Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2988

सावकाराने लिहून घेतलेले घर परस्पर विकले; मानसिक धक्का सहन न झाल्याने तरुणाने थेट..

सोलापूर : व्याजाच्या पैशात लिहून दिलेले घर सावकाराने परस्पर विक्री केल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने पंढरपुरातील एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतोष प्रकाश साळुंखे असं आत्महत्या केलेल्या या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील खासगी सावकार शेखर कुंदरकर, सुवर्णा अंकुश बिडकर व अंकुश रामा बिडकर (सर्व रा. अनिलनगर पंढरपूर ) यांच्याकडून संतोष साळुंखे यांनी व्याजाने पैसे घेतले होते. त्यांचे पैसे व्याजासह परत केले होते. तरीही वरील तिघांनी संतोषला व्याजाची जादा रक्कम दे म्हणून मारहाण केली. शिवाय व्याजाच्या पैशात लिहून‌ घेतलेल्या घराची परस्पर विक्री केली. याच मानसिक धक्क्यातून संतोष याने टोकाचे पाऊल उचलले.

याप्रकरणी संशयित आरोपी शेखर दत्तात्रय कुंदरकर याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेने पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. खाजगी सावकारांना कायद्याचा धाक राहिला नाही काय असा सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.

हे पण वाचा –

एक दोनदा नाहीतर 16 वेळा चावला ! कुत्र्याचा चिमुरडीवर जीवघेणा हल्ला

3 शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू; मृतात दोन सख्खा बहिणी, पाणी पिण्यासाठी गेल्या अन्..

मिनी लॉकडाऊनबाबत टास्क फोर्सने घेतला ‘हा’ निर्णय; व्यापारी, नोकरदारांसाठी महत्वाची बातमी

आधी विवाहित प्रेयसीला पळवले, नंतर मुलीचे अपहरण केले आणि मग….

हसत्या- खेळत्या लेकराचा अज्ञात व्यक्तीकडून निर्घृणपणे खून, बीडमधील घटना

Gold Price : सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदिही झाली स्वस्त; आजचे ताजे दर तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. कारण सोन्याचा भाव पुन्हा एकदा 48 हजारांवर आला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. MCX वर, फेब्रुवारीमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.51 टक्क्यांनी घसरला, तर चांदीच्या किंमती 1.42 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

ऑगस्ट 2020 मध्ये, MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज, MCX वर सोने फेब्रुवारी फ्युचर्स 47,775 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8,425 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

आज सोन्या-चांदीची किंमत काय आहे जाणून घ्या
फेब्रुवारीमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.51 टक्क्यांनी घसरून 47,775 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीही खूप स्वस्त झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 1.42 टक्क्यांनी घसरून 61,356 रुपयांवर आला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,110 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,620 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,070 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,070 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,070 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,070 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,070 रुपये
पुणे – 46,110 रुपये
नागपूर – 47,070 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -49,070 रुपये
पुणे – 48,620 रुपये
नागपूर – 49,070 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4612.00 Rs 4612.00 0 %
8 GRAM Rs 36896 Rs 36896 0 %
10 GRAM Rs 46120 Rs 46120 0 %
100 GRAM Rs 461200 Rs 461200 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4863.00 Rs 4863.00 0 %
8 GRAM Rs 38904 Rs 38904 0 %
10 GRAM Rs 48630 Rs 48630 0 %
100 GRAM Rs 486300 Rs 486300 0 %

PM Kisan चे पैसे अजूनही मिळाले नसतील तर ते कधी मिळतील जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत, सरकारने 1 जानेवारी रोजी 10 कोटींहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र अजूनही असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर अद्याप पैसे आलेले नाहीत. तुम्हालाही जर अजून मेसेज मिळाला नसेल, तर काळजी करू नका. आज सकाळी पीएम किसान पोर्टलवर स्टेटस तपासले असता त्यावर यासंबंधीचा काही मेसेज येत आहे.

