Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2987

रेशनच्या यादीतून तुमचं नाव वगळले आहे?? ‘अशा’ प्रकारे घरबसल्या करा चेक

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेशनकार्ड म्हणजे देशातील गरीब लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. नागरिकत्वचा दाखला म्हणूनही रेशनकार्ड चा वापर केला जातो. शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्ही रेशन कार्डमध्ये दिलेल्या माहितीचा वापर करू शकता.

जर कोणाकडे आधारकार्ड नसेल तर ती व्यक्ती त्याठिकाणी रेशनकार्ड वापरू शकते. पण काही वेळा काही त्रुटींमुळे रेशनकार्डच्या यादीतून आपलं नाव वगळले जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे जर आपलं नाव रेशन कार्ड च्या यादीतून वगळले आहे की नाही ते कसं तपासाय हे आज आम्ही सांगणार आहोत.

अशा प्रकारे करा चेक-

रेशनकार्ड यादीत तुमचे नाव वगळले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://nfsa.gov.in/Default.aspx ला भेट द्या.

• यानंतर रेशन कार्डचा पर्याय निवडा.

• आता Ration Card Details On State Portals या पर्यायावर क्लिक करा.

• यानंतर राज्य आणि जिल्हा निवडा.

• जिल्ह्यानंतर ब्लॉकचे नाव टाका, त्यानंतर पंचायतीचे नाव निवडा.

• आता रेशन दुकानाच्या दुकानदाराचे नाव आणि रेशनकार्डचा प्रकार निवडा.

• यानंतर तुमच्या समोर नावांची यादी येईल, जी शिधापत्रिकाधारकांची आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे नाव या यादीत पाहू शकता.

• जर तुमचे नाव या यादीत असेल तर तुमचे नाव कापले गेलेले नाही. तुम्ही ही यादी डाऊनलोड देखील करू शकता.

आता पोस्ट ऑफिस मधून बुक करू शकता रेल्वेचे तिकीट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि तेवढीच आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस (Post office) मध्ये सुद्धा ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. यामुळे रेल्वे स्टेशनच्या काऊंटर वर प्रवाशांची गर्दी होणार नाही.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसी (IRCTC) ही योजना सुरु करत आहे. रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) 6 जानेवारीला उत्तर प्रदेशच्या 9147 पोस्ट ऑफिसमधून रेल्वे रिझर्वेशन तिकीट जारी करण्याची योजना सुरु करतील.

6 जानेवारीपासूनच सर्व राज्यांच्या सर्व बँच पोस्ट ऑफिसपर्यंत ग्रामीण पोस्ट सेवक म्हणजे जीडीएस (Gramin Dak Sevaks) प्रवाशांसाठी ट्रेन रिझर्वेशन तिकीट बनवू शकतील. दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 75 वंदे मातरम ट्रेन चालवण्यात येतील. त्यासाठी टेंडर प्रक्रिया देखील सुरू झाली असून आत्तापर्यंत 9 कंपन्यानी याबाबत आपली इच्छा व्यक्त केली आहे

55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वळसे पाटलांनी केली ‘हि’ मोठी घोषणा; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मुंबईसह राज्यातीळ इतर शहरात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. अशात लोकांना मास्क लावण्याबाबत सांगत त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसशी फ्रण्ट लाईनवर लढणाऱ्या पोलीस दलातील वय झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. पोलीस दलात 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिली.

मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील वाढत असलेल्या कोरोना स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील पोलिसांच्या कोरोनातील सुरक्षेबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 55 वर्षांहून अधिक वयाच्या पोलिसांना घरुन काम करण्याचे आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या विळख्यात सर्वच स्थरातील लोक अडकत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या 230 डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सच वेगाने बाधित होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अशात पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याने राज्य सरकारच्यावतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. जामीन करून देखील वेळोवेळी बजावलेल्या तारखांना राज ठाकरे हे सतत गैरहजर राहिले आहेत. हे कारण सांगत परळी कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेस वर दगडफेक केली होती. या दगडफेकीच्या घटने प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. छठपूजेबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या रांची दिवाणी न्यायालयाने वॉरंट जारी केले होते.

काय आहे प्रकरण?

