Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2912

प्रथेला फाटा देत पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा

औरंगाबाद – पारंपरिक प्रथेला फाटा देत पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला तर नातवाने आजोबाला अग्नीडाग दिला. जन्मदात्याची अंतिम इच्छा पूर्ण करीत समाजापुढे आदर्श निर्माण केल्याचा हा प्रसंग आज सकाळी वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगरात घडला. परिसरात प्रथमच मुलींच्या खांद्यावर निघालेल्या या अंत्ययात्रेत अनेकजण सहभागी होते.

याविषयी अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील पुरुषोत्तम चंदुलाल खंडेलवाल (72 रा.बजाजनगर) हे 25 वर्षापुर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी अर्धागिनी मीना आणि रेखा, राखी, राणी, आरती व पुजा या मुलींसोबत बजाजनगरात आले होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तसेच पाचही मुलीच असल्याने पुरुषोत्तम खंडेलवाल यांनी न डगमगता कापड विक्रीचा व्यवसाय सुरु केला. सायकलवरुन बजाजनगर व परिसरात दिवसभर कपडे विकुन पुरुषोत्तम खंडेलवाल हे कुटुंबाची उपजिवीका भागवित होते. मुलगा नसल्याची खंत न बाळगळता पुरुषोत्तम खंडेलवाल यांनी मुलींच माझे स्वप्न पुर्ण करतील, अशी आशा बाळगत खडतर परिश्रम घेत मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण दिले. सर्व मुलीं उच्चशिक्षीत झाल्यानंतर खंडेलवाल यांनी कपडे विक्रीतुन केलेल्या कष्टाईच्या कमाईतुन या पाचही मुलींचे लग्न लावुन दिले. मुली सासरी केल्यानंतर तसेच वयोमनानुसार कष्टाचे काम करता येत नसले तर त्यांनी आपला व्यवसाय सुरुच ठेवला होता.

अशातच 9 वर्षापुर्वी आजारी पडल्यानंतर पुरुषोत्तम खंडेलवाल हे घरातच पडून होते. पतीच्या आजारपणात अर्धागिनी मिना खंडेलवाल व मुलगी राणी या दोघांनी त्यांची देखभाल केली. आजारपणातही पुरुषोत्तम खंडेलवाल हे पत्नी मीना व मुलगी राणी यांच्या मदतीने दैनंदिन कामकाज करीत होते. मात्र काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास मुलगी राणीस, मला दुधाचा कपआणून दे, तोपर्यंत मी फ्रेश होतो, असे म्हणून पुरुषोत्तम खंडेलवाल बाथरुमला गेले. बराचवेळ झाला तरी वडील बाहेर आले नाही. यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने मुलगी राणीने बाथरुमचा दरवाजा तोडला. यावेळी पुरुषोत्तम खंडेलवाल यानाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. यानंतर राणी यांनी नातेवाईक व छत्तीसगड, ओरीसा व शहरात असलेल्या दोन्ही बहिणींना वडीलांचे छत्र हरपल्याची माहिती दिली.

पुरुषोत्तम खंडेलवाल यांच्या ओरीसा व छत्तीसगड मध्ये वास्तव्यास असणाऱ्या दोन्ही मुली आज गुरुवारी पहाटे बजाजनगरात पोहचल्या. सर्व पाचही मुली वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी आल्यानंतर नातेवाईक व शेजाऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली होती. या पाचही मुलींनी धार्मिक प्रथेला फाटा देत जन्मदात्याच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला. तसेच पाचही मुली स्मशानभुमीपर्यंत गेल्या. यानंतर नातू तेजस खंडेलवाल याने आजोबांना अग्नीडाग दिला.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना पाठवले 1.59 लाख कोटी रुपये, तुमच्या खात्यात आले की नाही ते तपासा

