Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2876

Budget 2022 : इन्कम टॅक्सच्या नवीन स्लॅबमध्ये होऊ शकतात बदल

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । दोन वर्षांपूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने दोन स्लॅबची व्यवस्था केली होती. सरकारला आशा होती की, ते करदात्यांना आकर्षित करण्यास सक्षम असेल, मात्र केवळ 5 टक्केच करदात्यांनी नवीन स्लॅबमध्ये प्रवेश केला. हे पाहता 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार नवा इन्कम टॅक्स स्लॅब आणखी आकर्षक बनवू शकते.

टॅक्स पोर्टल क्लियरचे संस्थापक आणि सीईओ अर्चित गुप्ता म्हणतात की,”अर्थ मंत्रालयाने नवीन इन्कम टॅक्स स्लॅबबद्दल खूप विचारमंथन केले आणि त्याच्या अपयशाची कारणे शोधली. दोन टॅक्स सिस्टीम बाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे आढाव्यात आढळून आले आहे. मूल्यांकन वर्ष 2021-22 मध्ये, 5.89 कोटी करदात्यांनी रिटर्न भरले आहेत, त्यापैकी फक्त 5 टक्के म्हणजे 29.4 लाख लोकांनी नवीन स्लॅब स्वीकारला आहे.”

नवी टॅक्स सिस्टीम अयशस्वी का होत आहे?
नवीन टॅक्स सिस्टीममुळे कॉर्पोरेट करदाते खूप खूश होते, मात्र पर्सनल करदात्यांनी स्वतःला त्यापासून दूर ठेवले. अर्थ मंत्रालयाला असे आढळून आले की, “नवीन टॅक्स सिस्टीममध्ये कर सवलतीचा पर्याय काढून टाकल्यानंतर तो आकर्षक राहिला नाही. त्याच वेळी, त्याचा लोकांच्या बचतीवरही परिणाम झाला, कारण बहुतेक लोकं टॅक्स वाचवण्यासाठी बचत करण्याचा आग्रह धरतात. नवीन टॅक्स सिस्टीममध्ये बचतीवरील कर सवलत पूर्णपणे रद्द करण्यात आली.”

अनेक प्रकारच्या सवलती मिळू शकतात
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात नवीन टॅक्स सिस्टीमअंतर्गत अनेक सूट जाहीर करू शकतात. अर्चित गुप्ता यांचे म्हणणे आहे की,”काही अटींसह होम लोनवरील कर सवलत आणि स्टॅण्डर्ड डिडक्शनवर सूट यांचाही इन्कम टॅक्सच्या नवीन स्लॅबमध्ये समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय, सर्वोच्च टॅक्स स्लॅबची लिमिट देखील सध्याच्या 15 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढवता येऊ शकते.

नवीन इन्कम टॅक्स स्लॅबचे दर काय आहेत ?
इन्कम टॅक्सच्या नवीन स्लॅबमध्ये 2.5 लाख वार्षिक उत्पन्नावर कोणताही टॅक्स नाही. 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स लागतो. 5 ते 7.5 लाखांपर्यंत 10 टक्के आणि 7.5 लाख ते 10 लाखांपर्यंत 15 टक्के इन्कम टॅक्स भरावा लागेल. याशिवाय 10 लाख ते 12.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के, 12.5 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के दराने इन्कम टॅक्स भरावा लागतो.

शेतातील मदतनीसाने दोन वर्षे महिलेसोबत जबरदस्तीने केले “असे” कृत्य

Crime

सातारा | कोरेगाव तालुक्यातील एका गावात दि. 31/12/2019 रोजीचे रात्री 11.00 वा ते दिनांक 08/11/2021 रोजीचे रात्री 11.30 वा चे दरम्यान एकाने पिडीत महिलेच्या घरात शिरून वारंवार जबरदस्ती शारिरीक संबंध केले. तसेच घडलेला प्रकार तुझ्या मुलास किंवा इतर कोणास सांगितला तर तुला जीवे मारीन अशी धमकी दिल्याची तक्रार कोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी मनोज वसंत कदम (रा. चंचळी, ता. कोरेगाव जि. सातारा) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिडीत महिलेच्या पती आजारपणामुळे सन 1997 मयत झाले आहेत. तेव्हा पासून मनोज वसंत कदम हा महिलेस शेतातील कामात मदत करतो. दिनांक 31/12/2019 रोजी पिडीतेचा मुलगा रानात झोपण्यासाठी गेला होता. तेव्हा रात्री 11. 00 वाजणेचे सुमारास पिडीत महिलेच्या घरात मनोज शिरला. तेव्हा महिलेने एवढ्या रात्री आमचे घरी का आला आहे असे विचारले त्यावर त्याने माझा हात धरून पिरघळला व पिडितेस जवळ ओढुन जबरदस्ती शारिरीक संबंध केले. तसेच घडलेला प्रकार तुझ्या मुलास किंवा इतर कोणास सांगितला तर तुला जीवे मारीन अशी धमकी देवून तेथुन निघून गेला. त्यानंतर मी घाबरले असल्यामुळे महिलेने सदरचा प्रकार मुलाला सांगितले नाही. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी मनोज हा परत घरी आला व त्याने जबरदस्ती शारिरीक संबंध केले. परंतु भीतीपोटी कोणास काहीएक सांगितले नाही. त्यानंतर मनोज वसंत कदम हा वारंवार महिलेच्या घरी येवून शारिरीक संबंध करू लागला, तेव्हा त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने महिलेस मारहाण करून, सदरचा प्रकार कोणास सांगितला तर जीवे मारीन अशी धमकी दिली.