आज परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट जारी जारी केले आहे. हे प्रकरण म्हणजे रेल्वेत परप्रांतीयांचीच भरती केली जात असल्याबद्दल वक्तव्य केल्या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 मध्ये अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले होते. अंबाजोगाईत मनसैनिकांनी एसटी बसेसवर दगडफेक करून महामंडळाचे नुकसान केले होते.

या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर अंबाजाेगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरेंना जामीन मिळाल्यांनतर ते अंबाजोगाई न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे अंबाजोगाई न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. राज ठाकरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. माने यांच्या न्यायालयासमोर हजर झाले असता तीनशे रुपये दंड घेऊन त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले होते.

वनविभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी शिवसेनेचे गांधीगिरी पध्दतीने आंदोलन

सातारा | ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात 22/07/2021 रोजी पुराव्यासहित कागदपत्रे देण्यात आलेली आहेत. तरीही आज 2022 उजाडले तरी त्या कागदपत्रांवर कोणताही कारवाई होत नाही. संबधित अधिकाऱ्याला पाठिशी घातले जात आहे. तेव्हा या दोन्ही अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी, म्हणून शिवसेनेने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली.

सातारा वनविभाग कार्यालयात आज शिवसेनेच्या वतीने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तालुका प्रमुख अनिल गुजर, अतीस ननावरे, मोहन इंगळे, रमेश सावंत, उप तालुकाप्रमुख प्रशांत शेळके, विभाग प्रमुख हरिभाऊ पवार, सुनील साळुंखे, संजय इंगवले, सागर धोत्रे, शिवराम मोरे, रामदास कदम, अजय सावंत, अक्षय जमदाडे, सागर रायते, निखिल पिंपळे, राहुल जाधव, महेश शेडगे आदी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गुलाबाचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.  सचिन मोहिते म्हणाले, 2017 पासून 2021 पर्यंत या विभागात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. माैजे कोतवडे येथे रस्ते व ब्रीज बेकायदेशीपणे उभारण्यात आले आहेत. या कामातील वनविभागाचे गाैणखनिज गायब झाले आहे.

पुढे श्री. मोहिते म्हणाले, सर्व पुरव्या सहित सातारा वनविभागचे डी. सी. एफ. याना निवेदन दिले होते. तसेच या भ्रष्टाचार संदर्भात आवश्यक असणारी माहिती, माहिती अधिकार 2005 अंतर्गत सातारा तालुका आरएफओ याना मागितली होती. परंतु संबधित अधिकारी यामध्ये सहभागी असल्यामुळे सुरवातीला उडवा उडवाची उत्तरे देण्यात आली. परतू त्या संबधित अधिकारी यांची बदली झाल्यावर नवीन अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माहिती अधिकार अंतर्गत माहिती देण्यास सुरूवात केली. परंतु ती देखील अपूर्ण स्वरूपात मिळाली. यामुळे संपूर्ण प्रकरण सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले वरीष्ठ अधिकारी त्या संबधित भ्रष्ट अधिकारी याना वाचवण्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मागील 5 महिन्यात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळेच शिवसेना सातारा विधानसभा यांच्यावतीने आज वन भवन येथे गांधीगिरी पद्धतीने अधिकारी याना गुलाब पुष्प देऊन आंदोलन करण्यात आले. येत्या पंधरा दिवसात जर संबधित अधिकारी यांची चौकशी होऊन कार्यवाही झाली नाही. तर भगतसिंह विचारांच्या पद्धतीने तीव्र आंदोलन करून सातारा तालुका वनविभागाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

 

रायगडावरील ‘त्या’ प्रकारावरून संभाजीराजे आक्रमक; पुरातत्व विभागास पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेणारे खासदार छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक झाले आहे. दुर्गराज रायगडावरील ‘मदार मोर्चा’ येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी आज नवी दिल्लीमधील भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचलाकांना पत्र लिहिले आहे. रायगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भात लक्ष घाऊन या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी पत्रामधून त्यांनी केली आहे.

https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/photos/a.140401679451393/2054879214670287/

पुरातत्व विभागास लिहलेल्या पत्रात संभाजीराजे यांनी म्हंटले आहे की, “किल्ले रायगड येथील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी केली. तसेच त्यावर चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शिवभक्तांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधून यासंदर्भात निदर्शनास आणून दिले.

