आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना; गिरीश महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

जळगाव | सध्या राज्यभर कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया तर दिलीच वर एकनाथ खडसे यांना देखील टीकेचे लक्ष केले. महाजन म्हणाले की, राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना आहे.

नुकताच पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस वासी झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांना यापूर्वीही दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक मागणी केली आहे. हा नेमका कोणत्या प्रकारचा कोरोना आहे, यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करावं. हा आमच्या जिल्ह्यातील कोणता कोरोना आहे हे सगळ्यांना कळू द्या अशी मिश्किल टिपण्णी महाजन यांनी केली आहे.

महाजन यांच्या अशाप्रकारच्या मागणीमुळे जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय खडसे विरुद्ध महाजन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जाणीवपूर्वक एकनाथ खडसे यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात होता तर गिरीश महाजन यांना पुढे केले जात होते.त्यामुळे खडसे की महाजन हा वाद तेव्हापासून चर्चेत राहिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like