Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2834

बोगस कागदपत्र बनवून कोट्यवधींची जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दलालांच्या टोळीला नागरिकांकडून बेदम चोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरज तालुक्यातील कवलापूर गावच्या हद्दीत असणाऱ्या मोक्याची व कोट्यवधी रुपयांची दोन एकर जमीन मूळ मालकाला कोणतीही कल्पना न देता परस्पर बोगस ओळखपत्र आणि कागद तयार करून विक्री करण्यात येत होती. सदरची माहिती मूळ मालकाच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी थेट सांगलीतल्या नोंदणी कार्यालयात धडक देत पाच जणांच्या टोळीला पकडले. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी यावेळी तिघांना पकडून बेदम चोप दिला. नातेवाईकांचा रौद्रावतार बांधून दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

घटनेची माहिती मिळताच मोठी गर्दी याठिकाणी झाली होती. अखेर नातेवाईकांनी चोप देत या तिघांची सांगली शहर पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी निवृत्ती सीताराम हरगुडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून सलीम बाळू मुलाणी, अक्षय अनिल शिंदे, राहुल काशीद गंगाधर, विजय राजाराम माने आणि मनोज दशरथ निकम या पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

मिरज तालुक्यातील कवलापूर गावच्या हद्दीत तासगाव रोडवर गॅस गोडाऊनजवळ निवृत्ती सीताराम हारुगडे यांच्या मालकीची दोन एकर जमीन आहे. ही जमीन अनेक वर्षांपासून मोकळी आहे. इचलकरंजी येथील एका एजंटची नजर या मोक्याच्या जागेवर पडली. त्याने या जमिनीचा सातबारा उतारा काढला. एक ग्राहक शोधून मूळ मालकाच्या जागी एक बोगस व्यक्ती उभा केली. हारुगडे यांच्या नावाने बोगस रेशन कार्ड आणि आधारकार्ड तयार केले. सदरच्या जमिनीचे खरेदीपत्र करण्यासाठी आज दुपारी पाच जण सांगलीतील जुन्या राजवाडा चौकात असलेल्या नोंदणी कार्यालयात पोहचले होते.

याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला हरुगुडे यांच्या कागदपत्रांबद्दल संशय आला. त्याने थेट हारुगडे यांचा पुतण्या मारुती हारुगडे यांना फोन करून, तुमच्या चुलत्यांच्या जमिनीची विक्री सुरू असल्याचे सांगितले. बोगसगिरीचा प्रकार लक्षात येताच मारुती हरुगुडे हे काही मित्रांसह सांगलीतील नोंदणी कार्यालयात पोहचले. याचवेळी निवृत्ती हरुगडे यांच्या जमिनीची परस्पर विक्री करणारे पाच जण आढळले. मारुती हरुगडे यांनी जमीन विक्री करणाऱ्या टोळीतले निवृत्ती हरुगडे यांच्याबद्दल विचारणा केली. त्यावर दोघांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस येताच मारूती हरुगुडे आणि त्याच्या मित्रांनी संबंधित टोळीतील तिघांना पकडून बेदम चोप दिला.

औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी एक हजार रुपयांची तरतूद

औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या विकासासाठी अवघ्या 1 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे रेल्वे स्टेशनचा दुसरा टप्पा यंदाही रखडण्याची स्थिती आहे. परंतु मराठवाडा आणि विदर्भ भागादरम्यान वेगवान कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करून विकास मार्गाला नेण्याची क्षमता असलेल्या नांदेड-वर्धा (यवतमाळमार्गे) रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 820 कोटी 47 लाख रुपयांच्या निधीची तरतूद झाली आहे.

तर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गासाठी 567 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला. याबरोबर सध्या सुरू असलेल्या मराठवाड्यातील इतर रेल्वे प्रकल्पांसाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, नवे प्रकल्प सध्या ‘वेटिंग’वरच असल्याची स्थिती आहे.

नांदेड-वर्धा रेल्वे मार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये दळणवळणाचा संपर्क वाढण्यास मदत होणार आहे. या रेल्वे मार्गासाठी 820 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद झाल्याने हा मार्ग गतीने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या 25 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या परळी-बीड-अहमदनगर या 261 कि.मी. रेल्वेमार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. 261 कि.मी.पैकी सध्या 66 कि.मी म्हणजे अहमदनगर ते आष्टी हे काम पूर्ण झाले आहे. या मार्गासाठी 2022-23 या वर्षासाठी 567 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे.

तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वे ट्रॅकवर आणण्याचे मागणी 1960 पासून सुरू आहे. 2004-05 या वर्षात सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली. सर्वेक्षणानुसार हा मार्ग 84 किमीचा आहे. त्यासाठी 15 वर्षांपूर्वी 189 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. दरम्यान, पाठपुरावा थंडावला. त्यामुळे चर्चाच झाली नाही. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापुरात घेतलेल्या सभेत हा मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मोदींच्या मागील टर्मच्या शेवटच्या टप्प्यात या मार्गाच्या पुनर्सर्वेक्षणास मंजुरी मिळाली. पुन्हा सर्व्हे झाला तेव्हा हा प्रकल्प खर्च 904 कोटींवर गेला. आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी 10 कोटींच्या निधीची तरतूद झाली आहे.

प्रेमसंबंधातून विवाहितेची फसवणूक करत घातला 14 लाखांचा गंडा, पाचजणांवर गुुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

विवाहित असतानाही अविवाहित असल्याचे सांगून कर्जत येथे राहणार्‍या महिलेसोबत प्रेम संबंध निर्माण करून तिच्याकडून 14 लाख रुपये उकळून महिलेची शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून शहनिशा करून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन भाऊसाहेब गुंजाळ, सागर भाऊसाहेब गुंजाळ, विमल भाऊसाहेब गुंजाळ, महेश सोगे आणि श्रीकांत नरेंद्र राजे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पीडित महिलेचे सांगली हे माहेर आहे. काही वर्षांपूर्वी पीडित महिलेचा विवाह रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील एकाशी झाला होता. संशयित गुंजाळ व सोगे हे रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे राहतात. यातील सचिन गुंजाळ याने पीडित महिलेशी ओळख निर्माण केली. आपण अविवाहित असल्याचे सांगून महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. यानंतर पीडित महिला या आपल्या माहेरी सांगली मध्ये आल्या. संशयित गुंजाळ याने सांगलीतील डीमार्ट, पंढरपूर रोड तसेच विश्रामबाग चौक परिसर याठिकाणी नेऊन पीडित महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित महिलेचा विश्वास संपादन करून 14 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले.

यानंतर महिलेशी जवळीक साधून मानस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत पीडितेची शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केली. गुंजाळ याचं सत्य समोर आल्यानंतर पीडितेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता गुंजाळ याच्या कुटुंबीयांनी पीडित महिलेच्या पतीला शिवीगाळ करून तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली. गुंजाळ कुटुंबियांकडून होणार्‍या वारंवार त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

असदुद्दीन ओवेंसीना झेड प्लस सुरक्षा; हल्ल्यानंतर केंद्राचा निर्णय

modi owesi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर काल गोळीबार झाला होता. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार कडून ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. देशातील उच्चभ्रू आणि व्हीआयपींना त्यांच्या जीवाला धोका आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन विविध प्रकारची सुरक्षा प्रदान केली जाते.

ओवेसींच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच यावेळी वापरलेले हत्यार आणि एक कार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, सचिन आणि शुभम अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

एनएसजी कमांडोसह 22 जवान झेड श्रेणीतील
खासदार असदुद्दीन ओवेसी यांना देण्यात आलेल्या झेड श्रेणीच्या सुरक्षेत चार ते पाच NSG कमांडोसह एकूण 22 सुरक्षा कर्मचारी तैनात असतील . त्यात दिल्ली पोलिस, आयटीबीपी किंवा सीआरपीएफचे कमांडो आणि स्थानिक पोलिसांचाही समावेश आहे.

बंडातात्या कराडकरांवर करणार बदनामीचा खटला दाखल ; बाळासाहेब पाटील यांचा इशारा

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे करण्यात आलेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह साताऱ्याचे पालकमंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी आता बंडातात्या कराडकर यांच्या वरती गुन्हा दाखल करून बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुणे येथे दिला आहे.

व्यसनमुक्त युवक संघानच्या वतीने काल वाईन विक्री विरोधात सातारा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. त्याच्या वक्तव्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिला पदाधिकार्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काल रात्री राज्य महिला आयोगाकडून आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपली भूमिका मांडली. तसेच सातारा पोलिसांकडूनही आंदोलनाला परवानगी नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कायदेशीर रित्या बंडातात्या कराडकर यांच्या वरची गुन्हा दाखल करणार अशे. तसेच बदनामीचाही खटला दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे आता बंडातात्या कराडकर यांच्यापुढील अडचणीत वाढ होणार आहे.

