संजय राऊतांकडून शरद पवार आणि राष्ट्रवादीची पालखी वाहण्याचे काम; दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजपवर निशाणा साधला जात आहार. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. “राऊतांना शिवसेना आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत काही देणेघेणे पडलेले नाही. त्यांच्याकडून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पालखी वाहण्याचे काम केले जात आहे, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

प्रवीण दरेकर यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाईनच्या मुद्यांवरून भाजपवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी दरेकर म्हणाले की, राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्याच्या हितासाठी आहे असे राऊत म्हणत आहेत. मात्र, राऊतांना शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शिवसेना यांच्याबाबत काहीही देणेघेणे पडलेले नाही. ज्या ज्या वेळी भाजप आणि शिवसेना एकत्रित येईल असे वाटते. त्यावेळी राऊत विरोधाभास निर्माण करणारे लिखाण करण्याचे काम करतात.

वास्तविक, राऊतांना शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे पालखी वाहण्याचे काम करत आहेत. कोरोनाचे प्रश्न आहेत. अशीबाबत बोलण्यापेक्षा संजय राऊत हमारी तुमरीची विधाने करत आहेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ यांच्याकडून टीका केली जातेय, याकडे फारसे लक्ष देण्याची गरज वाटत नसल्याचे दरेकर यांनी सांगितले.