व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सत्ता आल्यानंतर मोहन भागवत आणि नरेंद्र मोदींना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही पाहिले मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू”, असा थेट इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूरमध्ये मोठया उत्साहात शस्त्र पूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी भाषण केले. या भाषणावरूनच प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि RSS वर जोरदार टीका केली आहे.

अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी म्हणले की, “मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनातले चांदणे आहेत. संघ आणि नरेंद्र मोदी एकच आहेत. मोहन भागवत म्हणजे नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी म्हणजे मोहन भागवत असे ते समीकरण आहे. भविष्यात आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही नरेंद्र मोदी आणि भागवतांना जेलमध्ये टाकू”

त्याचबरोबर, ‘त्यांनी मणिपूरमध्ये त्यांनी तेच केलं आहे. मुसलमानांच्या संदर्भात त्यांनी तेच केलं, औरंगजेबाचं स्टेट्स ठेवल्यानंतर कारवाई करणारे तेच आहेत. दंगा माजवणारं आरएसएसच आहे. त्यामूळे आरएसएसने लोकांना आधीच सांगितलं की आम्ही दंगली माजवून मतं घेणार आहोत. ही निवडणुकीसाठीची सावरासावर आहे” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

रावण दहन प्रथा थांबवावी….

दरम्यान, रावण दहनाविषयी बोलताना “रावण दहनाला आदिवासींचा विरोध आहे. पूर्वी दक्षिणेत रामदहनाचे कार्यक्रम व्हायचे. परंतु नेहरूंनी मध्यस्थी केल्याने ही प्रथा थांबली. आदिवासींची ही मागणी हिंदुत्ववादी संघटनांना आवाहन आहे की त्यांनी ही प्रथा थांबवावी. रावणदहन कार्यक्रम थांबवण्यासाठी संघानं पुढाकार घ्यावा. धर्म सकारात्मक बाबींवर चालावा, नकारात्मक बाबींवर नव्हे” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.