वास्तविक पाहता ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगड सारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे. किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा,” अशी मागणी या पत्रामधून संभाजीराजे यांनी केली आहे.

 

Cryptocurrency Price: क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये जोरदार घसरण

नवी दिल्ली । गुरुवारी, 6 जानेवारी 2022 रोजी, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये तीव्र घसरण झाली. गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टो बाजार 8.70 टक्क्यांनी घसरला. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:20 वाजता, जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप $2.04 ट्रिलियन होते, जे काल त्याच वेळी $223 ट्रिलियन होते. सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्ये लक्षणीय घट झाली. सर्वात मोठी घसरण सोलानामध्ये दिसून आली आणि त्यानंतर टॉप लुझर ठरलेल्या कॉईन्समध्ये इथेरियम आणि बिटकॉइनचा समावेश आहे.

बातमी लिहिण्याच्या वेळी, बिटकॉइन 7.65% ने घसरली होती, तर इथेरियम 9.63% ने घसरली होती. मात्र, टिथरमध्ये कोणतीही हालचाल झाली नाही. सोलानामध्ये 11.79% ची घसरण दिसली, तर Binance Coin 9.38% ने घसरला.

कोणत्या करन्सीमध्ये किती घसरण झाली ?
बिटकॉइन 7 टक्क्यांहून अधिकने खाली येऊन $43,051.43 वर ट्रेड करत होता. कालच्या $879 अब्जच्या तुलनेत त्याची मार्केटकॅप $811 अब्ज पर्यंत घसरली. Bitcoin ने गेल्या 24 तासांत $42,761.46 चा नीचांक आणि $46,929.05 चा उच्चांक केला आहे. Ethereum $3,458.27 वर ट्रेड करताना दिसला, 9 टक्क्यांहून अधिकने खाली आला. Ethereum ने गेल्या 24 तासांत $3,432.90 चा नीचांक आणि $3,842.06 चा उच्चांक केला आहे. त्याची मार्केट कॅप 24 तासांपूर्वी $448 अब्ज होती जी आता $410 बिलियनवर आली आहे.

Binance Coin देखील 8 टक्क्यांनी घसरून $466.79 वर ट्रेड करत आहे. सर्वात मोठी घसरण सोलानामध्ये दिसून आली आणि ती 11 टक्क्यांहून अधिकने घसरली आणि $149.39 वर आली, तर त्याची किंमत 24 तासांपूर्वी $168.71 होती.

आजची टॉप गेनर क्रिप्टोकरन्सी
जर आपण गेल्या 24 तासांत सर्वात वेगाने वाढणाऱ्या करन्सी/टोकन्सबद्दल बोललो, तर LUNI मध्ये 943.96% ची जबरदस्त वाढ झाली आहे. MoonRock (ROCK) ही दुसरी सर्वोच्च उडी घेणारी करन्सी आहे. यामध्ये 379.34 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. यानंतर, Brainiac Farm (BRAINS) मध्ये 343.47% ची वाढ नोंदवली गेली आहे.

अण्णाभाऊ साठेंचं मोदी सरकारला वावडे? केंद्राच्या प्रबोधनकारांच्या यादीतून नाव वगळल्याने संतापाची लाट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच नाव केंद्र शासनाच्या प्रबोधनकारांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. याच्या निषेधार्त वाटेगाव येथे आज एक दिवस गाव बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. गाव बंद आवाहना मध्ये ग्रामस्थ सहभागी होऊन गावातील व्यवहार बंद ठेऊन यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील वाटेगाव हे अण्णाभाऊ साठेंच जन्म गाव आहे. आपल्या शाहिरीतून अण्णाभाऊनी अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसे उभी केली. आणि ग्रामीण पददलित माणसाच्या जीवनाचे चित्रण आपल्या साहित्यातून समाजासमोर उभे केले. ४५ कादंबर्‍या, १५० कथा, तीन नाटके, ११ लोकनाट्ये, ७ चित्रपटकथा आणि असंख्य लावणी पोवाडे असे अण्णाभाऊ साठे यांच साहित्य प्रसिध्द झाले.

