Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2860

निगडीत विहिरीत पडलेल्या जखमी सांबराला जीवदान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा तालुक्यातील निगडी येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल 8 तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. दरम्यान पायामध्ये शिकारीचा फासा लागून जखमी झाल्याने सांबर विहिरीत पडले होते. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे माहिती सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, निगडी येथील शिवारातील एका विहिरीमध्ये सांबर पडल्याची माहिती गावातील ग्रामस्थांना समजली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ वन रक्षक राजू मोसलगी यांना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता दिली. वन विभागाचे रेस्कू पथका घटनास्थळी दाखल झाले. आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल 200 ते 225 किलो वजनाचा नर जातीच्या सांबराला विहिरीतून दोरखंड व रेस्कु जाळीचा वापर करून बाहेर काढले.

विहिरीतून बाहेर काढलेल्या सांबराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या मागील उजव्या पायात शिकारीसाठी वापरण्यात येणारा फासा अडकलेला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्या पायातील फासा काढून टाकत जखमांवर मलमपट्टी करत उपचार करण्यात आले. सब्रुवर पार्थमिक उपचार केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्याला सोडून देण्यात आले.

या सांबराला जीवदान देण्यामध्ये वनविभागाचे वन क्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सवणे,  वनपाल कुशाल पावरा, वनरक्षक राजू मोसलगी, सुहास भोसले, महेश सोनवले, श्रीकांत दुर्गे, गोरख शिरतुडे, शैलेश देशमुख, सुमित वाघ, दिपक मच्छे तसेच निगडी चे सरपंच सुभाष शामराव पवार, धनंजय बबन पवार, अण्णा मारुती जाधव, सागर प्रकाश मसुगडे, तुषार विजय पवार, प्रदीप तुळशीदास जाधव, रोहित व्यंकट पवार, महेश धनाजी भोईटे, प्रीतम आप्पासो पवार यांनी परिश्रम घेतले. बचावकार्य सहायक वन संरक्षक सुधीर सोनवले, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.

सांबर हा एक हरीण वर्गातील प्राणी असून हा हा भारत देशात आढळतो. या जातीचे नर प्राणी 185 ते 260 किलो वजनाचे असतात. सप्टेंबर ते जानेवारी या काळात यांचा प्रणयकाळ दिसून येतो. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्सरवेशन ऑफ नेचर या आंतरराष्ट्रीय संस्थेने या जातीचे अस्तित्व असुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे. ज्या मागचे प्रमुख कारण हे मानवाचा निसर्गातील वाढता हस्तक्षेप तथा शिकार आहे.

वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर 22 जण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथील वैजापूरजवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका आयशर गाडीची दुसऱ्या आयशरला धडक बसून अपघात झाला. पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 22 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

वैजापूर तालुक्यातील औरंगाबाद लासूर रोडवरील हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वाहनातून वऱ्हाडी औरंगाबाद वरून नाशिककडे लग्न समारंभासाठी निघाले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन्ही आयशरमध्ये हा अपघात झाला आहे. अपघातात 22  जण जखमी तर 4 जण जागीच मृत्यूमुखी झाल्याची माहिती वैजापूर पोलिसांनी दिली आहे.

पहाटे तीन वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आहे. यातील किरकोळ जखमी रुग्णांवर वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर जखमी रुग्णांना औरंगाबादच्या घाटीत हलवण्यात आले आहे.

वऱ्हाडावर काळाचा घाला ! दोन ट्रकमध्ये भीषण अपघात; 4 ठार तर 22 जखमी

औरंगाबाद – वैजापूर तालुक्यातील लासुर रोडवर मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला. यात 4 चार तर 22 जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील शिवराई फाट्यावर भीषण अपघात झाला. दोन आयशर ट्रकमध्ये हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे गतीवर अचानक नियंत्रण मिळवणे अशक्य झाले आणि चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या मुळे दोन्ही ट्रक परस्परांवर धडकले. यापैकी एक ट्रक लग्न समारंभावरून परतत होता. त्यामुळे त्यात अनेक प्रवासी होते, अशी माहिती मिळतेय. याच ट्रकमधील 4 जण ठार झाले असून यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.

दरम्यान, शिवराई फाट्यावर झालेल्या या भीषण अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार कळवण्यात आला. परिसरातील नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातातील उर्वरीत जखमींवर आता पुढील उपचार सुरु आहे.

इलेक्ट्रिक बसची 17 वाहनांना धडक; 6 ठार तर 12 जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश येथील कानपुर शहरात एक भीषण अपघात घडला. एका इलेक्ट्रिक बस ने तब्बल 17 गाड्यांना चिरडले. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 12 जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून या विचित्र अपघाताने शहरात खळबळ आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही इलेक्ट्रिक बस घंटाघर चौकातून टाटमिलच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. पूल उतरताच चालकाने बस विरुद्ध दिशेने चालवण्यास सुरुवात केली आणि मध्येच जो दिसेल त्याला उडवून निघून गेला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यापैकी तिघांची ओळख पटली आहे.

