Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2835

अरविंद केजरीवाल म्हणजे छोटा मोदी; काँग्रेस नेत्याची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवार यांनी जोरदार टीका केली आहे. अरविंद केजरीवाल म्हणजे छोटा मोदी आहे असं म्हणत त्यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवाल हे भाजपला मदत करत आहेत असेही ते म्हणाले. गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गोव्यात काही तोतया लोक आले आहेत. ते फक्त भाजपाची मदत करण्यासाठी आहेत. भाजपाला झळ पोहोचू नये यासाठी ते मदत करत आहेत. त्यांची टोपी सफेद असली तरी
आतला रंग हा आरएसएसचा आहे. अशा तोतया लोकांपासून सावधान राहण्याची गरज आहे,” अशी टीका सुरजेवाला यांनी केली.

अरविंद केजरीवाल यांची वागणूक, विचार, हुकूमशाहीच सर्व काही सांगून जाते. तुम्हाला यावरुनच या तोतया व्यक्तीचे चारित्र्य कसे आहे लक्षात येते असे त्यांनी म्हंटल. तसेच दिल्लीकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करा, असा टोला लगावला.

बंडातात्या कराडकरांवर अजून एक गुन्हा दाखल होणार?

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. दरम्यान आज सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी बंडा तात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सातारा शहर पोलिसांत आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली आहे.

बंडातात्या कराडकर यांनी राजकीय नेत्यांबद्दल साताऱ्यात आंदोलना दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर त्यांच्यासह 125 जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. दरम्यान आज बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. यानंतर त्यांच्याविरोधात आणखी तक्रारी दाखल करण्यासाठी सातारा येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकारी गेल्या असून त्याच्याकडून तक्रारी दाखल केल्या जात आहेत.

बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाणे मध्ये विनापरवाना जमाव जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना या चौकशीसाठी सातारा पोलीस घेऊन आले आहेत. सध्या त्यांच्यावर साताऱ्यात एक गुन्हा दाखल झाला असून महिलांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल साताऱ्यातील राष्ट्रवादी महिला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सातारा शहर पोलिसांत आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली आहे.

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, खरेदी करण्यापूर्वी आजचे दर तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचा दर 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ आला आहे. काल सोन्याचा भाव 0.07 टक्क्यांनी घसरला होता. यासोबतच चांदीचा भाव 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे.

सोन्या-चांदीची आजची किंमत
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.08 टक्क्यांनी वाढून 47,953 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचवेळी आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीच्या दरात 0.39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 60,971 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,060 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,060 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,510 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,660 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,510 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,990 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45,510 रुपये
पुणे – 45.060 रुपये
नागपूर – 45,510 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,660 रुपये
पुणे – 49,060 रुपये
नागपूर – 49,660 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4505.00 Rs 4490.00 -0.334 %⌄
8 GRAM Rs 36040 Rs 35920 -0.334 %⌄
10 GRAM Rs 45050 Rs 44900 -0.334 %⌄
100 GRAM Rs 450500 Rs 449000 -0.334 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4905.00 Rs 4898.00 -0.143 %⌄
8 GRAM Rs 39240 Rs 39184 -0.143 %⌄
10 GRAM Rs 49050 Rs 48980 -0.143 %⌄
100 GRAM Rs 490500 Rs 489800 -0.143 %⌄

Stock Market : बाजार रेड मार्कवर खुला; टाटा स्टील, आयटीसी फोकसमध्ये

Share Market

नवी दिल्ली । आज, शेवटच्या ट्रेडिंग दिवशी कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर झाली आहे. सेन्सेक्स 174.42 अंक किंवा 0.30 टक्क्यांच्या कमकुवतपणासह 58,613.60 वर उघडला, तर निफ्टी 6.40 अंक किंवा 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 17,566.60 वर उघडला.

रेड मार्कवर उघडलेला बाजार 9.50 वाजता ग्रीन मार्कवर ट्रेड करताना दिसला
शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स सकाळी 9:50 वाजता 110.08 अंकांच्या वाढीसह ग्रीन मार्कवर ट्रेड करताना दिसला. निफ्टीने 53.25 अंकांची वाढ नोंदवली. यामुळे निफ्टीने 17,610 चा स्तर गाठला.

रेड मार्कवर बंद होते
गुरुवारी, विकली एक्सपायरीच्या दिवशी, निफ्टी 219.80 अंक किंवा 1.24 टक्क्यांच्या घसरणीसह 17560.20 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 770.31 अंकांनी किंवा 1.29 टक्क्यांनी घसरून 58788.02 वर बंद झाला. बँक निफ्टी 39010 वर बंद झाला. यामध्ये 320.50 अंकांची म्हणजेच 0.81% ची घसरण झाली.

येथे टॉप गेनर्स आणि टॉप लुझर्स
ओएनजीसी, आयटीसी, टायटन कंपनी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स ठरले आहेत. तर इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज टॉप लुझर्स ठरले आहेत.

