हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी रेशन कार्ड हे एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. विशेषत: अशा वेळी जेव्हा लॉकडाऊनमुळे कोणताही गरीब भुकेला राहू नये यासाठी केंद्र सरकार या कार्डांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धान्य वाटपाचे काम करीत आहे. याशिवाय अनेक सरकारी योजनांमध्येही रेशनकार्ड असणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत हे महत्वाचे डाक्युमेंट नेहमीच अपडेट केली जाणे आवश्यक आहे जेणेकरुन सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. नुकतीच केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. त्याच्या अंमलबजावणीनंतर कोणत्याही शिधापत्रिकाधारकास देशातील कोणत्याही राज्यातून रेशन मिळू शकेल.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की जर आपल्या कुटूंबातील एखाद्या सदस्याचे नाव रेशनकार्डमध्ये अपडेट करायचे राहिले असेल तर ते घरी बसून कसे अपडेट करायांचे. रेशन कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाइनद्वारे अपडेट केले जाऊ शकतात.
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल?
१. जर तुम्हाला या कार्डमध्ये आपल्या मुलाचे नाव जोडायचे असेल तर कुटुंबप्रमुखाचे रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे. त्याची एक फोटोकॉपी आणि ओरिजिनल कॉपी असावी. याशिवाय मुलाचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्डदेखील असले पाहिजेत.
२. घरात लग्नानंतर आलेल्या सूनेचे नाव रेशनकार्डमध्ये जोडायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे त्या सुनेचे आधार कार्ड, विवाहाचे प्रमाणपत्र, नवर्याच्या रेशनकार्डची फोटोकॉपी आणि ओरिजिनल कॉपी असावी. याशिवाय तिच्या पालकांच्या घरी असलेल्या रेशनकार्डमधून नाव काढून टाकलेले प्रमाणपत्रही असले पाहिजे.
ही माहिती घरी ऑनलाइन अपडेट कशी करावी?
>> रेशनकार्डमधील कोणतीही माहिती अपडेट करण्या संबंधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. पहिल्यांदा, आपल्याला या वेबसाइटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल, जो काही मिनिटांतच पूर्ण होईल.
>> लॉगिन नंतर आपल्याला या वेबसाइटच्या होमपेजवर नवीन सदस्याचे नाव जोडण्याचा पर्याय असेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन फॉर्म उघडेल.
>> या फॉर्ममध्ये आपल्याला कुटुंबातील नवीन सदस्यांची संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
>> पुढील फॉर्ममध्ये या फॉर्मसह तुम्हाला वरील सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपीदेखील अपलोड करावी लागेल. यानंतर फॉर्म भरावा लागेल.
>> फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांक मिळेल, ज्याद्वारे तुम्ही या वेबसाइटवर लॉग इन करून फॉर्मला ट्रॅक करू शकता.
>> हा फॉर्म आणि कागदपत्रे यांची अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जातील. जर आपण दिलेली सर्व माहिती योग्य असेल तर हा फॉर्म स्वीकारला जाईल आणि रेशन कार्ड आपल्या पत्त्यावर पोस्टद्वारे पाठविले जाईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.