बंडातात्या कराडकर यांच्याकडून माफी

कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मुलाबद्दल काल केलेले वादग्रस्त वक्तव्य आज कराडकर यांनी मागे घेतले आहे. तसेच हे वक्तव्य चुकून झाले असून मी माफी मागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव निर्व्यसनी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

धक्कादायक !!! महापालिका अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटी कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील कंत्राटी कर्मचाऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी कर्मचारी बाबू किसन करमळकर याचे भाऊ अभिजित किसन करमळकर (रा. खणभाग, सांगली) यांनी महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे व रघुवीर (काका) हलवाई यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, पाणीपुरवठा विभागात काम करणारे माझे बंधू हे गेल्या तीन ते चार दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. याबाबत त्यांना कुटुंबीयांनी वारंवार विचारणा केली. यावेळी त्यांनी रघुवीर हलवाई व राहुल रोकडे मला कामाबाबत विनाकारण मानसिक त्रास देऊन माझ्याकडून हफ्त्याची मागणी करतात. पैसे न दिल्यास पैसे उकळण्याच्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देतात, असे त्यांनी घरी सांगितले होते. या दोघांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करणार आहे, असेही ते घरी म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी अंकलीजवळ विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवत ती त्यांच्या मित्रांच्या व्हॉट्सॲपवरही पाठवली होती. त्यामुळे माझ्या भावास आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दोघांवर कायदेशीर कारवाई करावी, असे अभिजित करमळकर यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. करमळकर याने अंकली गावाच्या हद्दीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सांगली ग्रामीण पाेलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या करमळकर याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी पोलिसांनी रुग्णालयात जात त्याची प्राथमिक चौकशी केली. मात्र, अद्यापही तब्येत ठीक नसल्याने पोलीस त्याच्याकडून येत्या दोन दिवसांत पुन्हा माहिती घेणार आहेत.

क्रिप्टोकरन्सीच्या नफ्यावर TDS कापून सरकार दरवर्षी करणार मोठी कमाई

Cryptocurrency

नवी दिल्ली । वाढत्या महागाईमुळे वित्तीय तुटीच्या समस्येशी झुंजणाऱ्या सरकारला पैसा उभा करायचा आहे. यामुळे केवळ सरकारी खर्चच वाढणार नाही तर रोजगारही वाढेल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालनाही मिळेल. पैसे कमावण्याच्या या एपिसोडमध्ये, सरकारने क्रिप्टोकरन्सीच्या नफ्यावर 30 टक्के टॅक्ससह त्याच्या ट्रान्सझॅक्शनवर एक टक्के TDS लावण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली आहे. या व्हर्चुअल मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर एक टक्का TDS कापून सरकार दरवर्षी मोठी कमाई करू शकते. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे अध्यक्ष जेबी महापात्रा सांगतात की,”या पावलामुळे दरवर्षी 1000 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत येतील.”

वार्षिक उलाढाल एक लाख कोटींपर्यंत
महापात्रा म्हणाले की,”क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजची वार्षिक उलाढाल 30,000 ते एक लाख कोटी रुपये आहे. 1 लाख कोटी रुपयांच्या एक टक्का TDS मधून दरवर्षी 1,000 कोटी रुपये सरकारकडे येतील. मात्र, क्रिप्टोकरन्सीच्या नफ्यावर 30 टक्के टॅक्स मधून किती पैसे मिळतील हे त्यांनी स्पष्ट केले नाही. मात्र, या कारवाईतून सरकारला मोठी कमाई होईल, असा विश्वास उद्योग जगताला आहे.

कमाईमध्ये क्रिप्टोची मोठी भूमिका
क्रिप्टोकरन्सीच्या नफ्यावर 30 टक्के टॅक्स आणि एक टक्का TDS सरकारच्या तिजोरीत भरपूर पैसा आणू शकतो, असा उद्योगाचा विश्वास आहे. हा नवीन नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे. अशा परिस्थितीत क्रिप्टोकरन्सी पुढील आर्थिक वर्षात सरकारच्या कमाईत मोठी भूमिका बजावू शकते. सध्या देशात क्रिप्टोकरन्सीमध्ये 1.5 लाख कोटी रुपयांहून जास्त गुंतवणूक झाल्याचा अंदाज आहे.

गुंतवणूकदारांना नफ्याची माहिती द्यावी लागेल
महसूल सचिव तरुण बजाज म्हणतात की,”इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये क्रिप्टोमधून मिळालेल्या नफ्यासाठी वेगळा कॉलम असेल. म्हणजेच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना त्यांच्या नफ्याची माहिती सरकारला द्यावी लागेल. जितथे सरकार आपली वित्तीय तूट कमी करण्याचा मार्ग शोधत आहे तिथे क्रिप्टोकरन्सीवरील टॅक्समुळे सरकारला खूप दिलासा मिळू शकेल.”

