PIB Fact Check: 15 ते 30 एप्रिलदरम्यान लॉकडाउन होणार? या बातमीमागील सत्य जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, भारत सरकार 15 ते 30 एप्रिल दरम्यान देशभरात लॉकडाऊन टाकणार असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीआयबीला जेव्हा या बातमीची माहिती मिळाली तेव्हा त्याची सत्यता तपासली गेली. या वृत्ताचे सत्य काय आहे ते जाणून घ्या.

एका फोटोवर असे लिहिले आहे की, 15 ते 30 एप्रिल दरम्यान संपूर्ण देशात संपूर्ण लॉकडाउन जाहीर केले जाईल. दुसरीकडे, सरकारने ही बातमी पूर्णपणे बनावट असल्याचे म्हंटले आहे आणि अशा दिशाभूल करणार्‍या माहितीपासून सावध रहायला देखील सांगितले आहे.

ट्विटमध्ये पीआयबीने काय लिहिले?
या Morphed छायाचित्रात असा दावा केला जात आहे की,” भारत सरकार 15 ते 30 एप्रिल दरम्यान देशभरात लॉकडाउन लादेल. PIBFactCheck: हा दावा बनावट आहे. लॉकडाऊनबाबत भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. कृपया अशी दिशाभूल करणारी छायाचित्रे किंवा मेसेजेस शेअर करू नका.

वास्तविक हे एक Morphed छायाचित्र आहे. म्हणजे वास्तविक चित्रात छेडछाड करुन दिशाभूल करणारी माहिती दिली गेली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असून या माहितीला लॉकडाउन ब्रेकिंग असे म्हटले जात आहे.

कोरोना काळात बनावट बातम्या वाढत आहेत
कोरोना काळात देशभर ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्यामध्ये अनेक बनावट बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने या व्हायरल बातमीचा इन्कार करत म्हटले आहे की,” सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोना कालावधीत अशा बनावट बातम्यांचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारकडूनही अनेक प्रयत्न केले गेले आहेत.”

आपण मेसेजेसची सत्यता तपासू शकता
जर आपल्यालाही असा मेसेज मिळाला असल्यास, आपण ते https://factcheck.pib.gov.in/ किंवा WhatsApp नंबर +918799711259 किंवा ईमेल: [email protected] वर फॅक्ट चेकसाठी पीआयबीला पाठवू शकता. ही माहिती पीआयबी वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group