Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2993

महाविकास आघाडी हे तीन माकडांचे सरकार; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर भाजपकडून अनेकवेळा टीका केली जाते. मात्र, भाजपमधील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. “महाविकास आघाडीच सरकार म्हणजे तीन माकडांचे सरकार आहे,” असे विधान पाटील यांनी केले आहे.

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर आज टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, राज्यात सध्या अस्तित्वात असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे तीन माकडाचे आहे. त्यांच्याकडून तोंड, नाक आणि कानावर हात ठेवून सरकार चालवले जात आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. ज्या ज्या ठिकाणी या सरकारकडून नुकसान केले जाईल त्या त्या ठिकाणी या सरकारला लाथ मारून जागे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी पाटील यांनी दिला आहे.

Gold Price : सोने महागले तर चांदी घसरली, आजचे नवीन दर तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजच्या सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली असून आगामी काळात सोन्याच्या दरवाढीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 49260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोरोना मुळे जगभरात वाढलेले निर्बंध, लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या आर्थिक घडामोडींवर होणारे परिणाम यामुळे सोन्याच्या मागणीला आणखी वेग येऊन दरवाढ होईल अशी शक्यता आहे.

MCX वर वाढले सोन्याचे भाव
आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 47,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. तर दुसरीकडे, चांदीबाबत बोलायचं झालं तर आज चांदीच्या दरात 0.12 टक्क्यांनी घसरण झाली असून 61,668 रुपये किलो असा चांदीचा भाव आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,110 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,620 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,250 रुपये
पुणे – 46,110 रुपये
नागपूर – 47,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -49,250 रुपये
पुणे – 48,620 रुपये
नागपूर – 49,250 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4612.00 Rs 4655.00 0.924 %⌃
8 GRAM Rs 36896 Rs 37240 0.924 %⌃
10 GRAM Rs 46120 Rs 46550 0.924 %⌃
100 GRAM Rs 461200 Rs 465500 0.924 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4863.00 Rs 4908.00 0.917 %⌃
8 GRAM Rs 38904 Rs 39264 0.917 %⌃
10 GRAM Rs 48630 Rs 49080 0.917 %⌃
100 GRAM Rs 486300 Rs 490800 0.917 %⌃

 

एलन मस्कला फटका, आता 5 हजार भारतीयांना द्यावा लागणार रिफंड

नवी दिल्ली । एलन मस्कला भारतात मोठा फटका बसला आहे. एलन मस्कची कंपनी स्टारलिंक सॅटेलाइटला कंपनीच्या इंटरनेट डिव्हाईसच्या प्री-ऑर्डर केलेल्या 5000 भारतीयांना पैसे परत करावे लागतील. भारत सरकारने कंपनीला तसे करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीला भारतात सेवा सुरू करण्यासाठीचा परवाना अजूनही मिळालेला नाही.

स्टारलिंक उपग्रह इंटरनेट उपक्रम हा एलन मस्कच्या स्पेसएक्स एरोस्पेस कंपनीचा भाग आहे. स्टारलिंक जगभरात कमी लेटन्सी ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देण्यासाठी छोटे सॅटेलाइट लाँच करत आहे. त्याचे लक्ष विशेषत: दुर्गम भागांवर केंद्रित आहे, जेथे पारंपारिक इंटरनेट मिळणे खूप कठीण आहे.

कंपनीने ग्राहकांना पाठवले ई-मेल
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, Starlink ने भारत सरकारच्या आदेशानुसार कंपनीच्या डिव्हाईसच्या प्री-ऑर्डरची माहिती ग्राहकांना ई-मेलद्वारे देणे सुरू केले आहे. अशाच एकायुझरला पाठवलेला ई-मेल पाहिल्याचा दावा रॉयटर्सने केला आहे. भारतातील 5000 लोकांनी स्टारलिंक डिव्‍हाइस लॉन्‍च होण्‍यापूर्वीच ऑर्डर दिली होती. ग्राहकांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये कंपनीने म्हटले आहे की, रिफंडचा पर्याय ग्राहकांकडे नेहमीच उपलब्ध होता. ते कधीही रिफंडघेऊ शकतात.

कंपनीला परवाना मिळालेला नाही
स्टारलिंक सध्या भारतात व्यावसायिक परवाना मिळविण्यासाठी संघर्ष करत आहे आणि सरकारने अजूनही परवाना मंजूर केलेला नाही. हे पाहता, भारत सरकारने मंगळवारी कंपनीला त्या सर्व लोकांना पैसे परत करण्याचे आदेश दिले ज्यांनी डिव्हाइससाठी प्री-ऑर्डर केली आणि परवाना मिळेपर्यंत पैसे जमा केले.