FD

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 17 जानेवारी 2022 पर्यंत 1.74 कोटींहून जास्त करदात्यांना 1,59,192 कोटी रुपयांहून जास्तीचा रिफंड दिला आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 17 जानेवारी 2022 दरम्यान केलेल्या रिफंडचा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 56,765 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा टॅक्स रिफंड 1,02,42 कोटी रुपये होता.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट करून सांगितले की, “CBDT ने 1 एप्रिल 2021 ते 17 जानेवारी 2022 दरम्यान 1.74 कोटीहून जास्त करदात्यांना 1,59,192 कोटी रुपये रिफंड केले आहेत. 1,72,01,502 प्रकरणांमध्ये 56,765 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिफंड आणि 2,22,774 प्रकरणांमध्ये 1,02,428 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड जारी करण्यात आला आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये, डिपार्टमेंटने म्हटले आहे की, यामध्ये AY 2020-21 (31 मार्च 2021 रोजी संपलेले आर्थिक वर्ष) 26,372.83 कोटी रुपयांच्या 1.36 कोटी रिफंडचा समावेश आहे.

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2.38 कोटी करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड जारी केला होता. 2019-20 या आर्थिक वर्षात जारी केलेल्या 1.83 लाख कोटी रुपयांच्या रिफंडच्या तुलनेत हे 43.2 टक्के जास्त आहे.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन वेबसाइटवरून रिफंडचे स्टेट्स तपासा-
तुम्हालाही इन्कम टॅक्स रिफंड मिळायचा असेल, तर तुम्ही त्याचे स्टेट्स ऑनलाइन पाहू शकता. इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलद्वारे किंवा NSDL वेबसाइटद्वारे स्टेट्स तपासले जाऊ शकते.

>> सर्वप्रथम तुम्हाला http://www.incometax.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
>> यूझर आयडी आणि पासवर्ड टाका.
>> लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ई-फायलिंगचा पर्याय दिसेल.
>> आता तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न निवडा
>> त्यानंतर View File Return वर क्लिक करा.
>> आता तुमच्या ITR Details दाखवले जातील.

रिफंड मिळण्यास उशीर होण्याची ‘ही’ कारणे असू शकतात
इन्कम टॅक्स रिफंड अडकण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे बँक खात्याच्या डिटेल्समधील चूक. फॉर्म भरताना तुम्ही तुमच्या खात्याचा तपशील चुकीचा टाकला असेल, तर त्यामुळे तुमचा इन्कम टॅक्स रिफंड अडकू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर खात्याचे डिटेल्स दुरुस्त करावे लागतील.

तुमचे रद्द झालेले PVC आधार कार्ड UIDAI कडून घरबसल्या कसे मिळवावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । UIDAI ने बाजारातून बनवलेले आधार PVC कार्ड अवैध घोषित केले आहे. UIDAI म्हणते की, त्यांच्याकडून मागवलेले आधार PVC कार्डच वैध आहेत. ते अनेक सिक्योरिटी फीचर्ससह सुसज्ज आहेत आणि सुरक्षित आहेत. बाजारातून तयार केलेली PVC आधार कार्डे असुरक्षित आहेत आणि ती वापरू नयेत. UIDAI च्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांची आधार कार्डे अवैध ठरली आहेत.

PVC आधार कार्ड हे एक प्रकारचे प्लास्टिक कार्ड आहे, ज्यावर आधार कार्डची माहिती छापली जाते. UIDAI नुसार, या कार्डमध्ये सुरक्षित QR कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, जारी करण्याची तारीख आणि कार्डची प्रिंट आणि इतर माहिती आहे. एटीएम, ऑफिस आयकार्ड किंवा डेबिट कार्ड आकाराचे असल्याने ते खिशात किंवा पर्समध्ये नेणे सोपे आहे. या कारणास्तव ते खूप लोकप्रिय झाले आहे.

फक्त 50 रुपयांमध्ये ऑनलाइन ऑर्डर करा
UIDAI कडून PVC आधार कार्ड मिळवणे खूप स्वस्त आहे. एका ट्विटमध्ये UIDAI ने म्हटले आहे की, कोणतीही व्यक्ती केवळ 50/- रुपये (PVC आधार कार्ड फी) (जीएसटी आणि स्पीड पोस्ट फीसह) भरून आधार PVC कार्ड ऑर्डर करू शकते. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला PVC आधार कार्ड ऑर्डर करावे लागेल.

