Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2862

अल्पवयीन मुलीसोबत आरोपींचे ‘हे’ दुष्कृत्य; 7 जणांना अटक तर 3 जण फरार

Rape

रायगड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये मोट्या प्रमाणात वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात अशीच हादरवणारी घटना घडली आहे. यामध्ये एका 17 वर्षीय मुलीवर 10 जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि हादरवून टाकणारी घटना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी परिसरात घडली आहे. या घटनेतील पीडित मुलगी हि 17 वर्षांची आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या पीडित मुलीच्या दोन मित्रांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. याची माहिती त्यांच्या मित्रांना कळाली आणि मग त्या मित्रांनी पीडित मुलीला धमकावण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपींनी पीडित मुलीला धमकी देत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

यानंतर वडखळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून 7 जणांना अटक केली आहे. तर 3 आरोपी अजूनही फरार आहेत. या कृत्यात आणखी काही तरुणांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फरार असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आली होती. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार केले होते. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले होते. हि घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी घडली होती.

Covid 19: 2 वर्षांत 5 लाख मृत्यू तर 4 कोटींहून अधिक रुग्ण; कोरोना विरुद्धची लढाई संपणार कधी ?

Corona

नवी दिल्ली । भारताच्या कोविड-19 साथीच्या रोगाविरुद्धच्या लढ्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत, मात्र या विषाणूशी लढण्याचे हे युद्ध कधी संपेल याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. देश सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. गेल्या दोन वर्षांत देशाला विविध प्रकारच्या कोरोना व्हायरसचाही सामना करावा लागला आहे. साथीच्या रोगाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, विषाणूच्या डेल्टा व्हेरिएन्टने कहर केला होता, तर ओमिक्रॉन व्हेरिएन्टमुळे संसर्ग खूप वेगाने पसरला.

आजपासून बरोबर दोन वर्षांपूर्वी म्हणजे 30 जानेवारी 2020 रोजी चीनमधील वुहान विद्यापीठात सेमिस्टर परीक्षा देऊन भारतात परतलेल्या विद्यार्थिनीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. तेव्हापासून, भारताला कोविड-19 च्या तीन लाटांचा सामना करावा लागला, ज्या दरम्यान म्युटेशनमुळे विषाणूचे अनेक व्हेरिएन्ट झाले, त्यापैकी काही अत्यंत घातक ठरले.

भारतात आतापर्यंत 4.94 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 4,10,92,522 कोरोना विषाणू संसर्गाची पुष्टी झाली आहे, तर 4,94,091 लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortia (INSACOG) नुसार, गेल्या दोन वर्षात भारतात कोरोना विषाणूचे सात व्हेरिएन्ट आढळून आले आहेत, ही चिंतेची बाब आहे. यामध्ये अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, b.1.617.1 आणि b.1.617.3 तसेच AY सिरीज आणि Omicron व्हेरिएन्टचा समावेश आहे.

यापैकी कोरोना विषाणूचे डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएन्ट घातक मानले गेले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएन्टची लागण झाली आणि यामुळे हजारो लोकं मरण पावले. देशात सध्या ओमीक्रोन या नव्या व्हेरिएन्ट मुळे कोरोनाची तिसरी लाट आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 2 जानेवारीपर्यंत 1.5 लाख नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे, त्यापैकी 71,428 नमुन्यांमध्ये चिंताजनक व्हेरिएन्टआढळून आले आहेत.

भारतातील साथीच्या रोगाचा अंत झाल्याबद्दल संभ्रम कायम आहे

साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी, आरोग्य तज्ञांनी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा आणि लसीकरण मोहीम आणखी तीव्र करण्याचा सल्ला दिला आहे, मात्र भारतात महामारी कधी संपेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ पूनम खेत्रपाल म्हणाल्या, “आम्ही अजूनही साथीच्या आजाराच्या मध्यभागी आहोत. त्यामुळे विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखणे आणि जीव वाचवणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”

निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे, अटीही सांगितल्या; नेमकं काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगात कधी कोण काय करेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना औरंगाबाद येथे घडली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक लढण्याची इच्छा बाळगणाऱ्या एका व्यक्तीचा बॅनर सध्या जोरदार चर्चेत आहे. या तरुणाने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे असे लिहलेले बॅनर संपूर्ण शहरभर लावले आहे.

रमेश पाटील नावाच्या ३५ वर्षे व्यक्तीने औरंगाबाद शहरातील गुलमंडी भागात एक बॅनर लावला आहे. ज्यावर, मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे आहे, असा बॅनर पाटील यांनी लावलं आहे. त्यांच्या या बॅनरची शहरात चर्चा असून, सोशल मीडियावर या बॅनरचे फोटो व्हायरल होत आहे.

आपल्या या बॅनरवर त्यांनी पुढे म्हटलं, वय वर्ष 25 ते 40, अविवाहित / विधवा / घटस्फोटीत चालेल. फक्त 2 अपत्य (मुले) पेक्षा जास्त असणारी चालणार नाही असं लिहून रमेश पाटील यांनी आपला संपर्क क्रमांक दिला आहे. याच बॅनरवर रमेश पाटील यांचा मोठा फोटोही लावण्यात आलेला आहे.

“ज्याला घ्यायचीच आहे तो कुठेही जाऊन घेणारच, त्यामुळे…”; वाईनच्या निर्णयाबाबत भुजबळांचे स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंत्रिमंडळाच्या बैठकीत शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाचे राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी समर्थन केले आहे. “आख्ख्या जगाने वाईनला हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली आहे. त्यात शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल. ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच आहे. त्यामुळे उगीच साप साप म्हणून भुई थोपटण्याचं काम आहे, असे भुजबळ यांनी म्हंटले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नुकत्याच वाईन विक्रीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात राज्य सरकारने शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हितासाठीचाच आहे. या ठिकाणी भाजपमधील लोक विरोध करत आहेत. मात्र, मध्य प्रदेशात भाजपाचं सरकार आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर मद्य घरात ठेवायला परवानगी दिली आहे. बार उघडायला परवानगी दिली आहे.

ज्या वाईनला आख्ख्या जगाने हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली आहे. त्या वाईनबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. मात्र, भाजपवाल्यांकडून काहीतरी विषय काढून त्याच्यावर आंदोलन करायचे हे काही बरोबर आहे, असे भुजबळ यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

सहकार मंत्र्याचे संकेत अन् शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सध्या कृषीपंपाची वाढती थकबाकीमुळे सरकार कडक धोरण राबविण्याच्या विचारात आहे. तर दुसरीकडे विरोधक त्यास विरोध करत आहे, त्यामुळे हा चर्चेचा विषय बनलेला आहे. महावितरणकडून वीजबिल वसुलासाठी कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीत केला जात आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीजबिल वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला तीव्र विरोध होत असल्याने अद्यापपर्यंत अशा प्रकारे अडवणूक करुन वीजबिल वसुली झालेली नाही. पण सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या सुचक विधानामुळे शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे.

कराड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर सहकार मंत्री पत्रकारांशी बोलत होते. येथील एका आयोजित कार्यक्रमात त्यांनी ऊस बिलातून वीजबिल वसुली हा शेवटचा पर्याय आहे. त्या दरम्यान, शेतकऱ्यांच्या तक्रारीचे नेमके स्वरुप काय आहे हे पाहूनच काम केले जाईल असे सांगितले आहे. शिवाय शेतकऱ्यांची याबाबत तयारी असेल तर तो अधिकार शेतकऱ्यांना आणि संबंधित संस्थेला असल्याचे सांगत यामधील सस्पेंन्स कायम ठेवलेला आहे. त्यामुळे भविष्यात गरज पडली तर अशाप्रकारे वीजबिलाची वसुलीही होऊ शकते असेच संकेत त्यांनी दिले आहेत.

थकीत वीजबिल वसुली झाली नाही तर ऊसाच्या बिलातूनच वसुली हाच पर्याय आहे. मात्र, यासंबंधी शेतकऱ्यांची तक्रार काय आहे हे पाहूनही निर्णय होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. मात्र, ऊसबिलातून वसुली होणारच असल्याचे संकेत त्यांनी अस्पष्ट दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार असल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडी सरकारला केवळ मद्यविक्रीतच रस; नवनीत राणा यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. यावरून भाजपनेत्यांकडून सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी निशाणा साधला आहे. “राज्यात अनेक प्रश्न आहेत, मात्र या सरकारला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसून, त्यांना केवळ मद्यविक्रीत रस आहे, अशी टीका राणा यांनी केली आहे.

