Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2956

Stock Market : बाजार वाढीने उघडला, आयटी कंपन्यांच्या निकालांवर असेल लक्ष

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजार बुधवारी जोरदार उघडले. उघडण्याच्या वेळी सेन्सेक्सने आज 61 हजारांची पातळी ओलांडली. सेन्सेक्स 300 हून जास्त अंकांच्या वाढीसह 60,950 च्या आसपास ट्रेड करत आहे. त्याच वेळी, निफ्टी 100 अंकांच्या वाढीसह 18,150 च्या जवळ दिसत आहे.

मंगळवारच्या व्यवसायात म्हणजे 11 जानेवारीला, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) बाजारात 111.91 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या कालावधीत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) बाजारात 378.74 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आज NSE वर F&O अंतर्गत 4 शेअर्समध्ये ट्रेडिंग होणार नाही. डेल्टा कॉर्प, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, व्होडाफोन आयडिया आणि आरबीएल बँक या शेअर्सच्या ट्रेडिंगवर बंदी घालण्यात आली आहे.

TCS, INFOSYS आणि WIPRO चे आज Q3 चे निकाल
TCS, INFOSYS आणि WIPRO या तीन IT दिग्गजांचे तिसर्‍या तिमाहीचे निकाल आज जाहीर होतील. INFOSYS आणि WIPRO च्या डॉलर्सच्या महसुलात 3 टक्क्यांहून जास्त वाढ अपेक्षित आहे, TCS चा डॉलर महसूल 2.1 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. TCS आज चौथ्या बायबॅकचाही विचार करेल.

अमेरिकी बाजार तेजीसह बंद झाले
कालच्या ट्रेडिंगमध्ये Dow 183 अंकांच्या वाढीसह 36252 वर बंद झाला होता. Dow मध्ये 500 हून जास्त अंकांची रिकव्हरी दिसून आली. त्याच वेळी, S&P मध्ये 0.92 टक्के वाढ नोंदवली गेली. 5 दिवसांच्या घसरणीनंतर S&P ने वेग पकडला होता. NASDAQ 210 अंकांनी वाढून 15153 वर बंद झाला. 100 अंकांच्या घसरणीनंतर NASDAQ मध्ये रिकव्हरी झाली. दुसरीकडे, यूएस फ्युचर्स मार्केटमध्ये फ्लॅट ट्रेडिंग होत आहे.

जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळत आहेत. आशिया मजबूत आहे. SGX NIFTY 100 अंकांनी वर आहे. दुसरीकडे, फेडबाबत कमी अनिश्चिततेमुळे काल अमेरिकन बाजार बंद झाले. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी धोरणात्मक कठोरता आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

महापालिकेने बजावल्या शहरातील 12 रुग्णालयांना नोटिसा

aurangabad mahanagar

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क उकळले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या लेखा परीक्षणानंतर हा प्रकार समोर आला होता. जास्तीचे उकळलेले शुल्क परत देण्यासाठी या रुग्णालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. पण त्यानंतरही पैसे परत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने महापालिकेने अशा 12 रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांमध्ये बेडसाठी मारामार सुरू होती. या परिस्थितीचा फायदा अनेक खासगी रुग्णालयांनी घेतला. ठरावीक रक्कम जमा केल्यानंतर रुग्णांना प्रवेश दिला जात होता. असे प्रकार वाढल्याने अनेकांनी शासनाकडे तक्रारी केल्या. त्यानुसार राज्य शासनाने रुग्णांच्या नातेवाइकांकडून किती बिल घ्यावे, याचे दरपत्रक जाहीर केले होते. त्यानंतरही काही रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात बिलांची वसुली केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अशा बिलांचे ऑडिट करण्याचा निर्णय झाला.

त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ज्या रुग्णालयांनी जास्तीचे पैसे आकारले त्यांना रुग्णांच्या नातेवाइकांना पैसे परत करण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र या पत्राला देखील रुग्णालयांनी जुमानले नाही. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाईसाठी महापालिकेकडे यादी सादर करण्यात आली आहे. महापालिकेने संबंधित 12 रुग्णालयांना नोटीस दिल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

महाबळेश्वर गारठले : तापमानाचा पारा शून्यावर

महाबळेश्वर प्रतिनिधी | सादिक सय्यद

महाराष्ट्राच नंदनवन असलेल्या महाबळेश्वरला थंडीचा कडाका वाढलेला आहे. आज बुधवारी दि. 12 रोजी महाबळेश्वरचा पारा शुन्यावर गेल्याने वेण्णालेक व लिंगमळा येथे हिमकण पडायला सुरवात झाली आहे. महाबळेश्वरला वाढलेल्या थंडीमुळे कश्मिरच्या हिमकण दुलईचा अनुभव पर्यटक व नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/893682541326965

गतकाही दिवसापासून महाबळेश्वर शहर व परीसरात थंडीचा कडाका वाढला आहे. रात्री वेण्णालेक परीसरात पर्यावरणप्रेमीनी महाबळेश्वर शहराच्या थंडीच्या तापमान तपासले असता, महाबळेश्वरचा पारा शुन्यावर असल्याचे तापमान मापकाने दर्शवले. महाबळेश्वर शहराला विविध रुपे पाहयला मिळतात. समुद्र सपाटी पासुन 3 हजार फूट उंचावर असलेल्या शहरात कमालीची थंडीचा अनुभव सदैव पहायला मिळतो.

