RBI म्हणाले,”तुम्ही तुमच्या एटीएम कार्डद्वारे आजच ‘ही’ 3 कामे करा, जेणेकरून तुमचे पैसे नेहमीच सुरक्षित राहतील”

हॅलो महाराष्ट्र । बँक खात्यात सामान्य लोकांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी RBI ने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या वापरावर काही नवीन नियम बनवले आहेत. या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. याबाबत RBI ने आपल्या ट्विटर हँडलवर महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. RBI ने यासाठी तातडीने तीन कामे करण्याचा सल्ला दिला आहे. पहिला रोजच्या व्यवहारासाठीचे लिमिट सेट करा. दुसरे – देशांतर्गत / आंतरराष्ट्रीय वापरासाठीचे लिमिट सेट करा. तिसरे -आंतरराष्ट्रीय वापर चालू / बंद करा.

रिझर्व्ह बँक याबाबत म्हणते की,’ असे केल्याने बँक ग्राहकांचे फसवणूकीमुळे होणारे नुकसान आणि आपल्या खर्चावर मर्यादा आणते.’ या संदर्भात एसबीआय, बीओबी, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेनेही आपल्या ग्राहकांना मेसेजेस पाठवले आहेत. त्यात म्हटले गेले आहे की, त्यांच्या क्रेडिट व डेबिट कार्डवरील काही सेवा 1 ऑक्टोबरपासून बंद केल्या जात आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवहार सेवा देखील समाविष्ट आहेत.

सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, आता बँक ग्राहक स्वत: आपल्या एटीएम आणि क्रेडिट कार्डचे लिमिट देखील ठरवू शकतात. समजा आपल्याला असे हवे असेल की, जर आपल्या कार्डावरून एक हजाराहून अधिक रक्कम निघाली नाही पाहिजे तर ते इंटरनेटमधील मॅन्युअलमध्ये जाऊन आपल्या व्यवहाराचे लिमिट बदलू शकतात. आपण कधीही मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीन किंवा आयव्हीआरद्वारे आपल्या कार्डचे लिमिट बदलू शकता.

ही सुविधा 24 तास आणि सात दिवस उपलब्ध असेल. म्हणजेच, आता आपल्या एटीएम कार्डच्या व्यवहाराचे लिमिट आपण स्वत:च ठरवू शकता. RBI ने ग्राहकांना कोणत्या सेवा घ्यायच्या व कोणत्या थांबायच्या आहेत हे त्यांच्या सोयीनुसार निर्णय घेण्यास सांगितले आहे.

डेबिट आणि क्रेडिट कार्ड देताना आता ग्राहकांना फक्त देशांतर्गत व्यवहारासाठीच परवानगी मिळेल. याचा अर्थ असा की, आता गरज नसल्यास एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी आणि पीओएस टर्मिनल्सवर खरेदी करण्यासाठी परकीय व्यवहारास मान्यता दिली जाऊ नये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like