत. त्यादृष्टीने शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने आता आपल्या कर्मचार्‍यांचे वर्क फ्रॉम होम संपवले आहे आणि सर्व कर्मचार्‍यांना ऑफिस मधून काम करण्यास सांगितले आहे. सरकारी शैक्षणिक संस्था आणि ऑफिस पूर्ण सुरू झाल्यानंतर देशातील टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएलसह इतर कंपन्यांमध्ये ऑफिस मधून काम कधी सुरू होणार, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. खाजगी कंपन्यांनी अजूनही आपले ऑफिस उघडण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही आणि त्यांचे बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत.

अलीकडेच केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्री जितेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वर्क फ्रॉम होम संपवून केंद्रीय कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की,”आता सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये यावे लागेल. मात्र ऑफिसमध्ये कोविड-19 नियमांचे पूर्णपणे पालन केले जाईल.”

ऑफिस कधी उघडणार ?
टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल यांसारख्या मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये ऑफिस मधून काम कधीपासून लागू केले जाईल याची कोणतीही माहिती या कंपन्यांनी अद्याप दिलेली नाही. अशी अपेक्षा आहे की, कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे आणि सरकारकडून कोविड निर्बंधांमध्ये दररोज शिथिलता आल्याने आयटी कंपन्या देखील लवकरच आपले ऑफिस उघडतील.”

TCS जानेवारीमध्ये ऑफिस सुरू करणार होते
गेल्या वर्षी, कोविड-19 चे ओमिक्रॉन व्हेरिएन्ट येण्यापूर्वी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने वर्क फ्रॉम होम पूर्ण केले होते आणि ऑफिस उघडण्याची तयारी केली होती. जानेवारीपासून कंपनीचे कर्मचारी ऑफिसमध्येयायला सुरुवात करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ओमिक्रॉनमुळे हे प्लॅनिंग फसले. डिसेंबर 2021 मध्ये, कंपनीने सांगितले की,”Omicron चा प्रसार पाहता, कंपनी योग्य विचार केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय घेईल. डिसेंबरमध्ये कंपनीचे 90 टक्के कर्मचारी घरून काम करत आहेत.”

HCL कोरोनाच्या प्रभावाकडे पाहत आहे
एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL) ने कोविड-19 चे ओमिक्रॉन आल्यावर कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याची योजना पुढे ढकलली होती. त्यानंतर कंपनीने सांगितले होते की,”कोविड-19 च्या ओमिक्रॉनच्या परिणामांचे मूल्यांकन केल्यानंतरच ऑफिस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.” कंपनीचे म्हणणे आहे की,”त्यासाठी त्यांचे कर्मचारी, कंत्राटदार आणि त्यांचे कुटुंबीय यांना पहिले प्राधान्य आहे. जोपर्यंत धोका पूर्णपणे टळत नाही तोपर्यंत कंपनी घरून काम करण्याला प्राधान्य देईल.”

इन्फोसिस दीर्घकाळापासून वर्क फ्रॉम होमच्या बाजूने आहे
कोविड-19 मुळे बदललेल्या परिस्थितीत इन्फोसिसनेही वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिले आहे. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, इन्फोसिसचे एचआर प्रमुख रिचर्ड लोबो म्हणतात की,” कंपनी आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देईल.” लोबो यांच्या मते, कंपनीला विश्वास आहे की, कामाचे हे हायब्रीड मॉडेल पुढील अनेक वर्षांसाठी लागू होईल. यामुळे अशी अपेक्षा आहे की, इन्फोसिस आपल्या कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये बोलावणार नाही किंवा वर्क फ्रॉम होम लवकर संपवणार नाही.

लतादीदींच्या नावाने मुंबईत 3 एकर जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय ; उदय सामंत यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आजच्या मंत्रिमंड्ळाच्या बैठकीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी लता मंगेशकर यांच्या नावाने आंतराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “माझ्या विभागाने मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय सुरु करण्याचे ठरवले होते याचे मला समाधान आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी लतादीदी यांचे निधन झाले. आता भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय असे नाव दिले जाणार आहे.

