हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यभर आदोलने केली. यात भप नेते तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. त्यावेळी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण सांगत पोलीस प्रशासनाने बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याच्या वक्तव्याचा निषेध दर्शविण्यासाठी बुधवारी कोराडी पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमवली. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना घेऊन आदोलनेही केली. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कोविड मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन केले. त्यामुळे बावनकुळे यांच्यावर प्रशासनाकडून कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बावनकुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले होते.
पटोलेंविरोधात बावनकुळे आक्रमक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील जेवणाळा येथे “मोदींना मी मारू शकतो, मी शिव्या देऊ शकतो,” असे कार्यकर्त्यांसोबत बोलताना म्हटले. तो व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर मोदी म्हणजे नरेंद्र मोदी नव्हे, तर तो गावगुंड मोदी असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.परंतु भाजपने पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी राज्यभर आंदोलने केली. केली. या दरम्यान कोराडी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले होते.