स्टेटसमध्ये असे लिहिले जात आहे
असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचे पैसे अजूनही आलेले नाहीत. स्टेटस तपासल्यावर कमिंग सून लिहिलेले दिसून येत आहे. याचा अर्थ लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील. जर ही अडचण ठीक झाली असेल तर तुम्ही तुमची पुढील स्टेप पूर्ण करा

अशाप्रकारे तपासा हप्त्याचे स्टेट्स
वेबसाइटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला Farmers Corner वर क्लिक करा. त्यानंतर Beneficiaries Status या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. आता तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाका. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

अशाप्रकारे लिस्टमध्ये तुमचे नाव तपासा
1. सर्वप्रथम तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट  https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
2. त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
3. Farmers Corner सेक्शनमध्ये, तुम्हाला Farmers Corner पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाउन लिस्ट मधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
5. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. यानंतर Beneficiaries List दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी तुम्ही घरबसल्या रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी तुमच्याकडे सातबारा, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि तुमच्या शेताचा बँक खाते नंबर असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.nic.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता.

आता ‘या’ लोकांकडून हिरावून घेतला जाऊ शकतो फॅमिली पेन्शनचा अधिकार, त्यासाठीचे नियम जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । फॅमिली पेन्शनच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील अनेक कुटुंबांना मदत करते. नोकरीतून रिटायर झाल्यानंतर पेन्शन घेण्यासाठी सरकारने काही नियम केले आहेत. या नियमांनुसार, पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला फॅमिली पेन्शन मिळते. मात्र, केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने फॅमिली पेन्शनमध्ये मोठा बदल केला आहे. माजी सैनिक कल्याण विभाग, संरक्षण मंत्रालयाने पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभागाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.

आता पेन्शन कोणाला मिळणार नाही?
खरेतर, 16 जून 2021 रोजी, पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभागाने (DOP&PW) एक महत्त्वाची अट नमूद केली होती की, हा अधिकार फॅमिली पेन्शन घेणार्‍या सदस्याकडून काढून घेतला जाऊ शकतो. यानुसार, फॅमिली पेन्शन घेणार्‍या सदस्यावर सरकारी कर्मचार्‍याच्या हत्येचा आरोप असल्यास किंवा अशा कोणत्याही गुन्ह्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असल्यास, अशा परिस्थितीत, कुटुंबातील इतर कोणत्याही पात्र सदस्याला पेन्शन दिली जाऊ शकते.

16 जून 2021 पासून लागू होईल
माजी सैनिक कल्याण विभाग, संरक्षण मंत्रालयाने 05 जानेवारी 2022 रोजी सशस्त्र दल पेन्शनधारकांसाठी DoP&PW च्या मेमोरँडममध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत आवश्यक बदलांसह एक आदेश जारी केला आहे. ही तरतूद 16 जून 2021 पासून लागू होईल.

तो जुना करार होता
– आतापर्यंत केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 1972 च्या नियम 54 च्या उप-नियम (11C) नुसार, जर एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनरच्या मृत्यूनंतर फॅमिली पेन्शन मिळविण्यास पात्र होते, मात्र सरकारी सेवक/ पेन्शनरची हत्या केल्याचा किंवा अशा गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप असल्यास, या संदर्भात फौजदारी कार्यवाहीचा निर्णय होईपर्यंत पेन्शन निलंबित करण्यात आली होती.

– अशा प्रकरणांमध्ये, अशा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सामील असलेल्या व्यक्तीशिवाय कुटुंबातील कोणत्याही पात्र सदस्यास पेन्शनचे पैसे देणे बंद करण्यात आले, जोपर्यंत त्या गुन्ह्याच्या कार्यवाहीवर निर्णय घेतला जात नाही. तसेच, या फौजदारी खटल्यांमध्ये दोषी सिद्ध झाल्यानंतर, त्या व्यक्तीला फॅमिली पेन्शन मिळण्यापासून काढून टाकण्यात आले. अशा स्थितीत, फॅमिली पेन्शन सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या तारखेपासून कुटुंबातील इतर पात्र सदस्यांना देय झाले असते. मात्र, जर संबंधित व्यक्ती नंतर आरोपातून निर्दोष मुक्त झाली असेल, तर सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या तारखेपासून फॅमिली पेन्शन त्या व्यक्तीला देय होईल.

फॅमिली पेन्शनचे नवीन नियम काय आहेत जाणून घ्या
फॅमिली पेन्शन मिळवणार्‍या व्यक्तीवर सरकारी कर्मचार्‍याच्या मृत्यूस प्रवृत्त केल्यास किंवा प्रवृत्त केल्याचा आरोप असल्यास, आरोपीवर अंतिम निर्णय होईपर्यंत कुटुंबातील इतर पात्र सदस्यांना फॅमिली पेन्शन देणे सुरू केले जाईल.

