मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा मानला जाणारा मंत्री मंडळ विस्तार येत्या १४ जूनला पार पडण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली असून या मंत्रिमंडळ विस्तारत रणजितसिंह मोहिते पाटील यांना राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना आज मुंबईला मंत्रालयात भेटायला बोलावले होते. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असले तरी रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मंत्री मंडळातील सहभाग निश्चित मानला जात आहे.
विजयसिंहांना मंत्रिपद नाही तर ‘हे’ पद दिले जाणार
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. त्यांनी या आधी एक वेळा विधान परिषदेत तर एकवेळा राज्यसभेत प्रतिनिधित्व केले आहे. तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.
ठरलं ! या दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार ?
लोकसभा निवडणुकीत माढामतदारसंघात राष्ट्रवादीला पराभूत करण्यात मोहिते पाटील कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करून घेतला जात आहे असे बोलले जाते आहे. २००९ सालापासून होत असलेल्या सततच्या खच्चीकरणाला कंटाळून मोहिते पाटील राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मंत्री मंडळात समावेश करून विजयसिंह मोहिते पाटील यांची राज्यपाल पदी नेमणूक केली जाण्याची देखील शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
मंत्री पद कस मिळवायचं हे माझ्याकडून शिकून घ्या : रामदास आठवले
भाजपच्या या खासदाराची लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड
भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या ‘या’ मतदारसंघात होत आहे नव्या उमेदवाराची मागणी
तासगाव विधानसभेला ‘या’ नेत्याला निवडून देण्याचे खा. संजय पाटील यांनी केले आवाहन
भाजपच्या कार्यकर्त्याचा सांगलीत खून
पवारांनी RSS चे कौतुक केल्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे म्हणतात….
अमोल कोल्हेंनी केली राज्य सरकारवर सडकून टीका
शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक