Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2875

कराड नगरपालिकेचा संकल्प : कृष्णा- कोयना नदीकाठी 20 हजार झाडांची वृक्षलागवड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत कराड नगरपरिषदेने कृष्णा कोयना नदीकाठी 20,000 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक वर्षी पुरामुळे नदीकाठील माती वाहून जाते ते थांबवण्यासाठी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कृष्णा कोयना नदी काठी 500 हजार झाडाची लागवड करण्यात आली. प्रत्येक झाडाला ठिंबक सिचनने पाणी पुरवठा करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनापासून वृक्षलागवडीची सुरवात करण्यात आली आहे. पालिकेने शहरातील सदाभाऊ पेंढारकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूकडून थेट प्रीतिसंगम बागेपर्यंत नदीकाठावर जमिनीवर वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी 20 हजार झाडे लावली जाणार आहेत. यावेळी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार ,जलनिस्सारण अभियंता ए. आर. पवार, सर्व विभागीय अधिकारी ,कर्मचारी ,पत्रकार, नागरिक आणि ग्रीनी टीम उपस्थित होते.

माझी वसुंधरांतर्गत राबविल्या जाणाऱ्या वृक्षारोपणामुळे जमिनीची धूप थांबणार आहे. त्याशिवाय प्रीतिसंगम बागेसहित ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्मारकालाही नैसर्गिक संरक्षण मिळणार आहे. त्यासह नदीकाठावरील निसर्गही समृद्ध होणार आहे. पक्ष्यांची आश्रयस्थाने वाढणार आहेत. या मोहिमेमुळे स्वच्छ व हिरवेगार कराड शहर दिसून येईल, यासाठी शहरातील विविध मोकळ्या जागी पालिका वृक्ष लावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.

दिलासादायक : सातारा जिल्ह्यात 790 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 790 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 22. 57 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 3 हजार 499 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 921 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 23 टक्क्यांवर आहे. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

गुरूवारी दिवसभरात 1188 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  काल सायंकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी 7670 रूग्ण सक्रीय होते. तर केवळ 417 रूग्ण रूग्णालयात उपरार्थ आहेत. रिकव्हरी रेट 94.18 टक्के इतकी आहे.

भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

suprim court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसापासून बारा आमदारांच्या निलंबनावरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात वाद सुरु आहे. दरम्यान आज सुप्रीम कोर्टाने बारा निलंबित आमदारांच्याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला. बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हंटले.

महाराष्ट्राच्या विधानसभेट भाजपच्या 12 आमदारांचे विधानसभा अध्यक्षांनी निलंबन केले होते. अधिवेशनादरम्यान भाजपच्या बारा आमदारांनी गोधळ घेतला होता. दरम्यान वर्षभरापासून बारा आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. आज याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यात बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय कोर्टाने दिला.

तालिका अध्यक्षांशी असंसदीय वर्तन केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची केली होती. या कारवाई विरोधात सर्व १२ आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान कोर्टाने आज याबाबात निर्णय दिला.

कोण होते ते 12 आमदार-

सभागृहात गोंधळ घातल्या प्रकरणी संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार (बंठी) भांगडिया या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते.

महाराष्ट्रात वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. काल देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रात वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू असल्याचे त्यांनी म्हंटले.

संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल राज्य सरकारने एक निर्णय घेतला. तो म्हणजे किराणा दुकान आणि सुपरमार्केट्मधे वाईन विक्रीसाठी ठेवण्याचा. वाईन मद्याचा दर्जा आहे का माहीत नाही. जरी असेल तरी देशात दारु बंदी आहे का? पण महाराष्ट्रात जे वाईन विक्रीला विरोध करत आहेत ते शेतकऱ्यांचे शत्रू.

वाईन विरीतून शेतकऱ्यांना आर्थिक लालभ होणार आहे. महाराष्ट्रात वाईन तयार केली जाते. त्याची वाईन खरेदी करून त्याची किराणा दुकानातून विक्री केली जाणार आहे. मात्र, काहीजण याला विरोध करीत आहेत. राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आलेला निर्णय योग्य आहे.

विराट नव्हे, रोहित शर्माच माझा आवडता खेळाडू- हरभजन सिंग

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याना एका मुलाखतीदरम्यान आपले आवडता भारतीय फलंदाज आणि गोलंदाज कोण असा सवाल केला असता त्याने आक्रमक सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा तसेच गोलंदाज म्हणून जसप्रीत बूमराह यांचे नाव घेतले. हरभजन सिंगने रोहित शर्माचे वर्णन प्रत्येक फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज असे केले आहे.

हरभजन सिंग म्हणाला की, टी-20 असो, एकदिवसीय क्रिकेट असो, कसोटी क्रिकेट असो, रोहित जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा त्याची फलंदाजी ही अविश्वसनीय असते असे हरभजन म्हणाला. रोहितकडे खूप वेळ आहे, तो फलंदाजी करताना खूप सोप्पी वाटते. मला वाटते की विराट कोहली आणि केएल राहुल यांसारख्या इतरांच्या मानाने रोहित हा कदाचित जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. विराट तितकाच चांगला आहे पण जेव्हा रोहित खेळतो तेव्हा त्याची खेळण्याची लेव्हल पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे रोहित माझा आवडता फलंदाज आहे.

