Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2984

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ‘त्या’ पुलाची केली पाहणी

औरंगाबाद – जालना रोडवरील उड्डाणपूलांची दुरुस्तीसाठी कोणतीही यंत्रणा जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे गुरुवारी समोर आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी क्रांती चौक उड्डाण पुलावर पडलेल्या फटीची पाहणी करून वाहतुकीस पूल धोकादायक झाला आहे की नाही, याची खातरजमा करून घेतली.

पुलातील रबर सरकल्याने फट दिसत असल्याचे एनएचएआय, मनपा, एमएसआरडीसीच्या अभियंत्यांनी राज्यमंत्र्यांना सांगितले. परंतु, स्थापत्य तंत्रानुसार ती फट काही ठिकाणी जास्त, तर काही ठिकाणी कमी आहे. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे, हे आता स्ट्रक्चरल ऑडिटनंतरच समोर येणार आहे.

मनपा किंवा बांधकाम विभागाने जबाबदारी घ्यावी –
दरम्यान, पाहणीनंतर एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता पी. आर. सोनवणे, मनपाचे शहर अभियंता एस. डी. पानझडे, एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंखे, सुरेख अभंग, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उड्डाणपुलांची जबाबदारी मनपा किंवा बांधकाम विभागाने घेतली पाहिजे, असे राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले.

संतापजनक ! लहान मुलगा अंगावर थुंकल्याने त्याच्या आईला चौघांकडून मारहाण

मीरारोड : हॅलो महाराष्ट्र – मीरारोड या ठिकाणी एक संतापजनक प्रकार घडला आहे. यामध्ये लहान मुलगा अंगावर थुंकला म्हणून त्याच्या आईला चार महिलांनी मिळून बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला गुप्ता गल्लीत गुडीयादेवी सैनी ह्या पती मुकेश व दोन मुलांसह राहतात.

काय आहे नेमका प्रकार
घटनेच्या दिवशी सायंकाळी छाया गुप्ता हिचा नातू विवेक हा सैनी यांच्या घरी गेला. तुमचा मुलगा राज ह्याने आपल्या अंगावर थुंकल्याची तक्रार विवेक याने गुडियादेवी यांच्याकडे केली. त्यावर राज याला बोलावून पकडून मारते असे गुडियादेवी यांनी विवेकला सांगितले. यानंतर काही वेळाने छाया सह बन्ना, मीना व मोटीबाई ह्या चौघी जणी गुडियादेवीच्या घरा बाहेर आल्या आणि त्यांना शिव्या देऊन लागल्या. यानंतर शिवीगाळ का करता ? अशी विचारणा केली असता विवेकची आई बन्ना हिने, तुझा मुलगा राज हा माझ्या मुलाच्या अंगावर थुंकला असे म्हणत पुन्हा त्या चौघीनी शिवीगाळ करायला सुरवात केली.

यावेळी गुडियादेवी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता या चौघींनी गुडियादेवी यांना घराबाहेर खेचून ठोशाबुक्क्यांनी व लाथांनी मारहाण सुरु केली. बन्ना हिने गुडियादेवीचा कान धरून खेचला असता कानातील रिंग ओढली गेल्याने कानाची पाळी फाटून त्यातून रक्त आले. यानंतर गुडियादेवी या चौघींच्या ताब्यातून आपली सुटका करून भाईंदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी उपचारासाठी चिठ्ठी दिल्यावर त्या आधी भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात गेल्या. तेथून त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी छाया, बन्ना, मीना व मोटीबाई ह्या चौघींवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

पत्नी प्रियकरासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत असताना अचानक झाली पतीची एंट्री आणि मग….

relation

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमधील लखीसरायमध्ये अनैतिक संबंधांमधून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेचा पती कामानिमित्त महिनोनमहिने घराबाहेर राहायचा. यादरम्यान या महिलेचे गावातील एकाबरोबर सुत जुळले. यानंतर या दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. असेच एकदा या महिलेच्या नवऱ्याने तिला व तिच्या प्रियकराला संबंध प्रस्थापित करताना पाहिले. ही घटना लखीसराय जिल्ह्यातील मेदनीचौक ठाण्याच्या ऋषी पहाडपूर गावामध्ये घडली आहे.