नवनीत राणा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यात शेतकऱ्याचे प्रश्न, आर्थिक नुकसान भरपाई, कोरोनाचे वाढते प्रमाण अशा अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मात्र, त्याकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. परंतु दुसरीकडे किराणा दुकानात वाईन विक्रीला सरकारने परवानगी दिली आहे. यावरून सरकारला केवळ मद्य विक्रीत रस असल्याचे दिसून येते.

किरणामाल दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगीचा देण्याचा निर्णय शेतकऱ्याच्या हितासाठी आहे, असे सरकार म्हणते. सरकारला आता या सर्वांमधून वेळ मिळालाच तर त्यांनी राज्यातील इतर समस्यांकडे देखील लक्ष द्यावे, असा टोलाही राणा यांनी यावेळी लगावला आहे.

शिवसेना उत्पल पर्रीकरांचा प्रचार करणार; भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

raut parrikar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज शिवसेना मागे घेणार असून त्यांच्या प्रचारासाठीहि शिवसेना उतरणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, उत्पल पर्रिकरांनी अर्ज भरला आहे. त्यांचा अर्ज वैद्य ठरला आहे. त्यामुळे आमचा उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर उमेदवारी अर्ज मागे घेईल. तसेच शिवसेना स्वतः त्यांच्यासाठी प्रचार करेल. एवढंच नव्हे तर आमचे कार्यकर्ते मुंबईतून गोव्याला येतील आणि उत्पल पर्रिकर यांचा प्रचार करतील.

दरम्यान, यावेळी त्यांनी गोव्यात प्रचाराला जाणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली. अमित शहा हे उत्तर प्रदेशात आणि गोव्यात घरोघरी प्रचार करत आहेत. चांगलं आहे. ही त्यांची पक्षाशी निष्ठा आहे. देशासमोर अनेक प्रश्न असताना ते घरोघरी जात आहेत, असा टोला राऊतानी लगावला

Budget 2022: अर्थसंकल्प सादर करणारे पंतप्रधान, जाणून घ्या कोणी कितीवेळा सादर केला अर्थसंकल्प

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशाच्या आर्थिक आरोग्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडणे, म्हणजेच अर्थसंकल्प मांडणे ही अर्थमंत्र्यांची जबाबदारी आहे, मात्र अर्थसंकल्पाच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा पंतप्रधानांना अर्थसंकल्प सादर करावा लागला. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे देशाचे असे पंतप्रधान होते, ज्यांनी पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला.

जवाहरलाल नेहरूंचा अर्थसंकल्प
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी 1958 मध्ये अर्थसंकल्प सादर केला. तत्कालीन अर्थमंत्री टीटी कृष्णमाचारी यांच्या अकाली राजीनाम्यामुळे पंतप्रधान नेहरूंनी अर्थसंकल्प सादर केला. वास्तविक, टीटी कृष्णमाचारी हे नेहरू सरकारमध्ये अर्थमंत्री होते. मुंद्रा घोटाळ्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे नेहरूंनी संसदेत अर्थसंकल्प मांडला.

इंदिरा गांधींचा अर्थसंकल्प
जवाहरलाल नेहरूंनंतर इंदिरा गांधी या देशाच्या दुसऱ्या पंतप्रधान होत्या, ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला. खरे तर इंदिरा सरकारमधील अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. इंदिरा गांधी यांनी 1970-71 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.

मोरारजी देसाई हे त्यावेळी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री या दोन्ही पदांची जबाबदारी सांभाळत होते. जुलै 1969 मध्ये इंदिरा गांधींनी त्यांच्याकडून अर्थमंत्रालयाची जबाबदारी घेतली आणि त्यांना उपपंतप्रधानपद स्वीकारण्यास सांगितले. त्यावर मोरारजी देसाई यांनी तत्कालीन मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या मुद्द्यावरून मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

राजीव गांधींचा अर्थसंकल्प
जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी यांनी 1987 मध्ये पंतप्रधान म्हणून अर्थसंकल्प सादर केला. तत्कालीन अर्थमंत्री व्हीपी सिंह सरकारमधून बाहेर पडल्यानंतर राजीव गांधी यांनीही पंतप्रधान असताना अर्थमंत्रिपद स्वीकारले आणि 1987-88 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला
सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. यात दोन अंतरिम बजट आहेत. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देसाई यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अर्थसंकल्प मांडला नाही.