त्यानंतर महिला दिनांक 13/08/2021 रोजी मुलीला हीला भेटणेसाठी गेले होते. त्यावेळी सदरचा प्रकार मुलीस सागितला होता. त्यावेळी देखील महिलेने व मुलीने सदरचा प्रकार कोणासही सांगितला नाही. त्यानंतर दिनांक 15/10/2021 रोजी गावी चंचळी (ता. कोरेगाव) येथे परत आले थोडे दिवस व्यवस्थित गेलेनंतर दिनांक 08/11/2021 रोजी रात्री 11.30 वा चे सुमारास मनोज वसंत कदम हा पिडीतेच्या घरात शिरला व त्याने मला तु सदरचा प्रकार तुझ्या मुलीला का सांगितला असे म्हणुन मला मारहाण करुन जबरदस्ती शारिरीक संबंध केले. यापुढे तु तुझ्या जमिनीत यायचे नाही ती आता माझी आहे, आलीस तर तुला व तुझ्या मुलास जीवंत ठेवणार नाही अशी धमकी देवून महिलेस शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. “महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू. महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.

शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच देत आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकार बेवड्यांना समर्पित; सुधीर मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडी सरकार हे पूर्णपणे बेवडयांना समर्पित आहे,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याच्या निर्णयावरून निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “मस्त पियो खूप जियो हा या सरकारचा मंत्र आहे. हे महाविकास आघाडीचे सरकार पूर्णपणे बेवड्याना समर्पित आहेत. कोरोनामध्ये सर्वसामान्यांना औषधांची आवश्यकता आहे. पण हंम दवा नही, हम दारू देंगे. हम महाराष्ट्र को मध्यराष्ट्र बनायेंगे,” हे या सरकारचे निर्णय आहेत.

कष्टकरी शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यायला यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेळ नाही. मात्र, पूर्णपणे राजकारण्यांना सहकार्य करणे आणि दारूबाजांना सहकार्य करणे हॅव या सरकारचे धोरण आहे. या सरकारने 300 टक्क्यांचा जो दारूवरचा कर होता तो 150 टक्क्यांवर नेहून ठेवला. म्हणजे वीज स्वस्त असण्याचे कारण नाही तर घरात अंधार असल्याचे चालते. पण दारी असली पाहिजे, हे या सरकारचे धोरण आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हंटले.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जारी केला 1.62 लाख कोटींचा रिफंड, अजूनही आला नसेल तर येथे तक्रार करा

Income Tax Department

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने गुरुवारी या आर्थिक वर्षात आतापर्यंत 1.79 कोटी करदात्यांना 1.62 लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. यामध्ये मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी 1.41 कोटी रिफंडचा समावेश आहे, ज्याची रक्कम 27,111.40 कोटी रुपये आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट केले की, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 एप्रिल 2021 ते 24 जानेवारी 2022 दरम्यान 1.79 कोटी मतदारांना 1,62,448  कोटी रुपयांहून अधिकचा रिफंड जारी केला आहे.

टॅक्स रिफंडचे स्टेट्स कसे तपासावे ?
सर्व काही बरोबर असूनही तुमचा टॅक्स रिफंड परत केला गेला नाही. त्यामुळे तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग पोर्टल आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या वेबसाइटला भेट देऊन तुमच्या रिफंडचे स्टेट्स तपासू शकता.