काय आहे प्रकरण
या गावातून काही दिवसांपूर्वी एक तरुण बेपत्ता झाला होता. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी तो हरवल्याची पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. यादरम्यान पोलिसांना रोहितचा मृतदेह नदीत सापडला होता. यानंतर पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि घटनेचा तपास सुरू केला. या तपासादरम्यान रोहितचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. रोहित यादव याचे गावातील आरोपी पुरन पासवान याच्या बायकोसोबत अनैतिक संबंध होते. पुरन पासवान हा पाटणामध्ये गवंडीकाम करतो. तसेच तो कामानिमित्त बराचकाळ घराबाहेर राहत असे.

31 डिसेंबर रोजी पूरन पासवान रात्री पाटणा येथून अचानक घरी आला. तेव्हा त्याला आपली पत्नी व रोहित यादव आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले. तेव्हा त्याने पत्नीला काही न करता रोहित यादव याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याला ठार मारले, तसेच त्याचा मृतदेह नदीत फेकला. या कामामध्ये आरोपी पुरनच्या पत्नीने त्याला साथ दिली. रोहित बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. तेव्हा त्याचे शेवटचे बोलणे हे पिंकी देवी हिच्याशी झाले होते. यानंतर पोलिसांनी तिला चौकशीसाठा बोलावले. यावेळी तिने आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पुरन पासवान यालाही अटक केले. या दोघांनी मिळून रोहित यादव याची हत्या केली. तसेच मृतदेह हा नदीमध्ये फेकून दिल्याचे पोलीस चौकशीत कबुल केले.

पिकअप गाडीचा अपघात ! दोन चिमुरड्यांसह एका महिलेचा मृत्यू

nandurbar

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे पिक अप गाडी तीव्र उतारावरुन मागे दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांसह एका महिलेचा मृत्यू आहे.

नेमके काय घडले ?
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मोदलगाव या ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. यावेळी एक पिकअप गाडी मजुरांना घेऊन जात होती. यावेळी अचानक चालकाचे पिकअप गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. हि गाडी उतारावरून घसरल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत.

मृतांमध्ये दोन चिमुरड्यांसह एका महिलेचा समावेश आहे. या अपघातानंतर जखमींना तातडीने धडगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे सर्व मजूर गोरांबा या गावचे रहिवाशी आहेत. हे सर्व मजूर नंदुरबार या ठिकाणी जात असताना हा अपघात घडला.

जेवण न बनवल्याने भडकलेल्या प्रियकराने गर्लफ्रेंडसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील मंदसौर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका प्रियकराने आपल्या 65 वर्षीची प्रेयसीची एका क्षुल्लक कारणावरून हत्या केली आहे. प्रेयसीने जेवण बनवण्यास नकार दिल्याने या आरोपी प्रियकराने तिची हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी प्रियकराला अटक केली आहे. संबंधित दोघांच्याही पती आणि पत्नीचा आधीच मृत्यू झालेला होता. यामुळे एकटेपणा दूर करण्यासाठी दोघंही एकमेकांच्या जवळ आले आणि शेतातच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

बुधवारी पोलिसांना बनी गावातील बसंतीलाल मोगीया याने आपल्या सोबत राहणाऱ्या कमलाबाईची हत्या केली असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. आरोपी बसंतीलालचे वय 45 वर्ष तर त्याची मृत प्रेयसी कमलाबाईचे वय 65 वर्ष होते. हे दोघेही मागच्या 15 वर्षांपासून शेतातील घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वाद होत होते. या दोघांच्या घरी मागच्या दोन दिवसांपासून जेवण बनलेलं नव्हतं. याच कारणामुळे मंगळवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

घटनेच्या दिवशी आरोपीने कमलाबाईला जेवण बनवण्यास सांगितले तेव्हा तिने जेवण बनवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने बसंतीलालने तिला काठीने मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीदरम्यान कमलाबाई बेशुद्ध झाली असता आरोपीने तिला त्याच अवस्थेत सोडून घटनस्थळावरून पळ काढला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी हे दोघे बाहेर न आल्याने शेजारच्या लोकांनी घरात पहिले असता त्यांना कमला मृतावस्थेत आढळून आली. यानंतर शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी काही वेळातच आरोपी बसंतीलाल याला अटक केली.

