पुणे | सध्या राज्यभर चर्चेत असणारे प्रकरण म्हणजे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण. वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यापासून तर दररोज या प्रकरणी नवनवीन खुलासे होतं आहेत. या संबंधित 12 कथित ऑडिओ क्लिप्स देखील व्हायरल झाल्याने हे प्रकरण अधिकच गूढ होत चाललं आहे. तर, पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना तयार झालेली आहे.
आजचं पूजा चव्हाणच्या जवळच्या नातेवाईक शांताबाई राठोड या म्हणाल्या की, आमच्या पूजाने आत्महत्या केली नाही. पूजाला ज्या यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते तिथेच तिला मारले असावे आणि पुण्यातील बिल्डींगवरून फेकले असावे. असा आम्हाला दाट संशय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पूजा ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. तिने आत्महत्या केली नाही तर तिचा घातच झालाय. असे देखील शांताताई राठोड म्हणाल्या आहेत. आता राठोड यांच्या या वक्तव्यामुळे पूजा चव्हाण यांनी आत्महत्या केली की ती हत्या होती असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.