महाबळेश्वर शहरात पर्यटक शॅाल, स्वेटर, कानटोपी परीधान करुन शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये फेरफटका मारताना दिसत आहेत. वेण्णालेक व लिंगमळा परीसरात गारठा महाबळेश्वर शहरापेक्षा जास्त तीव्रतेने जाणवतो. हिमकण वेण्णालेकच्या परीसरात बोटीवर व झाडांच्या पानावर पाहयला मिळतात. पर्यटक व सर्वसामान्याना महाबळेश्वरमध्ये हिमकण पाहायला मिळणं निसर्गाचा आविष्कार मानला जातो. मंगळवारी महाबळेश्वर येथील तापमानाचा पारा 4 अंशावर होता तर आज शून्यावर गेला आहे.

शरद पवार पंतप्रधान कधी होतील हे राऊतांनी सांगावे; चंद्रकांतदादांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत माध्यमांना माहिती देत देत आहेत. यावेळी त्याच्याकडून निवडणुकीतील विजयाबाबत केल्या जात असलेल्या भविष्यवाणी वरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. “या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर राऊत यांनी शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि पवारांनी मुख्यमंत्री घराबाहेर कधी पडतील, याची भविष्यवाणी करावी, असे असे म्हंटले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खासदर संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे.

या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशाबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील याची भविष्यवाणी पवार साहेबांनी करावी,असे पाटील यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे.

खंडोबाची यात्रा रद्द : महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या “या” गावात संचारबंदीचे आदेश

Khandoba Pali

उंब्रज | महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबाची शनिवार दि. 15 जानेवारी रोजी होणारी यात्रा जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली. दरम्यान, खंडोबाचे सर्व धार्मिक विधी, रुढी, परंपरा या स्थानिक पातळीवर खंडोबाचे प्रमुख मानकरी, कारखान्याचे मानकरी अशा फक्त 50 जणांच्या उपस्थितीत होणार आहेत. याबाबत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी आदेश काढला आहे.

पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा 15 जानेवारी हा मुख्य दिवस आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा रद्दचा निर्णय बैठकीत जाहीर करण्यात आला. या बैठकीस खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड होते. सुरेश पाटील, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच सुनील काळभोर, मंडल अधिकारी युवराज काटे, धनवडे, यात्रा कमिटीचे चेअरमन प्रकाश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

संपुर्ण यात्रा कालावधीत सासन काठ्या, मानकरी, पालख्या, बैलगाड्या यांना मनाई करण्यात आली आहे. तसेच सर्व दुकाने, स्टाॅल, खेळणी यांनाही मनाई करण्यात आली आहे. सर्व भाविकांना दर्शनासाठी देवस्थान मार्फत ऑनलाईन सोय करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत पाल यात्रा अनुषंगाने पाल गावाकडे जाणाऱ्या रोडवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला असुन काशिळ-पाल- तारळे रोड, उंब्रज-वडगाव-पाल रोड, हरपळवाडी- पाल रोड, मरळी- पाल रोड वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे.

या बैठकीस देवस्थानचे संचालक संजय काळभोर, सर्जेराव खंडाईत, तंटामुक्तीचे संजय गोरे, मंगेश कुंभार, जगन्नाथ पालकर, उत्तम गोरे, सचिन लवंदे, महेश पाटील, संजय गोरे, दिनकरराव खंडाईत, हरीष पाटील आदी उपस्थित होते.

पाच किलोमीटर अंतर परिसरात संचारबंदी : अजय गोरड

दि. 14 ते 19 जानेवारी अखेर व 23 जानेवारी रोजी श्री खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दि. 14 जानेवारीपासून पाच किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घ्यावी तसेच यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.

औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान लाईन ब्लॉक, ‘ही’ रेल्वे धावणार उशिरा

railway

औरंगाबाद – औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान उड्डाण पुलाच्या बांधकामा करिता आजपासून 3 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा लाईन ब्लॉक चार दिवस असेल. यामुळे तपोवन एक्स्प्रेस चार दिवस 30 मिनिटे उशिरा धावणार आहे.

औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान किलो मीटर 110/5-6 वर असलेल्या रेल्वे उड्डाणपुला शेजारी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाचे बांधकाम करण्या करिता दिनांक 12 ते 15 जानेवारी, 2022 दरम्यान चार दिवस सकाळी 10.30 ते 13.30 दरम्यान तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे.