रिलायन्सकडून Dunzo मध्ये 200 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक

नवी दिल्ली । रिलायन्स रिटेलने क्विक कॉमर्स फर्म Dunzo मध्ये 200 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीसह, रिलायन्सची बेंगळुरूस्थित स्टार्टअपमध्ये 25.8 टक्के भागीदारी असेल. Dunzo ने या राउंडमध्ये एकूण 240 मिलियन डॉलर्सची फंडिंग उभी केली आहे. रिलायन्स रिटेलसह सध्याचे गुंतवणूकदार Lightbox, Lightrock, 3S Capital आणि Alteria Capital यांनीही या फंडिंग राउंडमध्ये भाग घेतला.

रिलायन्स रिटेलने एका निवेदनात म्हटले आहे की,”या भांडवलाचा उपयोग Dunzo चा देशातील सर्वात क्विक कॉमर्स बिझनेस बनण्याच्या दृष्टीकोनाला पुढे नेण्यासाठी केला जाईल. यामध्ये मायक्रो-वेअरहाउसेसच्या नेटवर्कद्वारे जीवनावश्यक वस्तूंची तत्काळ डिलिव्हरी करता येईल. भारतातील विविध शहरांमधील स्थानिक व्यापार्‍यांसाठी लॉजिस्टिक सक्षम करण्यासाठी Dunzo आपल्या B2B बिझनेसचा विस्तार करेल.

रिटेल ग्राहकांना मिळेल नवीन अनुभव
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या, “आम्ही ऑनलाइन वापराच्या पद्धतीत बदल पाहत आहोत आणि Dunzo ने या क्षेत्रात केलेल्या कामामुळे आम्ही खूप प्रभावित झालो आहोत. Dunzo हे भारतातील क्विक कॉमर्सचे पायोनिअर आहेत आणि देशातील अग्रगण्य स्थानिक कॉमर्स बनण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहोत.” त्या पुढे म्हणाल्या की,”Dunzo सोबतच्या भागीदारीमुळे रिलायन्स आपल्या रिटेल ग्राहकांना आणखी सुविधा देऊ शकेल आणि रिलायन्स रिटेल स्टोअर्समधून उत्पादनांच्या जलद डिलिव्हरीचा अनुभव देऊ शकेल. आमच्याशी संबंधित व्यापारी त्यांच्या व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टीकोनातून Dunzo च्या हायपरलोकल डिलिव्हरी नेटवर्कमध्ये एंट्री करू शकतील कारण ते JioMart द्वारे त्यांचा व्यवसाय ऑनलाइन आणत आहेत.

Dunzo चे सीईओ कबीर बिस्वास यांनी दिली ‘ही’ माहिती
Dunzo चे सह-संस्थापक आणि सीईओ असलेले कबीर बिस्वास म्हणाले, “रिलायन्स रिटेलच्या या गुंतवणुकीमुळे, आता आमच्याकडे लॉन्ग टाईम भागीदार असेल ज्यांच्यासोबत आम्ही विकासाला गती देऊ आणि कि भारतीय त्यांच्या दैनंदिन आणि साप्ताहिक आधारावर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी काय करतात हे परिभाषित करू शकू. Dunzo Daily ने आतापर्यंत मिळवलेल्या प्रसिद्धीमुळे आम्ही उत्साहित आहोत आणि पुढील 3 वर्षांत देशातील सर्वात विश्वासार्ह द्रुत वाणिज्य पुरवठादार होण्याचे आमचे ध्येय आहे.”

दररोज फक्त 200 रुपयांची बचत करून जमा करा 28 लाख रुपये

LIC

नवी दिल्ली । जर तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर चांगला रिटर्न तर मिळतोच पण जोखीमही कमी असते. LIC ने अशीच एक विशेष योजना सादर केली आहे, ज्याचे नाव आहे LIC जीवन प्रगती योजना. ही योजना अशा लोकांसाठी आहे जे जोखमीमुळे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सी इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरतात.

LIC च्या या प्लॅनमध्ये पैसे गुंतवून तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी चांगला रिटर्न मिळवू शकता. विशेष म्हणजे ते खरेदी केल्यावर बचत आणि सुरक्षितता दोन्हीची गॅरेंटी दिली जाते. या दृष्टीने देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीची ही योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकते.