तुमचा युझर आयडी आणि तुमचा परमनंट अकाउंट नंबर (पॅन) वापरून तुम्ही http://www.incometaxindiaefiling.gov.in या ई-फायलिंग पोर्टलवर तुमच्या खात्यात ‘रजिस्टर्ड युझर’ विभागात लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर ‘ई-फाइल रिटर्न्स/फॉर्म’ या विभागाचा संदर्भ घ्या.

इन्कम टॅक्स रिटर्न आणि संबंधित मूल्यांकन वर्ष निवडा. एक नवीन पेज ‘माय रिटर्न’ उघडेल जे तुमच्या दाखल केलेल्या रिटर्नचे स्टेट्स जसे की, ITR फायलिंग, व्हेरिफिकेशन, ITR प्रोसेस, रिफंड स्टेट्स दाखवेल. ‘स्थिती’ मेनू अंतर्गत, तुम्ही पेमेंट मोड पाहू शकता.

तुम्ही घरबसल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे तक्रार करू शकता
काही गडबड न होऊनही रिफंड आला नसेल, तर त्याची तक्रार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे करता येईल. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने यासाठी टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. करदाते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग पोर्टलद्वारे देखील तक्रारी नोंदवू शकतात.

किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्याच्या फायद्यासाठी तसेच महसूल वाढविण्यासाठी एक हजार चौरस फुटाच्या किराणा दुकान आणि सुपर मार्केट या ठिकाणी वाईन देण्याच्या निर्णयास मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, आज किराणा दुकान आणि सुपर मार्केट या ठिकाणी वाईन देण्याच्या निर्णयाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच दुकानात वाईन ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राज्यातील सुपर मार्केट, किराणा दुकान, बेकरी, डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये वाईन विकता येऊ शकणार आहे.

वाईनच्या खरेदीवर प्रति लिटर 10 रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत पाच कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. किती वाईन विकली याचाही रेकॉर्ड सरकारला मिळणार आहे.

शेअर बाजार कोसळल्यावर आपला पैसा जातो कुठे?? जाणून घ्या नेमकं गणित

Stock Market

नवी दिल्ली । शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की बुडालेला हा पैसा कोणाकडे जातो. तुमचे झालेले नुकसान नफा म्हणून दुसऱ्याला जाते का? याचे उत्तर आहे नाही, हा पैसा गायब होतो. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे आणि ही बातमी तुम्हाला बाजाराच्या पडद्यामागे काय काय घडते याची संपूर्ण माहिती देईल.

वास्तविक, शेअरचे मूल्य त्याच्या कंपनीच्या कामगिरीवर, तोटा आणि नफ्याचे मूल्यांकन यावर अवलंबून असते. जर गुंतवणूकदार आणि बाजार विश्लेषकांना वाटत असेल की, एखादी कंपनी भविष्यात चांगली कामगिरी करू शकते, तेव्हा तिच्या शेअर्सची खरेदी वाढते आणि बाजारात तिची मागणीही वाढते. त्याचप्रमाणे, एखाद्या कंपनीला भविष्यात नफा कमी होईल किंवा व्यवसायात मंदी येईल असे भाकीत केले गेले तर तिच्या शेअर्सचा खेळ बिघडतो आणि कमी किमतीत विक्री सुरू होते. कारण, बाजार मागणी आणि पुरवठा या सूत्रावर काम करतो. त्यामुळे, दोन्ही प्रकरणांमध्ये शेअर्सचे मूल्य वर किंवा खाली जाते.

दुसऱ्या पद्धतीने समजून घ्या
बाजारात खरा पैसा नसतो आणि शेअरचे मूल्य हे त्याचे मूल्यांकन असते. जर आज तुम्ही 100 रुपयांना शेअर खरेदी करत असाल आणि दुसऱ्या दिवशी कंपनीचे मूल्यांकन बदलले ज्यामुळे शेअरचे मूल्यांकन 80 रुपयांपर्यंत खाली आले. आता हे शेअर्स विकल्यावर तुम्हाला 20 रुपयांचा तोटा झाला आहे, मात्र जी व्यक्ती ते खरेदी करेल त्याला थेट फायदा मिळणार का ? होय, जर त्या शेअरचे मूल्यांकन पुन्हा 100 रुपये झाले, तर ते विकून 20 रुपये नफा नक्कीच होईल.