साताऱ्यात बंडातात्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधात सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अंदोलन केसात आले. त्याचे पडसाद सातारा येथेही उमटले. सातारा येथील पोवई नाका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतर पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

सातारा येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत निषेध आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भारतातील सर्व महिलांची जाहीर स्वरूपाची माफी मागावी. त्यांनी जर माफी मागितली नाही तर आम्ही संपूर्ण देशभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा दिला.

संसदेत खासदार असलेल्या सुप्रियाताई सुळे याचा संसदेत अनेकवेळा गौरव झालेला आहे. तो बंडातात्यांनी कधी पाहिलाही नसेल. कारण ते भलत्याच कोणत्या नशेत वावरत असले पाहिजे असावेत. त्यामुळे त्यांना कळलेले नाही कि पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे या काय आहेत, अशा प्रकारची प्रतिक्रिया महिला अपदाधिकाऱ्यानी यावेळी दिली. दरम्यान, सातारा या ठिकाणी करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. यावेळी सातारा येथील पोवई नका येथे महिला पधाधिकाऱ्यानी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजीही केली.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर RBI देऊ शकते धक्का, व्याजदरात होऊ शकेल वाढ

RBI

नवी दिल्ली । सतत वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर RBI दणका देण्याची तयारी करत आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या पतधोरण आढावा बैठकीत RBI धोरणात्मक व्याजदर वाढवू शकते. ब्रिटनच्या ब्रोकरेज फर्म बार्कलेजने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, RBI ची चलनविषयक धोरण समिती (MPC) अतिरिक्त कॅश उभारण्यासाठी रिव्हर्स रेपो दरात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. रेपो दरात कोणतीही वाढ अपेक्षित नाही.

बार्कलेज विश्लेषकांनी पुढील आठवड्याच्या MPC च्या बैठकीपूर्वी सांगितले की,”ओमिक्रॉन पॅटर्नचा उद्रेक आणि तुलनेने अनुकूल चलनवाढ दरम्यान, RBI कडे प्रो-ग्रोथ मौद्रिक धोरण राखण्यासाठी जागा आहे. मध्यवर्ती बँक कॅश मॅनेजमेंटच्या उपाययोजना लक्षात घेऊन रिव्हर्स रेपो दरात 0.20-0.25 टक्के वाढ करू शकते.”

सलग नवव्यांदा रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही
बार्कलेजशिवाय अनेक विश्लेषकांनीही रिव्हर्स रेपो दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. ते म्हणतात की,”सरकारी कर्जात आश्चर्यकारक वाढ झाल्यामुळे, RBI ची पॉलिसी सामान्यीकरणाकडे जाऊ शकते. डिसेंबरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत, RBI ने सलग नवव्यांदा प्रमुख धोरण दर रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवला होता.”

महागाईतून दिलासा मिळू शकेल
RBI ने 2021-22 मध्ये जीडीपी विकास दराचा अंदाज 9.5 टक्के ठेवला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विकास दर 6.6 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 6.0 टक्के राहण्याचा अंदाज आहे. महागाईच्या आघाडीवर, RBI ने म्हटले होते की, 2021-22 मध्ये किरकोळ महागाई 5.3 टक्के राहील. पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केल्याने महागाई शाश्वत आधारावर कमी होईल. परदेशात असलेल्या शाखांमधील बँकांसाठी भांडवली गुंतवणूक आणि नफा हा नियम आणखी सोपा करण्यात आला आहे.

PM Kisan चा पुढचा हप्ता ‘या’ दिवशी येईल, अशा प्रकारे तारीख तपासा

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर करते. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या काही शेतकरी असे आहेत की, जे या सरकारकडून सुरू असलेल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर हे लक्षात घ्या की सरकार लवकरच 11 व्या हप्त्यासाठीचे पैसे जारी करणार आहे. 11व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही ताबडतोब रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

पीएम किसानचा हप्ता या महिन्यांत येतो
प्रत्येक आर्थिक वर्षात, पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस
या योजनेत रजिस्ट्रेशन करणे अगदी सोपे आहे. ही प्रोसेस तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा पटवारी किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी स्वतःचे रजिस्ट्रेशन देखील करू शकता.

तुम्ही अशाप्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता
>> तुम्हाला सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जा.
>> येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.

जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होतो
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, ज्यांच्याकडे 2 हेक्टर म्हणजे 5 एकर लागवडीयोग्य शेती आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळतो. आता सरकारने धरण्याची मर्यादा रद्द केली आहे. मात्र जर कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरला तर त्याला पीएम किसान सन्मान निधीमधून बाहेर ठेवले जाते. यामध्ये वकील, डॉक्टर, सीए यांना योजने बाहेर ठेवले आहेत.

‘या’ चुकांमुळे पैसे अडकतात
काही वेळा सरकारकडून खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात, मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचे आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकातील चूक असू शकते.