Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2861

धावत्या रामेश्वरम् ओखा एक्स्प्रेसचे ब्रेक लाईनर जाम, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

औरंगाबाद – रामेश्वरम ते ओखा साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसच्या सगळ्यात शेवटी असलेल्या बोगीचे ब्रेकलाईनर जाम झाले. मात्र यामुळे निघणाऱ्या धुरामुळे आगीच्या भीतीने रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.

रामेश्वरम ते ओखा एक्सप्रेस औरंगाबादहुन 10:30 वाजता रवाना झाली. ही रेल्वे ताशी 100 कि. मी. च्या वेगाने धावत होती. पोटूळ ते लासूर स्टेशनदरम्यान राहणारे रेल्वे सेना सदस्य महेंद्र कुकलारे यांनी सहज लक्षात आले की मागील दोन डब्यातुन मोठ्या प्रमाणात धूर निघत आहे. ही माहिती त्यांनज तात्काळ रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना दिली. सोमाणी यानी ही माहिती तात्काळ औरंगाबाद स्टेशन व्यवस्थापक एल. के. जाखडे, लासूर स्टेशन मास्तर राजेश गुप्ता, नांदेड रेल्वे नियंत्रण कक्ष प्रमुख, रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.

लासूर स्टेशनवर रामेश्वरम -ओखा सुपरफास्ट एक्सप्रेस मेन लाईनवर थांबविण्यासाठीच्या सूचना लासूर स्टेशन मास्तर यांना मिळाली. त्यामुळे एक्सप्रेस थांबविण्यात येऊन 10 मिनिटात ब्रेक मोकळे करण्यात येऊन रेल्वे पुढील प्रवासासाठी निघून गेली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडली नाही.

भाजपच्या ‘या’ माजी नागरसेवकावर मोक्काअंतर्गत कारवाई

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यांना कल्याणच्या विशेष मोक्का न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सचिन खेमा यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खंडणी, प्राणघातक हल्ला यासह आठ गुन्हे दाखल आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
3 जानेवारी रोजी रात्री 11.30 ला सचिन खेमा याने कल्याणमधील भूषण जाधव याला शिवसेनेचे पदाधिकारी अरविंद मोरे यांच्याबरोबर फिरतो म्हणून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात सचिन खेमा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणातील साक्षीदार असलेले व्यापारी अमजद सय्यद याला धंदा चालू ठेवायचा असेल तर पाच लाख रूपये दे अशी खंडणीची धमकी देत त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यावेळी सचिन खेमा याच्यासोबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी सचिन खेमा याच्यासह अजून एकाला अटक करण्यात आली होती.

भाजपला धक्का
या दरम्यान सचिन खेमाच्या सुटकेसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. सचिन खेमा याच्यासह अन्य दोन नगरसेवकांना सत्ताधारी शिवसेनेने जाणीवपूर्वक अडकवल्याचा आरोप करत भाजपने शनिवारी राज्य सरकारविरोधात अप्पर पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे कारण देऊन हा मोर्चा रद्द करण्यात आला. सचिन खेमा याच्याविरोधात मोक्का अंतर्गत झालेली कारवाई आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का मानला जात आहे.

फोन हरवला तर लगेच करा ‘हे’ काम, अन्यथा रिकामे होऊ शकेल तुमचे बँक खाते

Internet

नवी दिल्ली । स्मार्टफोन आज आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यामध्ये बँकिंग डिटेल्स पासून मोबाइल वॉलेटपर्यंत सर काही असते. पण जर तुमचा फोन हरवला तर चोर तुमचे बँक खाते आणि मोबाईल वॉलेटमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जर आपला मोबाईल चोरीला गेला असेल तर तुम्ही ताबडतोब काही आवश्यक पावले उचलली पाहिजेत जेणेकरून तुमच्या बँक खात्यात जमा केलेले पैसे सुरक्षित राहू शकतील.

