Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2989

‘मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला, नौटंकी करणे तुमचा स्वभावच ; चंद्रकांतदादांचा पटोलेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत घडलेल्या गंभीर घटनेवरून काँग्रेस नेत्यांनी टोला लगावला. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेला नौटंकी असे म्हटल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पटोलेंना इशारा दिला. पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे’, असा इशारा भाजप पाटील यांनी दिला.

चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच ट्विट करीत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १५-२० मिनिटे एखाद्या उड्डाणपुलावर थांबावे लागल्याच्या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच काँग्रेसवर निशाणाही साधला. पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेला ढिसाळपणा म्हणजे देशद्रोही कॉंग्रेसने गाठलेला कळस आहे. मी पंजाब येथील काँग्रेस सरकारचा निषेध करतो.असे चंद्रकांतदादांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

यावेळी पाटील म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर वर्षभर निवडणूक लांबवून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत राज्यपालांवर खापर फोडण्याचा त्यांच्या आघाडीचा प्रयत्न म्हणजे नौटंकी होती. नाना पटोलेंच्या राजकीय आयुष्यात नौटंकीचे अनेक प्रसंग आहेत. नौटंकी हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेस सरकारकडून गंभीर चूक झाली असताना त्याला नौंटकी म्हणणे निषेधार्ह आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पंजाब दौरा रद्द करावा लागल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात एकच खळबळ उडाली. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनीही या प्रकारानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर भाजपच्या आरोपांना आता काँग्रेस नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. ‘मोदींनी जे पेरलं तेच उगवलं’, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला होता.

कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लागु; ‘या’ गोष्टी असतील बंद

औरंगाबाद – सध्या जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढत आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे. सध्याची वाढत जाणारी रुग्ण संख्या पाहता रुग्णालयांनी बेड्सची संख्या वाढविण्यावर भर द्यावा. रुग्णांना गृह विलगीरणात राहायचे असल्यास घरातील इतर सर्व सदस्यांचे लसीकरण बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण सांगितले. जिल्हाधिकारी यांनी यावेळी शहरातील सर्व रुग्णालयांतील उपलब्ध बेड्सचा आढावा घेतला तसेच ऑक्सिजनची संभाव्य मागणी लक्षात घेता सर्व ऑक्सिजन प्रकल्पाची देखील सविस्तर आढावा घेतला.

जिल्हाधिकारी  म्हणाले की,  जे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत त्यांच्या घरातील इतर सदस्यांनी स्वत: होम क्वारंटाईन राहावे त्यांनी घराबाहेर पडू नये. सर्व रुग्णालयांनी रुग्णांची सर्जरी पूर्वी जशा इतर चाचण्या केल्या जातात तशाच प्रकारे कोविडची चाचणी देखील करण्याचे निर्देश दिले.  वाढती रुग्णसंख्या पाहता गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याने  हॉटेलमध्ये/ रिसॉर्ट्स मध्ये होणाऱ्या गर्दीचे चित्रिकरण करावे. लसीकरण केलेले नसेल तर पेट्रोल मिळणार नाही. तसेच त्यांनी मास्क परिधान केलेले असावे.सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याना अपवादात्मक वैद्यकीय कारण वगळता रजा घेता येणार नाहीत. शहर आणि ग्रामीण भागातील लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसिलदार, गट विकास अधिकारी यांनी मंगल कार्यालयांना नियमित  भेटी देण्याचे निर्देश देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

शहराजवळील शेतामध्ये चालणाऱ्या हुरडापार्टीवर आजपासून पूर्णपणे निर्बंध असतील. एखाद्या ठिकाणी  हुरडापार्टी सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास चालकावर पोलीस कारवाई करणार.  शहराजवळील /शहराबाहेरील फार्म हाऊस/ रिसॉर्टवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आजपासून फार्म हाऊस/ रिसॉर्ट पूर्णपणे बंद असतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी सांगितले. मंगल कार्यालय व्यवस्थापनाने आगामी लग्नाच्या बुकिंग तारखांची माहिती प्रशासनाला कळवावी. 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याबाबत मंगल कार्यालय व्यवस्थापनाने प्रशासनाला लेखी द्यावे. नियमांचे उल्लंघन केल्यास  पोलीस कारवाई करणार असल्याचे उपायुक्त उज्वला वनकर यांनी सांगितले.