वेदांत फॅशन्सचा IPO आज उघडणार आहे
मान्यवर ब्रँडचे मालक वेदांत फॅशन्स लि. IPO सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजेच आजपासून तीन दिवसांसाठी उघडेल. हा IPO ८ फेब्रुवारीला बंद होईल. कंपनीच्या IPO साठी 824-866 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. हा पब्लिक इश्यू प्रमोटर आणि सध्याचे भागधारकांसाठी 3,63,64,838 इक्विटी शेअर्ससाठी आणलेली ऑफर फॉर सेल आहे. कंपनी IPO द्वारे वरच्या प्राईस बँडवर 3,149 कोटी रुपये उभारणार आहे.

बंडातात्या कराडकर यांच्या ‘त्या’ वक्तव्याची विलासबाबा जवळ यांनी मागितली माफी

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून आज सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी व्यसनमुक्त युवक संघाचे विलासबाबा जवळ यांनी माफी मागितली आहे.

बंडातात्या कराडकर यांनी राजकीय नेत्यांबद्दल साताऱ्यात आंदोलना दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केले होत. यानंतर त्यांच्यासह 125 जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. दरम्यान विलासबाबा जवळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल सातारा येथे करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान ह.भ.प बंडातात्या कराडकर यांनी जी वक्तव्ये केली. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहे. सर्वांनी हा विषय येथेच थांबवावा आणि वाईन विरोधी धोरणाबद्दल बोलावे आणि हा निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न कराव, अशी विनंती विलासबाबा जवळ यांनी केली आहे.

सातारा येथे काल बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाच्यावतीने सातारा पोलिसांकडे चौकशीची मागणी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी सातारा पोलिस बंडातात्या कराडकरांच्या फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील राष्ट्र संत गुरुवर्य दिक्षित मठात दाखल झाले. दोन तासानंतर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले असून त्यांना सातारा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.

गोवा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज; 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली असून राष्ट्रवादी कडून 13 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच आपण स्वतः 3 दिवस प्रचाराला गोव्याला जाणार आहोत असेही त्यांनी सांगितलं.

गोव्यात भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आघाडी केली आहे. यापूर्वी शिवसेनेनं आपली उमेदवार यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीने नेमक्या किती जागा लढवणार हे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी कडून 13 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असतील असे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर यांना जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत असून आमच्या पक्षाचा त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका गोव्याचे अध्यक्ष घेतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री  अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह 24 नेत्यांचा समावेश आहे. गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याने सर्वच पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे.

बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून आज सकाळी सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन चौकशी केली त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले.

सातारा येथे काल बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाच्यावतीने सातारा पोलिसांकडे चौकशीची मागणी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी सातारा पोलिस बंडातात्या कराडकरांच्या फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील राष्ट्र संत गुरुवर्य दिक्षित मठात दाखल झाले. दोन तासानंतर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले असून त्यांना 12 वाजेपर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्यात आणले जाणार आहे.

विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांविरोधात सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते.

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात

nashik crime

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. नाशिक-औरंगाबाद रोडवर हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाल्याचे समजत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कशा प्रकारे घडला अपघात ?
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील धामणगाव जवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. मेडिकल कॉलेजमधील शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला हा अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात घडला आहे. बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे.

या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचासाठी खाजगी आणि पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन ट्रक ड्रायव्हरचा शोध सुरु केला आहे. या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सुप्रिया ताई आणि पंकजा ताई निर्व्यसनी आहेत; बंडातात्यांची कोलांटीउडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी अखेर आपल्या विधानावर माफी मागितली आहे. तसेच सुप्रिया ताई आणि पंकजा ताई याना कोणतेही व्यसन नसून त्या निर्व्यसनी आहेत. मी अनावधानाने तस वक्तव्य केले होते अस म्हणत कोलांटीउडी मारली.

बंडातात्या कराडकर म्हणाले, मी ज्या 4 नेत्यांबद्दल विधान केले त्या सर्वांची माफी मागतो. माझ्या मनात कोनाविषयी आकस किंवा द्वेष नाही.सुप्रिया ताई आणि पंकजा ताई याना कोणतेही व्यसन नाही. मी अनावधानाने माझ्याकडुन ते विधान गेलं. मात्र आज मी त्या सर्वांची माफी मागतो. मला कोणाचाही अपमान करायचा नव्हता असेही त्यांनी म्हंटल.

सुप्रिया ताई आणि पंकजाताई या दोघी मला मुलीसमान आहेत असे म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बंडातात्या कराडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जमावबंदी लागू असताना त्याचे उल्लंघन केल्यामुळे साताऱ्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

घाटी रुग्णालयात स्थूल गर्भवतीची दुर्लभ शत्रक्रिया यशस्वी; बाळ आणि बाळंतीण सुखरूप

औरंगाबाद – गर्भवती महिलेचे वजन 155 किलो तर बी.एम.आय.66 प्रति मीटर स्केवर सर्वसाधारण माणसापेक्षा तिप्पट वाढलेल्या एका महिलेची अवघड व दुर्मिळ शस्त्रक्रिया औरंगाबादेतील शासकीय वैधकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे यशस्वी झाली. ही जगातील सातवी तर देशातील पहिली यशस्वी शत्रक्रिया असल्याचा दावा स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रीनिवास गडप्पा यांनी केला आहे.

शहरातील मिसरवाडी भागात राहणारी महिला गुडडी शेख (वय-28) या गर्भवती असल्याने त्यांनी एक महिन्याअगोदर घाटी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा बीएमआय हा सर्वसाधारण माणसापेक्षा तिप्पट आल्याचे समोर आले. प्रसूतीची वेळ काही आठवड्यावर अली असताना. शेख यांच्या उपचाराला साजेशे आवश्यक साधन सामग्री रुग्णालयात उपलब्ध न्हवती. डॉक्टरांच्या विशेष प्रयत्नानी या महिलेसाठी विशेष व्हीलचेअर, मोठा स्ट्रेचर, शत्रक्रियेसाठी लागणारे गाऊन, भूल देण्यासाठी आवश्यक विशेष उपकरणे या सर्वांची विशेष उपलब्धता करण्यात आली.66 बी.एम.आय. असलेल्या आता पर्यंत जगात फक्त 6 च शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहे.आणि यापूर्वी पर्यंत देशात अशी अवघड एकही शस्त्रक्रिया झालेली नसल्याने घाटी रुग्णालयातील डॉक्टरासमोर एक मोठे आव्हान होते. मात्र डॉक्टरांनी पूर्ण तयारीनिशी हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. अखेर 24 जानेवारी रोजी महिलेची सिझेरियन शत्रक्रिया करण्यात आली. महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता बाळंतीण आणि बाळ दोघेही सुखरूप आहे. या दुर्मिळ आणि अवघड शस्त्रक्रियेमुळे औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयाचे नाव जागतिक पातळीवर नोंदवले गेले आहे.

देशात पहिली शस्त्रक्रिया केल्याचा अभिमान

66 बीएमआय असलेल्या स्थूल महिलेची सिझेरियन प्रसूती ही घटना जगासाठी दुर्मिळ आहे.नोंदीनुसार जगात फक्त सहाच अश्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.तर भारतात या शस्त्रक्रियेची पहिलीच घटना आहे. शासकीय घाटी रुग्णालय अवघड शस्त्रक्रिया करणारा देशातील पहिला आणि जगातील सातवा रुग्णालय आसल्याने आम्हाला अभिमान आहे. -डॉ.श्रीनिवास गडप्पा, विभाग प्रमुख

महिनाभर पथकाने घेतली काळजी
एक महीने आधीपासुनच भूल व शस्त्रक्रिया करिता लागणारी सर्व तयारी जसे सामग्रीची उपलब्धी, फुफुसाचे व्यायाम, वजन नियंत्रणात करण्याकरिता दररोज चालायचा व्यायाम, जंतुदोष याचे नियंत्रण, दिवसातून तीन वेळा रक्तदाब मोजणे, बाळाचे ठोके योग्य असल्याचे सोनोग्राफी वर किंवा एनएसटी मशीन वर खात्री करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण मोजणे इत्यादी कामे नियमितपणे पथक दररोज करत होते. तर रुग्णाला आवश्यक असलेले सर्व संबंधित तज्ञ डॉक्टरांची मदत वेळोवेळी घेण्यात येत होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, पथक प्रमुख डॉ.विजय कल्याणकार, डॉ.सोनाली देशपांडे, डॉ.प्रशांत भिंगारे, डॉ.रुपाली एस. गायकवाड, डॉ. अमित काकडे, डॉ. प्रतिक्षा कांदळकर, डॉ. चैताली पांडव, डॉ. ऐश्वर्या एम., डॉ. हर्षिता एस.,डॉ.दिती आनंद, डॉ. अपूर्वा खटोकर, डॉ. धनश्री पाटील, डॉ. ऐश्वर्या चंदवाडे, सिस्टर तृप्ती पाडळे, रिबेका खंडागळे, चंद्रकला चव्हाण, दीपक शिराळे. आदींनी परिश्रम केले.

काय आहे बी.एम.आय ?
बीएमआय म्हणजे बॉडी मास्क इंडेस्क याचा वापर शरीरातील स्तुलतेचे प्रमाण मोजण्यासाठी होतो.सर्वसाधारण माणसाचा बीएमआय हा 20 ते 25 असतो, हाच आकडा जर 30 च्या वर गेला तर डॉक्टरांच्या भाषेत त्याला स्थूल समजले जाते. मात्र शेख यांचे बीएमआय हे तब्बल तिप्पट होते.