Aadhaar card online apply
UIDAI वेबसाइट https://uidai.gov.in वर जा.
येथे ‘My Aadhaar’ विभागात जाऊन ‘Order Aadhaar PVC Card’ वर क्लिक करा.
तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार एनरोलमेंट आयडी (EID) एंटर करा.
सिक्योरिटी कोड किंवा कॅप्चा एंटर करा.
OTP मिळवण्यासाठी Send OTP वर क्लिक करा.
नियुक्त केलेल्या ठिकाणी रजिस्टर्ड मोबाइल I OTP सबमिट करा.
सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला आधार पीव्हीसी कार्डचे प्री-व्यू दिसेल.
खाली दिलेल्या पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्याने तुम्हाला पेमेंट पेजवर नेले जाईल.
येथे 50 रुपये फी भरा.
तुम्ही पेमेंट करताच तुमच्या आधार PVC कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल.
पोस्ट ऑफिसच्या स्पीड पोस्टद्वारे काही दिवसांनी PVC आधार कार्ड तुमच्या घरी पोहोचेल.

“मुलगी झाली हो” मालिकेचे शूटींग बंद पाडण्याचा संभाजी ब्रिगेडकडून प्रयत्न, कार्यकर्ते आक्रमक

सातारा | स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ सध्या चांगलीच वादात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेतील अत्यंत लोकप्रिय पात्र विलास पाटील हे साकारणारे अभिनेते किरण माने याना तडकाफडकी मालिकेतून काढण्यात आले. यामुळे संपूर्ण राज्यातून संबंधित प्रकरणावर रोष व्यक्त केला जात आहे. यामध्ये अनेक राजकीय पक्ष, नेते मंडळी आणि मुख्य म्हणजे कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या होत्या. यानंतर आता संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद करण्याच्या हेतूने ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यातील गुळूंब या गावात सध्या मालिकेचे चित्रीकरण सुरू असून तेथे संभाजी ब्रिगेडकडून चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून किरण माने प्रकरण दिवसागणिक चिघळताना दिसत आहे. एकीकडे कलाकाराची अश्या पद्धतीने गळचेपी करण्यामुळे सर्व स्तरांतून राग व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे मालिकेच्या निर्मात्यांनी आणि वाहिनीने परिपत्रकातून किरण माने यांच्यावर महिला सह कलाकारांसोबत गैरवर्तन केले असल्याचा आरोप लावला होता. या आरोपानंतर काही महिला सह कलाकारांनी किरण माने यांची बाजू घेतली आहे. दरम्यान किरण माने यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तर आज जितेंद्र आव्हाड यांचीही भेट घेऊन संबंधित प्रकरणाची माहिती दिली आहे.

किरण माने यांच्यावर मालिकेतील इतर महिला कलाकारांकडून गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. मात्र मानेंनी आधीच आपल्या राजकीय भूमिका घेण्यामुळे मालिकेतून काढून टाकल्याचे माध्यमांना स्पष्ट केले होते. यानंतर महिला कलाकारांमध्ये दोन गट पडल्याचे दिसले. यातील एकीकडून मानेंवर आरो तर दुसरीकडून समर्थनाचे झेंडे फडकवले गेले आहेत. त्यामुळे राज्य महिला आयोगाने देखील निर्माते आणि वाहिनीकडे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच बहुजन समाजातील कलाकारांवर अन्याय केला असल्याचेही आता काहीजण बोलू लागेल आहेत. अशावेळी आता संभाजी ब्रिगेडने देखील आपली आक्रमक भूमिका घेत चित्रीकरणावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे.

घरातील भूत काढायचे सांगून भोंदू हकिमने 3 लाख लुटून महिलेवर केला अत्याचार

bhondu baba

औरंगाबाद – डॉक्टरांकडे जाऊनही डोकेदुखी न थांबल्याने भोंदू हकिमाकडे गेलेल्या महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आल्याची घटना औरंगाबादेत काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. शुद्धीवर आल्यावर सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर सदर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यानंतर या भोंदू हकिम फरार झाला होता. औरंगाबादमधील बेगमपुरा पोलिसांनी दीड महिना शोध घेऊन 19 जानेवारीला अखेर या हकिमाला अटक केली. या भोंदू हकीमाचे नाव मुश्ताक शेख उमर शेक असून तो मूळचा नाशिक येथील रहिवासी आहे.