3 शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू; मृतात दोन सख्खा बहिणी, पाणी पिण्यासाठी गेल्या अन्..

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या घटनेमध्ये पूजा गरड आणि सानिका गरड या दोन सख्खा बहिणी आणि आकांक्षा वडजे या लहान मुलीचा करून अंत झाला आहे. गावापासून दीड किलिमिटर अंतरावर असणाऱ्या सदाशिव जगताप यांच्या शेतातळ्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

या तिन्ही मुलींसोबत असणारी एक दहावर्षीय मुलगी सुदैवाने वाचली आहे. विशेष म्हणजे या मुली शाळा बुडवून सरपण वेचण्यासाठी शेतावर गेल्या होत्या. त्यात यांना तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी त्या शेतातळ्यात उतरल्या आणि पाय घासरून पाण्यात पडल्या. एकमेकांना वाचवण्याच्या नादात तिन्ही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे.

हे पण वाचा –

पळून जाऊन लग्न करणे बेतले जीवावर; मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाची केली ‘ही’ अवस्था

महाराष्ट्रात लागणार मिनी लॉकडाऊन?; ‘असे’ असतील निर्बंध

घातपात, अपघात की आणखी काही? तरंगणारं चप्पल..काठावर मोबाईल अन् तलावात मृतदेह सापडला

औरंगाबादकरांनो सावधान ! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे ‘शतक’

corona

औरंगाबाद – औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, जिल्ह्यात आज तब्बल 120 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 103 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 229 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजार 159 झाली आहे. आतापर्यंत एकूण 3658 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 272 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 20 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 20 रुग्णांना सुटी देण्यात आली.

एक दोनदा नाहीतर 16 वेळा चावला ! कुत्र्याचा चिमुरडीवर जीवघेणा हल्ला

dog attack

चेन्नई : वृत्तसंस्था – चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका कुत्र्याने लहान मुलीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या कुत्र्याने एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 16 वेळा या मुलीला चावा घेतला आहे. या हल्ल्यात हि मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती सध्या नाजूक आहे. या मुलीवर ज्या कुत्र्याने हल्ला केला तो रस्त्यावरील कुत्रा नसून पाळीव कुत्रा होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कधी आणि कुठे घडली घटना ?
ही घटना 28 डिसेंबर रोजी चेन्नईच्या नोलंबूरमध्ये घडली आहे. नोलंबूरच्या श्रीराम नगर परिसरात एक कुटुंब राहत होतं. त्यांची 9 वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी एकजण आपल्या आपल्या घरात पाळलेल्या कुत्र्याला घेऊन बाहेर हिंडायला निघाला होता. यावेळी कुत्र्याने अचानक या मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात हि मुलगी गंभीर जखमी झाली.

काय घडले नेमके ?
श्रीराम नगरमध्ये राहणारी एक ही नऊ वर्षांची मुलगी आपल्या घरातून बाहेर फिरण्यासाठी निघाली होती. तेव्हा या कुत्र्याची मालकीण आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायाला निघाली होती. यावेळी हा कुत्रा 9 वर्षांच्या मुलीच्या आधी मागे लागला. कुत्रा मागे लागल्याचं पाहून प्रचंड घाबरलेली मुलगी त्या ठिकाणाहून पळाली. यानंतर काही अंतरावर या मुलीचा तोल जाऊन ती पडली. यावेळी या कुत्र्याने 16 वेळा मुलीचा चावा घेतला. यानंतर स्थानिकांनी लगेचंच मुलीच्या दिशेनं धाव घेऊन तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी चेन्नईतील नोलंबूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या पाळीव कुत्र्यांची मालकीण असलेल्या विजयालक्ष्मी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

सोलापूरमध्ये शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा तळ्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. सानिका गरड, पूजा गरड, आकांक्षा युवराज वडजे अशी मृत पावलेल्या तिघींची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मार्डी गावावर शोककळा पसरली आहे. मार्डी गावात राहणाऱ्या सानिका, पूजा, आकांक्षा या तिघी जणी दुपारी 1 च्या सुमारास रानात जळण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. जळण गोळा करत असताना त्यांना खूप तहान लागली. यानंतर त्या त्या जवळच असलेल्या शेतातील शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेल्या.