जानेवारीच्या अखेरीस भारतात परवान्यासाठी अर्ज करण्याचा स्टारलिंकचा मानस आहे. त्याच वेळी, गेल्या महिन्यात, स्टारलिंकच्या भारत प्रमुखाने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले होते की,” कंपनीने डिसेंबर 2022 पर्यंत 200,000 डिव्हाइस विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”

मुख्यमंत्री नसले तरीही राज्य चांगल्या प्रकारे सुरु आहे; रावसाहेब दानवेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आजारपणामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकींना हजेरी लावली जात आहे. यावरून भाजप नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “राज्यातील गृहमंत्री फरार आहे. पोलीस आयुक्त फरार आहे. आता मुख्यमंत्री सध्या खुर्चीवर नाहीत. मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य चांगले सुरू आहे,” अशी टीका दानवे यांनी केली आहे.

राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “राज्यात सध्या चांगल्या प्रकारे काम सुरु आहे. राज्यात अनेक निर्णय घेतले जात आहेत. आजारपणामुळे आता मुख्यमंत्री सध्या खुर्चीवर नाहीत. ते खुर्चीत नसतानाही राज्य़ चांगलया प्रकारेचालले आहे. यामागचे खरे श्रेय कोणाचे असेल तर ते मुख्यमंत्र्यांना नसून राज्यातील जनतेचे आहे.”

“आपल्या राज्यातील जनता हि अत्यंत संयमी आहे. त्यामुळे राज्य व्यवस्थित सुरू आहे. असे असताना राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते गृहमंत्री फरार आहे. आणि त्यांच्याप्रमाणे पोलीस आयुक्तही फरार असल्याची टीका यावेळी दानवे यांनी केली आहे.

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! आता 5 लाखांपर्यंतचे ऑनलाइन IMPS ट्रान्सझॅक्शन फ्री असणार

PIB fact Check

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँकअसलेल्या SBI ने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे केलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या इन्स्टंट पेमेंट सर्व्हिस (IMPS) ट्रान्सझॅक्शनवर कोणताही सर्व्हिस चार्ज आकारला जाणार नाही. SBI ने मंगळवारी सांगितले की, ही तरतूद YONO अ‍ॅप युझर्ससाठी देखील लागू आहे. तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन IMPS करून घेतल्यास, तुम्हाला जीएसटीसह सर्व्हिस चार्ज भरावा लागेल. SBI ने सांगितले की, या सूचना 1 फेब्रुवारी 2022 पासून लागू होतील.

काही महिन्यांपूर्वीपर्यंत IMPS ट्रान्सझॅक्शनची कमाल मर्यादा 2 लाख रुपये होती, जी आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे. आतापर्यंत एसबीआय केवळ 2 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS ट्रान्सझॅक्शनवर सर्व्हिस चार्ज आकारत नाही.

डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन
SBI ने सांगितले की,” ग्राहकांमध्ये डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग (YONO App सह) द्वारे IMPS ट्रान्सझॅक्शनवर सर्व्हिस चार्ज लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर बँक शाखांमधून IMPS ट्रान्सझॅक्शनसाठी 2 लाख ते 5 लाख रुपयांचा नवा स्लॅब करण्यात आला आहे. या स्लॅब अंतर्गत येणाऱ्या रकमेवर सर्व्हिस चार्ज 20 रुपये असेल आणि त्यासोबत जीएसटीही घेतला जाईल.”

सध्‍या बँकेच्‍या शाखांमध्‍ये केवळ 1,000 रुपयांपर्यंतचे IMPS ट्रान्सझॅक्शन सर्व्हिस चार्जशिवाय आहेत. रु. 1,001 रु. 10,000 पर्यंतच्या ट्रान्सझॅक्शनवर रु. 2 + GST ​​लागू होतो. दुसरीकडे, 10,001 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंतच्या ट्रान्सझॅक्शनवर 4 रुपये + GST ​​लागू आहे. 1 लाख ते 2 लाख रुपये सर्व्हिस चार्ज 12 रुपये + GST ​​आहे.

मंत्री यशोमती ठाकूर यांचे रुग्णालयातून फायलींचा ढीग उपसून काम सुरूच

अमरावती प्रतिनिधी । सलमान खान

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, असे असतानाही त्यांच्यातील काम करण्याची जिद्द आणि इच्छा तसूभरही कमी झालेली नाही. रुग्णशय्येवर असतानाही त्यांनी फायलींचा ढीग उपसून काम सुरूच ठेवल्याची माहिती एका चित्रफितीद्वारे समोर आली आहे.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनाही या दरम्यान कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्याचे आवाहन करत स्वतः रुग्णालयात दाखल झाल्या.

शासकीय रुग्णसेवेवर विश्वास दाखवत त्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल होणे पसंत केले. शासकीय कर्मचारी, रुग्णालय यंत्रणा आणि शासकीय उपचार हे दर्जेदारच असतात. त्यांचा लाभ घेण्यात कुठेही कमीपणा अथवा संकोच न करता विश्वास ठेवल्य़ास नक्कीच फायदा होतो. हे सांगत सर्वांनी शासकीय रुग्णसेवेवर विश्वास ठेवावा असे आवाहनही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले होते.