शहरातील बेगमपुरा परिसरात राहणाऱ्या एका महिलेला मागील अनेक महिन्यांपासून डोकेदुखीचा त्रास होता. शहरातील नामवंत डॉक्टरांकडे उपचार घेऊनही तिचा त्रास कमी होत नव्हता. महिलेला नातेवाईकाने मालेगावचा एक हकीम उपचार करत असल्याचे सांगितले. रहेमानिया कॉलनीत दुकान असलेल्या आरोपी मुश्ताककडे पीडिता 27 जुलै रोजी गेली. त्यानंतर हकीम पीडितेच्या घरी गेला. घरावर आत्म्याचा प्रभाव असून तीन कस्तुरी खरेदी करून त्याला घरातून काढण्यासाठी तीन लाख रुपयांचा खर्च सांगितला.

तुमच्या घरातून आत्म्याचा प्रभाव काढण्यासाठी तीन लाख रुपयांचा येईल, असे भोंदूने सांगितले. 2 ऑगस्ट 2020 रोजी पीडितेने त्याला कस्तुरीसाठी एक लाख रुपये दिले. 15 ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी आणखी एक लाख रुपये दिले. तेव्हा त्याने पीडितेला खोलीत नेत आत्मा जाण्यासाठी उपचार करावे लागतील, असे सांगत इतर लोकांना घराबाहेर काढले. पीडितेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार केला. पूर्ण शुद्धीवर आल्यानंतर मात्र पीडितेला हा प्रकार समजला. सदर महिलेने 7 डिसेंबर 2021 रोजी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच, भोंदू हकीम मुश्ताक फरार झाला होता. अखेर बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार, तपास अधिकारी विशाल बोडखे यांनी शोध घेत त्याला अटक केली.

उत्पल पर्रीकरांना तिकीट देत होतो, पण…; फडणवीसांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Utpal Parrikar Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा पत्ता कापण्यात आला आहे. यानंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण देत भाजपची भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उत्पल पर्रिकर यांना आम्ही भाजपकडून तिकीट देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना आम्ही इतर दोन मतदारसंघाचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी एक पर्याय त्यांनी नाकारला आहे. पण दुसऱ्या पर्यायाबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. मला असं वाटतं की दुसऱ्या पर्यायाबद्दल ते सकारात्मक उत्तर देतील.

दरम्यान, यावेळी फडणवीसांनी काँग्रेस वर हल्लाबोल केला. काँग्रेसला गोव्याचं काही पडलं नाही. केवळ लूटीचं राजकारण सुरू करता यावे यासाठी काँग्रेसला गोवा हवा आहे. पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी काँग्रेसला गोव्याची सत्ता हवी आहे अशी टीका त्यांनी केली.

वनविभागाची कारवाई : मांडूळ जातीते साप विकणाऱ्या तिघांना अटक

खंडाळा | शिरवळ येथील शिरवळ – लोंणद रस्त्यावर असणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसरात जिवंत मांडूळ विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना सातारा वन विभागाने ताब्यात घेतले आहे. रवींद्र कंगाळे, अनिकेत यादव, संतोष काटे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार मांडूळ साप हा शेड्युल 4 मध्ये येत असून सातारा वनविभागाने ताब्यात घेतलेले जिवंत मांडूळ इंडियन सँड बोआ (शास्त्रीय नाव – एरिक्स जॉनी) प्रजातीचे असून त्याची लांबी 141 सेंमी तर वजन सव्वादोन किलो आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे बुधवार, दि. 19 रोजी काहीजणांनी जिवंत मांडूळ जातीचे साप विक्री करण्यासाठी पकडले असून ते आजच विक्री करणार आहेत, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे मिळाली होती. याची माहिती भाटे यांनी याची माहिती वनक्षेत्रपाल (फिरते पथक सातारा) सचिन डोंबाळे यांना तत्काळ दिली. हे मांडूळ विक्री करण्यासाठी काही संशयित शिरवळ – लोणंद रोडवरील पशुवैद्यकीय कॉलेज परिसरात सांयकाळी पाच वाजता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे वनक्षेत्रपाल सचिन डोंबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावला.