या लाईन ब्लॉकमुळे गाडी संख्या 17617 मुंबई सी.एस.टी. ते नांदेड तपोवन एक्स्प्रेस या चार दिवशी मनमाड ते दौलताबाद दरम्यान 30 मिनिटे उशिरा धावेल, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.

 भाजपचा ‘हा’ आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

BJP NCP Logo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्र भाजपला उतरती कळा लागल्याचे दिसते. कारण भाजपमधील अनेक मोठे नेते, मंत्री हे भाजपला सोडचिठ्ठी देत इतर पक्षात प्रवेश करू लागले आहेत. गोव्यात भाजपच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता परभणीतील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विजय गव्हाणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आणि त्यांच्याकडून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या इतर पक्षातील नेत्याचे इनकमिंग सुरु आहे. अशात भाजप नेते विजय गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून गव्हाणे यांनी भाजपच्या कार्यक्रम, बैठकांना गैरहजेरी लावली होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपला सोडल्यानंतर गव्हाणे यांनी भाजपमध्ये निष्ठवंतांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उद्या गुरुवारी प्रवेश करणार आहेत. त्याच्या प्रवेशाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, नवाब मलिकांसह जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.

कोरोनाचा उद्रेक : सातारा जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट 16.12 टक्के, नवे 735 बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 735 जण बाधित आढळले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित मंगळवारी आढळून आले. गेल्या आठ दिवसात कोरोना बाधिताचा आकडा वाढू लागला आहे. शंभरीच्या खाली असलेला बाधिताचा आकडा आता हजाराकडे निघाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झालेला पहायला मिळत आहे. त्यामध्ये वातावरण बदल यामुळे व्हायरलचे आजाराचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 559 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 735 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 16.12 टक्के आला आहे. कोरोना सोबत अोमिक्राॅन आणि व्हायरल आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवर ताण वाढताना दिसत आहे.

कोव्हीड -19 साठी 1077 हेल्पलाईनवर संपर्क साधा

कोविड-19 मुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्जदारास अर्ज करताना अडचणी येवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने अर्ज करण्याची नियमावली जाहीर केली आहे. अर्ज करण्यास काही अडचणी निर्माण झाल्यास 1077 हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

मनपा प्रशासकांसह 60 कर्मचाऱ्यांना ‘बुस्टर’ तर दिवसभरात 640 जणांनी घेतला डोस

vaccine

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधक लसचा प्रिकॉशन डोस काल सकाळी अस्तिक कुमार पांडेय यांच्यासह मनपाच्या 60 कर्मचाऱ्यांना देण्यात आला. आज ही विशेष बाब म्हणून मनपा मुख्यालयात डोस देण्यात येणार आहे. मनपातर्फे 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे. ज्यांचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले आहेत, अशाच लाभार्थींना हा डोस देण्यात येत आहे.

यावेळी प्रशासक पांडे म्हणाले की शहरात 90 टक्के लसीकरण झाले असून, दुसरा डोस 50 टक्क्यांवर नागरिकांनी घेतला आहे. लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी महापालिकेतर्फे वॉर्डवॉर्डात शिबिरे आयोजित केली असून, नागरिकांच्या देखील प्रतिसाद मिळत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन मनपा आरोग्य कर्मचारी डोस देत आहेत.

दिवसभरात 640 जणांनी घेतला बुस्टर डोस –
केंद्र शासनाच्या आदेशानुसार 10 जानेवारीपासून शहरात प्रिकॉशन डोसला सुरुवात करण्यात आली. काल दुसऱ्या दिवशी 640 नागरिकांनी हा डोस घेतला. यामध्ये फ्रन्टलाइन वर्कर, हेल्पलाइन वर्कर, साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नागरिक, विविध आजार असलेले नागरिक प्रिकॉशन डोस घेऊ शकतात. दुसरा डोस घेतल्यानंतर किमान नऊ महिने अंतर असणे आवश्यक आहे.

इयत्ता 10 वी मध्ये शिकणारी साक्षी मागच्या 20 दिवसांपासून गायब; काय आहे कारण?

सोलापूर : महाराष्ट्रामध्ये सध्या तरुण मुलींचं अचानक गायब होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीची साक्षी इंगोले ही मुलगी मागच्या 20 दिवसांपासून बेपत्ता आहे.

बार्शीतील सिल्व्हर ज्यूबली शाळेत साक्षी ही इयत्ता दहावीच शिक्षण घेत आहे. याबाबत गणेश भोकरे या इसमा विरोधात मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून बार्शी पोलीस पोलिसात आय पी सी कलम 154 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

संबंधित इसमाने फूस लावून आपल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय मुलीच्या आई – वडिलांनी व्यक्त केला आहे. सदरील घटनेला 20 दिवस ओलांडून गेले असले तरी मुलीचे आई – वडील अजून ही मुलीच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून हे प्रकरण प्रकाशात आणलं आहे. यामाध्यमातून चित्रा वाघ यांनी पोलीस प्रशासन आणि असंवेदनशील सरकारला धारेवर धरलं आहे.