“जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही”, राहुल गांधींचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल

नवी दिल्ली वृत्तसंस्था: लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे ट्विटरवर नेहमी सक्रिय असतात ते ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारला सतत प्रश्न करत असतात. लसीकरणाच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर टीका केली आहे. ‘लस घेण्याचा अधिकार इंटरनेट नसणाऱ्यांचाही आहे’ असं ते म्हणाले आहेत.

लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता असते याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की कोरोना लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रत्येकाला मदत मिळायला हवी. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता नसावी कारण जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही.

देशातील सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना चे चित्र पाहायला मिळत आहे. पण तिसऱ्या लाटेचा धोका देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे त्यामुळं लसीकरण हे गरजेचे बनले आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देखील लसीकरणाच्या ऑनलाईन नोंदणीच्या आवश्यकतेवर आक्षेप घेतला होता. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की नियोजन करणाऱ्यांना सत्य परिस्थितीची जाणीव असायला हवी. काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी अठरा वर्षांपुढील सर्वांना लसीकरण मोफत केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.

You might also like