वनविभागाचे पथक येथे असतानाच तिघे संशयित पाच वाजता एका दुचाकी (एमएच ११ – बीएफ २९५४)वरून आले. त्यांचे वर्तन संशयास्पद असल्यामुळे त्यांना तत्काळ ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विक्रीसाठी आणलेले ‘इंडियन सँड बोआ’ प्रजातीचा मांडूळ साप मिळून आला. यावेळी या तिघांनी आपली नवे रवींद्र महादेव कंगाळे (वय 42, श्रीरामनगर, रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा), अनिकेत तात्यासो यादव (वय 24, रा. कवठे-मसूर, ता. कराड, जि. सातारा), संतोष दिनानाथ काटे (वय 42, रा. भांबे, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) अशी सांगितली. या तिघांना ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी, व तीन मोबाईल संच तसेच एक जिवंत मांडूळ हस्तगत केले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या कारवाईत वनक्षेत्रपाल (फिरते पथक) सचिन डोंबाळे, खंडाळा वनक्षेत्रपाल महेश पाटील, वनपाल दीपक गायकवाड, राहुल जगताप वनरक्षक विजय भोसले, आंनदा जगताप, पोलीस कॉन्स्टेबल सुहास पवार, चालक दिनेश नेहरकर आदी सहभागी झाले होते. दरम्यान, या घटनेचा पुढील पंचनामा व गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया खंडाळा वनक्षेत्रपाल महेश पाटील यांच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

भारतातही 5G सह विमान उड्डाणास ब्रेक लागणार ? TRAI चे काय म्हणणे आहे जाणून घ्या

Flight Booking

नवी दिल्ली । विमान तंत्रज्ञानावर 5G मोबाइल फोन सेवेच्या कथित दुष्परिणामांचा मुद्दा भारतात देखील 5G सेवा सुरू करण्याच्या मार्गावर आडवा येऊ शकतो. हे पाहता, टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) 5G स्पेक्ट्रमच्या किंमतीबाबत सल्लामसलत करताना स्पष्टीकरण जारी करू शकते. लाइव्ह मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, TRAI च्या सूत्रांनी सांगितले की,”TRAI चा असा विश्वास आहे की, भारतात 5G सेवा सुरू झाल्यामुळे फ्लाइट ऑपरेशनवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.”

विशेष म्हणजे, अमेरिकेत 5G सेवा सुरू केल्यानंतर, एअर इंडियासह अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी बुधवारी अमेरिकेतील काही विमानतळांवर आपल्या फ्लाईट्स रद्द केल्या. एअरलाइन्सचे म्हणणे आहे की, विमानाच्या रेडिओ अल्टिमीटरवर 5G चा परिणाम इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टीम बंद करू शकतो, ज्यामुळे विमान धावपट्टीवर थांबवण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. यानंतर ही 5G सेवा जगभर वादात सापडली आहे.

दोन सूत्रांनी लाइव्ह मिंटला सांगितले की, भारतात 5G तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एअरलाइन्सच्या कामकाजावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. 5G साठी 3.3GHz ते 3.6GHz बँड सेट केले आहेत. हे दोन्ही बँड एअरलाइन अल्टिमीटरद्वारे वापरल्या जाणार्‍या 4.2Ghz बँडपेक्षा खूप खाली आहेत. या दोन बँडमध्ये पुरेसे अंतर आहे. यामुळे, ते एकमेकांमध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता नगण्य आहे.

बँडमधील अंतराची कोणतीही अडचण येणार नाही
TRAI शी संबंधित आणखी एका सूत्राने लाइव्ह मिंटला सांगितले की ट्रायला या संपूर्ण प्रकरणाची माहिती आहे. ही समस्या भारतात 5G सेवा सुरू करण्याच्या मार्गात येणार नाही. कारण 5G साठी निश्‍चित केलेला बँड आणि एअरलाइन्सद्वारे वापरला जाणारा बँड यामध्ये बऱ्यापैकी अंतर आहे. सध्या, 5G स्पेक्ट्रमच्या किमतींबाबत भागधारकांशी सल्लामसलत सुरू आहे. 24 जानेवारीपर्यंत 5G बाबत सूचना देऊ शकता. यानंतर TRAI ओपन हाऊस चर्चा करेल. यानंतरच ट्राय 5G वर शिफारस जारी करेल. या शिफारशीत एअरलाइन्सवर 5G च्या परिणामांबाबतही स्पष्टीकरण असेल असे सूत्राचे म्हणणे आहे.