संगीत महाविद्यालयासाठी मुंबई विद्यापीठातील जागा द्यावी अशी शिफारस करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खूप इच्छा होती. पण आता जमीन मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर 3 एकर जागेत हे संगीत महाविद्यालय उभारले जाणार आहे. त्या महाविद्यालयाला भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे नाव दिले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या दृष्टीने तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्याचेही सामंत यांनी सांगितले.

‘कोरोनाचा पुढील व्हेरिएन्ट ओमिक्रॉनपेक्षा वेगाने पसरू शकेल’ – WHO

Corona

नवी दिल्ली । वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की, कोरोनाव्हायरस ओमिक्रॉनचा शेवटचा व्हेरिएन्ट चिंतेचा ठरणार नाही. यासोबतच या व्हायरसचा पुढील व्हेरिएन्ट जास्त वेगाने पसरणार असल्याचेही संस्थेने म्हटले आहे. यावेळी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19 तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या,”ओमिक्रॉन हा शेवटचा व्हेरिएन्ट चिंतेचा असणार नाही. यापुढील व्हेरिएन्ट जास्त तंदुरुस्त असेल. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की, तो जास्त वेगाने पसरत जाईल कारण तो सध्या पसरत असलेल्या व्हेरिएन्टची जागा घेईल. मात्र हे आगामी व्हेरिएन्ट जास्त गंभीर असतील की नाही हा एक मोठा प्रश्नच आहे.”

लसीकरण करणे आवश्यक आहे
डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की,”असे देखील होऊ शकेल की, भविष्यात जास्त इम्यून एस्केप पाहिले जाऊ शकेल. म्हणजेच, रोग प्रतिकारशक्तीच्या कोणत्याही उपायांचा विषाणूवर प्रभाव पडणार नाही आणि नवीन व्हेरिएन्टवरील लसीचा प्रभाव संपून जाईल.” गंभीर आजार आणि मृत्यूपासून संरक्षण करण्यासाठी संस्थेने लसीकरणावर भर दिला. “आपण त्या परिस्थितीत राहू इच्छित नाही. म्हणून, आपण हे सुनिश्चित करू इच्छितो की, व्हायरसचा प्रसार कमी करू,” असेही केरखॉव्ह म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या कि, “आम्हाला अपेक्षा आहे की, योग्य हस्तक्षेपामुळे कोविड-19 चा प्रसार कमी होईल. मात्र त्यांच्यापैकीही, लसीपासून संरक्षित नसलेल्या किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांवर याचा जास्त परिणाम होईल.” कोरोनाव्हायरस श्वसनसंस्थेला लक्ष्य करत असल्याने जगाला संसर्ग वाढण्याचे मौसमी नमुने दिसू शकतात असा इशाराही त्यांनी दिला.

“महाविकास आघाडीत तुमची लायकी ही खलिता वाहणाऱ्या काशिदासारखी”; भाजप नेत्याचे राऊतांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेत ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचे काम सुरू आहे. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत’, असा इशारा भाजप नेत्यांना दिला. संजय राऊतांच्या या इशाऱ्याला भाजप आमदार अमित साटम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप नेते तथा आमदार अमित साटम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहार की, “नमस्कार मी आमदार अमित साटम. जनाब संजय राऊत मुंबई काही तुमची जागीर नाही. घरात घुसायची भाषा करता, पण तुमच्या घरात तुमची काय किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. महाविकास आघाडीत तुमची लायकी ही खलिता वाहणाऱ्या काशिदासारखीच आहे. भ्रष्टाचार करायचा, मग तो बाहेर काढणाऱ्या किरीट भाईंवरती भेकड हल्ले करायचे. प्रविण राऊत यांना अटक झाल्यानंतर तुमचं मानसिक संतुलन बिघडले आहे हे आम्हाला ठाऊक आहे.

हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नाही. पण तुमच्याच भाषेत बोलायचे तर एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा आणि मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातील ताकद काय आहे ते पाहायला या. हे या मराठ्याचे खुले आव्हान आहे, जय जिजाऊ, जय शिवराय,” अशा शब्दात अमित साटम यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.