दरम्यान, मृत पावलेल्यांपैकी तिघांची ओळख पटली असून इतरांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. शुभम सोनकर, ट्विंकल सोनकर, अरसलान यांची ओळख पटली आहे. जखमींवर टाटमिल येथील कृष्णा हॉस्पीटल आणि हैलट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेची दखल घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

राज्यभर गाजलेल्या ‘त्या’ पोस्टर मॅन वर अखेर गुन्हा दाखल

औरंगाबाद – तीन अपत्य असल्यामुळे आपण महापालिका निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढविण्यासाठी दुसरी पत्नी हवी, या आशयाचे पोस्टर्स रविवारी शहरात झळकले. त्यामुळे शहरासह राज्यात एकच खळबळ उडाली. संतप्त भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या पोस्टर्सला काळे फासून फाडले. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात येताच महापालिकेने अनधिकृत पोस्टर लावणाराविरुद्ध महाराष्ट्र मालमत्तेच्या विकृतीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 च्या कलम 3 प्रमाणे क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.

रमेश विनायकराव पाटील याने रविवारी सकाळी गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट या भागात एकसारख्या मजकुराचे पोस्टर लावले. त्यावर ‘औरंगाबाद महापालिका निवडणूक 2022’ असे ठळक अक्षरात लिहून त्या खाली ‘मला तीन अपत्य असल्याने निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. (जातीची अट नाही) वय 25 ते 40 असावे. अविवाहित, विधवा, घटस्फाेटीत चालेल. फक्त दोन अपत्य (मुले) पेक्षा जास्त असणारी चालणार नाही’, असा मजकूर होता.

सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाले. महिलांनी त्यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला. दुपारी भाजप महिला आघाडीच्या मनीषा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पैठणगेट गाठले. भाजप कार्यकर्ता अजय चावरिया यांनी पोस्टरला काळे फासले.

औरंगाबादेत आजपासून आठवी, नववी व अकरावीचे वर्ग सुरू; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

औरंगाबाद – कोरोना संसर्ग वाढताच बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत. मनपा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दहावी, बारावीचे वर्ग भरविण्यास परवानगी दिली होती. आता मनपा हद्दीतील शासकीयसह खासगी शाळांमधील आठवी, नववी व अकरावीचे वर्ग अटी-शर्थीच्या अधीन राहून आजपासून भरविण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने रविवारी शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी केली होती.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, अवघ्या काही दिवसांतच ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या व इतर व्यवहार सुरूच ठेवण्यात आले. त्यामुळे पालकांमधून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. दरम्यान महापालिका प्रशासकांनी 10 व 12 वीचे वर्ग प्रत्यक्षात भरविण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आता आठवी, नववी व 11 वीचे वर्ग भरविण्यास सोमवारपासून परवानगी दिली आहे. त्यानुसार रविवारी शाळांना सुटी असूनही शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळेची साफसफाई, सॅनिटायझेशनचे कामे सुरू होती.

मनपा प्रशासनाने शाळा व्यवस्थापक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व इतरांसोबत झालेल्या चर्चेनुसार महापालिका हद्दीतील फक्त इयत्ता आठवी, नववी व अकरावीचे प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून अटी व शर्थीच्या अधीन राहून सुरू करण्यास मान्यता दिली. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीचा पर्याय निवडला आहे, त्या विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने शिक्षण देण्यात यावे. प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी वाहनचालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी लसीचे दोन्हीही डोस घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शाळेत टप्प्या-टप्प्याने तसेच एक दिवस आड बोलविण्यात यावे, असे म्हटले आहे.

इंस्टाग्रामवर अश्लील भाषेमध्ये व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ‘थेरगाव क्‍विन’वर गुन्हा दाखल

thergaon queen

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर अश्‍लिल भाषेचे आणि धमकी देणारे व्हिडिओ पोस्ट करणे तरुणीला महागात पडले आहे. यामुळे इन्स्टाग्रामवर ‘थेरगाव क्‍विन’ नावाने अकाऊंट चालविणाऱ्या दोन मुलींसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हे अश्लील भाषेचे व्हिडिओ पोलीस उपनिरीक्षक महिलेच्या मोबाईलवर आले.

त्यानंतर त्यांनी कारवाई करत कुणाल कांबळे या तरुणाला आणि थेरगाव आणि चिंचवड परिसरात राहणाऱ्या दोन तरुणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. थेरगाव या ठिकाणी राहणारी मुलगी इन्टाग्रामवर ‘थेरगाव क्‍विन’ या नावाने अकाऊंट चालविते.