सिम कार्ड ब्लॉक करा
स्मार्टफोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर, सर्वप्रथम सिम कार्ड तात्काळ ब्लॉक करणे गरजेचे आहे, जेणेकरून चोर फायनान्शिअल सर्व्हिसेसचे OTP किंवा इतर मेसेज पाहू शकणार नाहीत. नंतर तुम्ही नवीन सिम कार्डसह तोच मोबाईल नंबर वापरणे सुरू ठेवू शकता.

इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग एक्सेस ब्लॉक करा
स्मार्टफोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यावर इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग एक्सेस ब्लॉक करा. ऑनलाइन बँकिंग सर्व्हिसेस ब्लॉक करण्याव्यतिरिक्त, UPI पेमेंट इनऍक्टिव्ह करण्यास विसरू नका. सर्व पासवर्ड रिसेट केल्यानंतरच ऑनलाइन बँकिंग सर्व्हिसेस पुन्हा वापरण्यास सुरुवात करा.

मोबाइल वॉलेट एक्सेस ब्लॉक करा
पेटीएम, फोनपे, अ‍ॅमेझॉन पे, फ्रीचार्ज सारख्या मोबाईल वॉलेट्सने आपले आयुष्य खूप सोपे केले आहे मात्र जेव्हा मोबाईल फोन चुकीच्या हातात पडतो तेव्हा ते महाग ठरू शकते. फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास, मोबाइल नंबरशी लिंक केलेले मोबाइल वॉलेट ब्लॉक करा.

पोलीस ठाण्यात तक्रार करा
जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल किंवा कुठेतरी हरवला असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात जा आणि घटनेची तक्रार करा. एफआयआरची कॉपी घ्यायला विसरू नका जेणेकरून फोनचा गैरवापर झाल्यास ती पुरावा म्हणून सादर करता येईल.

वर्क फ्रॉम होम आता न्यू नॉर्मल झाले आहे; 82% कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये परत यायचेच नाही

मुंबई । आता लोकं ऑफिसला जाण्याऐवजी घरूनच काम करण्याला प्राधान्य देत आहेत. जॉब साइट SCIKEY च्या टेक टॅलेंट आउटलुकच्या रिपोर्ट नुसार, आधी कोरोना महामारीमुळे, कर्मचार्‍यांवर घरातून काम करण्याची सिस्टीम लादण्यात आली होती, मात्र आता 2 वर्षांनंतर ‘वर्क फ्रॉम होम’ आता न्यू नॉर्मल (New Normal) झाले आहे.. या अभ्यासातील लोकांपैकी 82 टक्के लोकांना ऑफिसला जायचे नाही आणि घरून काम करायचे आहे.

टॅलेंट टेक आउटलुक 2022 चार खंडांमधील 100 हून जास्त अधिकारी आणि एचआर एक्झिक्युटिव्हकडून मिळालेल्या फीडबॅकचे विश्लेषण करते. सोशल मीडिया, मुलाखती आणि पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले.अभ्यासात सहभागी असलेल्या 64 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की,”त्यांची प्रोडक्टिविटी जास्त आहे आणि वर्क फ्रॉम होममुळे तणावही कमी असतो.

दरम्यान, 80 टक्क्यांहून अधिक एचआर मॅनेजर्सनी सांगितले की,” त्यांच्यासाठी पूर्णवेळ ऑफिसमध्ये जाणारे कर्मचारी शोधणे अवघड होत आहे. त्याच वेळी, 67 टक्क्यांहून जास्त कंपन्यांनी असेही म्हटले की,” त्यांना ऑफिसमधून काम करणारी लोकं शोधणे कठीण होत आहे.”

