तुमच्या अंगावर एक तरी केसेस आहे का?; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा तर पवारांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “माझ्या अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्रातूनच पहिल्यांदा विरोध झाला. मी अयोध्येला गेलो असतो तर माझ्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले असते. म्हणून मी गेलो नाही. आमच्या मनसे सैनिकांनी आंदोलने केली. मात्र, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? हे सत्तेत इतके मश्गूल आहेत की यांना कशाची पर्वा नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. तर शरद पवार यांना टोला लगावला.

आज राज ठाकरे यांनी पुण्यात जाहीर सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की, परवा मुख्यमंत्री म्हणाले, संभाजीनगरचे नामांतर झालं, नाही झालं फरक पडत नाही. मी बोलतोय ना. तू कोण आहेस? मी बोलतोय याला काय लॉजिक आहे? इतकी वर्ष केंद्रात सरकार होते. आजपर्यंत संभाजीनगरचा प्रश्न मिटवला का? कारण तो सतत निवडणुकांसाठी जिवंत ठेवायचा आहे. याच गोष्टी फक्त यांना करायच्या आहेत. मुंबईत बॉलिवुडमध्ये पाकिस्तानी कलाकार येत होते. या देशातून हाकलून दिले त्यांना.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1193816048107580

 

कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे? जेव्हा रझा अकादमीच्या लोकांनी मोर्चा काढला आणि पोलीस भगिनींना घोळका करून त्यांच्या अब्रूवर हात घालण्यात आला. बाहेरचे मुसलमान तिथे आले होते. त्याच्याविरोधात फक्त मनसेनं मोर्चा काढला. बाकी कुणी नाही काढला. कोणतं हिंदुत्व बोलताय तुम्ही? उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सांगावी की तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

निवडणुका नाहीत मग उगीच कशाला भिजत भाषण करायचं

यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला. ते म्हणाले की, आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसतायत. मी म्हटलं निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करायांचे, असा टोला राज ठाकरेंनी पवारांना लगावला.

शरद पवार बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलीटी घालवतायत

शरद पवार म्हणतात की, आज महाविकास आघाडी सरकार पाहिल असत तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. पवारांना एकच सांगतो कि तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडिबिलीटी घालवत आहेत. ते म्हणतात कि, आम्ही सकाळी मोडायचो आणि रात्री जेवायला एकत्र बसायचो. शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाहीये की कुणाबरोबर राहत आहेत. लोकांना वाटेल यांचे खोट खोट भांडण चालायच. पण हे लोक सत्तेत मश्गुल असल्याने यांना कशाच काही वाटत नाही’, असे राज ठाकरे यांनी म्हंटले.

मोदींकडे केल्या तीन विनंत्या –

यावेळी राज ठाकरेंनी पंतप्रधानांना विनंती केली. ते म्हणाले की, मोदींनी लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. देशाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी अजून एक कायदा आणावा आणि तिसरी विनंती म्हणजे औरंगाबादचं लवकरात लवकर संभाजी नगर हे नाव बदलून टाकावे, अशा विनंत्या राज ठाकरे यांनी केल्या.

बृजभुषण सिंहकडून चुकीचा पायंडा…

अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदार बृजभुषण सिंह यांच्याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, राम जन्मभुमीचं दर्शन मला घ्यायचं होतं, मात्र त्याबरोबरच कारसेवकांचे मृत्यू ज्याठिकाणी झाले होते, तिथे देखील भेट द्यायची होती. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, हे शक्य नाही. या सर्व गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. मला त्यातले अनेक पापुद्रे सांगू देखील शकत नाही. 14 वर्षानंतर माफी मागितली नाही तर येऊ देणार नाही असं म्हणणं म्हणजे चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच असेल तर गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाचा गृहस्थ आहे. एका बलात्कार प्रकरणानंतर गुजरातमधून त्यांना हाकलून देण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार? वास्तविक आपले हिंदुत्व, आपले लाऊड स्पीकर यांना झोंबले असल्याची टीका राज ठाकरेंनी सिह यांच्यावर केली.

Leave a Comment