हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. त्या संदर्भात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याशी चर्चा झाल्याचे,”असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे. जलील यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत मंत्री टोपे यांनी माहिती दिली. “जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला, त्यांच्या एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील,” असे टोपे यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी जालना येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमच्यात व जलील यांच्यात काही दिवसांपूर्वी चर्चा झाली हे खरे आहे. मी जलील यांच्या घरी गेलो होता. दोघांच्यात यावेळी अनेक मुद्यांवर चर्चाही झाली. यावेळी जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला.
आता जलील यांनी ठेवलेलया प्रस्तावाबाबत आम्ही अद्यापतरी निर्णय घेतलेला नाही. जलील यांच्यासोबत झालेल्या गप्पांवेळी मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षां सोबत आम्ही यायला तयार आहोत, असे जलील यांनी म्हंटले. त्यांच्या या प्रस्तावाबाबत पक्षातील वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील, असे टोपे यांनी सांगितले.
संजय राऊत आमची पार्टी तुमच्यासारखी नाही, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फक्त राजकारणासाठी वापर करता. तुमच्यापेक्षा आम्ही त्यांचा जास्त आदर करतो, असेही यावेळी जलील यांनी म्हंटले.