हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत लॉकडाऊनच्या वेळी केवळ 2.51 कोटी प्रवासी कामगारांनाच धान्य वाटप केले आहे. ग्राहक व अन्न मंत्रालयाच्या मते अन्नधान्याचे कमी वितरण केल्यामुळे प्रवासी मजुरांची वास्तविक संख्या खूपच कमी होती. लॉकडाऊन झाल्यापासून केंद्र सरकार रेशनकार्ड नसलेल्यांना मोफत शिधा देत आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत ही योजना सुरू केली गेली होती, परंतु लोकांना या योजनेची पूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळत नाही आहे. मात्र, अर्ज करूनही रेशन मिळत नसल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेंतर्गत कोठेही रेशनकार्ड नसलेल्या देशातील स्थलांतरितांना मोफत रेशन दिले जाते. त्याअंतर्गत, प्रत्येक सदस्याला दरमहा पाच किलो तांदूळ किंवा गहू आणि प्रत्येक कुटुंबासाठी एक किलो हरभरा डाळ देण्यात येणार आहे.
ही योजना लॉकडाऊन दरम्यान सुरू करण्यात आली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या या लॉकडाऊनच्या वेळीच गरीब कल्याण अन्न योजनेच्या (PMGKAY) मुदतवाढीस मान्यता देण्यात आली. अलीकडेच केंद्र सरकारने PMGKAY अंतर्गत 81 कोटीहून अधिक लोकांना नोव्हेंबर 2020 पर्यंत धान्य देण्याची घोषणा केली होती. तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत त्यांनाही रेशन दिले जात आहे. मात्र ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांच्याकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत गुलाबी, पिवळ्या आणि खाकी शिधापत्रिकाधारकांना प्रति सदस्य 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबासाठी एक किलो डाळ मोफत देण्यात येईल.
रेशन न दिल्यास कडक कारवाई केली जाईल
अशा परिस्थितीत कोणत्याही कार्डधारकांना नि: शुल्क रेशन मिळण्यास अडचण येत असेल तर ते संबंधित जिल्हा अन्न व पुरवठा नियंत्रक कार्यालयात किंवा राज्य ग्राहक सहाय्य केंद्रावर त्याबाबत तक्रार करू शकतात. यासाठी सरकारने 1800-180-2087, 1800-212-5512 आणि 1967 हे टोल फ्री क्रमांक सुरु केलेले आहेत. या नंबरवर ग्राहक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. अनेक राज्य सरकारांनी स्वतंत्रपणे हेल्पलाइन क्रमांक देखील सुरु केलेले आहेत.
उल्लेखनीय हे आहे की पीएम मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटले होते की, या गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत देशातील ज्या गरीब कुटुंबांकडे रेशनकार्ड आहे किंवा नाही, त्यांना 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो हरभरा मोफत देण्यात येईल. सुरुवातीला त्याचा कालावधी 30 जूनपर्यंत निश्चित करण्यात आला होता, तो आता नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. असे असूनही अनेक गरीब मजुरांना हे रेशन मिळालेले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.