हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फायनान्सकडून कर्ज आणि इतर वित्तीय सेवा घेत असलेल्यांसाठी मोठी बातमी. खरं तर केरळच्या या फायनान्स कंपनीचा मालक पळून गेला आहे. थॉमस डॅनियल रॉय आणि प्रभा या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांचा पळून गेलेल्यांमध्ये समावेश आहे. त्यानंतर पठाणमथिता पोलिस ठाण्याने पॉपुलर फायनान्सच्या संचालकाविरूद्ध लूक आऊट नोटीस बजावली आहे. ग्राहकांचा असा आरोप आहे की, कंपनी एप्रिलपासून आपल्या ठेवीदारांना व्याज देत नव्हती. या कंपनीचे मुख्यालय पठाणमथिता जिल्ह्यात आहे. राज्यात पॉप्युलर फायनान्सच्या सुमारे 247 शाखा आहेत. गेल्या काही दिवसांपासून कंपनी तोट्यात असल्याचे समजताच कंपनीच्या ग्राहकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
ग्राहकांचे पैसे अडकले
ग्राहकांनी कंपनीत 10,000 ते लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. पण आता त्यांचे पैसे अडकले आहेत. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, पॉप्युलर फायनान्सकडे काही NRI सहित 1500 ठेवीदारांचे पैसे आहेत.
ठेवीदारांचे सुमारे 2000 कोटी रुपयांचे नुकसान झाले
या प्रकरणाचा तपास करणारे कोनी पोलिस स्टेशनचे निरीक्षक पी एस राजेश यांनी सांगितले की, या बोर्डच्या सर्वच संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर कलम 406 (फसवणूक), कलम 420 (बनावट) आणि कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाणमथिता जिल्हा पोलिस प्रमुख केजी सायमन यांनी सांगितले की, गेल्या काही काळापासूनच आमच्याकडे ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. आमच्या अंदाजानुसार ठेवीदारांचे एकूण 2000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.