धाडसी चोरी : पुसेसावळीत चाैघांना मारहाण करून 5 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास

खटाव | सातारा येथील पुसेसावळीत मंगळवारी मध्‍यरात्री दराेडेखाेरांच्‍या टाेळीने लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यानी मारहाण करत सुमारे 12 तोळे सोने, 1 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम असा 5 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जयश्री हणमंतराव माने जखमी झाल्या असून, त्याच्यावर कराड येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी संजय आप्पासो कदम यांनी पुसेसावळी पोलीसात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी, माने कुटुंबीय रात्रीचे जेवण करुन झोपले होते. रात्रीचे जेवण करुन झोपले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास माने यांचे जावई फिर्यादी संजय आप्पासो कदम यांची पत्नी सारीका यांना घरात कोणीतरी आल्याची चाहूल लागली. त्यांनी पती संजय यांना जागे केले. संजय यांनी दरोडेखोरांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने कदम दाम्पत्यास मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. बेडरुममध्ये झोपलेल्या जयश्री माने यांच्याकडेही काही दरोडेखोरांनी मोर्चा वळवला. त्यांनाही मारहाण केली.

या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या यावेळी झालेल्या गोंधळामुळे वरच्या मजल्यावर झोपलेले हणमंतराव माने खाली आले. दरोडेखोरांनी त्यांनाही सोडले नाही. या चौघांना मारहाण करून दरोडेखोरांनी सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लंपास करुन पोबारा केला. जाताना त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली त्यामुळे कुटुंबियांनी फोन करु शेजाऱ्यांची मदत घेतली. दरोडेखोर सुमारे 30 ते 35 वयोगटातील असू ते मराठी बोलत होते. याप्रकरण पुसेसावळी पोलिसांत गुन्हा नोंद झाली असून तपास सपोनि प्रशांत बधे करत आहेत.

 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या रजा, सुट्या रद्द

औरंगाबाद – ओमिक्रोन आणि कोरोना संसर्गाची वाढती रुग्णसंख्या पाहून जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या रजा आणि सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एवढेच नव्हे तर शहरात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांची वाढत्या रुग्णसंख्या च्या पार्श्वभूमीवर काल बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रोगाचा सामना करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले. या साथीचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ हाती असावे. यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

याविषयी गटणे म्हणाले की, कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक आणि अनिवार्य बाबी वगळता कोणत्याही स्वरूपाच्या रजा देऊ नयेत, अशा सूचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

Stock Market : बाजाराची खराब सुरुवात, सेन्सेक्स 800 तर निफ्टी 17700 अंकांनी घसरला

Share Market

नवी दिल्ली । खराब जागतिक संकेतांमुळे शेअर बाजाराची सुरुवातही आज कमकुवत झाली. सकाळी 9:40 वाजता बीएसई सेन्सेक्सने 800 हून जास्त अंकांची घसरण नोंदवली. त्याच वेळी, निफ्टी 238.40 अंक किंवा 1.21 टक्क्यांसह 17,695.95 वर ट्रेड करताना दिसला.

सुरुवातीच्या ट्रेडिंग दरम्यान, सेन्सेक्स 638.93 अंक किंवा 1.06 टक्क्यांच्या घसरणीसह 59,584.22 वर उघडला, तर निफ्टी 182.30 अंकांनी किंवा 1.02 टक्क्यांनी घसरून 17,742.95 वर उघडला.

बाजार तेजीसह बंद झाला
काल बुधवारीही बाजार तेजीसह बंद झाले. सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60,000 चा टप्पा पार केला. सेन्सेक्स 367.22 अंकांच्या वाढीसह 60,223.15 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 120 अंकांच्या वाढीसह 17,925.25 वर बंद झाला. बँक निफ्टीने आज जोरदार प्रदर्शन केले. तो 855.75 अंकांनी वाढून 37,695.90 वर बंद झाला.

30 पैकी 28 शेअर्स घसरले
सेन्सेक्सच्या 30 शेअर्स पैकी 28 शेअर्स घसरले आहेत. HDFC सर्वात मोठ्या घसरणीसह ट्रेड करत आहे. 2.36 टक्क्यांच्या घसरणीनंतर तो 2610.50 रुपये प्रति शेअरवर दिसत आहे. दुसरीकडे, मारुतीच्या शेअर्समध्ये 0.85 ची वाढ दिसून येत आहे. हा शेअर 7831.28 वर आहे. याशिवाय भारती एअरटेलचा शेअरही वाढत आहे.

आशियाई बाजारातील स्थिती
आशियाई बाजारातही आज कमकुवत दिसून येत आहे. SGX NIFTY 182 अंकांनी घसरला आहे. त्याच वेळी, Nikkei 28,721.49 च्या आसपास सुमारे 2 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, स्ट्रेट टाइम्समध्ये 0.32 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, तैवानचा बाजार 0.92 टक्क्यांच्या कमकुवतपणासह 18,329.65 च्या पातळीवर ट्रेड करत आहे. तर हँग सेंग 0.74 टक्क्यांच्या घसरणीसह 22,738.61 च्या पातळीवर दिसत आहे.

विनामास्क वाहन चालवत असाल तर सावधान ! तुमचे वाहन ‘ब्लॅक लिस्ट’ झाले तर नाही ना ?

औरंगाबाद – शहरात तुम्ही जर दुचाकी-चारचाकीतुन विनामास्क फिरला असाल तर कदाचित तुमचे वाहन ब्लॅकलिस्ट झालेले असू शकते. कारण आरटीओ कार्यालयाने विनामास्क फिरणाऱ्या 1875 चालकांचे वाहन ब्लॅकलिस्ट केले आहे.

कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून गेल्या काही दिवसांपासून शहरात विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांचे फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यात विनामास्क वाहनधारकांविरुद्ध महापालिकेच्या पथकाकडून फोटो काढण्यात येत आहेत‌. ते फोटो आरटीओ कार्यालयाच्या मेल आयडी वर पाठवले जात आहेत. त्यानंतर वाहन चालकांना ई-चलन पाठवण्यात येते. दंड भरला नाही तर वाहनधारकांना टॅक्स, पीयूसी, इन्शुरन्स, फिटनेस करता येणार नाही.

एवढेच नव्हे तर वाहन मालकाला वाहन विक्री करता येणार नाही. ई-चलान पाठवण्यात आलेल्या वाहनधारकांनी आलेल्या दंडाची रक्कम त्वरित भरली तर त्यांचे वाहन ब्लॅकलिस्टमध्ये जाण्यापासून वाचू शकते. आतापर्यंत 1875 वाहने ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहेत.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात तसेच देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. संपर्कात आलेल्यांची आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असेल आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.

कोरोनाच्या संसर्ग वाढीमुळे लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार दोन दिवसांच्या नाशिक-मुंबई दौऱ्यावर होते. दोन दिवस नाशिक-मुंबई दौरा झाल्यानंतर डॉ. भारती पवार यांना त्रास जाणवू लागा. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

https://twitter.com/DrBharatippawar/status/1478935828655001601?s=20

डॉ. भरती पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार दोन दिवसांच्या नाशिक-मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर खासदार गोडसे यांचा अहवाल प्रथम पॉझिटिव्ह आला. त्यानंतर डॉ. भारती पवार यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. भारती पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात ठिकठिकाणी दौरे केले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या.

विहेत एका रात्रीत तीन घरे फोडली, मुद्देमाल लंपास

crime

पाटण | विहे (ता. पाटण) येथे तीन बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. तसेच आणखी एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला असून, संशयितांनी सुमारे 80 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने विहेसह परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी चोरी करताना बाहेरून घरांना कडी लावलेल्या होत्या.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विहे येथे मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुधीर सुभाषराव पाटील, अमेय अशोकराव कुलकर्णी, रामचंद्र जाधव यांची बंद असलेली घरे. चोरट्यांनी फोडली आहेत. तर विजय तुकाराम जंबुरे यांचे घर फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. या घरफोडीत सुधीर पाटील यांचे सुमारे एक किलोचे चांदीचे दागिने व रामचंद्र जाधव यांच्या घरातील 14 हजार रूपये असा जवळपास 80 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

अमेय कुलकर्णी यांच्या घरात चोरट्यांच्या हाताला काहीही लागले नाही. ही तीन घरे फोडल्यानंतर विजय जंबुरे यांचे घर फोडण्याच्या प्रयत्नात असताना समोर सीसीटीव्ही कॅमेरा दिसल्याने व शेजारील घरातून कोणाची तरी चाहल लागल्याने चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. संशयितांनी चोरी करताना खबरदारी म्हणून शेजारील घरांच्या दरवाजाला बाहेरून कड्या घातल्या होत्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उत्तम भापकर व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या घटनेमुळे विहेसह परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.