20 वर्षांसाठी करावी लागेल गुंतवणूक
LIC च्या या प्लॅनमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. यामध्ये दररोज 200 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही सलग 20 वर्षे पैसे गुंतवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 28 लाख रुपयांचा एकरकमी फंड मिळेल. ही रक्कम भविष्यातील मोठ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

जीवन विम्यासह डेथ बेनिफिट सुविधा
LIC च्या जीवन प्रगती योजनेत तुम्हाला जीवन विम्यासोबत जोखमीचाही लाभ मिळेल. याशिवाय तुम्ही तुमचा प्रीमियम नियमितपणे भरत असाल तर या प्लॅनमध्ये डेथ बेनिफिटची सुविधाही उपलब्ध आहे. दर पाच वर्षांनी त्यात वाढ होत राहते. म्हणजे पाच वर्षांनंतर जेवढी रक्कम आधी मिळणार होती, त्यापेक्षा जास्त असेल.

विमाधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी व्यक्तीला मिळेल 100% रक्कम
पॉलिसी खरेदी केल्यानंतर पाच वर्षानंतर, विमाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, नॉमिनी व्यक्तीला या योजनेअंतर्गत मूळ विम्याच्या रकमेच्या 100% मिळतील. 6-10 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास, नॉमिनी व्यक्तीला विमा रकमेच्या 125 टक्के रक्कम मिळेल. 11-15 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास विमा रकमेच्या 150 टक्के आणि 16-20 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास, विमा रकमेच्या 200% मिळतील.

सावकारी जाचाला कंटाळून तरुणाने उचललं ‘हे’ टोकाचे पाऊल

sucide

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सावकरी जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. व्याजाच्या पैशात लिहून दिलेले घर सावकाराने परस्पर विकल्याने या तरुणाला मानसिक धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने या तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. संतोष प्रकाश साळुंखे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
संतोष साळुंखे याने पंढरपुरातील खासगी सावकार शेखर कुंदरकर, सुवर्णा अंकुश बिडकर आणि अंकुश रामा बिडकर यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यांचे पैसे व्याजासह संतोष यांनी परत केले होते. मात्र पैसे परत केलेले असतानासुद्धा या तिघांनी संतोषला व्याजाची जादा रक्कम दे म्हणून मारहाण केली. तसेच या सावकारांनी व्याजाच्या पैशात लिहून‌ घेतलेल्या घराची परस्पर विक्री केली. याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने संतोष याने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी संशयित आरोपी शेखर दत्तात्रय कुंदरकर याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ऑगस्ट 2021 मध्येदेखील सावकारी जाचाला कंटाळून एका एका मॉड्युलर फर्निचर व्यावसायिकाने आत्महत्या केली होती. तुषार माणिकराव साठवणे असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव होते. या व्यावसायिकाने यवतमाळमधील वडगाव परिसरात मॉड्युलर फर्निचरचा व्यवसाय सुरु केला होता. लॉकडाऊनच्या काळात त्याचे दुकान पुर्णतः बंद होते. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत दुकान उघडण्यासाठी तुषार यांनी खाजगी सावकार ताटी पलूमवार यांच्याकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यावेळी तुषार यांनी व्यवसाय पूर्ववत सुरू झाला की कर्जाची परत फेड करू असे सांगितले होते. परंतु कर्जाच्या व्याजासाठी सावकाराकडून तगादा लावण्यात तसेच अपमानस्पद वागणूक देण्यात आली होती. यानंतर या सगळ्या जाचाला कंटाळून तुषार यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्र्यांचा तर हात नाही ना?; पटोलेंचा थेट गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलनकर्त्यामुळे १५- २० मिनिटे एका जागी अडकून राहावे लागले. यावरून देशातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून राजकिय पक्ष एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा या घटनेमागे हात असल्याचा आरोप करीत शंका व्यक्त केली आहे. पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना?, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वीपासून सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचे कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शहांचा हात तर नाही ना हा प्रश्न आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनीच त्याचे उत्तर दिले पाहिजे. असे करून काही डाव तर साधायचा नव्हता ना हेही सांगितले पाहिजे.

