मुंबई : जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं. त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे असं म्हणत ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे ह्यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते. हेच वाझे शिवसेनेत होते आणि मुकेश अंबानी आधी उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत. आणि त्यांच्या घराबाहेर बॉम्बची सापडते आणि ती गाडी पोलिसानी ठेवली असा आरोप आहे. मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली ह्याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा असं राज म्हणालेत.
दरम्यान, सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत. ह्यात आत्ता नको पडूया. ह्याची चौकशी व्यवस्थित होऊद्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील.पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या असं म्हणत राज यांनी सदर घटनेच्या मुळात जाणं गरजेचं असल्याचे म्हटले आहे.