एम्प्लॉयरसाठी आव्हान
बदललेल्या वातावरणात, वर्क फ्रॉम होम आता पर्यायाऐवजी न्यू नॉर्मल झाले आहे आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी लोकं देखील आपल्या एम्प्लॉयरकडून अशी अपेक्षा करतात. जे एम्प्लॉयर या सिस्टीमचा अवलंब करण्यास तयार नाहीत त्यांना चांगल्या टॅलेंटला गुंतवून ठेवण्यासाठी आणि आधीच कार्यरत असलेल्या लोकांना त्यांच्यासोबत टिकवून ठेवण्यासाठी आव्हानांना सामोरे जावे लागेल.

पत्नी घरी न आल्यामुळे पतीने रागाच्या भरात उचलले ‘हे’ पाऊल

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका जावयाने सासरवाडीत जाऊन सासू व पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले आहेत. यामध्ये सासूचा जागीच मृत्यू तर आरोपीची पत्नी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा पूर्णा या ठिकाणी घडली आहे. पुष्पा उर्फ रुक्माबाई इंगळे असे मृत महिलेचे नाव असून ती टाकरखेडा पूर्णा येथील रहिवासी आहे. तर स्नेहल दिनेश बोरखडे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीच्या पत्नीचे नाव आहे. आपल्या पत्नीवर व सासूवर जीवघेणा हल्ला करुन आरोपी दिनेश बोरखडे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.

सासूवर कुऱ्हाडीने सपासप वार
आरोपीची पत्नी स्नेहल या आई आजारी असल्याने माहेरी गेल्या होत्या. मात्र पत्नी परत घरी न आल्याने आरोपी दिनेश हा सासरवाडीला गेला. त्या ठिकाणी त्याने आपल्या पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीची सासू या दोघांचे भांडण सोडवण्यास गेली असता आरोपीने रागाच्या भरात आपल्या सासुवर कुर्‍हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात आपल्या सासूचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी दिनेश घटनास्थळावरुन फरार झाला. या हल्ल्यामध्ये आरोपीची पत्नी स्नेहल हीदेखील गंभीर जखमी झाली आहे.

आरोपीचा शोध सुरु
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत महिलेचे शव शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिनेशवर खुनाचा गुन्हा दाखल केला. सध्या आरोपी दिनेश हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी दिनेशचा शोध लागल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.

म्हातारपणी पैशांची कमतरता भासू नये यासाठी काय करावे ? चला जाणून घेऊया

post office

नवी दिल्ली । म्हातारपणी पैशांची कमतरता भासू नये असे वाटत असेल, तर खास प्लॅनिंग करून तुमची गुंतवणूक मॅनेज करावी लागेल. जर आयुष्यभराचे भांडवल म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि ग्रॅच्युइटीचे योग्य मॅनेजमेंट केले, तर रिटायरमेंटनंतर तुम्ही वृद्धापकाळासाठी आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकता.

बँक बझारचे सीईओ आदिल शेट्टी म्हणतात की,”तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासोबतच तुमच्या सर्व आर्थिक दायित्वांचाही लवकर निपटारा करावा लागेल. जर तुम्ही होम लोन, कार लोन किंवा इतर कोणतेही लोन घेतले असेल तर ते लवकर फेडा. तुम्ही तुमच्या PF आणि ग्रॅच्युइटीची रक्कम एकरकमी भरण्यासाठी वापरू शकता किंवा नियमित प्री-पेमेंटची निवड करू शकता.

EPF खात्यात पैसे वाढू द्या
सध्या डेट फंडातील EPF वर सर्वाधिक 8.5 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. शेवटच्या कामकाजी दिवसानंतर, तुमच्या EPF मध्ये जमा केलेल्या पैशावर 36 महिन्यांसाठी व्याज मिळते म्हणजेच तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत काम केले असेल, तर 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या तीन आर्थिक वर्षांसाठी हे खाते बंद होण्यापूर्वी EPF खात्यात जमा केलेल्या पैशांवर व्याज उपलब्ध असेल. EPF खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळते. अशा परिस्थितीत, जर मोठी गरज नसेल, तर EPF फंडातून पैसे काढू नका.