माझ्या मते रोहित शर्माने तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार असावा. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर त्याला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार करायला हवा.”बुमराहबाबत हरभजन सिंग म्हणाला की, जसप्रीत बुमराह हा टी-20, एकदिवसीय किंवा कसोटी क्रिकेटचा उच्च दर्जाचा गोलंदाज आहे. त्यामुळे रोहित आणि बुमराह हे माझे दोन आवडते खेळाडू आहेत.

खासगी सावकारास अटक : शेतकऱ्यास 50 हजाराच्या बदली 16 लाखाची मागणी

Phaltan Police

फलटण | निंबळक येथील एका शेतकऱ्याला व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे 3 लाख 50 हजार घेऊनही 16 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास तारण जमिनीची विक्री करण्याची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या एका खासगी सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक केलेली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवनाथ सदाशिव राणे (रा. कोळकी, ता. फलटण) याच्याकडून रामदास एकनाथ पिसाळ (रा. निंबळक, ता. फलटण) यांनी 2010 मध्ये दरमहा 10 टक्के व्याजदराने 50 हजार रुपये निंबळक (ता. फलटण) येथे घरी घेतले होते. त्याच्या मोबदल्यात पिसाळ यांनी संशयित आरोपीस 2010 ते 2016 पर्यंत वेळोवेळी मिळून 1 लाख 50 रुपये व त्यानंतर 2017 ते 2021 पर्यंत 2 लाख रुपये म्हणजे अकरा वर्षांत मुद्दलाच्या सातपट पैसे रोख स्वरूपात दिले.

तरी देखील संशयित आरोपी राणे आजपर्यंतच्या व्याजापोटी फिर्यादीस आणखी सोळा लाख रुपये बेकायदेशीररीत्या मागत होता. ते न दिल्यास तारण म्हणून राणे याच्या नावे करून दिलेली जमीन पुन्हा माघारी न करता परस्पर तिऱ्हाईत व्यक्तीला विकण्याची धमकी देत होता. शिवीगाळ करत होता. पिसाळ यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर नवनाथ राणे यास अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. अरगडे तपास करीत आहेत.

गांजाप्रकरणाचा अनुभव असल्याने मलिकांना वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी दिली असावी; भाजपचा टोला

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दुकानात आणि सुपरमार्केटमध्येही वाईन मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मंत्री नवाब मलिक यांनी काल जाहीर केले. त्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सरकार वर टीका करत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटल की, गांजाप्रकरणात असलेला अनुभव लक्षात घेऊन वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी नवाब मलिक यांना दिली असावी, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावरून सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच ठाकरे सरकारला दिलाय. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारनं गरिबांना थोडी तरी मदत करावी. पेट्रोल-डिझेलऐवजी दारु स्वस्त! दारुबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी! महाराष्ट्रात नवीन दारुविक्री परवाने देण्याचा निर्णय! आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू! महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाचे वाभाडे काढले.

‘आदित्य’ सरोवरात वसले ‘खैरे लॉन’ अन् ‘दानवे उद्यान’

औरंगाबाद – महापालिकेने विविध संस्था, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून खाम नदीचे पुनरुज्जीवन केले आहे. नदीपात्रात पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचे सरोवर, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या नावाने ‘ऑक्सिजन हब’, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नावाचे योग लॉन, आमदार अंबादास दानवे यांच्या नावाने फुलपाखरू उद्यान तर रफिक झकेरिया यांच्या नावाने प्रकाश योजना सुरू करण्यात आली आहे. बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुशोभित नदीपात्राचे लोकार्पण करण्यात आले.

महापालिकेतर्फे वर्षभरापासून खाम नदीच्या पुनरुज्जीवनाअंतर्गत कामे सुरू होती. बुधवारी या कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ठाकरे म्हणाले की, खाम नदीचे सौंदर्य व निसर्गरम्य परिसर बघून याठिकाणी फिरावे वाटते, खामनदी पुनरुज्जीवित होईल, असा विचार केला नसेल; पण खऱ्या अर्थाने शहराचा शाश्वत विकास झाल्याचे येथे पाहायला मिळाले. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना अभिमान वाटला असता, शासनाचा एक पैसाही खर्च न करता खाम नदीचे पुनरुज्जीवन करून गतवैभव मिळवून दिल्याबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय व इको सत्त्व, व्हेरॉक कंपनी, छावणी परिषदेचे ठाकरे यांनी कौतुक केले. प्रारंभी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी माहिती दिली.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुभाष ऑक्सिजन हब येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आदित्य सरोवर, उन्नती सरोवर, डॉ. रफिक झकेरिया खाम नदी प्रकाशयोजना, चंद्रकांत खैरे योग लॉन, अंबादास दानवे फुलपाखरू उद्यान, व्हेरॉक एफीथिएटर व हॉलीबॉल ग्राउंडचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, रवींद्र निकम, छावणी परिषदेचे सीईओ विक्रांत मोरे, शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख सौरभ जोशी, इको सत्त्वाचा नताशा झरिन, गौरी मिराशी, व्हेरॉकचे सतीश मांडे, विजय पाटील, देविदास पंडित यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