Budget 2022: अंतर कमी करण्यासाठी ‘वंदे भारत’ सारख्या ट्रेन चालवण्याची सरकारची तयारी

Railway

नवी दिल्ली । दोन दिवसांनंतर सादर होणार्‍या सर्वसाधारण अर्थसंकल्प 2022 मध्ये रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेला आणखी निधी मिळू शकतो तसेच शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी अनेक शहरांसाठी ‘वंदे भारत’ सारख्या सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली जाऊ शकते.

अर्थसंकल्पात Golden Quadrilateral रूटवर ताशी 180 ते 200 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या सेमी-हाय स्पीड ट्रेन्स चालवण्याची घोषणा केंद्र सरकार करू शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. या गाड्या वंदे भारतसारख्या असू शकतात. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी 75 आठवड्यात 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती.

6500 अ‍ॅल्युमिनियमचे डबे बनवण्याचा प्रस्ताव
सरकार अर्थसंकल्पामध्ये रोल स्टॉकवरही लक्ष केंद्रित करू शकते. सध्याच्या गाड्या पूर्णपणे बदलण्यासाठी 6500 अ‍ॅल्युमिनियम कोच, 1240 लोकोमोटिव्ह आणि सुमारे 35,000 वॅगन बनवण्याचा प्रस्ताव आहे. वास्तविक, अ‍ॅल्युमिनियमचे बनलेले डबे हलके असतात. तसेच ते कमी ऊर्जा वापरतात. छोट्या व्यापाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन रेल्वे मालवाहतुकीमध्ये EMU सुरू करू शकते.

खर्चात कपात करून तंत्रज्ञानावर भर
अर्थसंकल्पात रेल्वेचा लॉजिस्टिक खर्च कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा खर्च 14 टक्क्यांवरून 11 टक्क्यांवर आणण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. या उपाययोजनांमुळे मालवाहतुकीचा खर्च चार टक्क्यांनी कमी होऊ शकतो. नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी सरकार अर्थसंकल्पात काही नव्या तरतुदी करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजपने अमृता फडणवीसांना पक्षाचे प्रवक्तेपद द्यावे; मनिषा कायंदेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटमधून महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. यावरून शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “अमृता फडणवीस ज्याप्रकारची वक्तव्ये करतात ती भाजपमधीलच अनेक नेत्यांना आवडत नाही. पण केवळ त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्यामुळे भाजपचे नेते तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. भाजपने अमृता फडणवीसांना पक्षाचे प्रवक्तेपद द्यावे,” असा टोला कायंदे यांनी लगावला आहे.

मनीषा कायदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, अमृता फडणवीस यांनी ट्विट करीत जी विधाने केली आहेत. त्यामागील कारण म्हणजे फडणवीसांना वर्षा बंगला सोडावा लागल्यामुळे त्या वैफल्यग्रस्त झाल्या आहेत. त्याच नैराश्यातून अमृता फडणवीस टीका करत असतात. अनेकदा अमृता फडणवीसांना आपण काय बोलतोय, हेच समजत नाही.

वास्तविक पाहता भाजपच्या नेत्यांनाही अमृता फडणवीस यांची वक्तव्ये आवडत नाहीत. कारण त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे अनेकदा पक्ष अडचणीत येतो. परंतु, अमृता या देवेंद्र फडणवीस यांची पत्नी असल्यामुळे भाजपचे नेते तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. त्यामुळे भाजपने किमान अमृता फडणवीस यांना पक्षाचे प्रवक्तेपद देऊनच टाकावे, असे कायंदे यांनी म्हटले.

अमृता फडणवीस यांनी काय केले आहे ट्विट?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत, नवाब मलिक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. नामर्द, बिगड़े नवाब आणि नन्हें पटोले, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता अमृता फडणवीसांवर टीका केली जाऊ लागली आहे.