उच्च जोखमीच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवू नका
तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार तुमचे पैसे वेगवेगळ्या ऍसेट्स क्लासमध्ये गुंतवा. याचा अर्थ असा की, जर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकत नसाल तर जास्त रिटर्नमुळे उच्च जोखीम असलेल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे टाळा. यासाठी तुम्ही कमी जोखीम असलेली डेट ओरिएंटेड प्रॉडक्ट्स निवडू शकता. यासाठी तुम्ही पीपीएफ, म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स्ड एडव्हांटेज स्कीम्स, डेट ओरिएंटेड हायब्रीड म्युच्युअल फंड स्कीम आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग्जमध्ये एकरकमी गुंतवणूक यासारखे पर्याय निवडू शकता.

एमर्जन्सी फंड तयार करा, हेल्थ इन्शुरन्स खरेदी करा
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी एमर्जन्सी फंड तयार करा. रिटायरमेंटनंतर तुमच्याकडे किमान 5 लाख रुपये रोख स्वरूपात त्वरित उपलब्ध असावेत. त्यासाठीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. हे पैसे कोणत्याही मेडिकल एमर्जन्सीसाठी किंवा इतर कोणत्याही विशेष गरजांसाठी वापरले जाऊ शकतात. हे पैसे नियमित बँक ठेवी किंवा लिक्विड म्युच्युअल फंड योजनांमध्ये ठेवता येतात. वैद्यकीय खर्चाबाबत दुसरी तयारी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. तुमच्याकडे चांगली कव्हरेज असलेली हेल्थ पॉलिसी असणे आवश्यक आहे जेणेकरून वैद्यकीय खर्चामुळे आर्थिक भार वाढू नये.

आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? अर्थसंकल्पाच्या 1 दिवस आधी ते का सादर केले जाते?

Economic Survey

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षाची आर्थिक पाहणी उद्या 31 जानेवारीला अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सादर केली जाणार आहे. उद्यापासून संसदेचा अर्थसंकल्प सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केल्यानंतर उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर एक महिन्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 14 मार्चपासून सुरू होईल आणि 8 एप्रिलपर्यंत चालेल.

अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. वास्तविक, भारताचे आर्थिक सर्वेक्षण हे भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेले वार्षिक डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित अधिकृत आणि नवीन डेटा समाविष्ट केला जातो. हे मुख्य आर्थिक सल्लागारांच्या देखरेखीखाली तयार केले जाते.

आर्थिक आव्हानांची ब्लूप्रिंट
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची दिशा आणि संदर्भ देशासमोर आर्थिक सर्वेक्षण सादर करते. यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित सर्व क्षेत्रांचे प्रमुख कल आणि गेल्या वर्षभरातील त्यांची स्थिती यांचा तपशील संपूर्ण डेटासह उपस्थित आहे. यासोबतच, आर्थिक सर्वेक्षण देशासमोरील प्रमुख आर्थिक आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्याच्या मार्गांची ब्लू प्रिंटही सादर करते. या सर्वेक्षणांतर्गत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांकडून अर्थव्यवस्थेची सर्व आकडेवारी गोळा केली जाते आणि देशाचे आर्थिक चित्र स्पष्टपणे समोर येईल अशा पद्धतीने एकत्रितपणे सादर केले जाते.

आर्थिक स्थितीचे सोपे सादरीकरण
अर्थसंकल्प हा टेक्निकल डॉक्युमेंट असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर एखाद्याला आर्थिक जगाची माहिती नसेल, तर त्याला अर्थसंकल्प समजण्यात अडचण येऊ शकते. मात्र आर्थिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून सामान्य माणसालाही देशाची आर्थिक स्थिती बऱ्याच अंशी समजू शकते. आर्थिक सर्वेक्षण पाहिल्यावर या वेळी सरकारचा भर कोणत्या क्षेत्रावर अधिक असेल, याचा अंदाज तुम्ही सहज लावू शकता.

