नवी दिल्ली। देशावर कोरोनाचं संकट आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एच.डी देवगौडा यांच्याशी फोनवर संवाद साधला. तसेच पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बरोबर विरोधी पक्षातील इतर नेत्यांशी सुद्धा फोनवर संवाद साधला. देशावर कोरोनाचं सावट आणखी दाट होत आहे. देशातील सर्व व्यवहार बंद आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग देशाच्या चिंतेत भर पाडत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकरांसोबत कोरोनावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयन्त करत आहे. त्यामुळं कोरोनाच्या या लढाईत विरोधी पक्षांना सोबत घेण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान मोदींनी आज या सर्वांशी संवाद साधला.
याव्यतिरिक्त समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते मुलायमसिंग यादव, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, तृणमुल काँग्रेस अध्यक्षा तथा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन आणि एनडीएचे सहयोगी प्रकाश सिंह बादल यांच्याशीही पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. दरम्यान, येत्या बुधवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदीं कोरोनावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक घेणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”