`फकिरा` या कादंबरीच्या १६ आवृत्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली. जगातील आणि भारतातील २७ भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचे भाषांतर झाले. अश्या थोर लोकशाहिर आणि साहित्यकाच नाव केंद्र शासनाच्या प्रबोधनकारांच्या यादीतून वगळण्यात आल्याने सर्वच थरातून निषेध नोंदविला जात आहे. याच निषेधार्त आज वाटेगाव येथे दिवसभर गाव बंद ठेऊन ग्रामस्थांनी निषेध नोंदवला.

राज्यातील ‘हे’ शासकीय रूग्णालय कोविड रूग्णालयात रूपांतर होणार; ओमियोक्रॉनचा धोका वाढला..

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरज शासकीय रूग्णालय हे 17 तारखेपासून नॉनकोविड हॉस्पिटल बंद करून कोविडमध्ये रूपांतर होणार आहे. ओमियोक्रॉनचा फैलाव झपाट्याने होत असून त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर व वैदयकीय अधिक्षक डॉ.रूपेश शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

अधिष्ठाता डॉ.सुधीर ननंदकर पुढे म्हणाले, आता मिरज शासकीय रूग्णालयात जे नॉनकोविड रूग्ण आहेत त्यांना डिसचार्ज करण्यात येणार आहे. शासकीय रूग्णालयात आता 38 टन ऑक्सिजनची क्षमता निर्माण झाली आहे. रूग्णालयात 135 व्हेंटीलेटर सज्ज आहेत. कोणत्याही परिस्थितीवर रूग्णालय प्रशासन सज्ज आहे.

नागरीकांनी ओमिक्रॉनला घाबरून जावू नका. ओमिक्रॉनचा प्रसार झपाट्याने होते परंतु त्याच्यावर मात करायची असेल तर मास्क, सुरक्षित अंतर या गोष्टी पाळाव्याच लागतील. तसेच गर्दी करू नये. जेवढी गर्दी कमी असेल तितका धोका कमी असणार आहे. लसीकरणामुळे नागरीकांची सुरक्षितता वाढली आहे. लसीकरणावरही भर देणे जरूरीचे आहे.

अधिष्ठाता डॉ.नणंदकर म्हणाले, मिरज शासकीय रूग्णालय गेल्या 20 महिन्यापासून कोविड रूग्णालयात रूपांतर झाले होते. कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्याने परत नॉनकोविड रूग्णालयात रूपांतर केले होते. आता नवीन ओमियोक्रॉनमुळे आतापासून तयारी म्हणून 17 तारखेपासून कोविड रूग्णालय सुरू होत आहे.

तत्पुर्वी 10 तारखेपासून ओपीडी,आयपीडी, सर्जरी बंद होणार आहे. एर्मजन्सी मेडीसीन सुरू असणार त्यामध्ये सर्पदंश, हृदय विकार, विषबाधा अशा पध्दतीचेे तात्काळ मेडीसन विभाग सुरू राहणार आहे.

रूग्णांवर उपचार व तपासणी झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सांगली शासकीय नॉनकोविड रूग्णालयात पाठविण्यात येणार आहे. नागरीकांनी घाबरून न जाता कोविडचे नियम पाळणे जरूरीचे आहे. तसेच लसीकरण हे महत्वाचे असल्याचे त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

ओमायक्रॉनचे रूग्ण सापडल्याची अधिकार्‍यांनेच पसरवली अफवा; अंंस का केलं विचारलं तेव्हा म्हणाले..

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |

खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनीच मंगळवारी विट्यात ओमायक्रॉनचे रूग्ण सापडल्याची अफवा प्रसिध्दि माध्यमांमार्फत पसरवल्याने खानापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी मंगळवारी विट्यात कोरोनाचे रुग्ण सापडले असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली. याबाबत काही पत्रकारांनी त्यांना हे रुग्ण कोणत्या व्हेरिएंटचे असल्याचे विचारले असता त्यांनी थेट ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले असल्याची माहिती दिली.

यानंतर अनेक लोकांसह पत्रकारांचे फोन डॉ. अनिल लोखंडे यांना गेले. त्यानंतर मात्र या महाशयांनी यु टर्न घेत लोकांना सतर्क होण्यासाठी खोटी प्रसिद्धी होवू दे असे जाहिररित्या सांगितले. डॉ. अनिल लोखंडेच्या या प्रकारानंतर विट्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ माजली असून अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

पत्रकारांनाच ओमायक्रॉनबाबत खोटी माहिती देवून लोकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम केले आहे. तरी या अधिकार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.