बसस्थानकावर भीक मांगो आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

st

औरंगाबाद – शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी एसटी महामंडळाच्या 20 ते 25 कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून भिक मांगो अंदोलन केले म्हणून कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, 80 पेक्षा जास्त कर्मचारांचे बळी घेणाऱ्या आघाडी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय यासह अन्य घोषणा फलकांद्वारे कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

सहाय्यक फौजदार सुभाष रोडामन चव्हाण यांनी यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद कुलकर्णी, मच्छिंद्र बनकर, दिनेश गवळे, संतोष शिंदे, जी.टी.पवार, तनवीर खान, अरुण मोडे, जयश्री हजारे, सारीका डोंगरकर, शेट्टी मँडम, कल्पना मानवतकर, उदय कुलकर्णी इतर 12ते 15 कर्मचारी यांच्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान काल प्रजासत्ताक दिनी मध्यवर्ती बसस्थानकाच्या मुख्यद्वारवर 20 ते 25 एस.टी. कर्मचारी हातात फलक घेवून होते. फलकावर देदो बाबा देदो, राज्य सरकार के नाम पर भीक देदो, सरकारला भीक लागलेली आहे. त्यामुळे ते एस.टी. कामगारांच्या मागण्या मान्य करु शकत नाही,आता जनतेने मदत करावी. राज्य शासनात एस.टी.कामगारांचे विलगीकरण झालेच पाहीजे, 80 पेक्षा जास्त कर्मचारांचे बळी घेणारे हेच का ते प्रगतशिल महाराष्ट्र सरकार, सरकार तुपाशी एस.टी.कामगार उपाशी वा रे सरकार आदी फलक हातात घेवून महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, आघाडी सरकारचा धिक्कार असो, आघाडी सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, महाराष्ट्र सरकार हाय हाय अशा सरकार विरोधी घोषना देत होते.

पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेत असाल तर ‘या’ 5 टॉप एंट्री-लेव्हल क्रेडिट कार्डांबाबत जाणून घ्या

Credit Card

नवी दिल्ली । देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्ड वापराचा कल वाढत आहे. जर तुम्ही तुमच्या पहिल्या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर कोणते क्रेडिट कार्ड निवडावे हे समजणे कठीण आहे. तुमच्यासाठी सर्वोत्तम क्रेडिट कार्ड हे तुमच्या खर्चाच्या पद्धतीवर आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे फायदे मिळवायचे आहेत यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत ही 5 एंट्री-लेव्हल क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतील.

Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड
प्राइम मेंबर्ससाठी 5 टक्के आणि नॉन-प्राइम मेंबर्ससाठी 3 टक्के, Amazon पे ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे Amazon App किंवा वेबसाइटवर खरेदीसाठी अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध आहेत. Amazon वर, या कार्डद्वारे रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी 2 टक्के अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध आहेत. Amazon व्यतिरिक्त कुठेही पेमेंट केल्यावर 1% अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात. हे लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड आहे.

Axis ACE क्रेडिट कार्ड
Axis Bank Ace क्रेडिट कार्डद्वारे Google Pay वर रिचार्ज आणि बिल पेमेंटवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. Swiggy, Zomato आणि Ola वर 4 टक्के कॅशबॅक आणि इतर सर्व ऑनलाइन किंवा ऑफलाइन खर्चावर 2 टक्के कॅशबॅक आहे. या कार्डची वार्षिक फी 499 रुपये आहे.

SBI SimplyCLICK  क्रेडिट कार्ड 
SBI SimplyCLICK क्रेडिट कार्ड वापरून Amazon, BookMyShow, Cleartrip, Lenskart आणि Netmeds वर 10X रिवॉर्ड पॉइंट्स मिळवा. या कार्डद्वारे इतर ऑनलाइन खर्च केल्यास 5X रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. या कार्डची वार्षिक फी 499 रुपये आहे.

Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड
Flipkart आणि Myntra वर Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डसह, Cleartrip, PVR, Uber, Swiggy, Cure.Fit, Tata 1mg आणि Tata Sky वर खर्च करण्यासाठी 4 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे तर इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंटवर 1.5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे.

HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्ड
HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्डद्वारे सर्व ऑनलाइन खर्चांवर ई-वॉलेट रीलोड वगळता सर्व ऑनलाइन खर्चांवर 1.5 टक्के कॅशबॅक आणि इतर प्रकारच्या खर्चांवर 1 टक्के उपलब्ध आहे. या कार्डची वार्षिक फी 750 रुपये आहे.