तिने आणि तिच्या दोन साथीदारांनी मिळून अश्‍लिल भाषा वापरून धमकीचे व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर अपलोड केले. यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यानंतर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

छावणीत ब्रिजजवळ रेल्वेच्या धडकेत अज्ञात तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद- रेल्वेच्या धडकेत झालेल्या अपघातात एका 25 ते 30 वयोगटातील अज्ञात तरुण ठार झाल्याची घटना रविवारी (दि.३०) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास छावणी परिसरातील ओव्हरब्रिज जवळील पटरीवर घडली. पोलीसाकडून तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रक्ताने माखलेल्या अवस्थेत तरुण रेल्वे रुळावर पडल्याची माहिती छावणी पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत.जखमी तरुणाला घाटी रुग्णालयात हलविले मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.या प्रकरणी छावणी पोलीस ठण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास साह्ययक पोलीस उप निरीक्षक सुरेश जिरे करित आहे.

असे आहे मृताचे वर्णन

मृत तरुण हा रंगाने काळा सावळा, केस काळे,धाडी-मिशी बारीक,अंगात केशरी शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेली होती.तर पायात काळ्या रंगाची सॅंडल आहे. आशा वर्णनाच्या तरुणास ओळखणाऱ्या व्यक्तीने छावणी पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहन साह्ययक फौजदार सुरेश जिरे यांनी केले आहे.

पत्नीने पतीला चहातून दिले विष; ‘त्या’ गंभीर अवस्थेतही बायकोसाठी गहिवरला तरुण

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या पतीच्या चहात विष घातले. पतीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत अवैध संबंध होते. यासाठी पत्नीने आपल्या पतीला मार्गातून हटवण्यासाठी हत्येचा कट रचला.

काय आहे प्रकरण ?
ही घटना छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या प्रमोद विश्वकर्माने सांगितले कि, त्याची पत्नी सुधा विश्वकर्मा हिचे संतोष विश्वकर्मा याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत आणि दोघांना मी अनेकदा आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यानंतर त्याने आपल्या पत्नीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती असे पीडित प्रमोदने सांगितले.

प्रमोदने आपल्या पत्नीच्या कृत्याची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यांनीदेखील तिला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने काही ऐकले नाही. पीडित तरुणासोबत राहायचं नसल्याचं सांगून आरोपी पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरूच होते. मात्र एवढे होऊनही पीडित तरुणाला आपल्या पत्नीला सोडण्याची इच्छा नाही. त्यांच्या या लग्नाला 8 ते 9 वर्षे झाले आहेत. याशिवाय त्यांना दोन मुलेदेखील आहेत. यामुळे पीडित तरुण आपल्या पत्नीची समजूत काढत होता. यामुळे आरोपी पत्नीने चहामध्ये विष टाकून आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा पतीने केला आहे. मात्र तरीदेखील पीडित तरुण आपल्या पत्नीला सोडू इच्छित नाही.

दिवसभर चर्चेत राहिलेल्या ‘त्या’ बॅनरवरुन भाजप आक्रमक

औरंगाबाद – निवडणुकीसाठी उमेदवार बायको पाहिजे अशा आशयाचे बॅनर रमेश पाटील या विवाहित तरुणाने शहरातील विविध चौकात लावले होते. या बॅनरवरून सकाळपासून राज्यभर चर्चेला उधाण आले आहे. दुपारी संतप्त भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजार पेठेतील बॅनरवर शाईफेक करीत बॅनर फाडला. बॅनर लावणाऱ्या रमेश पाटील या तरुणांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे हा बॅनरचा वाद वाढताना दिसून येत आहे. त्याला निवडणूक लढवायची इच्छा होती. मात्र लॉकडाऊनमध्ये तिसरे आपत्य झाल्यामुळे तो निवडणुकीसाठी उभा राहू शकत नाहीये. याच तरुणाने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे असे लिहलेले बॅनर संपूर्ण शहरभर लावले आहे. तरुणाच्या या बॅनरची सध्या महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.

या बॅनरसोबत त्यांनी बायको कशी असवी हेसुद्धा लिहले आहे. पाटील यांचा प्लॉटिंग चा व्यवसाय आहे. रमेश पाटील यांनी लिहलेले बॅनर अतिशय मजेदार आहे. त्यांनी बॅनरवर पत्नीचे वय तसे च ती कशी असावी याविषयी सविस्तर लिहले आहे. ‘मला तीन मुले असल्यामुळे मी निवडणूक लढवू शकत नाहीये. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी मला उमेदवार बायको पाहिजे. जातीची अट नाहीये. मुलीचे वय 25 ते 40 वर्षादरम्यान असावे. विधवा तसेच घटस्फोटीत मुलगीदेखील चालेल. लग्नासाठी उत्सुक असलेल्या मुलीला दोनपेक्षा जास्त अपत्य नसावे,’ असे पाटील यांनी त्यांच्या बॅनरमध्ये लिहले आहे. तशा अटी त्यांनी सांगितल्या आहेत.

या बॅनवरून आता भाजप आक्रमक झाले आहे, भाजपच्या महिलांनी हे बॅनर शाईफेक करत फाडलेच, मात्र पाटील यांच्यावर आता त्वरीत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे बॅनर लावण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. यामुळे महिलांचा अपमान होत आहे, असा आरोप भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. आता राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने अनेकांना इच्छा असूनही निवडणूक लढवता येत नाही, त्यामुळेच हा प्रकार समोर आला आहे.