हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या व्हॅलेंटाईन डेची जोरदार तयारी सर्वत्र सुरू आहे. व्हॅलेंटाईन वीक सुरू झाल्याने प्रेमीयुगुलांसाठी आठवड्यातील सात दिवस खूप खास आहेत. कारण या वीकमध्ये अनेक प्रकारे प्रेमी युगुल एकमेकांना वचन, भेटवस्तू देतात. या दिवसांमध्ये अनेक लव्ह स्टोरी बनतात तर काही लव्हस्टोरींना दिशा मिळते. आज या विकमधील एक महत्वाचा दिवस तो म्हणजे प्रपोज डे होय. यानिमित्त आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील लोकप्रिय अशा नेत्याच्या लव्हस्टोरीबाबत सांगणार आहोत. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस होय. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिल्याच भेटीत लग्न करण्याचा निर्णय घेतला. जाणून घेऊया अनोखी लव्हस्टोरीबद्दल…
भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लव्हस्टोरी खास आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात अमृता त्यांना तितकीच मोलाची साथ दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या नागपूरस्थित प्रसिद्ध डॉक्टर चारू रानडे आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या आहेत.
अमृता फडणवीस यांनी नागपूरच्या जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण पुण्यातील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून केले. येथून अमृता फडणवीस यांनी एमबीएची पदवी घेतली. अमृता फडणवीस या गेल्या 17 वर्षांपासून बँकेत सेवेत आहेत.
https://www.instagram.com/p/B4-BLmAjA0U/?utm_source=ig_web_copy_link
तर दुसरीकडे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अविवाहित राहून संघाचे कार्य करायचे ठरवले होते. देव देश आणि धर्म यासाठी आयुष्य वेचायचे ठरवले होते. पण त्यांच्या आईला हा निर्णय मान्य नव्हता. त्यांनी देवेंद्रना हा निर्णय बदलायला सांगितले. मग मात्र वयाच्या एका टप्प्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
https://www.instagram.com/p/CgTo1rkLJGt/?utm_source=ig_web_copy_link
आईने फर्मान सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच वधू संशोधन सुरु झालं आणि योगायोग म्हणजे अमृता आणि देवेंद्र त्यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी पहिल्यांदा भेटले. अमृता फडणवीस यांना पाहता क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग पुढाकार घेत देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. साधारण एक तासभर दोघांच्यात अनेक विषयावर बोलने झाले. एकमेकांना समजून घेतल्यानंतर दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.
https://www.instagram.com/p/CbPXaVIh4ga/?utm_source=ig_web_copy_link
फडणवीसांना आवडायची ‘ही’ अभिनेत्री?
खरं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांची काजोल हि आवडती अभिनेत्री होती. त्यांना अमृतामध्ये तिचा भास झाला. त्यांनी तसं सांगितलं पण. मग अनृत आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. पुढे 2005 साली डिसेंबरमध्ये त्यांनी नागपूरच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये लग्न केले.
अमृता फडणवीस देवेंद्रजींना प्रेमाने मारतात ‘या’ नावाने हाक
एकमेकांशी तासभर बोलल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडत लग्न करणाऱ्या या दोघांची लव्हस्टोरी खूप खास अशी आहे. जेव्हा लग्न झाले तेव्हा सुरुवातीला अमृता देवेंद्र फडणवीस यांना सर अशी हाक मारत. मग काही दिवसांनी त्यांना प्रेमाने देवेन असे म्हणू लागल्या.