या ठिकाणी पाणी पित असताना अचानक या तिघांचा तोल गेला आणि त्या पाण्यात पडल्या. या तिघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या तिन्ही मुली गरीब कुटुंबातील असल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला.

काही दिवसांपूर्वी नांदेडमधील देगलूर तालुक्यातील कावळगड्डा गावामध्येसुद्धा अशाच प्रकारची घटना घडली होती. यामध्ये शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. अक्षय रोहिदास राजुरे आणि प्रमोद हनुमंत राजुरे अशी मृत मुलांची नावे आहेत. घटनेच्या दिवशी तीन शाळकरी मुले खेळता खेळता गावाजवळील एका शेतात अर्धवट असलेल्या शेततळ्याजवळील गेली. शेततळे तुडूंब भरलेले होते. यापैकी एक मुलगा शौचास गेला तर बाकी दोघे अक्षय आणि प्रमोद शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र तळ्यात गाळ असल्यामुळे हे दोघेही गाळात त्यांचा मृ्त्यू झाला.

पळून जाऊन लग्न करणे बेतले जीवावर; मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाची केली ‘ही’ अवस्था

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यामध्ये पळून जाऊन लग्न करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून या तरुणावर पोलीस ठाण्याच्या आवारात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या तरुणावर सध्या उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

रघू तिवारी असे हल्ला करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील सैती फैल येथील रहिवासी आहे. जखमी रघूचे मागच्या काही वर्षांपासून गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होतं. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण घरच्यांचा या दोघांच्या लग्नाला विरोध होता. यानंतर रघुने पळून जाऊन लग्न केले. त्यामुळे याबाबत जबाब नोंदवण्यासाठी रघू पोलीस ठाण्यात गेला होता. जबाब नोंदवल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी रघूशी पोलीस ठाण्याच्या बाहेर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यानंतर हा वाद एवढा वाढला कि मुलीच्या नातेवाईकांकडून रघूवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यांनी धारदार शस्त्राने रघूच्या पोटात वार केले.

या हल्ल्यामध्ये रघू गंभीर जखमी झाला आहे. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात हि घटना घडली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने रघुला खामगाव येथील रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्याची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला अकोल्यातील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर रघुच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस आता काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मरणानंतरही यातनाच ! अंत्यविधीला जागाच नसल्याने मृतदेह आणले थेट तहसीलला

बीड – जिल्ह्यातील केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील एका वृद्ध महिलेचे मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. तिचा अंत्यविधी करण्यासाठी गावात मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने नेमका अंत्यविधी कुठे करावा ? या अडचणीने संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी त्या महिलेचा मृतदेह बुधवार तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.

तालुक्यातील सोनेसांगवी येथील वृद्ध महिला लक्ष्मीबाई शहाजी कसबे यांचे मंगळवार रोजी रात्री उशिरा दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. परंतू तिचा अंत्यविधी करण्यासाठी मगासवर्गीय समाजाची स्मशानभूमी उपलब्ध नाही. पूर्वी हा समाज शेजारच्या माळेगाव शिवारातील सरकारी गायरान जमिनीत अंत्यविधी करीत होता. सध्या त्या गायरान जमिनीत काही वर्षांपूर्वी मागासवर्गीय समाजातील भूमिहीन लोकांनी अतिक्रमण करून ते जमीन कसत आहेत. त्यामुळे त्यांना तेथे अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तर सोनेसांगवी ग्रामपंचायतीने सोनेसांगवी येथील खुल्या जागेत स्मशाभूमी करण्याचा ठराव घेतलेला आहे.

