हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु झाल्यापासून त्यामध्ये पाच मोठे बदल केलेले आहेत. जर त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला फायदा होईल. जे लोक या माहितीची अपडेट ठेवतात त्यांना वार्षिक 6000 रुपये मिळण्यास मदत होते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटी 10 लाख शेतकर्यांची नोंदणी झाली आहे. या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 1 ऑगस्टपासून 2000 रुपयांचा सहावा हप्ता येणे सुरू होईल.
चला तर मग या पंतप्रधान किसान योजनेतील बदल आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात
>> किसान क्रेडिट कार्ड: किसान क्रेडिट कार्ड (केसीसी-किसन क्रेडिट कार्ड) देखील पीएम किसान योजनेला जोडले गेले आहे. हे केले गेले आहे जेणेकरून केसीसी बनविण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होईल. म्हणजेच सरकार ज्याला 6000 रुपये देत आहे त्यांना केसीसीला बनवायला मदतच होईल. सध्या सुमारे 7 कोटी शेतकर्यांकडे केसीसी आहे, तर सरकार लवकरात लवकर आणखी 2 कोटी लोकांना सामील करून त्यांना 4 टक्के दराने 3 लाख रुपयांपर्यंतची कर्ज देऊ इच्छित आहे.
>> पंतप्रधान किसान मानधन योजना: जर एखादा शेतकरी या पंतप्रधान-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी (पीएम किसान मंडळाच्या योजनेसाठी) कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. कारण अशा शेतकऱ्यांचे संपूर्ण कागदपत्र भारत सरकारकडे आहेत. या योजनेंतर्गत शेतकरी पंतप्रधान-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभामध्ये थेट योगदानाचा पर्याय निवडू शकतात. अशा प्रकारे, त्याला थेट त्याच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्याचे प्रीमियम हे 6000 रुपयांमधून वजा केले जाईल.
>> शेतकर्यांना स्वत:च रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा: लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी मोदी सरकारने सेल्फ रजिस्ट्रेशनची पद्धत अवलंबली आहे. तर पूर्वीचे रजिस्ट्रेशन हे लेखपाल, कानूनगो आणि कृषी अधिकारी यांच्यामार्फत करायचे होते. आता जर शेतकऱ्यांकडे महसूल रेकॉर्ड, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक असेल तर तो फामर्स कॉर्नरवर (pmkisan.nic.in) जाऊन स्वत:च रजिस्ट्रेशन करू शकतो.
>> स्वत:च स्टेटस जाणून घेण्याची सुविधाः रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला आहे की नाही, तुमच्या खात्यात किती हप्त्याची रक्कम आली आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आता कोणत्याही कार्यालयात भेट देण्याची गरज नाही. आता कोणताही शेतकरी पीएम किसान पोर्टलला भेट देऊन आधार, मोबाइल आणि बँक खाते क्रमांक देऊन स्टेटसची माहिती मिळवू शकेल.
>> आधार कार्ड अनिवार्यः या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार सुरुवातीपासूनच आधार कार्डची मागणी करत होते. पण याबद्दल फारसा दबाव नव्हता. नंतर मात्र ते अनिवार्य करण्यात आले. योजनेत शेतकऱ्यांना आधार लिंक देण्याची सूट 30 नोव्हेंबर 2019 नंतर वाढविण्यात आली नव्हती. केवळ पात्र शेतकऱ्यांच लाभ मिळावा यासाठी हे केले गेले.
पीएम-किसान योजनेत आधारचे लिंकींग कसे करावे
यासाठी आपल्याला पंतप्रधान किसान योजनेत दिलेल्या बँक खात्यात जावे लागेल. तेथे आधार कार्डची फोटो कॉपी आपल्यासोबत घ्यावी. बँक कर्मचार्यांना आपल्या खात्यास त्यांच्या आधारशी लिंक करण्यास सांगा. आधार कार्डाची फोटो कॉपी आहे तिथे खाली एका ठिकाणी सही करा.
जवळपास सर्वच बँकांमध्ये ऑनलाईन आधार लिंकींगची सुविधा उपलब्ध आहे. जिथून आपण आपला आधार लिंक करू शकता. लिंक करताना, 12 अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक टाइप करा आणि सबमिट करा. जेव्हा आपला आधार आपल्या बँक नंबरशी लिंक केला जाईल, तेव्हा आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठविला जाईल. परंतु यासाठी तुमच्याकडे नेट बँकिंगची सुविधा असावी.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.