बुधवारी, एअर इंडियासह इतर अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी अमेरिकेला जाणारी त्यांची काही उड्डाणे रद्द केली. काही विमानतळांवर 5G तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे असे केले गेले. या आठवड्याच्या सुरुवातीला, एअरलाइन्स यूएस एव्हिएशन रेग्युलेटरला पत्र लिहून म्हणाले की,”5G तंत्रज्ञानामुळे विमानाच्या ऑपरेशनमध्ये गंभीर व्यत्यय येऊ शकतो, कारण 5G तंत्रज्ञान विमानाच्या स्वयंचलित लँडिंगसाठी वापरल्या जाणार्‍या अल्टिमीटरला त्रास देऊ शकते.”

COAI नेही सुरक्षित असल्याचे सांगितले
त्याच वेळी, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) 5G तंत्रज्ञानाद्वारे एअरलाइन्सच्या कामकाजात व्यत्यय आणण्याची शक्यता बिनबुडाची आहे. COAI चे महासंचालक एसपी कोचर म्हणाले, “भारतीय वैमानिक महासंघाने व्यक्त केलेल्या चिंता आम्हाला समजल्या आहेत. हा मुद्दा यापूर्वीही समोर आला आहे. मात्र प्राधिकरणाला स्पेक्ट्रम हस्तक्षेप असमाधानकारक आढळला.” कोचर म्हणतात की,” दोन फ्रिक्वेन्सीमध्ये 530 मेगाहर्ट्झचे अंतर आहे. त्यामुळे 5G तंत्रज्ञान विमान वाहतुकीला कोणताही धोका नाही.”

‘त्या’ गॅंगवॉरमधील मुख्य आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद – जुन्या वादाचा सूड घेण्याच्या भावनेतून प्लॉटिंगचा व्यावसायिक 25 वर्षीय तरुणावर टोळक्याने 15 जानेवारीरोजी चाकूने तब्बल 36 वार करून निर्घृणपणे खून केला होता. या गॅंगवारमधील मुख्य आरोपी तालेब सुलतान चाऊस याला गुन्हे शाखेने दौलताबादेतून बुधवारी सायंकाळच्या सुमारास बेड्या ठोकल्या.

हे गॅंगवार मिसारवाडीतील गल्ली क्रमांक नऊमध्ये घडले होते. हसन साजिद पटेल असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन तर इतर दोघांना जिन्सी, सिडको पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या होत्या. तर यातील पाचजण फरार होते, त्यापैकी मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र अजूनही चारजण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.आरोपी तालेब सुलतान चाऊस हा मूळचा परभणी जिल्ह्यातील पाथरीचा राहणारा आहे, अनेक वर्षापासून त्याचे कुटूंबीय औरंगाबादेत स्थिरावले आहेत. शनिवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान त्याने साजेदचा खून करुन रेल्वेने थेट पाथरी गाठले. ही माहिती गुन्हे शाखेला सुत्रांकडून मिळाली होती.

दरम्यान त्याला सुत्रांनीच दौलताबाद येथे नातेवाईकांकडे आणले. त्यानंतर जिन्सी पोलिस आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्या पथकातील किरण गावंडे, विठ्ठळ सुरे, ओमप्रकाश बनकर,नवनाथ खांडेकर, संजय राजपूत ठाकूर यांच्या पथकाने दौलताबादेतून बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे मृत हसन याच्यावर झालेल्या 36 वार यापैकी सर्वात जास्त वार हे आरोपी तालेब यानेच केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. याशिवाय तालेब यालाही मारहाणीदरम्यान 11 टाके पडल्याचे पोलिसांनी सांगितले