बाजार भावना कशी काम करते?
शेअर बाजार हा भावनेचा खेळ आहे, असे म्हणतात. याचा अर्थ असा की, शेअरची किंमत गुंतवणूकदारांच्या भावनांनुसार ठरवली जाते. उदाहरणार्थ- एखाद्या कंपनीने कॅन्सरचे औषध बनवण्यासाठी पेटंट घेतले असेल तर भविष्यात त्याचा व्यवसाय आणि कमाई नक्कीच वाढेल असे गुंतवणूकदारांना वाटते. या विश्वासापोटी तो कंपनीचे शेअर्स खरेदी करू लागतो. बाजारात त्याची मागणी वाढली की, भाव वाढू लागतात. म्हणजेच, कंपनीबद्दलच्या अशा समजूतीमुळे तिचे मूल्यांकन अचानक वाढते. याला Implicit Value असे म्हणतात, तर कंपनीचे वास्तविक मूल्य तिच्या एकूण भांडवलामधून दायित्वे वजा करून निश्चित केले जाते. याला Explicit Value म्हणतात.

7 दिवसांत 17.23 लाख कोटी रुपये बुडाले, याचा अर्थ काय?
बाजारातील सततच्या घसरणीमुळे गेल्या 7 व्यापार दिवसांत गुंतवणूकदारांचे 17.23 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. म्हणजे कुणाच्या खिशात जाण्याऐवजी कंपन्यांचे मूल्यांकन कमी झाल्याने हा पैसा हवेतच विरला. BSE वर लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 17 जानेवारी रोजी 280.02 लाख कोटी रुपये होते, जे 25 जानेवारी रोजी 262.78 लाख कोटी रुपयांवर आले.

विराट कोहली पुन्हा कर्णधार होणार?; संघ अजूनही आशावादी

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र विराट कोहलीनेच आगामी आयपीएल मध्ये संघाचे नेतृत्व करावे यासाठी आरसीबी अजूनही आशावादी आहे. आम्ही विराट कोहलीचे मन वळवण्याचा प्रयत्न करू असे आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा यांनी सांगितले.

विराट कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक सामने जिंकले आहेत. आम्हाला अजूनही तो कर्णधार म्हणून हवा आहे. आम्ही त्याला कर्णधारपद परत घेण्यासाठी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करू. जर त्याने कर्णधारपदाची भूमिका स्वीकारली, तर विराट कोहली पुन्हा आरसीबीचा कर्णधार होईल असे प्रथमेश मिश्रा यांनी म्हंटल.

दरम्यान, विराट कोहली गेल्या अनेक वर्षांपासून आरसीबीचे नेतृत्व करत आहे. तब्बल 8 हंगामात त्याने बंगळुरूची धुरा सांभाळली होती मात्र एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकवण्यात आरसीबीच्या संघाला यश आले नाही. त्यामुळे विराटने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

पुढील पाच वर्षे अपक्ष म्हणून काम करणार; अर्ज दाखल केल्यानंतर उत्पल पर्रिकरांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने उत्पल पर्रिकर यांना पणजीतुन उमेदवारी देण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांनी आज पणजीतून आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. पुढील पाच वर्षे आपण अपक्ष म्हणून काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रिकर यांनी दिली.

भाजपचे जेष्ठ आणि दिवंगत नेते मनोहर पर्रिकर याचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांनी आज आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आता ते पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहोत.

गोव्यासाठी भाजपकडून 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याऐवजी त्यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे उत्पल पर्रिकरांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

युतीचा पूल बांधायचा असेल तर… ; युतीबाबत मुनगंटीवारांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत शिवसेना नेते, महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. “युतीचा पूल बनवायचा असेल तर दोन्ही बाजू योग्य असल्या पाहिजेत. तसे केल्याशिवाय शास्त्रीय दृष्टिकोनातून हा मनाचा पूल भविष्यात बांधला जाऊ शकत नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, युतीचा पूल बनवायचा असेल तर दोन्ही बाजू योग्य असल्या पाहिजेत, शास्त्रीय दृष्टिकोनातून हा मनाचा पूल भविष्यात बांधला जाऊ शकत नाही. शिवसैनिकांना वाटत असेल एकत्र यावे पण आता आमच्यात इतके अंतर पडल की आता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असे वाटत नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार –

शिवसेना नेते तथा महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पुन्हा माध्यमाशी बोलताना युतीबाबत वक्तव्य केले. नितीन गडकरीच सेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतील. गडकरी हा माणूस मागील 30 वर्षांपासून मातोश्रीवर जात आहे. त्यामुळे मी हे वक्तव्य केले. दोन रस्त्यांवर ते पूल बांधू शकतात तर दोन व्यक्तींची मनही जुळवू शकतात. त्यामुळे मी हे विधान केले. मी कालही तेच विधान केले आणि आजही करतोय, असा पुनरुच्चान अब्दुल सत्तार यांनी केला.