मात्र त्या जागे शेजारील लोकांनी विरोध केल्यामुळे संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका ट्रॅक्टरमध्ये मृतदेह तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवले आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. तहसीलदार दुलाजी मेंडके हे सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे, सरपंच विजयकुमार ईखे, रिपाईचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, रवींद्र जोगदंड, मुकुंद कणसे या ग्रामस्थांशी संवाद साधत पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप दहीफळे व केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

IND vs SA: वांडरर्सवर चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेला कधीही चांगली कामगिरी करता आलेली नाही, आकडेवारी पहा

जोहान्सबर्ग । टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बुधवारी, दुसऱ्या कसोटीच्यातिसऱ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात 266 धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने अर्धशतके झळकावली. हनुमा विहारीनेही नाबाद 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. टीम इंडियाने पहिल्या डावात 202 धावा केल्या होत्या तर दक्षिण आफ्रिकेने 229 धावा केल्या होत्या. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे.

या मैदानावरील चौथ्या डावातील यजमान दक्षिण आफ्रिकेचा विक्रम पाहता संघाने 12 वेळा फलंदाजी केली आहे. ज्यामधील 7 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे, तर संघाला केवळ 3 सामने जिंकता आले आहेत. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. यादरम्यान, त्यांना भारताविरुद्ध या सामन्यापूर्वी चौथ्या डावात तीनदा खेळण्याची संधी मिळाली. त्यातील 2 सामने अनिर्णित राहिले तर एका सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेला आता हा सामना जिंकण्यासाठी चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

200 हून जास्त धावा करून फक्त एकच सामना जिंकला
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जोहान्सबर्गच्या वांडरर्स मैदानावर केवळ एकदाच 220 हून अधिक धावा करून विजय मिळवला आहे. संघाने 2006 मध्ये न्यूझीलंडविरुद्धचा सामना 6 विकेट्सवर 220 धावा करून जिंकला होता. संघाने या मैदानावर चौथ्या डावात 7 विकेट गमावत 450 धावांची मोठी धावसंख्याही उभारली आहे. मात्र, 2013 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खेळलेला हा सामना अनिर्णित राहिला होता. याशिवाय यजमान संघाने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 291 धावा केल्या होत्या. ज्यावेळी तो संघ हरला होता. भारताविरुद्धच्या इतर दोन सामन्यांच्या चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेने अनुक्रमे 278 आणि 228 धावा केल्या.

टीम इंडिया कधीही हरली नाही
या मैदानावरील टीम इंडियाचा विक्रम पाहिला तर, आतापर्यंत एकही कसोटी येथे हरलेली नाही. या सामन्यापूर्वी संघाने येथे 5 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 2 सामने त्यांनी जिंकले आहेत, तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. जर संघाने ही कसोटी जिंकली तर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकाही जिंकेल.

उड्डाणपूलाच्या देखभालावरुन मनपा- एमएसआरडीसी यांच्यात टोलवाटोलवी

औरंगाबाद – शहरातील अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या जालना रोडवरील पुलांची देखभाल-दुरुस्ती करण्यावरून मनपा व राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यात टोलवाटोलवी सुरू झाली आहे. मुलांची देखभाल व दुरुस्ती कोणी करावी यातून दोन्ही संस्थांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे त्या मुलांची दुरुस्ती कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात आजघडीला पाच ते सहा उड्डाणपूल आहेत. यातील बांधकाम विभागाकडे शहरातील सेवन हिल पुलाचे हस्तांतरण करण्यात आले असून, पुल खराब झाल्याची ओरड सुरू झाल्यानंतरच ते जागे होतात. एमएसआरडीसी- मनपात फुलांच्या जबाबदारी वरून पत्र प्रपंचाच्या फैरी सुरू आहेत. बांधकाम विभागाकडे शहरातील फक्त एका मुलाची जबाबदारी आहे. 3 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुलांच्या जबाबदारी वरून मनपाने एका शब्दानेही उत्तर दिले नाही.

क्रांती चौक उड्डाणपुलावर धोकादायक गॅप पडल्याचे वृत्त समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर काल पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील सर्व मुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बांधकाम विभागाने ऑडिट सुरू केले आहे.