पाच राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी नौटंकी सुरू आहे. भाजप जनतेचे प्रश्न, महागाई बेरोजगारी जनतेचे प्रश्न यावरील विषय डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीने काम करत असते. पंतप्रधान रोज अनेक रुप बदलत असतात. त्या पद्धतीने आजही त्यांनी तेच केले. पंजाबमध्ये रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून नौटंकी सुरू असेल. या प्रकरणी पंजाब सरकारने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू केली आहे. त्यातून दूध का दूध पानी का पानी व्हावे, असेही यावेळी पटोले यांनी सांगितले.

कॉमन केवायसी म्हणजे काय, सरकारच्या दृष्टीने ते कसे फायदेशीर ठरेल जाणून घ्या

नवी दिल्ली । स्टॉक ब्रोकर, म्युच्युअल फंड आणि बँका यांसारख्या फायनान्शिअल संस्थांसाठी अनेक लोकं कॉमन केवायसीची मागणी बऱ्याच काळापासून करत आहेत. आता सरकारही या दिशेने गंभीर झाले आहे. सरकारचा असा विश्वास आहे की, कॉमन केवायसी (नो युवर कस्टमर) केल्याने फायनान्शिअल संस्था आणि सर्वसामान्य जनतेला फायदा होईल.

वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या एका कार्यक्रमात स्टॉक ब्रोकर, म्युच्युअल फंड आणि डिपॉझिटरीज इत्यादींसाठी एक मजबूत कॉमन केवायसी सिस्टीम स्थापन करण्यासाठी सिंगल विंडो पोर्टल तयार करण्यावर भर दिला. चला तर मग या कॉमन केवायसीचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.

दोन्ही कंपन्या आणि ग्राहकांना फायदा
कॉमन केवायसीचा फायदा इक्विटी ट्रेडिंग आणि बँकिंगशी संबंधित सर्व फायनान्शिअल संस्थांना तसेच त्यांच्यात सामील होणाऱ्या ग्राहकांना होईल. कॉमन केवायसीसाठी एक समान पोर्टल असल्याने, या पोर्टलवर केवायसीची नोंदणी केल्यानंतर ग्राहकाला वेगवेगळ्या संस्थांकडे वारंवार कागदपत्रे जमा करावी लागणार नाहीत. त्यामुळे त्यांचा वेळ वाचेल.

दुसरीकडे, फायनान्शिअल संस्थांनाही फायदा होईल. कॉमन केवायसी पोर्टलवरून ते त्यांच्यासोबत सामील होणार्‍या ग्राहकांची सर्व माहिती ताबडतोब घेतील. यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतील तसेच सेवांच्या वितरणास गती मिळेल.

ग्राहक लवकरच सहभागी होऊ शकतील
कॉमन केवायसीमुळे सामान्य लोकांना असा फायदा होईल की ते इक्विटी ट्रेडिंग आणि बँकिंग संस्थांशी त्वरीत कनेक्ट होऊ शकतील. आता वेगवेगळ्या संस्थांमध्ये सामील होण्यासाठी प्रत्येक वेळी केवायसी करावे लागेल. काही संस्था यामध्ये बराच वेळ घालवतात. त्यामुळे नवीन ग्राहकांना वाट पहावी लागते. उशीर झाल्यामुळे, अनेक वेळा अनेक लोकं संस्थेत प्रवेश घेण्याचा निर्णय बदलतात.

जास्त लोकं इक्विटी ट्रेडिंग आणि बँकिंगमध्ये सामील होतील
कॉमन केवायसी असल्‍याने इक्विटी, ट्रेडिंग आणि बँकिंगशी संबंधित सर्व फायनान्शिअल संस्थांना जास्तीतजास्त नवीन लोकांना जोडण्‍याची सोय होईल. सिंगल विंडो केवायसी सिस्टीममुळे फायनान्शिअल संस्थांना जास्त ग्राहक मिळतील, असा विश्वास वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीही व्यक्त केला. यामुळे बँक खाते उघडणे, शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू करणे आणि क्रेडिट कार्ड मिळवणे सोपे होईल. जास्त गुंतवणूकदार आणि सामान्य लोकं स्टॉक एक्सचेंज आणि बँकिंग क्षेत्रात सामील होतील.