सध्या त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. मात्र, त्यांनी रुग्णालयातही आपल्या दैनंदिन कामकाज सुरू ठेवल्याचे दिसते आहे. रुग्णालयातील बेडवर बसूनच त्या फायलींचा ढिगारा उपसत असल्याचे एका चित्रफितीद्वारे समोर आले आहे. जनतेप्रती आणि कामाबद्दल असलेल्या त्यांच्या या निष्‍ठेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रवीण दरेकरांना कोरोनाची लागण

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 13 मंत्र्यांना आणि राज्यातील अनेक आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान काल राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी., असे दरेकर यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत राज्याचे मोठ्या मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

मिनी लॉकडाऊनबाबत टास्क फोर्सने घेतला ‘हा’ निर्णय; व्यापारी, नोकरदारांसाठी महत्वाची बातमी

मुंबई । राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा मिनी लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चा केल्या जात होत्या. याबाबत टास्क फोर्सचे तज्ज्ञ यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठक झाली. सदर बैठकीत महत्वाची चर्चा करण्यात आली आहे. राज्यात तुर्तास मिनी लॉकडाऊन न लावता त्या ऐवजी निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली जारी केली जाऊ शकते.

मुंबईत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत टास्क फोर्स तज्ज्ञ आणि आरोग्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत मिनी लॉकडाऊन लावण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊनचा पर्याय निकालात निघाल्याने राज्यातील नोकरदार, सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊन लावल्यास राज्याचे अर्थचक्र थांबू शकत असल्यामुळे राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

चोवीस तासात 18 हजार 466 नव्या कोरोना रुग्णांची नोंद –

दरम्यान सध्या मुंबईसह राज्यभरात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असा सवाल उपस्थित होत होता. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 18 हजार 466 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून तर 20 जणांचा मृ्त्यू झाला.

‘आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या…’

st

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी 8 नोव्हेंबर पासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले संप अद्यापही सुरूच आहे. यासंदर्भात राज्य शासन कुठलाही निर्णय घेत नसल्याने शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील 172 कर्मचाऱ्यांनी आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात संपकरी कर्मचाऱ्यांनी म्हटले की, आम्हाला सध्या तुटपुंज्या पगारावर संसाराचा गाडा हाकावा लागतो. तसेच अन्य प्रकारे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आमच्याही मनात सतत आत्महत्या करण्यासारखे विचार येतात‌. वारंवार निवेदने देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आम्ही स्वेच्छा मरणाची परवानगी मागत आहोत. आता सरकारकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला आम्ही वैतागलो आहोत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने आपण एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीनीकरण करून, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देऊन आमचे आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्तता करावी, अन्यथा आम्हाला स्वेच्छा मारण्याची परवानगी द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

घातपात, अपघात की आणखी काही? तरंगणारं चप्पल..काठावर मोबाईल अन् तलावात मृतदेह सापडला

अमरावती प्रतिनिधी : सलमान खान

एका ३० वर्षीय युवकाचा अमरावती शहरातील वडाळीच्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सदरच्या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस आपल्या पथकासोबत घटनास्थळी पोहोचले. त्यांना वडाळी तलावाच्या काठावर मोबाईल पडलेला दिसला. तसेच तलावावर त्याची तरंगताना चप्पल दिसली. त्यानंतर पोलिसांनी गोताखोरांची मदत घेऊन शोधकार्य सुरु केले. परंतु युवकाचा ठावठिकाणा लागला नाही. विनोद उध्दव मेश्राम असे तलावात बुडणाऱ्या युवकाच नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, विनोद मेश्राम वडाळी तलावात बुडल्याची माहिती मिळाली. तलावाच्या काठावर त्याचा मोबाईल पडलेला दिसला व तलावात त्याची चप्पल तरंगतांना आढळून आली. त्यामुळे तो तलावात बुडल्याचा संशय निर्माण झाला. विनोदच्या भावाने सदरची सूचना फ्रेजरपुरा पोलिसांत दिली. माहिती मिळताच ठाणेदार आपल्या पथकांसह घटनास्थळी पोहोचले.

सदरची घटना वाऱ्यासारखी चोहोकडे पसरली. त्यामुळे तलावाच्या काठावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. पोलिसांनी गोताखोरांची मदत घेऊन विनोदचा तपास सुरु केला. परंतु बराच वेळ होऊन सुध्दा त्याचा थांगपत्ता मिळ शकला नाही.

शेवटी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय स्थित असलेल्या आपातकालीन रेस्क्यू पथकाला मदतीला बोलाविले. अथक परिश्रमानंतर सदर पथकाने विनोदचे शव तलावातून शोधुन काढले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शव पोस्टमार्टम करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहे.