महत्वाची बातमी! Ola अ‍ॅपमधील ‘या’ तांत्रिक बिघाडाचा ड्रायव्हर्स घेतात फायदा, ग्राहकांकडून आकारले जात आहे दुप्पट भाडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । 1 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी तीन ओला कॅब चालकांना फसवणूकीच्या आरोपाखाली अटक केली. या ड्रायव्हर्सनी ओला अ‍ॅपच्या तांत्रिक गोंधळाचा (ग्लिच) फायदा घेतला आणि प्रवाश्यांना निर्धारित डेस्टिनेशनपेक्षा अंतर वाढवून त्यांच्याकडून अधिक शुल्क आकारले. या प्रकरणात, मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन कॅब चालकांना अटक केली आहे. अटक केलेल्या कॅब ड्रायव्हरने सांगितले की, त्याला अ‍ॅपमधील तांत्रिक बिघाड सापडला होता आणि त्याला त्याचा फायदा घ्यायचा होता. कमीतकमी 40 कॅब चालकांनी अशा प्रकारची फसवणूक केली होती.

आपली फसवणूक कशी होते हे जाणून घ्या
या तांत्रिक बिघाडा दरम्यान, ड्रायव्हरच्या अ‍ॅपमध्ये, जेव्हा वाहन पुलाखाली किंवा उड्डाणपुलाखाली येते, तेव्हा जीपीएस मध्ये ते पुलावरुन जात असताना दिसते. त्यादरम्यान, फसवणूक करण्यासाठी हे ड्रायव्हर पुलाखालून येईपर्यंत अ‍ॅप लॉक करायचे आणि पुल ओलांडल्यानंतर ते अ‍ॅप पुन्हा सुरू करायचे, ज्यामुळे GPS रीरूट करण्यासाठी नवीन मार्ग शोधायचा आणि ज्यामुळे अंतर वाढत असे आणि भाडेही वाढत असे.

610 रुपयांच्या बदल्यात 1200 रुपये
मुंबई विमानतळ ते पनवेल या मार्गावर सर्वाधिक पूल व उड्डाणपूल असल्याने वाहनचालकांनी फसवणूकीसाठी हा मार्ग निवडल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी सांगितले की, फसवणूकीत प्रवाशांना ठरविलेल्या भाड्या पेक्षा दुप्पट पैसे द्यावे लागले. पनवेलला जाणाऱ्या एका प्रवाशाला 610 रुपये द्यावे लागायचे, तर फसवणूकीच्या वेळी त्याला 1240 रुपये द्यावे लागले.

प्रवासी तक्रार करत नाहीत
भाडे इतके वाढल्यानंतरही प्रवाशांना या घोटाळ्याबद्दल शंका आली नाही का? हो नक्कीच आली, जेव्हा प्रवाशांनी ड्रायव्हरकडे याबाबत तक्रार केली तेव्हा त्यांनी कस्टमर केअरशी बोलण्याचा सल्ला देऊन लोकांना टाळले. बर्‍याच वेळा लोकांनी याबद्दल तक्रारदेखील केली नाही आणि ज्यामुळे वाहनचालक सतत फसवणूक करत राहिले. काही बाबतींत वाहन चालकांवर दंडही लावण्यात आला परंतु यामुळे फारसा फरक पडला नाही.

या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी ओलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कंपनी कोणती पावले उचलेल याबाबत विचारले. ते म्हणाले की, आम्ही या प्रकरणात सखोल चौकशी करीत आहोत आणि या तांत्रिक अडचणी कशा दूर करता येतील याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.