या विषयांची माहिती
आर्थिक सर्वेक्षणात कॅश पुरवठ्याचा कल काय आहे हे दिले आहे. याशिवाय कृषी, औद्योगिक उत्पादन, पायाभूत सुविधा, रोजगार, निर्यात, आयात, परकीय चलन इत्यादी मुद्द्यावर अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती काय आहे हे दर्शविते.

भारतातील पहिले आर्थिक सर्वेक्षण 1950-51 मध्ये सादर करण्यात आले. 1964 पर्यंत ते केंद्रीय अर्थसंकल्पासोबत सादर केले जात होते. सन 1964 पासून ते अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले.

आर्थिक सर्वेक्षण कसे तयार केले जाते?
आर्थिक सर्वेक्षण अर्थात आर्थिक सर्वेक्षण तयार करण्याची जबाबदारी अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाच्या (DEA) आर्थिक विभागाकडे आहे. हे सर्वेक्षण मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) यांच्या निर्देशानुसार पूर्ण केले जाते. एक प्रकारे, CEA हा या रिपोर्टचा मुख्य लेखक किंवा शिल्पकार आहे. हा रिपोर्ट CEA द्वारे अंतिम केल्यानंतर, तो औपचारिक मंजुरीसाठी अर्थमंत्र्यांकडे सादर केला जातो.

अनंत नागेश्वरन यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती
आर्थिक सर्वेक्षणाच्या सादरीकरणाच्या अवघ्या तीन दिवस आधी केंद्र सरकारने व्ही. अनंत नागेश्वरन यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आणि त्यांनी शुक्रवारीच पदभार स्वीकारला. डॉ. नागेश्वरन यांनी लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून काम केले आहे.

गेल्या महिन्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे पद रिकामे होते. मागील CEA केव्ही सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त होते. केव्ही सुब्रमण्यम यांनी ऑक्टोबरमध्येच घोषणा केली होती की ते त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदावर कायम राहणार नाहीत.

नाना पटोलेंना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलणाऱ्या पटोलेंना नागपुरात मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे,” अशी टीका बनवकुळे यांनी केली आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा ‘ वध‘ असा उल्लेख करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या बुरसटलेल्या मानसिकतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून दिला आहे. ‘वध‘ राक्षसांचा होतो, महापुरुषांचा नाही, हे या ‘अनपढ ‘ माणसाला कोण सांगणार?”

“नाना पटोले यांना मी अगोदरच सांगितले आहे की, त्यांना नागपूरमधील मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे. बीडच्या कार्यकर्त्यांनी पटोलेंची मानसिक मनस्थिती बिघडली असल्यामुळे त्यांना औषधेही पाठवली आहेत. पटोले हे जाणीवपूर्वक वादग्रस्त अशा प्रकारची वाक्ये काढून काँग्रेसची प्रतिष्ठा मलीन करत आहेत,” असे बावनकुळे यांनी म्हंटले.

रेल्वे गोदामातील कामगारही e-SHRAM वर रजिस्ट्रेशन करू शकतात; कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेच्या कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, ई-श्रम पोर्टलवरील असंघटित क्षेत्रातील कामगारांची लिस्ट बदलण्यात आली आहे. आता ई-श्रम पोर्टलवर रेल्वे गोदामातील कामगारही जोडले गेले आहेत. या लिस्ट मध्ये गोदामातील कामगार हा व्यवसाय म्हणून आधीच दर्शविला आहे.

नवीन बदलामध्ये, रेल्वे गोदाम कामगारांच्या सोयीसाठी, ‘गोदाम कामगार’ या व्यवसायात थोडासा बदल करण्यात आला आहे आणि आता तो ‘गोदाम कामगार/रेल्वे गोदाम कामगार’ असा करण्यात आला आहे. याचा अर्थ गोदाम कामगार आता ई-श्रम पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करू शकतात. या कामगारांनाही ई-श्रम कार्ड मिळतील.

सध्या ई-श्रम पोर्टलवर सुमारे 400 व्यवसाय आहेत आणि आतापर्यंत 24.45 लाखांहून अधिक ई-श्रम कार्ड जारी करण्यात आले आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून कामगार मंत्रालयाने 38 कोटी कामगारांचे ई-श्रम कार्ड बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सरकारच्या या निर्णयावर गोदाम कामगारांचे प्रवक्ते परिमल कांती मंडल म्हणाले की,”कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात ओळख ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाने गोदामातील कामगारांना मान्यता देऊन त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली आहे.”

ई-श्रम कार्डचे फायदे
असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकारी योजनांच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकारने ई-श्रम योजना सुरू केली आहे. ही योजना कामगार मंत्रालयाने ऑगस्ट 2021 मध्ये ई-श्रम पोर्टलच्या लॉन्चद्वारे सुरू केली होती. रोजंदारी मजूर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कोणत्याही बांधकाम क्षेत्रात किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

तुम्हाला मिळू शकतो ‘हा’ फायदा
रोजंदारी मजुरांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळतो.
कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळतो.
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेचा लाभ.
अपघातामुळे अपंगत्व आल्यास 2 लाख, परंतु 1 लाख रुपयांची आर्थिक मदत.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत, रजिस्टर्ड कामगाराच्या मृत्यूनंतर, कुटुंबातील सदस्यांना 2 लाख रुपयांची विमा रक्कम मिळू शकते.

रजिस्ट्रेशन कसे करावे ?
ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी, E-SHRAM च्या अधिकृत वेबसाइट, http://eshram.gov.in वर जा. मेन पेजवरील ‘Register on e-SHRAM’ या लिंकवर क्लिक करा. येथे तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर send OTP की वर क्लिक करा.

अनाथ प्राण्यांची तारणहार Rescue Mom सायली त्रिंबकेची आत्महत्या

सातारा | अनाथ प्राण्यांची तारणहार Rescue Mom म्हणून परिचित असलेली साया अनिमाल केअरच्या संचालिका सायली त्रिंबके यांनी मुंबईत राहत्या घरी आत्महत्या केली. आज रविवारी दि. 25 रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव गडकर आळी येथील निवासस्थानी आणले जाणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

भटक्या कत्र्यांसाठी सायली हिने आपल जीवन समर्पित केले होते. लाॅकडाउनच्या काळात त्यांनी अनेक भटक्या प्राण्यांची देखभाल केली. ज्या ज्या भागात आवश्यकता पडेल तेथे त्या जाऊन प्राण्यांना खाऊ घालत असतं. त्यांच्या कार्याची अनेक संस्था, संघटनांनी दखल घेऊन त्यांचा सन्मान देखील केला आहे.

सायली यांचा प्रतापगंज पेठ येथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. एकदा त्या पार्लरमध्ये झाेपी गेल्या हाेत्या. त्यावेळी त्यांना रस्त्यावर काही हालचाली जाणवल्या. त्यांनी उठून पाहिल्यानंतर त्यांना चाेरीच्या हेतुने काेणी तरी आल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ परिचित लाेकांना फाेन करुन हा प्रकार सांगितला.

त्यानंतर त्यांनी शटर उघडून त्या लाेकांचा पाठलाग केला. या घटनेतून सायली त्रिंबके यांनी दुचाकी चाेरी करणारी टाेळी शाहूपूरी पाेलिसांना पकडून दिली. त्यानंतर पाेलिस दलाने सायली यांच्या धाडसाचे काैतुक करुन त्यांचा सन्मान केला हाेता. आज त्यांच्या निधनाचे वृत्त समजातच साता-यातील प्राणीमित्र संघटनांनी त्यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.